Ghulam Nabi Azad : Congress : G 23 चे नेते गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण 

Categories
Breaking News Political देश/विदेश

G 23 चे नेते गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण 

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) हे आज दिवसभर काँग्रेस (Congress) नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसून आले. आज त्यांनी 10, जनपथ येथील पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या घरी जाऊन त्यांची देखील भेट घेतली. G-23 गटाने पाच राज्यांतील पराभवानंतर घेतलेली भुमिका आणि त्यानंतर निर्माण झालेल्या गृहकलहादरम्यान, ही भेट महत्वाची मानली जातेय. आझाद यांच्या या भेटीगाठी नेमक्या कोणत्या हेतूनं सुरु आहेत, याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नसल्याने चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता त्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सोनिया गांधी आणि गुलाम नबी आझाद यांच्यात काही दिवसांपूर्वीच फोनवर चर्चा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. G-23 नेत्यांच्या गटाने पाच राज्यांमध्ये झालेल्या काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षात संघटनात्मक बदल करण्याची भावना व्यक्त करत अनेक बैठका घेतल्या. तसंच काँग्रेस वर्कींग कमिटीची बैठक देखील काही दिवसांपूर्वी झाली होती. ही बैठक म्हणजे, आझाद यांच्या माध्यमातून, G-23 नेत्यांपर्यंत पोहोचण्याचा गांधी परिवाराचा प्रयत्न असल्याचं देखील बोललं जातंय. इंडिया टुडेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. या बैठकीनंतर गुलाम नबी आझाद यांनी अध्यक्षपदाबाबत बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली.

 

दरम्यान, या बैठकीनंतर गुलाम नबी आझाद म्हणाले की, नेतृत्व बदलाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्याबद्दलची चर्चा रविवारी झालेल्या काँग्रेस वर्कींग कमिटीच्या बैठकीत झाली होती. “नेतृत्वाबद्दल बोलायचे झाल्यास, श्रीमती सोनिया गांधी यांनीच हा पदभार सांभाळावा असं वर्कींग कमिटीच्या बैठकीत आधीच ठरलेलं होतं. नेतृत्व हा मुद्दा नाही, श्रीमती गांधींनी अध्यक्षपद सोडावं असं कोणीही म्हटलेलं नाही. आमच्याकडे फक्त काही सूचना होत्या, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या” असं आझाद म्हणाले.G-23 चे नेते म्हणून आपण सोनिया गांधींना कोणते बदल सुचवले? असा प्रश्न विचारला असता, आझाद म्हणाले, “काँग्रेस हा एक पक्ष आहे आणि सोनिया गांधी या पक्षाच्या अध्यक्ष आहेत, बाकीचे आम्ही सर्वजण नेते आहोत. अंतर्गतरित्या केलेल्या शिफारसी सार्वजनिकरित्या सांगता येणार नाही.”

Last Day Of PMC : Administrator : नगरसेवक, सत्ताधाऱ्यांचा आज शेवटचा दिवस! : उद्यापासून महापालिकेवर प्रशासक 

Categories
Breaking News PMC Political पुणे

नगरसेवक, सत्ताधाऱ्यांचा आज शेवटचा दिवस!

: उद्यापासून महापालिकेवर प्रशासक 

पुणे – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal कॉर्पोरेशन) सभागृहाचा आज अखेरचा दिवस असणार आहे. सर्व पक्षीय नगरसेवक आणि सत्ताधारी भाजपचा हा शेवटचा दिवस आहे. निवडणुका होईपर्यंत मंगळवारपासून महापालिकेत प्रशासक (Administrator) सुरू होणार आहे. दरम्यान, आज शेवटच्या दिवशी महापालिकेची निरोपाची ऑनलाइन सभा (Online Meeting) होणार आहे. त्यामुळे या शेवटच्या सभेत एकमेकांवर कुरघोड्या, पाच वर्षांच्या कारभाराचा मागोवा घेतानाच सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता असल्याने याकडे लक्ष लागले आहे.

