NCP Vs Governor | Pune | काळे मन हेच भाजपचे अंतर्मन! | अशा घोषणा देत राष्ट्रवादीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

काळे मन हेच भाजपचे अंतर्मन! | अशा घोषणा देत राष्ट्रवादीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे शहर (NCP Pune)  यांच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)  यांच्या विरोधात सावरकर पुतळा सारसबाग येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP City president Prashant Jagtap)  म्हणाले की,”राज्यपाल पदावर असणाऱ्या व्यक्तीने त्या संबंधित राज्याची संस्कृती, लोकभावना यांबाबत आदर बाळगणे अपेक्षित असते. परंतु विद्यमान राज्यपाल वारंवार महाराष्ट्र व महाराष्ट्रातील आदरणीय व्यक्तीमत्त्वांबाबत अवमानास्पद वक्तव्ये करीत आहेत. ही अतिशय गंभीर व संतापजनक बाब आहे.छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाराष्ट्रातील थोर व्यक्तींवर वारंवार गरळ ओकण्याचे काम राज्यपाल करीत आहेत. यातून त्यांच्या पुर्वाश्रमीच्या पक्षाचा महाराष्ट्र द्वेषी अजेंडा ते राबवित आहे. किंबहुना ते महाराष्ट्र भाजपाचे कार्यकर्ते म्हणूनच काम करीत आहेत. ” ते पुढे म्हणाले की, “राज्यपाल महाराष्ट्राचा वारंवार अपमान करीत आहेत व त्याला भाजप प्रोत्साहन देत आहेत.”(NCP against Governor Bhagat singh koshyari)

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी तर एका वृत्तवाहिनीवर बोलताना छत्रपतींनी ओरंगजेबाची पाच वेळा माफी मागीतली होते असे नीच व अवमानकारक वक्तव्य केले. या वक्तव्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली. सत्तेसाठी साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांचे तळवे चाटण्याची ही अतिशय लाचार प्रवृत्ती असून कोणताही स्वाभिमानी मराठी माणूस हे सहन करणार नाही. आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांचा निषेध करीत आहे.शिवरायांचा अवमान ही भाजपाची मॅच फिक्सिंग असा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केला.‌ (NCP Vs BJP)

या आंदोलनात यावेळी
“छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधींचा जयजयकार करण्यात आला ”
“भगतसिंग कोशियारी
नही चलेंगी होषीयारी”
“काळी टोपी
“काळे मन हेच भाजप चे अंतरमन”
“भाज्यपाल हटावो महाराष्ट्र बचावो”
“सुधांशु त्रिवेदीचा धिक्कार असो “अश्या धोषणा देण्यात आल्या

सदर प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, संतोष नांगरे ,प्रिया गदादे , किशोर कांबळे , वनराज आंदेकर , महेश शिंदे ,बाबा पटील , मुणालीनी वाणी, श्वेता होनराव , पार्थ मिठकरी , गणेश मोहीते, मनाली भिलारे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Agitation by NCP Pune)

Security of the statue of Shivaji Maharaj : पालिकेतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र सुरक्षा रक्षक नेमा

Categories
Breaking News PMC social पुणे

पालिकेतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र सुरक्षा रक्षक नेमा

: शिवाजीनगर पोलिसांची महापालिकेला सूचना

पुणे : पुणे महानगरपालिका मुख्य इमारतीच्या आवारातील उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठीत पुतळा बसवण्यात आला आहे. सिंहासनाधिष्ठित पुतळा सुरक्षिततेसाठी दिवस व रात्री याप्रमाणे २४ तास सुरक्षा रक्षक नेमणे आवश्यक आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची आवश्यकता आहे. अशी सूचना शिवाजीनगर पोलिसांनी महापालिकेला केली आहे. याबाबत पोलिसांनी महापालिकेला पत्र दिले आहे.
: जिल्हाधिकाऱ्यांनी घातल्या होत्या अटी

पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनी पुतळा बसविणेकामी दिलेल्या अर्टीचे अवलोकन केले असता नमुद अटींमध्ये  “छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांचा सिहासनाधिष्ठित पुतळा उभारण्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवनार नाही, याची जबाबदारी आयुक्त, पुणे महानगरपालिका पुणे यांची राहिल” तसेच “छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा सिहासनाधिष्ठित, पुतळा यांचा सुरक्षिततेच्या अनुषंगाने आयुक्त पुणे महानगरपालिका, पुणे यांनी स्वखर्चाने पुरेशा संरक्षक भिंतीसह सुरक्षित व उंच चतुतऱ्यावर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा सिहासनाधिष्ठित पुतळा उभारावा, तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळयाच्या सभोवतालाचा परिसर दृष्टीक्षेपात येईल अशा रितीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन घेवुन छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा सुरक्षिततेसाठी दिवस व रात्री याप्रमाणे २४ तास सुरक्षा रक्षक नेमणे आवश्यक आहे”. असे नमुद करण्यात आलेले आहे.

