Maharashtra Politics | विरोधी पक्षांनाच सत्ताधाऱ्यांबरोबर बसण्याची हाव असेल तर लोकशाहीचा गाडा टिकेल कसा? आणि मग युवकांचा राजकारणातला रोल मॉडेल कोण असणार?

Categories
Breaking News Political social देश/विदेश महाराष्ट्र संपादकीय

Maharashtra Politics | विरोधी पक्षांनाच सत्ताधाऱ्यांबरोबर बसण्याची हाव असेल तर लोकशाहीचा गाडा टिकेल कसा? आणि मग युवकांचा राजकारणातला रोल मॉडेल कोण असणार?

Maharashtra Politics | (Author: Ganesh Mule) | लोकशाहीचे (Democracy) जसे चार महत्वाचे स्तंभ आहेत, अगदी त्याचप्रमाणे आणि किंबहुना त्याहूनही महत्वाचा लोकशाहीचा आधार हा विरोधी पक्ष (Opposition Party) असतो. मात्र विकासाचे कारण देत तोच विरोधी पक्ष जर सत्ताधाऱ्या (Ruling Party) सोबत हातमिळवणी करून सत्तेत बसू लागला तर हा लोकशाहीचा गाडा टिकेल कसा? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने अशाच गोष्टी घडत चालल्या आहेत. त्यामुळे युवकांचा (Youth) राजकारणावरील विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे आम्ही राजकारणात रोल मॉडेल (Roll Model) म्हणून कुणाकडे पाहायचे, असा संभ्रम राजकारणात येऊ पाहणाऱ्या आणि सर्वसामान्य युवकांना पडला आहे. (Maharashtra Politics)
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. ज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. जे काही घडतं त्यामुळे लोक फक्त सुन्न होतात. सुरुवातीला भाजप (BJP) हा मोठा पक्ष असून देखील भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. मुख्यमंत्री कुणाचा असणार, या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपचा हात सोडला. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेवर आली. यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा सगळ्यात मोठा हात होता. काँग्रेस (INC), शिवसेना (Shivsena)आणि राष्ट्रवादीने (NCP) सत्ता स्थापन केली. मात्र हे सहन न झाल्याने आणि विरोधी पक्षात बसण्याची वेळ आलेल्या भाजपने कुरघोड्या करायला सुरुवात केली. यात सगळ्यात आघाडीवर होते ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis). फडणवीस हे पवारांना शह देतात म्हणून त्यांची लोकप्रियता वाढू लागली होतीच. शिवाय त्यांना केंद्राकडून देखील साथ मिळत असल्याने त्यांचे महाराष्ट्रात वर्चस्व वाढत चालले होते. (Maharashtra Political Crisis)
मग फडणवीस यांनी आपले बुद्धिचातुर्य चालवत आणि गनिमी कावे करत शिवसेनेत उभी फूट पाडली. उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सेना एकाकी पडली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडाने शिवसेना तर फुटलीच मात्र महाविकास आघाडीला देखील आपली सत्ता राखता आली नाही. मग भाजप आणि शिंदे यांनी ठाकरेंचं उरलं सुरलं देखील सगळं हिरावून घेतलं. बंडखोरी केलेली सगळी लोकं ही ED आणि तत्सम यंत्रणांना घाबरलेली होती. फक्त हेच लोक नाही तर काँग्रेस, उद्धव यांची सेना आणि राष्ट्रवादीतील लोकांच्या मागे देखील यंत्रणा लावल्या जात होत्या. कुठल्याही पद्धतीने दबाव आणून विरोधी पक्ष कमकुवत करायचा हा चंग बांधून भाजपने कुरघोड्या सुरु ठेवल्या.
याचाच परिणाम म्हणून राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी (Ajit Pawar) नुकतेच बंड केले. विरोधी पक्षात असणारा राष्ट्रवादी मग  लगेच सत्ताधारी झाला. शरद पवारांना हे माहित होते कि नाही, हे पुढे उघड होईलच. मात्र या सगळ्या घटनांमुळे मात्र सर्वसामान्य लोक, युवक यांचा मात्र राजकारणावरील विश्वास उडत चालला आहे. शिवाय सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणारा विरोधी पक्ष जर सत्तेच्या दावणीला बांधला जात असेल तर लोकशाहीचा गाडा कसा टिकणार? लोकांच्या आशेचा किरण कोण असेल? असे प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडू लागले आहेत.
जे चाललंय ते सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचं आहे, हे याचमुळे. कारण काँग्रेस ला कंटाळून लोकांनी भाजपला मोठा पक्ष बनवलं. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना आपल्या आशेचा किरण मानलं. मात्र भाजपने लोकांच्या हिताची भूमिका घेतली असं दिसून येत नाही. भ्रष्टाचारी लोकांच्या मागे यंत्रणा लावल्या म्हणून लोकांना भाजपविषयी आदर वाटू लागला. पण कालांतराने भाजपने त्याच लोकांना आपल्या पक्षाचा आश्रय देत त्यांना मंत्री केलं. त्यामुळे लोकांना यातला नेमका बोध कळेना. तसेच शरद पवार यांचं महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील मक्तेदारी मोडून काढणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. मात्र त्यांच्या कुरघोड्या पाहता ते लोकांसाठी कमी आणि सत्तेसाठी चिटकून राहण्यासाठी सर्व गोष्टी करतात, हे लक्षात येऊ लागलं. शरद पवारांच्या नेहमीच्या बदलत्या भूमिकेमुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास उरला नाही. कालच्या प्रकरणात आपला हात नाही, असं शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी लोकं आता त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.
सत्ताधाऱ्यांनी लोकांचं, लोक काय बोलतात यावर फार लक्ष द्यायचं नसतं आणि आपला अजेन्डा चालवायचा असतो, अशी एक रीत पडून गेली आहे. मात्र  विरोधी पक्षानं लोकांची बाजू घेऊन लोकांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून द्यायचा असतो, हे देखील सोयीस्कर रित्या विसरले जात आहे. अशा परिस्थितीत उत्साहाने राजकारणात येऊ पाहणाऱ्या नवख्या युवकांनी नेमकं कुणाला आदर्श मानायचं? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
यात लोकांनाच अग्रणी भूमिका घ्यायला हवीय. राजकारणातून आपला फार विकास होत नसतो, हे आता तरी लोकांनी लक्षात घ्यायला हवंय. आपला विकास आपल्यालाच करावा लागतो. आपल्याशिवाय आपल्याला कुणी वाचवू शकत नाही, हे सूत्र लक्षात घेऊन आणि राजकारणाकडे दुर्लक्ष करून लोकांनी स्वविकास करून घ्यायला हवाय.