कोरोना आणि ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या आहेत. पुणे महापालिकेसाठी तीन सदस्यांच्या प्रभाग निश्चित केला आहे. या प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर होऊन त्यावर हरकती-सूचना मागविण्यात आल्या. त्याची सुनावणी होऊन प्रारूप आराखड्यात आवश्‍यक असलेल्या बदलांचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. त्यामुळे अंतिम आराखडा जाहीर करून आरक्षणाची सोडत जाहीर करण्याची प्रक्रिया अद्याप शिल्लक आहे. त्यातच राज्य सराकरने विधिमंडळात नवीन कायदा पारित करून निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. त्यामुळे या निवडणुका किमान सहा महिने पुढे जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

: स्थायी समितीच्या बैठकीत काय होणार?

 दुपारी सव्वाबारा वाजता स्थायी समितीची अंदाजपत्रकाची बैठक आहे. यामध्ये भाजपकडून उपसूचना मांडून त्यांना आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात हवे ते बदल करून घेतले जाण्याची शक्यता आहे. मात्र, आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात बदल करता येत नाहीत. त्यासाठी मुख्यसभेची मान्यता घ्यावी लागते, असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत वाद होण्याची शक्यता आहे. दुपारी तीन वाजता आॅनलाइन मुख्यसभा होणार आहे. या मुख्यसभेत महत्त्वाचे विषय नाहीत. पण या सभेत गेल्या पाच वर्षांचा मागोवा घेणारी भाषणे व भावनिक भाषणे होण्याची शक्यता आहे. सुविधा काढून घेणारमंगळवारपासून आयुक्त विक्रम कुमार हे प्रशासक म्हणून महापालिकेचा कारभार सांभाळणार आहेत. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यालय, गाड्या व इतर सुविधा काढून घेतल्या जातील. त्याबाबतही प्रशासनाकडून तयारी सुरु झाली आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकावर चर्चा होणार आहे. याचवेळी भाजपकडून स्थायी समिती बरखास्त होऊ शकत नाही, त्यामुळे अध्यक्ष हेमंत रासने हेच पुढील वर्षाचे अंदाजपत्रक मांडणार असे सांगत आहेत. त्यास विरोधीपक्षांनी विरोध केला आहे.  बैठकीत अंदाजपत्रकावर उपसूचना देऊन त्यात बदल करायचे प्रस्ताव भाजपकडून केले जाऊ शकणार आहेत. तर प्रशासनाने राज्य सरकारकडे भाजपच्या दाव्याबाबत खुलासा मागितलेला असून, त्यावर उत्तर न मिळाल्यास प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.

: भाजप पुन्हा नको; शिवसेना करणार आंदोलन

दरम्यान शहर शिवसेना आज दुपारी महापालिकेत आंदोलन करणार आहे. भाजप पुन्हा नको रे बाबा, अशा पद्धतीच्या घोषणा शिवसेनेने तयार केल्या आहेत. तसेच   पुणे महापालिकेत मागील पाच वर्षात केलेला भ्रष्टाचार पथनाट्याच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात येणार आहे. तसेच पालिकेतील भ्रष्टाचाराची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे.

Women’s Day : महिला दिनानिमित्त गुणवंत महिलांचा सन्मान  : योगिता सुराणा, भरत सुराणा यांचा उपक्रम 

Categories
cultural social पुणे

महिला दिनानिमित्त गुणवंत महिलांचा सन्मान

: योगिता सुराणा, भरत सुराणा यांचा उपक्रम

पुणे : प्रत्येक क्षेञात, प्रत्येक क्षणाला समाजात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमठवत, परिस्थितीला निर्धाराने सामोरे जात, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणार्या माझ्या सर्वच महिला, भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असे मत कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकारी योगिता सुराणा यांनी व्यक्त केले

महिला क्रिकेट टीम मधील विविध गुणवंत महिलांचा चा आज  जागतिक दिनानिमित्त महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष  मोहन  जोशी,वास्तूशांस्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र  कोळी,रवी वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

या कार्यक्रमाचे नियोजन पुणे शहर काँग्रेस सरचिटणीस योगिता सुराणा, भरत सुराणा , दिलीप शेलवंटे, तेजश्री शेलवंटे यानी केले.  या कार्यक्रमात सिमा महाडिक, रजिया बल्लारी, बेबीताई राऊत,डॉ अर्चना लडकत रिना पाटिल, निलम गोरे,असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