तसेच पुतळा परिसर येथे विविध पक्ष संघटना यांनी एकत्र येवुन स्थानिक वाद अथवा जातीय तपणाव वाढवणे अशी संभाव्य कृत्ये टाळण्यासाठी सदर पुतळा परिसराचे १०० मिटरच्या त्रिज्येच्या परिसरात कोणताही सांस्कृतिक अथवा अन्य कार्यक्रम आयोजित करणेस कोणत्याही संस्था/संघटना/पक्ष/व्यक्ती/व्यक्ति समुदाय यांना कायदा व सुव्यवस्था या कारणास्तव परवानगी देण्यात येवू नये हि विनंती. तरी वर नमुद प्रमाणे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या उक्त अटी व शर्ती प्रमाणे आपण आपले पुणे मनपा कार्यालय आवारातील छत्रपती श्री शिवाजी महाराज, यांचे पुतळयाचे अनुषंगाने भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवु नये याकरीता सदर ठिकाणी योग्य प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येवुन, पुतळयाचे सुरक्षिततेसाठी दिवस व रात्री २४ तास आपले कडील सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे. असे पोलिसांनी पत्रात म्हटले आहे.

Shivsena : पुणे शहर शिवसेनेतर्फे बंगळुरू येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध..

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शिवसेनेने कर्नाटक सरकारच्या एसटी बसेसवर भगव्या रंगाने “छत्रपती शिवाजी महाराज की जय” लिहून बस केल्या रवाना…

: पुणे शहर शिवसेनेतर्फे बंगळुरू येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध..

पुणे (प्रतिनिधी): कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराचे पडसाद राज्यभरात उमटण्यात येत असून पुण्यात देखील शिवसेनेच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. पुणे शहर शिवसेनेच्यावतीने कर्नाटकच्या अनेक बसेसना भगव्या रंगाने “छत्रपती शिवाजी महाराज की जय” लिहून व जयजयकार करून पुण्यातून कर्नाटकला राज्यात पाठवल्या आल्या. स्वारगेट परिसरातील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहासमोरिल खाजगी बस पार्किंगमध्ये उभ्या असणार्‍या कर्नाटक डेपोच्या अनेक एसटी बसेसला काळे फासत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, असंघटित कामगार सेनेचे अनंत घरत, उपशहरप्रमुख बाळासाहेब मालुसरे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, विभागप्रमुख सुरज लोखंडे, अशोक हरणावळ, मनीष जगदाळे, युवा सेनेचे युवराज पारीख, श्रीनाथ विटेकर, प्रसाद काकडे, विजय जोरी, संदीप गायकवाड, चंदन साळुंके, हर्षद ठकार, मुकेश दळवे, दिलीप पोमान, नंदू येवले, नितीन रावलेकर, राजेश मांढरे, गणी पठाण, सागर साळुंके उपस्थित होते.

संजय मोरे म्हणाले की, गेल्यावर्षी बेळगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवला होता. कन्नड संघटना आणि कर्नाटक सरकारकडून वारंवार मराठी भाषिकांनाही डिवचण्याचा प्रयत्न वारंवार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना बंगळुरूत करण्यात आली. तेथील भाजप सरकारचा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा द्वेष हा वारंवार जाहीर होत आहे. निवडणूका जवळ आल्या की भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होते. निवडणूकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच मते मागायची, निवडून यायच आणि नंतर शाई फेकायची. हि यांची निती आहे. हे आता बंद झाले पाहिजे. पुणे महापालिकेची निवडणूक आली असल्यामुळे भाजप उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमीपूजन करत आहेत. पाच वर्षापूर्वी पुतळा बसविण्याची घोषणा करून पुढच्या निवडणुकीसाठी भूमीपूजन केले जात आहे. शिवसृष्टी विषयी तोंडातून ब्र पण काढत नाहीत. भाजप पुणेकरांची अजून किती फसवणूक करणार आहेत? अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी संजय मोरे यांनी दिली.