सर्वच राजकीय पक्ष म्हणतात, तरुणांनी राजकारणात आले पाहिजे पण युवा वर्गाने कोणाचा आदर्श घ्यावा हाच मोठा प्रश्न आज निर्माण झाला आहे. ज्यांचा आदर्श घ्यावा अशी व्यक्तिमत्वे कधी एका पक्षात तर कधी दुसऱ्या पक्षात हे वास्तव सद्यस्थितीत आहे आणि  पक्षाची ध्येयधोरणे काय ? या मुद्द्याला तिलांजली दिली जात असल्याचे वास्तवही आहे.त्यामुळे युवा वर्गाने राजकारणात यावे ही साद एकीकडे घातली जात आहे आणि दुसरीकडे जनहितासाठी आवश्यक असणारा विरोधी पक्ष कायमचा हद्दपार करण्याचे डावपेच सुरू आहेत त्यासाठी राजकारणात फोडाफोडीचे राजकारण तर खुलेआम होत आहे मात्र विकासाच्या नावाखाली स्वार्थ साधला जात असेल तर लोकहिताचा विचार कुणीच करत नाही असेच म्हणावे लागेल.

– हेमंत बागुल, काँग्रेस कार्यकर्ता.
——
Article Title | Maharashtra Politics |  If only the opposition parties want to sit with the rulers, how can the car of democracy survive?  And then who will be the role model of the youth in politics?

PMC Teachers Agitation Update | रजा मुदतीतील शिक्षण सेवकांच्या आमरण उपोषणाला काँग्रेस, भाजपचा पाठिंबा 

Categories
Breaking News Education PMC Political पुणे

PMC Teachers Agitation Update | रजा मुदतीतील शिक्षण सेवकांच्या आमरण उपोषणाला काँग्रेस, भाजपचा पाठिंबा

PMC Teachers Agitation Update | पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागात (PMC Education Department) काम करणाऱ्या रजा मुदतीतील ९3 शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणी २०१७ (एप्रिल) पासून लागू करावी. या मागणीसाठी सर्व शिक्षण सेवक महापालिका भवनासमोर आमरण उपोषणास (Agitation) बसले आहेत. या आंदोलनाला काँग्रेस आणि भाजपने पाठिंबा दिला आहे. तसेच महापालिका प्रशासनासोबत चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याची मागणी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी केली आहे.   (PMC Teachers Agitation Update)

काँग्रेस कडून सकाळी आमदार रविंद्र धंगेकर(MLA Ravindra Dhangekar), मोहन जोशी (Mohan Joshi), अभय छाजेड (Abhay Chajed) या नेत्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांची समस्या जाणून घेतली. तसेच प्रशासनासोबत चर्चा करून शिक्षकांना न्याय देण्याची मागणी केली. तर दुपारी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (BJP City President Jagdish mulik) यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. मुळीक यांनी देखील प्रशासना सोबत चर्चा केली. तसेच याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. (Pune Municipal Corporation)