Congress : PM Modi in Pune : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेचा अवमान रोखण्यास काँग्रेसला यश : कॉंग्रेसचा दावा

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेचा अवमान रोखण्यास काँग्रेसला यश

– माजी आमदार मोहन जोशी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महापौरांनी तयार केलेल्या फेट्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेस काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतल्यावर ती राजमुद्रा काढण्यात आली. राजमुद्रेचा अवमान रोखण्यात कॉंग्रेसला यश आले, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.

पुणे मेट्रोच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी महापौरांनी खास फेटा तयार करून घेतला होता. त्या फेट्यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या राजमुद्रेचा वापर करण्यात आला होता. राजमुद्रा ही महाराष्ट्राची मानबिंदू आहे. पण महापालिकेतील भाजप आणि महापौरांनी हेतुपुरस्सर राजमुद्रा असलेला फेटा वापरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्याची मालिका चालू ठेवली. पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठा करण्याचा हा प्रकार होता. यास काँग्रेस पक्षाने निषेध नोंदवून या प्रकाराला विरोध केला. अखेरीस फेट्यावरील राजमुद्रा काढणे भाजपला भाग पडले आणि काँग्रेसच्या लढ्याला यश मिळाले, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे. सत्तेच्या जोरावर मनमानी करणाऱ्या भाजपला काँग्रेसने दणका दिला, असेही जोशी यांनी म्हटले आहे.

PM Modi Attack on congress : काँग्रेसच्या काळात फक्त भूमीपूजन; पण प्रकल्प कधी पूर्ण होईल हे समजत नसे

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

काँग्रेसच्या काळात फक्त भूमीपूजन; पण प्रकल्प कधी पूर्ण होईल हे समजत नसे

: पंतप्रधान मोदींचा काँग्रेस वर प्रहार

पुणे : पुण्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण, गरवारे ते आनंदनगर मेट्रो चे  आणि इ बस सेवेचे उदघाटन असे कार्यक्रम झाले. त्यानंतर एमआयटीच्या प्रांगणात मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोदींनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

मोदी म्हणाले, या मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यासाठी मला बोलविले होते. आता तिचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य मिळाले. काँग्रेस सरकारच्या काळात भूमीपूजन होत होते. पण तो प्रकल्प कधी पूर्ण होईल हे समजत नसे. वेळेवर प्रकल्प पूर्ण होऊ शकतो, हे मेट्रोने दाखवून दिले असल्याचे सांगून त्यांनी काँग्रेस सरकारवर टीका करण्याची संधी साधली आहे.

”आज बारापेक्षा जास्त शहरात मेट्रो काम चालू आहे. त्यात महाराष्ट्र जास्त आहेत. मुबंई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक इकडे मेट्रो सुरू होतेय. लोकांना आग्रह जे मोठे लोक समाजात आपण मानतो त्यांना आग्रह की मेट्रो प्रवास सवय लावा जेवढा जास्त मेट्रो प्रवास तेवढी शहराला मदत होईल. तसेच जास्तीत जास्त ई वाहतूक सुरू झाली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.”

महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सेनानी यांना मोदींकडून श्रद्धांजली

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वी अनेकांच्या कामाने पावन झालेल्या पुणेकरांना नमस्कार करत आहे. देश स्वतंत्र अमृतमहोत्सव साजरा करतोय. पुण्याच विशेष महत्व आहे. यामध्ये लोकमान्य ,टिळक चाफेकर बंधू असे स्वातंत्र्य सेनानी यांना श्रद्धांजली वाहत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Silent Agitation Against PM Modi : पंतप्रधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस उद्या करणार मूक आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे

पंतप्रधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस उद्या करणार मूक आंदोलन

