Tag: Central Gov
Dearness allowance | महागाई भत्त्याची फाईल मोदी मंत्रिमंडळात पोहोचली | आता केव्हाही जाहीर होऊ शकते | जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट
वर्षभरात दुसऱ्यांदा महागाई भत्त्यात वाढ होणार आहे
महागाईचा स्तर लक्षात घेऊन महागाई भत्ता वाढतो
52 लाख कर्मचारी आणि 63 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे
New Wage Code | नवीन कामगार संहिता, वेतन डीकोड केलेले – मसुदा तयार | कधीही लागू होऊ शकतो | संपूर्ण अहवाल वाचा
APY: अटल पेन्शन योजनेत मोठा बदल | हा नवा नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होईल | जाणून घ्या काय परिणाम होईल
सरकारने “रेशन कार्ड मित्र” पोर्टल सुरू केले | जाणून घ्या लाभ कसा मिळवायचा
11 राज्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे
काय आहे रेशन मित्र अॅप?
वन नेशन, वन कार्ड
वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचे फायदे
रेशन मित्र अॅप कसे डाउनलोड करावे.
रेशन मित्र पोर्टलचे फायदे
8 वा वेतन आयोग येणार की नाही? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण
नवीन वेतन मेट्रिक्सचे पुनरावलोकन केले जाईल
कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ?
तुम्हाला किती फायदा होईल?
मंकीपॉक्सची लस देशात बनणार | आदर पूनावाला | सीरम इन्स्टिट्यूटची तयारी काय आहे?
देशात मंकीपॉक्सची आठ प्रकरणे
सरकारने निविदा काढल्या
टास्क फोर्सची स्थापना
मंकीपॉक्स म्हणजे काय
मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत
5G स्पेक्ट्रमच्या शर्यतीत कोण चॅम्पियन बनले?
7 दिवसांच्या लिलावात सरकारला ₹1.50 लाख कोटी मिळाले
5G सेवा कधी सुरू होईल
या फ्रिक्वेन्सी बँडचा लिलाव केला जात आहे
राज्य के शक्कर आयुक्त, प्रधान सचिव की जांच की जाए
: राष्ट्रीय किसान संगठन की केंद्र सरकार से गुहार
पेट्रोल-डीझेल का स्वस्त झाले?
नवी दिल्ली – देशात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल -डिझेलच्या किंमतीनं उच्चांक गाठला होता. अनेक राज्यांत पेट्रोलचे दर १२० रूपयांच्या पुढे गेले होते. तर डिझेलचे दरही १०० रूपयांवर पोहोचले होते. परंतु दिवाळीच्या तोंडावर सरकारनं देशवासीयांना दिलासा देत उत्पादन शुल्कात (excise duty) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर ५ रूपयांनी तर डिझेलचे दर हे १० रूपयांनी कमी होणार आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर पोटनिवडणुकांच्या निकालाचा हा परिणाम असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालांतून अनेक राज्यांत प्रादेशिक पक्षांचा करिश्मा कायम दिसला आहे. तर, जिथे ते नाहीत, तिथेच भाजप व काँग्रेस यांच्यात सामना झाला आणि काही प्रमाणात काँग्रेसला यश मिळू शकले, असेही स्पष्ट झाले. एकंदरीत पोटनिवडणुकीत भाजपची चांगलची पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं. देशभरातील वाढती महागाई, इंधन दरवाढ यास जनता कंटाळल्यामुळे भाजपला पराभवाचा फटका बसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. त्यातच, पोटनिवडणुकांच्या निकालाच्या दुसऱ्याचदिवशी केंद्र सरकारने जनतेला दिवाळी गिफ्ट दिलंय.
मोदी सरकारने उत्पादन शुक्लात कपात केल्यामुळे पेट्रोल 5 आणि डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, हा पोट निवडणूक निकालांचा परिणाम असल्याची खोचक टीका दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केली आहे. स्वाती यांनी ट्विट करुन, जनतेनं मोदी सरकारला दिलेल्या रिटर्न गिफ्टचा हा परिणाम असल्याचं म्हटलं आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान व हिमाचल प्रदेश व कर्नाटक या राज्यांत मात्र काँग्रेस व भाजप थेट सामने झाले. त्यापैकी राजस्थानातील दोन, हिमाचल प्रदेशातील तीन व मध्य प्रदेशातील एक अशा सहा जागा काँग्रेसने जिंकल्या वा स्वत:कडे ठेवल्या. कर्नाटकातील एक जागाही काॅंग्रेसने मिळवली. भाजपने मध्य प्रदेशातील तीन व आसामच्या पाचही जागा जिंकल्या. मेघालयच्या तिन्ही जागांवर सत्ताधारी पक्षाने विजय मिळविला.
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला झटका
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला मोठाच धक्का बसला मंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार व माजी मुख्यमंत्री स्व. वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी विजय मिळविला. विधानसभेच्या जागाही काँग्रेसने जिंकल्या. यापैकी भाजपने जुब्बल-काेटखाई जागा गमावली.
राजस्थानमध्ये काँग्रेस
राजस्थानचमध्ये दोन्ही जागा काँग्रेसने सहजच जिंकल्या. त्या दोन्ही जागा याआधीही काँग्रेसकडेच होत्या. त्या मिळवण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली होती.
मध्य प्रदेशात भाजपचे नुकसान
मध्य प्रदेशमध्ये भाजपने विधानसभेच्या दोन जागा जिंकल्या, तर एक जागा काँग्रेसने मिळवली. खंडवा लोकसभेची जागाही भाजपने राखली आहे. ज्ञानेश्वर पाटील यांनी ८५ हजारांहून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळविला.
कर्नाटकमध्येही पिछेहाट
कर्नाटकमध्ये भाजपला दोनपैकी एका जागेवर विजय मिळवता आला. सिंदगी येथे भाजपचे रमेश भुसानूर यांनी विजय मिळविला, तर हंगलमधून भाजपचा पराभव करून काँग्रैसचे श्रीनिवास माने विजयी झाले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या जिल्ह्यातील हा मतदारसंघ आहे.
कृषी कायद्याच्या विरोधात कौल
हरयाणाच्या एलनाबादमधून भारतीय लोकदलाचे अभय चौटाला विजयी झाले. कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिबं देण्यासाठी त्यांना आमदाराकीचा राजीनामा दिला होता. पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराला पराभूत करून ते पुन्हा निवडून आले.