आंदोलनकर्त्यांनी सांगितले कि, पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पुणे महापालिकेच्या प्रशासनाने अति तत्परता दाखवत तब्बल २१९ शिक्षकां साठी एकतर्फी व पती-पत्नी अंतर्गत आंतर जिल्हा बदलीने सदर २१९ शिक्षकांना पुणे महापालिकेच्या सेवेत सामावून घेतले आहे.पुणे महापालिकेचे प्रशासन या २१९ शिक्षकांसाठी पायघड्या घालून त्यांचे स्वागतासाठी सज्ज आहेत.. त्यांना विशेष ट्रीटमेंट दिली जात आहे. परंतु  याच पुणे महापालिकेच्या शाळेत गेली सुमारे १५ वर्षापासून ६००० रुपयांच्या तुटपुंज्या मानधनावर शिकवणारे ९३ रजा मुदत शिक्षकांकडे दुर्लक्ष करण्यामागे नक्की काय दडलय हा संशोधनाचाच विषय आहे. असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. (PMC Pune News)
93 शिक्षकांनी त्यांची नियमित तीन वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याबाबत प्रशासनाला अनेक वेळा निवेदने दिली.  पण त्यांचे निवेदनाला कोणीही दाद दिली नाही म्हणून या 93 शिक्षकांनी गेल्या पंधरा वर्षात अनेक वेळा निदर्शने,धरणे ,उपोषण या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याची खूप प्रयत्न केले. सदर शिक्षकांना प्रशासनाने कागदपत्रांचा ससेमिरा मागे लावत एकदा महापालिकेच्या आस्थापना विभागात ,शिक्षण विभागात व नगर विकास विभागात अनेक वेळा पत्र व्यवहार करून नियमित  सेवेत घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. परंतु पुणे मनपाचे ढीम्म प्रशासनाने सदर शिक्षकांना कुठलीही खबरदात किंवा त्यांची दखल घेतली नाही अखेर या शिक्षकांनी मुंबई  उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्यावरती झालेला अन्याय दूर करण्याबाबत याचिका दाखल केली होती . मुंबई उच्च न्यायालयाने सदर 93 शिक्षकांवरती खूप अन्याय झालेला आहे व यांना तात्काळ सहा आठवड्याच्या आत महापालिकेच्या सेवेत समावून घेऊन वेतनश्रेणीवर नियमित वेतन अदा करण्याचे आदेश दिलेले असताना सुद्धा गेली चार महिन्यापासून सदर पुणे मनपाचे प्रशासन याकडे जाणून बुजून कानाडोळा करत आहे. असा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला. (PMC Pune Education Department)
News Title | PMC Teachers Agitation Update | Congress, BJP support hunger strike of education workers during leave period

Pune Akashwani Centre Update| चुकीच्या निर्णयाला स्थगिती नको, कायमस्वरूपी अधिकारी नेमा | काँग्रेसच्या मागणीला यश | मोहन जोशी

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

Pune Akashwani Centre Update| चुकीच्या निर्णयाला स्थगिती नको, कायमस्वरूपी अधिकारी नेमा | काँग्रेसच्या मागणीला यश | मोहन जोशी

Pune Akashwani Centre Update | पुणे आकाशवाणी केंद्राचे (Pune Akashwani Centre) वृत्त विभाग केंद्र बंद करण्याच्या निर्णयावर तात्पुरती स्थगिती केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर (Union Minster Anurag Thakur) यांनी दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. परंतु पुणेकर जनतेचा असलेला रोष व काँग्रेसने (Congress party) केलेली मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारनी (Central Government) केलेली ही तात्पुरती मलमपट्टी आहे. पुणेकरांना स्थगिती नको निर्णय कायमस्वरूपी रद्द झाला पाहिजे. अशी काँग्रेसची मागणी आहे असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी म्हंटले आहे. (Pune Akashwani Centre Update)

मोहन जोशी पुढे म्हणाले की, यासाठी केवळ सक्षम माहिती अधिकारी नाही असे कारण सांगून हे केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता. मात्र हे कारण पुन्हा मिळू नये, त्यासाठी केंद्र सरकारने भारतीय माहिती सेवेतील सक्षम अधिकाऱ्याची येथे नेमणूक करावी म्हणजे पुणे आकाशवाणी केंद्राचे वृत्तसेवा केंद्र बंद होण्याचा प्रसंग पुन्हा उद्भवणार नाही. तसेच पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न कॉंग्रेस पक्षाने मार्गी लागण्यासाठी हाती घेतल्यावर पुणेकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त पाठींब्या बद्दल पुणेकरांचेही आभार मानतो, असे मोहन जोशी शेवटी म्हणाले. (Pune Akashwani news)


News Title | Pune Akashwani Center Update| Don’t suspend wrong decisions, appoint permanent officers Success to Congress demand Mohan Joshi

Pune Akashvani News | पुण्याबद्दल आकस नसेल तर प्रकाश जावडेकरांनी पुण्यासाठी एवढे तरी करावे – मोहन जोशी

Categories
Breaking News Political पुणे

 Pune Akashvani News | पुण्याबद्दल आकस नसेल तर  प्रकाश जावडेकरांनी  पुण्यासाठी एवढे तरी करावे – मोहन जोशी