: सकाळी १० वाजता आंबेडकर स्मारक येथे होणार आंदोलन

पुणे : २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले तेव्हापासून सातत्याने सरकारमधील विविध घटक मंत्री, राज्यपाल सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेल्या राज्यघटनेचा अवमान करत आहे, दलितांचा आवाज वारंवार दाबण्याचा प्रयत्न होत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र भूमिचा अपमान करत आहे आणि पुन्हा त्यांच्याच हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पुण्यात अनावरण होत आहे, या घटनेच्या निषेधार्थ मूक आंदोलन म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उद्या ६ मार्च रोजी ससून हॉस्पिटल जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे शांततेच्या मार्गाने काळे कपडे परिधान करत महात्मा गांधीजी व महापुरुषांची भजने गात मूक आंदोलनासाठी बसणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

जगताप म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणाऱ्या पुणे मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी मी आज फेसबुक लाईव्ह द्वारे सदर मेट्रो मार्गाची पाहणी केली. अवघ्या पाच किलोमीटरच्या या मेट्रो मार्गाचे काम अर्धवट स्वरूपात असून, हे काम पूर्ण होण्यास किमान तीन महिने लागतील.एस एन डी टी कॉलेज जवळील स्टेअरकेस, पत्रे ,प्लास्टर, पेंटिंग, वेल्डिंग, रेलिंग ही सर्वच काम अर्धवट परिस्थितीत असून ,ही काम पूर्ण नाही झाली तर पुणेकर ही मेट्रो वापरू शकत नाहीत. मेट्रोच्या कामाची अत्यंत दयनीय परिस्थिती असताना ,निव्वळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुणेकरांची फसवणूक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलवण्यात येत आहे. मुळात उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातील निवडणुकांमधून मोदींनी युक्रेन मध्ये अडकलेल्या मुलांसाठी वेळ काढला नाही, परंतु अर्धवट स्वरूपात असलेल्या मेट्रोसाठी वेळ काढला. यावरून  भाजपची कामकाजाची पद्धत आपणा सर्वांना दिसून येते. असे ही जगताप म्हणाले.

: शहर कॉंग्रेस कडून देखील होणार निदर्शने

दरम्यान शहर कॉंग्रेस कडून देखील पंतप्रधानाच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. शहर कॉंग्रेस च्या वतीने घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती शहर कॉंग्रेस कडून देण्यात आली.

 

Congress : NCP : कॉंग्रेसच्या माजी स्थायी समिती अध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश 

Categories
Breaking News Political पुणे

कॉंग्रेसच्या माजी स्थायी समिती अध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुणे महानगपालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अय्याजभाई काझी, उद्योजक  गणेश घुले व सामाजिक कार्यकर्ते गौरव घुले यांनी पवार साहेबांच्या विचारांवर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.

या प्रवेशासाठी शहराध्यक्ष  प्रशांत जगताप, आमदार  सुनील टिंगरे, माजी महापौर  दत्तात्रय धनकवडे, महानगरपालिका स्थायी समितीचे मा.अध्यक्ष निलेश निकम, बाळासाहेब बोडके,सुरेश घुले,  राजू साने, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Congress Vs Chandrakant Patil : हिंदू आहोत हिंदुत्ववादी नाही.! : कॉंग्रेसचा पलटवार

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

हिंदू आहोत हिंदुत्ववादी नाही.!

: कॉंग्रेसचा पलटवार

पुणे : पुण्यात भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कार्यकर्त्यांनी सत्कार केल्यानंतर काँग्रेस ने गोमुत्र टाकून त्या पायऱ्या स्वच्छ केल्या होत्या. त्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, काँग्रेसचा गोमुत्र आणि गाईवरील विश्वास वाढलेला पाहून आपल्याला खूप आनंद झाला. त्यावर आता कॉग्रेस ने देखील उत्तर दिले आहे. आम्ही हिंदू आहोत, हिंदुत्ववादी नाही. शिवाय पाटील यांनी सावरकरांचा गाई बद्दलचा विचार आधी वाचवा, असा टोला देखील लगावला आहे.

कॉंग्रेसचा गोमूत्र आणि गाई वरील विश्र्वास वाढलेला पाहण्यापेक्षा विनायक दामोदर सावरकर यांचा गाई बद्दलचा विचार आधी चंद्रकांत पाटिलांनी वाचावा …!
हिंदू आहोत हिंदुत्ववादी नाही.

