Chitrashrusthi | काँग्रेस पक्षाने देश उभारण्याचे काम अनेक वर्ष केलं परंतु गेली आठ वर्ष भाजपाने देश विकण्याचे काम केलं | नानाभाऊ पटोले

Categories
Breaking News cultural Political पुणे

काँग्रेस पक्षाने देश उभारण्याचे काम अनेक वर्ष केलं परंतु गेली आठ वर्ष भाजपाने देश विकण्याचे काम केलं | नानाभाऊ पटोले

काँग्रेस पक्षाने देश उभारण्याचे काम अनेक वर्ष केलं. परंतु गेली आठ वर्ष भाजपाने देश विकण्याचे काम केलं. यांची जाणीव सर्व नागरीकांनी विशेषता युवकांनी ठेवली पाहिजे. इतिहासाची मोडतोड करण्याचे काम भाजपचे नेते करत आहे. अप्रचार करत आहे. या अप्रचाराला रोखण्यासाठी अशा प्रकारे चित्रसृष्टीचे निर्माण करणे आवश्यक आहे. हे काम आमचे कार्यसम्राट नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी अशा शब्दात अविनाश बागवे यांचे कौतुक केले.

स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी ७५ व्या वर्षानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरु मार्ग, भवानी पेठ या ठिकाणी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जीवनावर आधारीत चित्रसृष्टी काँग्रेस पक्षाचे मा. नगरसेवक अविनाश रमेशदादा बागवे यांच्या वतीने निर्माण करण्यात आली. या चित्र सृष्टीचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते झाले.

या कार्यक्रमाला त्यांच्या समवेत राज्याचे माजी गृह राज्यमंत्री रमेशदादा बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहनदादा जोशी तसेच शहराध्यक्ष अरविंद शिंदे, भोर मतदारसंघाचे आमदार संग्रामदादा थोपटे, पुरंदर मतदारसंघाचे आमदार संजय जगताप, सौ सुरेखाताई खंडाळे, विठ्ठलजी थोरात व अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला पार पडला.

यावेळी बोलताना नानाभाऊ पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षाने देश उभारण्याचे काम अनेक वर्ष केलं परंतु गेली आठ वर्ष भाजपाने देश विकण्याचे काम केलं यांची जाणीव सर्व नागरीकांनी विशेषता युवकांनी ठेवली पाहिजे. इतिहासाची मोडतोड करण्याचे काम भाजपचे नेते करत आहे. अप्रचार करत आहे. या अप्रचाराला रोखण्यासाठी अशा प्रकारे चित्रसृष्टीचे निर्माण करणे आवश्यक आहे. हे काम आमचे कार्यसम्राट नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक अविनाश बागवे यांनी केले होते. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल थोरात व सूत्रसंचालन अरुण गायकवाड यांनी केले.

यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक उपस्थित होते.