Pune Akashvani News | आकाशवाणी पुणे केंद्रातील (Akashvani Pune Centre) प्रादेशिक वृत्त विभाग बंद करुन त्यावरील बातमीपत्रांचे छत्रपति संभाजीनगरला  स्थलांतर करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेऊन पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाला नष्ट करण्याचे धोरण आखले आहे असे दिसून येत आहे. अशा वेळी माजी केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री असणारे ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांना पुण्याबद्दल आकस नसेल तर किमान पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्याकडे प्रयत्न करून हा निर्णय रद्द होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. जर हा निर्णय केंद्र शासनाने (Central Government) रद्द केला नाही तर कॉंग्रेस पक्षातर्फे (Congress Party) तीव्र निदर्शने केली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा पुण्याबद्दलचा आकस स्पष्टपणे दिसून येत असल्यामुळे पुणेकरांनी आता संघटित होऊन भाजपचा हा डाव हाणून पाडला पाहिजे. तसेच शिवाजीनगर येथे भव्य मेट्रो स्टेशन होत असल्यामुळे पुणे आकाशवाणीच्या सुमारे ४ एकर जागेवर बिल्डरच्या फायद्यासाठी व्यापारी संकुल होण्यासही विरोध केला पाहिजे असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी म्हंटले आहे.
मोहन जोशी पुढे म्हणाले की, ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकर केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री असतानाच त्यांनी घेतलेल्या केंद्र धार्जिण्या निर्णयामुळे पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची स्वायत्तता गेली. पुणे आकाशवाणीचे प्रादेशिक वृत्ताचे केंद्र गेले. पुणे दूरदर्शनची देखील त्यांनी दुरावस्था करून टाकली. केवळ राज्याचेच नव्हे तर देशाची सांस्कृतिक राजधानी असा पुण्याचा नावलौकिक कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातबद्दल प्रेम आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरबद्दल प्रेम आहे अशावेळी ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकरांना पुण्याबद्दल प्रेम आहे काय? असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत. पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाला नख लावणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारला साथ देऊन ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकर यांनी कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यी मर्जी संपादन केलीही असेल मात्र पुणेकर आता त्यांच्या पुणे विरोधी कटकारस्थानांना क्षमा करणार नाहीत. आता तरी याचे प्रायश्चित्त म्हणून ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे रदबदली करून पुणे आकाशवाणी केंद्राबद्दलचा निर्णय मागे घेण्यास त्यांना भाग पाडावे. कॉंग्रेस पक्ष  पुणेकरांचे हित सांभाळण्यासाठी या निर्णयाविरुद्ध जोरदार आंदोलन करेल, असा इशारा मोहन जोशी यांनी दिला.  (Pune Akashvani)
—-
News Title | Pune Akashvani News |  If you don’t care about Pune, Prakash Javadekar should do something for Pune – Mohan Joshi

Panshet Flood Victims |भाजपकडून पानशेत पुरग्रस्तांवर नऊ वर्षांपासून अन्यायच ; निवडणुकीच्या भितीपोटी काढला आदेश | मोहन जोशी

Categories
Breaking News Political social पुणे

Panshet Flood Victims |भाजपकडून पानशेत पुरग्रस्तांवर नऊ वर्षांपासून अन्यायच ; निवडणुकीच्या भितीपोटी काढला आदेश | मोहन जोशी

Panshet Flood Victims | “पानशेत पूरग्रस्तांना (Panshet Flood Victims) ते राहात असलेल्या जागा त्यांच्या मालकीची करुन देण्यासाठी काँग्रेस पक्षाने (Congress Party) २०१४ मध्ये निर्णय घेतला होता. परंतु, भाजप सरकारने (BJP Government) ९ वर्षे त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे पानशेत पुरग्रस्तांवर भाजप सरकारने अन्यायच केला आहे.” अशी टिका प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी केली. (Panshet Flood Victims)

याविषयी जोशी म्हणाले, “पानशेत पुरग्रस्तांचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. पुरग्रस्त राहात असलेली घरे त्यांच्या मालकी हक्काने देण्यासाठीचा प्रश्न होता. काँग्रेस पक्षाने या प्रश्नाची दखल घेत पाठपुरावा केला होता. त्यामुळे विकास देशमुख हे जिल्हाधिकारी असताना पुरग्रस्तांच्या बैठ्या घरांमधील रहिवाशांना जागेचा मालकी हक्क देण्याचा निर्णय घेण्यात आला होता व तशी प्रमाणपत्रे देखील देण्यात आली होती. त्यानंतर पुरग्रस्त १०३ सोसायट्यांना देखील मालकी हक्क मिळावा, त्यांच्यासंबंधीच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यात याव्यात, यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे २०१४ मध्ये तत्कालीन महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुरग्रस्त सोसायट्यांमधील रहिवाशांना जागा त्यांच्या मालकी हक्काने देण्याचा निर्णय घेतला होता.” असे मोहन जोशी म्हणाले. (Pune News)

पुरग्रस्तांवर भाजपने अन्याय केला असल्याची टिका करत मोहन जोशी पुढे म्हणाले, “२०१४ मध्ये राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर भाजप सरकारने पानशेत पुरग्रस्तांसंबंधीच्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे गरजेचे होते. मात्र तसे घडले नाही. नऊ वर्ष भाजप सरकारने पानशेत पुरग्रस्तांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार केला आहे. नऊ वर्ष निर्णयाची अंमलबजावणी न करता पुरग्रस्तांवर अन्याय केला आहे. कसबा विधानसभा निवडणूकीमध्ये काँग्रेस विजयी झाल्यामुळे भाजपला आपली चुक कळली आहे, त्यामुळे भविष्यातील निवडणुकांमध्ये आपल्याला पुरग्रस्तांचा चांगलाच फटका बसू शकतो, हे लक्षात आल्यामुळेच त्यांनी आता पुरग्रस्तांबाबत तातडीने आदेश दिले आहेत. मात्र अशा प्रकारे भाजपने नऊ वर्ष पुरग्रस्तांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचा केलेला प्रकार दुर्दैवी आहे.” असे मोहन जोशी म्हणाले.

