Omprakash Bakoria | PMPML | पीएमपीचे नवे सीएमडी ओमप्रकाश बकोरिया  | लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

पीएमपीचे नवे सीएमडी ओमप्रकाश बकोरिया

| लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली

पुणे | पीएमपीचे सीएमडी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली करण्यात आली आहे. आता पीएमपीचे सीएमडी म्हणून ओमप्रकाश बकोरिया काम पाहतील. राज्य सरकारने नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
ओमप्रकाश बकोरिया यांनी याआधी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. त्यांना क्रीडा व युवक आयुक्त पदी नेमण्यात आले होते. पुण्यातून त्यांनी चांगले काम केले. त्यानंतर आता बकोरिया पीएमपीचे सीएमडी म्हणून काम पाहतील. दरम्यान आता तरी पीएमपीच्या कामकाजात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Sinhagadh Fort | PMP | पीएमपीच्या सिंहगडावरील बससेवेला तात्पुरती स्थगिती : पीएमपी प्रशासनाचा निर्णय

Categories
Breaking News social पुणे

पीएमपीच्या सिंहगडावरील बससेवेला तात्पुरती स्थगिती

: पीएमपी प्रशासनाचा निर्णय

सिंहगडावरील अरुंद रस्ता, त्यामुळे बसच्या अपघातांचा होणारा संभाव्य धोका लक्षात घेत, पीएमपी प्रशासनाने सिंहगडावरील ई-बससेवा तात्पुरती स्थगित केली आहे.

सिंहगडावरील पर्यावरण संवर्धन आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वनविभाग आणि पीएमपी प्रशासन यांच्याकडून सिंहगडावर ई-बस सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, या सेवेला स्थानिकांचा प्रचंड विरोध होता. तसेच, दोन दिवसांपूर्वीच सिंहगडाच्या तीव्र उतारावरून वळण घेताना एक मोठा अपघात होता होता वाचला. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने येथील ई बस सेवा काही कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंहगडावरील अरुंद रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर येथे पुन्हा ई बससेवा सुरू करण्यात येईल. सिंहगड घाट रस्ता रुंदीकरण संदर्भात पीडब्ल्यूडी सोबत लवकरच आम्ही बैठक घेणार आहोत.

                     – लक्ष्मीनारायण मिश्रा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

PMPML : Prakash Dhore : पीएमपी प्रशासनाच्या कारभारा विरोधात दस्तरखुद्द पीएमपी संचालक करणार आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे

पीएमपी प्रशासनाच्या कारभारा विरोधात दस्तरखुद्द पीएमपी संचालक करणार आंदोलन

: प्रशासनाबाबत नाराजी

पुणे : पीएमपी प्रशासनाच्या कारभाराबाबत नेहमीच ओरड होत असते. याबाबत विरोधी पक्षाकडून देखील सातत्याने आवाज उठवला जातो. मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते. मात्र आता सत्ताधारी पक्षाचे नेते आणि पीएमपी चे संचालक देखील या कामकाजाला कंटाळले आहेत. त्यामुळे संचालक प्रकाश ढोरे यांनी प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. संचालक ढोरे उद्या सकाळी 11 वाजल्यापासून आंदोलनाला बसणार आहेत. याबाबत त्यांनी CMD ना पत्र देखील दिले आहे.

: PMP CMD ना दिले पत्र

ढोरे यांच्या पत्रानुसार पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.च्या संचालक मंडळाची  सभा क्र.३, दिनांक 30/08/२०२२ रोजी संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये आम्ही संचालकांनी आयत्यावेळचे ठरावदाखल केले होते. त्यावेळेस प्रशासनाने आम्हाला सदर ठरावाबाबत सभेच्या तारेखपासून ७ दिवसाच्या आत प्रशासनाचा अभिप्राय देणेबाबत सांगितले होते. याबाबत आमच्याकडून सभा वृत्तांत अंतिम झाल्यानंतर ही विचारणा करण्यात आली होती. तथापि प्रशासन विभागाने अद्यापपावेतो आम्हाला अभिप्राय कळविलेला नाही. तरी याबाबत परिवहन महामंडळाच्या प्रशासनाचा भोंगळ कारभार चाललेला असून तसेच चालढकल करण्यात आलेली असून संचालकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत आम्ही प्रशासनाच्या कारभाविरूध्द व भोंगळ कारभाराबाबत निषेधार्थ म्हणून दिनांक 09/०२/२०२२ रोजी सकाळी ११.00 वाजल्यापासून आंदोलनास बसत आहे. याबाबतची संपूर्ण जबाबदारी आपणावर राहील. असे ढोरे यांनी पत्रात म्हटले आहे.