Dearness Allowance (DA) | मनपा कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता (DA) देण्याबाबतचे परिपत्रक जारी  |  फरकासह महागाई भत्ता नोव्हेंबर पेड इन डिसेंबर च्या वेतनातून दिला जाणार 

Categories
Breaking News PMC पुणे

मनपा कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता (DA) देण्याबाबतचे परिपत्रक जारी

|  फरकासह महागाई भत्ता नोव्हेंबर पेड इन डिसेंबर च्या वेतनातून दिला जाणार

पुणे | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता (Dearness Allowance) अदा करण्यात येतो. 1 जुलै पासून महागाई भत्ता 4% ने वाढवून तो 38% इतका करण्यात आला आहे. त्यानुसार मनपा कर्मचाऱ्यांनाही (PMC Pune employess) याचा लाभ मिळणार आहे. याला आयुक्तांनीही मंजूरी दिली आहे. याबाबतचे परिपत्रक (Circular) येणे बाकी होते. मुख्य वित्त व लेखा विभागाकडून हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. याचा लाभ कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर पेड इन डिसेंबर (November paid in December) च्या वेतनात मिळेल. असे महापालिका प्रशासनाकडून (PMC Official) सांगण्यात आले. तर सेवानिवृत्त सेवकांना डिसेंबर पेड इन जानेवारी च्या वेतनात अदा होईल.

पुणे महानगरपालिका अधिकारी / सेवकांना दिनांक ०१.११.१९७७ पासून मे. केंद्र शासनाचे सेवकांप्रमाणे महागाई भत्ता देण्यास तसेच त्या मध्ये वेळोवेळी होणारे बदल जसेच्या तसे लागू करण्यास मनपा मुख्य सभा ने २३.१२.१९७७ ला धोरणात्मक मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार वेळोवेळी कार्यवाही करण्यात येत आहे.  सद्यस्थितीत दिनांक ०१/०१/२०२२ पासुन ३४% दराने महागाई भत्ता आदा करण्यात येत आहे. ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी  महागाई भत्त्याचा दर दिनांक ०१/०७/२०२२ पासुन ३४% वरून ४% ने वाढवून ३८% इतका करण्यात आलेला आहे. (Pune Municipal corporation)

हा ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित दर ४% वाढवून ३४% वरून ३८% इतका करणेत आला आहे. सदरचा दर ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित करण्यात आलेल्या वेतन श्रेण्यांना लागू करण्यात आला आहे. पुणे
महानगरपालिकेतील अधिकारी / सेवकांना व सेवानिवृत्ती अधिकारी / कर्मचारी सेवकांना कुंटूंबनिवृत्ती वेतनधारक यांना दिनांक ०१/०७/२०२२ पासुन ४% दराने महागाई भत्ता वाढवुन म्हणजेच एकुण ३८% दराने महागाई भत्ता फरकासह आदा करणेस महापालिका आयुक्त यांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार परिपत्रक जारी करण्यात आले आहे. (circular of DA)
त्यानुसार जुलै ते नोव्हेंबर या 5 महिन्याचा सुधारित दराने भत्ता कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर पेड इन डिसेंबर च्या वेतनात मिळेल. तर सेवानिवृत्त सेवकांना डिसेंबर पेड इन जानेवारी च्या वेतनात अदा होईल. असे महापालिका प्रशासनाकडून (PMC Official) सांगण्यात आले. (PMC retired employees)

Protest Against Health Department : महापालिका आरोग्य विभागाच्या कारभाराविरोधात कर्मचाऱ्यांची निदर्शने 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका आरोग्य विभागाच्या कारभाराविरोधात कर्मचाऱ्यांची निदर्शने

पुणे : अंशदायी वैद्यकीय सहाय योजना अंतर्गत महापालिका कर्मचारी आणि आजी माजी सभासद अर्थात आजी माजी नगरसेवकांना उपचारासाठी 90% रक्कम महापालिकेकडून उपलब्ध करून दिली जाते. मात्र नुकतेच आरोग्य प्रमुखांनी जारी केलेल्या सर्क्युलर मुळे कर्मचारी आणि आजी माजी सभासदांना 40 ते 60% रक्कम खिशातूनच भरावी लागणार आहे.  कारण सी. एच. एस. दरपत्रकात अंर्तभूत नसलेल्या बिलांचे पैसे मनपा देणार नाही, असे आदेश आरोग्य प्रमुखांनी रुग्णालयाला दिले आहेत. यामुळे महापालिका कर्मचारी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांच्या सर्वच संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. गुरुवारी महापालिका कर्मचाऱ्यानी महापालिका भवनासमोर निदर्शने केली. यात हजारो कर्मचारी सहभागी झाले होते.

PMC : Ravindra Binwade : कोरोनाचे काम करणारे पीएमपी चे सर्व कर्मचारी कार्यमुक्त  : महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

कोरोनाचे काम करणारे पीएमपी चे सर्व कर्मचारी कार्यमुक्त

: महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

: ‘द कारभारी’ च्या बातमीचा परिणाम

पुणे : कोरोनाचा कहर सुरु झाल्यापासून महापालिका प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका प्रशासनाने पीएमपी चे कर्मचारी कोरोनाच्या विविध कामासाठी नियुक्त केले होते. मात्र आता या कर्मचाऱ्यांना काम कमी आहे. याबाबत ‘द कारभारी’ ने वृत्त दिले होते. त्यानुसार आता पीएमपीच्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या कामातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. याबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी आदेश जारी केले आहेत.

: कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी नियुक्त केले होते कर्मचारी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि त्याला तोंड देण्यासाठी पालिकेने सर्वतोपरी प्रयत्न केले.  क्वारंटाईन रूमपासून विविधकक्षांवर  प्रशासनाची देखरेख होती.  त्याचबरोबर सर्वेक्षणाचे कामही सुरू होते.  त्यासाठी महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते.  त्यानंतर पीएमपीचे कर्मचारीही या कामात गुंतले होते.  शहरात कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी महापालिकेकडून अनेक प्रयत्न केले जात होते.  महामंडळाने आपल्या आरोग्य विभागातील कर्मचारी व अधिकारी तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली.  यामध्ये क्वारंटाईन रूम आणि आयसोलेशन रूममध्ये काम करणे, सर्वेक्षण करणे, कोरोनाच्या कामाचा अहवाल देणे, निवारागृहांमध्ये काम करणे, कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपाययोजनांबाबत जनजागृती करणे, अशा कामांचा समावेश आहे.  त्यासाठी महापालिकेचे कर्मचारी, शिक्षण विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट यांना काम दिले आहे.  यामध्ये पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.
मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काम कमी आहे.  याबाबत ‘द कारभारी’ ने वृत्त दिले होते. त्यानुसार आता पीएमपीच्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या कामातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. आपल्या मूळ कामावर रुजू होण्याचे आदेश या कर्मचाऱ्याना देण्यात आले आहेत.  महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी आदेश जारी केले आहेत.