याची पार्श्वभूमी सांगताना मोहन जोशी म्हणाले की, पुण्यात पानशेत धरण फुटण्याची घटना १२ जुलै १९६१ या दिवशी घडली. त्यामुळे आलेल्या पुरामध्ये पुण्याच्या मध्यवर्ती भागातील हजारो कुटुंबीयांची घरे, दुकाने पुराच्या पाण्यात गेली. त्यामुळे तत्कालीन सरकारने पुरग्रस्तांसाठी दत्तवाडी, राजेंद्रनगर, पर्वती दर्शन, सहकारनगर, शिवदर्शन, एरंडवणे, जनवाडी, गोखलेनगर, महर्षीनगर अशा ठिकाणी घरे बांधून दिली होती. संबंधित घरे ९९ वर्षांच्या कराराने भाडेतत्वावर देण्यात आली होती. मात्र हि घरे मालकी हक्काने मिळावीत यासाठी पुरग्रस्त नागरीक लढा देत होते. आता काँग्रेसने घेतलेल्या निर्णयाची भाजप सरकारने तब्बल ९ वर्षांनी अंमलबजावणी केली हेही नसे थोडके! असे मोहन जोशी शेवटी म्हणाले.


News Title |Panshet flood victims from BJP have been unjust for nine years; The order issued due to the fear of elections Mohan Joshi

Pune Metro | मेट्रोच्या विलंबाला जबाबदार कोण? | हा तर पुणेकरांच्या स्वप्नाशी केलेला खेळ | मोहन जोशी

Categories
Breaking News Political पुणे

Pune Metro | मेट्रोच्या विलंबाला जबाबदार कोण? | हा तर पुणेकरांच्या स्वप्नाशी केलेला खेळ | मोहन जोशी

Pune Metro | पुणेकर आतुरतेने वाट पहात असलेल्या पूर्ण मेट्रोला (Pune Metro) हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे की नाही? या विलंबाला नक्की कोण जबाबदार आहे असा प्रश्न काँग्रेसने (congress) केला आहे. भारतीय जनता पक्षाने (Bhartiy Janata Party) हा पुणेकरांच्या स्वप्नाबरोबर खेळच चालवला आहे. (Pune Metro)
प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) म्हणाले, भाजपच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणूक (PMC Élection) लक्षात घेत पंतप्रधानांच्या हस्ते घाईघाईत फक्त ५ किलोमीटर मार्गाचे उदघाटन ६ मार्च २०२२ रोजी केले. त्याला आता सव्वा  वर्ष झाले. या सव्वा वर्षाच्या कालावधीत मेट्रोची धाव १ इंचही पुढे गेलेली नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) वायद्यावर वायदे करत आहेत. या वर्षीचा जानेवारी झाला, मग मार्चही झाला, त्यानंतर महाराष्ट्र दिनाचा मुहुर्त सांगून झाला, मात्र तोही होऊन गेला आणि आता जून उजाडला तरी मेट्रो अद्याप पूर्ण  सुरू झालेली नाही असे मोहन जोशी म्हणाले. (Pune Metro News)
पुणेकरांना रोजची वाहतूक कोंडी (Traffic in pune) आता नकोशी झाली आहे. त्यावरचा उपाय म्हणून केंद्र व राज्य सरकारने मेट्रोचा ११ हजार ५०० कोटी रूपये इतक्या अगडबंब खर्चाचा प्रकल्प सुरू केला. तो बहुधा भ्रष्टाचारासाठीच केला असावा अशी शंका आता पुणेकरांना येऊ लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ डिसेंबर २०१६ रोजी भूमी पूजन केल्यापासून आता ७ वर्षे झाली तरीही अजून काम सुरूच असल्याचे सांगण्यात येते. याचा काय अर्थ घ्यायचा? हा प्रकल्प आता नक्की कशाची वाट पाहतोय? की उदघाटनांचा प्रचंड सोस असलेल्या पंतप्रधानांना भाजपच्या नेते पुन्हा पुण्यात आणणार आहेत हे त्यांनी एकदा जाहीर करावे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वायद्यांचा पुणेकरांना आता कंटाळा आला आहे. त्यांच्या वरील विश्वास उडाला आहे. (Congress leader Mohan Joshi)
पुणेकरांना आम्ही मेट्रो दिली असे भाजपच्या पुण्यातील नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येते. मात्र ही मेट्रो पुणेकरांचा अंत पहात आहे. काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत पुणेकर मेट्रो मार्गावरील वाहतूक कोंडीचा, रस्त्यांवरील खड्ड्यांचा, मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांमध्ये साचलेल्या पाण्याचा त्रास सहन करत आहे. मात्र भाजपला त्याच्याशी काहीच देणेघेणे नाही असे दिसते आहे. असेल तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीरपणे पूर्ण मेट्रो सुरू होण्याची एकच तारीख जाहीर करावी असे काँग्रेसचे त्यांना आव्हान असल्याचे मोहन जोशी म्हणाले. (Pune News)
——
News title | Pune Metro |  Who is responsible for metro delay?  |  This is a game played with the dream of Punekar  Mohan Joshi