सचिन आडेकर
अध्यक्ष पं नेहरू स्टेडियम ब्लॉक काँग्रेस कमिटी

Chandrakant Patil : Congress : काँग्रेसचा गोमुत्र आणि गाईवरील विश्वास वाढलेला पाहून खूप आनंद झाला

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

काँग्रेसचा गोमुत्र आणि गाईवरील विश्वास वाढलेला पाहून खूप आनंद झाला

: चंद्रकांत पाटलांचा कॉंग्रेसला खोचक टोला

 

पुणे : पुण्यात भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कार्यकर्त्यांनी सत्कार केल्यानंतर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने गोमुत्र आणि गुलाबजल टाकून त्या पायऱ्या स्वच्छ केल्या. त्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, काँग्रेसचा गोमुत्र आणि गाईवरील विश्वास वाढलेला पाहून आपल्याला खूप आनंद झाला.

महाविकास आघाडीला दहा मार्चनंतर सत्ता सोडण्याची वेळ येईल

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी सांगितले.

भाजपा कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांकडून होत असलेल्या पक्षपाती कारवाईच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारची सध्याची स्थिती पाहिली तर कोणीही विश्लेषण करणारा सांगू शकेल की, हे सरकार आता फार दिवस टिकणार नाही. आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. दोन मंत्र्यांचा राजीनामा झाला. तसे बाकीच्यांचेही होतील. पोलिसांच्या बदल्यांबाबत माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी त्यांना अनिल देशमुख यांच्याकडून यादी मिळत होती असे सांगितले तर देशमुख म्हणतात की, त्यांना शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याकडून मिळत होती व ते ती पुढे पाठवत होते. दुसरीकडे आयपीएस अधिकारी परमवीरसिंग यांनी सांगितले की, सचिन वाझे याला पुन्हा नोकरीत घेण्यासाठी त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दबाव आणला होता. या गंभीर आरोपांनंतर आघाडीच्या नेत्यांनी काहीही संवेदनशीलता दाखवली नसली तर ही प्रकरणे गुन्ह्याची आहेत. अनिल देशमुख यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला तसा या गंभीर प्रकरणांबाबत न्यायालय न्याय देईल. अशी स्थिती निर्माण होईल की, आघाडीच्या नेत्यांना सत्ता सोडून घरी जावे लागेल.

त्यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड व एकूण संपूर्ण महाराष्ट्रात ज्या प्रकारे सत्तेचा दुरुपयोग चालू आहे तो आम्ही सहन करणार नाही. किरीट सोमय्या यांचा सत्कार करून काल पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवून दिले की, आम्हीही काही कमी नाही. पिंपरी चिंचवडमध्ये खोट्या केसेस करून पोलिसांमार्फत आम्हाला हे सरकार किती दाबणार असा आपला सवाल आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. पोलिसांनी निःपक्षपातीपणे चौकशी केली नाही तर आपण न्यायालयात जाऊ.

 

Anjaney Sathe : MNS : Congress : मनसेला खिंडार : मनसे नेते अंजनेय साठे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

मनसे नेते अंजनेय साठे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अंजनेय साठे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबई येथे टिळक भवनात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या युवा नेत्याचे स्वागत नाना पटोले यांनी पुष्पगुच्छ आणि काँग्रेसचे तिरंगी उपरणे देऊन केले. याप्रसंगी विधिमंडळ पक्षेनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहप्रभारी सोनल पटेल, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे आदी उपस्थित होते.

समाजकारण, राजकारण या क्षेत्रात कार्यरत असणारे अंजनेय साठे यांनी काँग्रेसच्या विचारधारेशी बांधिलकी मानली. त्यांचे आम्ही स्वागत करत आहोत असे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले.

अंजनेय साठे यांचे वडील डॉ. सुनील साठे आणि आई डॉ. अर्चना साठे हे दोघेही सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आहेत. अंजनेय साठे यांचे पणजोबा स्वर्गीय विनायकराव साठे हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सात वर्षे तुरुंगवास भोगला होता. कै.विनायकराव साठे यांनी तत्कालीन सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री पद भूषविले होते.