Odisha Train Accident | ओडिशा रेल्वे अपघात | पुणे शहर कॉंग्रेस कडून श्रद्धांजली आणि शोकसभा

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे

Odisha Train Accident | ओडिशा रेल्वे अपघात |पुणे शहर कॉंग्रेस कडून श्रद्धांजली आणि शोकसभा

Odisha Train Accident |  तीन दिवसांपूर्वी ओडिशा येथे कोरोमंडल एक्स्प्रेस, माल गाडी, आणि हावडा एक्स्प्रेस ह्या तिन्ही गाड्यांचा भयानक मोठा अपघात झाला. ह्या महाभयंकर अपघातामध्ये सरकारी आकडेवारी नुसार 288 प्रवासी मृत्यु पावले.  ह्या अपघातामध्ये जे प्रवासी मृत्युमुखी पडले. त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्या साठी पुणे शहर काँग्रेस (Pune City Congress) ने  श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. या श्रद्धांजली सभेत पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी नगरसेवक माजी मंत्री उपस्थित होते. ह्यावेळी श्रद्धांजली सभे मध्ये सर्व नेत्यांनी थोडक्या शब्दां मध्ये श्रद्धांजली वाहिली, या श्रद्धांजली सभेचे नियोजन माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर ,नगरसेवक अभिजीत शिवरकर, कॅन्टोन्मेंट चे अध्यक्ष प्रदीप परदेशी यांनी केले होते. (Odisha Train Accident)

या शोकसभेसाठी पुणे शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर माजी मंत्री रमेश दादा बागवे. मा प्रदेश महासचिव अभयजी छाजेड, मा कमलताई व्यवहारे ,मा ,संगीता तिवारी मा अजित दरेकर ,मा, रफिक शेख माननीय सुजाता शेट्टी, मा नानी राजगुरू , मा रजनी त्रिभुवन, मा नीता परदेसी, मा साहिल केदारी मा मुक्तार शेख ,मा,अविनाश बागवे मा प्रशांत सुरसे, मा सीमा महाडिक ,मा, सीमा सावंत यासेच पुणे शहर काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. (Pune congress)

यावेळी पुणे शहर कांग्रेस चे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आपल्या श्रद्धांजलि पर भाषणात हा अपघात आहे की हत्या आहे. ह्या सरकारने हे बळी घेतले आहेत. तसेच रेल्वेचे बजेट कसे कमी केले ह्या सरकारने ,सिग्नल फेल्युअर रिपोर्ट आल्यावर ही गप्प बसले. निष्क्रियता दाखवली केंद्र सरकारने कॅग रिपोर्ट वर .रेल्वे मध्ये हजारोंची राहिलेली भरती सरकारने अजून केले नाहीये ,रेल्वे ट्रॅक रिपेअर केलेले नाहीयेत. रेल्वे मेंटेनन्स अजिबात नाहीये या गोष्टी सगळ्यांच्या लक्षात आणून दिल्या .
यानंतर एक तिरंगा मेणबत्ती लावून सर्वांनी मेणबत्ती पेटवून अपघातातील मृत प्रवासी व्यक्तींना  श्रद्धांजली अर्पण केली. आणि तसेच जे जखमी आहेत त्यांना देव लवकर बरे करो अशी प्रार्थना केली. (Odisha Train accident news)


News Title | Odisha Train Accident | Tribute and condolence meeting from Odisha train accident | Pune City Congress

Karnataka Election Results | कर्नाटकमधील कॉंग्रेसचा विजय ही २०२४ मधील केंद्रातील सत्तापालटाची नांदी | मोहन जोशी

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

Karnataka Election Results | कर्नाटकमधील कॉंग्रेसचा विजय ही २०२४ मधील केंद्रातील  सत्तापालटाची नांदी  | मोहन जोशी

Karnataka Election Results | कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Election) कॉंग्रेस पक्षाने (congress Party) निर्विवाद बहुमत संपादन केले ही २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील सत्तापालटाची नांदी आहे. केंद्रातील अपयशी मोदी सरकार आणि कर्नाटकातील भारतीय  जनता  पक्षाचे  भ्रष्टाचारी व अकार्यक्षम सरकार यांविरुद्चा एकत्रित रोष कर्नाटकातील मतदारांनी मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त केला हे या निकालावरून दिसून येते. असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी केले. (Karnataka Election Results)
जोशी म्हणाले, जनतेच्या खऱ्या   प्रश्नांच्या कडे दुर्लक्ष करीत केवळ धार्मिक उन्माद वाढविण्यावर भा ज पा ने भर दिला .धनसंपत्तीचा मोठा वापर केला.?मात्र , महागाई ,बेरोजगारी या बरोबरच महाभयानक भ्रष्टाचार याला विटलेला कर्नाटकातील  मतदार या धार्मिक उन्मादाला बळी पडला नाही. भ्रष्ट्राचारी जनविरोधी ,सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून दूर फेकले, त्याबद्दल कर्नाटकच्या जनतेला मी धन्यवाद देतो. त्या बरोबरच यु पी ए अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी ,कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ,श्री.राहुल गांधी ,प्रियांका गांधी सर्व पदाधिकारी आणि कर्नाटक राज्यातील कॉंग्रेस नेते व कार्यकर्ते यांचे अभिनंदन करतो .
अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीने या निवडणुकीत चिकोडी लोकसभा मतदार संघातील आठ  विधानसभा मतदार संघांची जबाबदारी निरीक्षक म्हणून माझ्यावर सोपवली होती.गेले 2 महिने अधिकाधिक वेळ मी त्यासाठी दिला .या मतदार संघात आठ पैकी पाच मतदारसंघात कॉंग्रेस पक्ष विजयी झाला याबद्दल चिकोडी लोकसभा मतदार संघातील मतदारांचे मी विशेष आभार मानतो.
‘ऑपरेशन लोटस’चा विचारही भाजपा करू शकणार नाही .एव्ह्ढे घवघवीत यश कर्नाटकातील  मतदरांनी कॉंग्रेसला दिले आहे .कॉंग्रेस पक्ष हा विश्वास सार्थ ठरवेल हे निश्चित !असे ही जोशी म्हणाले.
——
Karnataka Election Results | Congress victory in Karnataka heralds a coup at the Center in 2024 Mohan Joshi

karnataka election 2023 | कर्नाटक निवडणूक आणि तिथले राजकरण समजून घ्या

Categories
Breaking News Political देश/विदेश संपादकीय

कर्नाटक निवडणूक आणि तिथले राजकरण समजून घ्या

2023 ची कर्नाटक निवडणूक ही भारतीय राजकारणातील एक अत्यंत महत्वाची घटना आहे.  समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि गतिशील राजकीय इतिहासासाठी ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटक राज्यात प्रमुख राजकीय पक्षांमध्ये सत्तेसाठी तीव्र लढाई पाहायला मिळणार आहे. (Karnataka election 2023)
 राज्यात एकूण 224 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि विधानसभेचे सदस्य (आमदार) निवडण्यासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. जे नंतर राज्यात सरकार स्थापन करतील.
 कर्नाटक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) (BJP) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (congress) (आयएनसी), आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) (जेडीएस) हे प्रमुख दावेदार होते.  2018 पासून राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला राज्यावर आपली पकड कायम ठेवण्याची आशा आहे.
 दुसरीकडे, भाजपला नेस्तनाबूत करण्याच्या प्रयत्नात काँग्रेस आणि जेडीएसने युती केली.  2018 च्या निवडणुकीनंतर राज्यात यापूर्वी काँग्रेस आणि जेडीएसने युतीचे सरकार स्थापन केले होते, परंतु अंतर्गत गटबाजी आणि सत्ता संघर्षामुळे हे सरकार कोसळले.
 2023 ची कर्नाटक निवडणूक अत्यंत ध्रुवीकरणाची होणार आहे.  भाजप आणि काँग्रेस-जेडीएस या दोन्ही आघाडीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत.  आपल्या विकासाच्या अजेंड्यावर आणि मजबूत नेतृत्वावर आधारित असलेल्या भाजपने बेंगळुरू मेट्रोचे बांधकाम आणि कृषी संजीवनी योजना सुरू करण्यासारख्या राज्यातील आपल्या उपलब्धींवर लक्ष केंद्रित केले.
 दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएसने राज्य सरकारमधील कथित भ्रष्टाचार, इंधनाच्या किमतीत झालेली वाढ आणि नवीन शेती कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन या मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधला.
 शेवटी, 2023 ची कर्नाटक निवडणूक ही राज्याच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना होणार आहे.
 —

|  कर्नाटकचे राजकारण नेमके कसे आहे? (Politics in Karnataka)

 कर्नाटकचे राजकारण त्याच्या गतिमान स्वरूपासाठी ओळखले जाते आणि राजकीय घडामोडींचा समृद्ध इतिहास आहे.  राज्याच्या स्थापनेपासून विविध राजकीय पक्षांनी राज्य केले आहे, कोणत्याही एका पक्षाची सत्तेवर सातत्यपूर्ण पकड नाही.
 कर्नाटकातील प्रबळ राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष (भाजप), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC), आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) (JDS) आहेत.  इतर लहान पक्ष जसे की बहुजन समाज पक्ष (BSP) आणि कर्नाटक संरक्षण वेदिके (KRV) सारख्या प्रादेशिक पक्षांची देखील राज्याच्या राजकीय परिदृश्यात उपस्थिती आहे.
 काँग्रेस हे पारंपारिकपणे कर्नाटकात प्रबळ राजकीय शक्ती आहे आणि स्वातंत्र्योत्तर इतिहासातील बहुतांश काळ त्यांनी राज्यावर राज्य केले आहे.  तथापि, भाजपने अलिकडच्या वर्षांत महत्त्वपूर्ण स्थान मिळवले आहे आणि 2008 ते 2013 आणि 2018 ते 2023 पर्यंत राज्यात सत्तेत होते.
 माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि त्यांचे पुत्र एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांनीही कर्नाटकच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  राज्यात आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाने अनेकदा काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे.
 प्रादेशिक अस्मिता आणि भाषेचे महत्त्व हे कर्नाटकच्या राजकारणाचे एक निश्चित वैशिष्ट्य आहे.  राज्यात कन्नड भाषिक लोकसंख्या लक्षणीय आहे, आणि KRV सारख्या पक्षांनी कन्नड भाषा आणि संस्कृतीचे कारण पुढे केले आहे.
 कर्नाटकच्या राजकारणातही वाद आणि राजकीय नाटक यांचा वाजवी वाटा दिसून आला आहे.  2019 मध्ये, सत्ताधारी आघाडी सरकारमधील अनेक आमदारांनी राजीनामा दिला तेव्हा राज्यात राजकीय संकट आले, ज्यामुळे सरकार कोसळले आणि भाजप पुन्हा सत्तेवर आला.
 शेवटी, कर्नाटक राजकारण हे एक जटिल आणि गतिमान क्षेत्र आहे, ज्यामध्ये अनेक राजकीय पक्ष सत्ता आणि प्रभावासाठी स्पर्धा करत आहेत.  राज्याची प्रादेशिक ओळख आणि भाषा राजकीय चर्चा घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि अलिकडच्या वर्षांत राज्याने महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी पाहिल्या आहेत.
 —

Congress | पुणेकरांना 40% सवलत पूर्ववत करण्यासाठी व व्याज कमी करण्यासाठी प्रभू रामचंद्रांना साकडे

Categories
Breaking News PMC Political social पुणे

पुणेकरांना  40% सवलत पूर्ववत करण्यासाठी व व्याज कमी करण्यासाठी प्रभू रामचंद्रांना साकडे

पुण्यात राहणाऱ्या नागरिकांना1970 सालापासून 40% घरपट्टी सूट मिळत होती. तथापि गेली पाच वर्ष ती बंद करण्यात आली आहे. ती पूर्ववत करण्यासाठी काँग्रेस च्या वतीने प्रभू श्री रामचंद्रांना साकडे घालण्यात आले.

पुणेकरांना मिळणारी 40% सवलत पुन्हा सुरू ठेवावी यासाठी अनेक वेळा आंदोलन झाली.काँग्रेस पक्षाने सहीची मोहीम राबवली. देवेंद्र फडवणीस यांना निवेदन दिले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील साहेबांना पत्र पाठविले. परंतु पाच वर्षे त्यांनी दुर्लक्ष केले होते. कसब्यात भाजपाचा पराभव झाल्यावर पालकमंत्र्यांनी मागील महिन्यात याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे बैठक घेऊन ती पूर्ववत चालू ठेवावी अशी मागणी केली.


परंतु कॅबिनेटमध्ये लगेच निर्णय घेतो असे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आश्वासन देऊन सुद्धा एक महिना लोटला पुणेकरांना याचा आर्थिक बोजा नागरिकांना सोसावा लागत आहे. यासाठी पुणेकर नागरिकांच्या वतीने काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी व आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली तुळशीबाग राम मंदिरत, राज्य सरकारला 40% पट्टीतील सवलत सुरू ठेवावी व सावकारी व्याज कमी करावे त्यासाठी आरती करून साकडे घालण्यात आले. यावेळी मोहन जोशी म्हणाले की पुणेकर नागरिकांच्या साठी आम्ही प्रत्येक वेळेस आंदोलन केलीत. मग ते रस्त्यावरील खड्ड्यांच्या असो व पाणीपुरवठा बाबत असो सरकारचे नेतृत्व करणारे नुकतेच आयोध्या वारी करून आलेत आमची म्हणजेच पुण्याचे तुळशीबागेतील राम मंदिर आहे.
आमदार यांनी यांनी भाजपाच्या राजकारणावर टीका केली ज्या मतदारांनी भाजपाला मतदान केले भरमसाठ टॅक्स लावून ते छळत आहेत.40% सवलती सोबत 500 .फीट घरांना टॅक्स माफ करण्यासाठी आम्ही पण रस्त्यावर उतरणार असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे संयोजन प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस संजय बालगुडे यांनी केले होते. यावेळी मंदिरात रामाची आरती करण्यात करिता आरतीला 40 ते 50 कार्यकर्ते हजर होते असे पत्रक संजय बानगुडे यांनी दिले आहे.