Contract workers | PMC pune | कंत्राटी कामगारांची इशारा सभा | राष्ट्रीय मजदूर संघातर्फे आयोजन‌

Categories
Breaking News PMC पुणे

कंत्राटी कामगारांची इशारा सभा

| राष्ट्रीय मजदूर संघातर्फे आयोजन‌

कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचा इशारा देण्यासाठी ” इशारा सभेचे आयोजन‌ ” राष्ट्रीय मजदूर संघातर्फे करण्यात आले आहे. ही सभा दिनांक ३० सप्टेंबर २०२२ वार शुक्रवार रोजी दुपारी २–००ते ६–०० या वेळेमध्ये पुणे मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष आणि कामगार नेते  सुनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे

पुणे महानगरपालिका मध्ये सुमारे दहा हजार कंत्राटी कामगार सध्या कार्यरत आहेत. मनपाच्या वेगवेगळ्या खात्यात सुरक्षा रक्षक,वाहन चालक, पाणी पुरवठा, स्मशान भूमी,सफाई कामगार तसेच कार्यालयात लेखनिक अशा अनेक पदांवर कार्यरत आहेत. या दिवाळीला मनपाच्या कायम कामगारांना ८.३३ टक्के बोनस म्हणजेच एक पगार व १९००० रूपये सानुग्रह अनुदान इतकी रक्कम मिळणार आहे.परंतू कंत्राटी कामगारांना काहीच मिळणार नाही हा मोठा अन्याय कंत्राटी कामगारांवर होत आहे.अशा सर्व कंत्राटी कामगारांना कायम कामगारांए्वढाच बोनस व सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे, कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहतील , कंत्राटी कामगारांना कायम कामगारांए्वढाच पगार द्यावा अशा मागण्यांच्या संदर्भात मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचा इशारा देण्यासाठी ” इशारा सभेचे आयोजन‌ ” राष्ट्रीय मजदूर संघातर्फे करण्यात आले आहे. ही सभा दिनांक ३० सप्टेंबर २०२२ वार शुक्रवार रोजी दुपारी २–००ते ६–०० या वेळेमध्ये पुणे मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष आणि कामगार नेते  सुनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे, त्यासाठी जास्तीत जास्त कंत्राटी कामगारांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष श्री सीताराम चव्हाण आणि सेक्रेटरी श्री. एस. के. पळसे यांनी केले आहे

Labor Law | कामगार कायद्यातील बदलांमुळे किती कामगारांना रोजगार मिळणार ? | कामगार नेते सुनील शिंदे

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

कामगार कायद्यातील बदलांमुळे किती कामगारांना रोजगार मिळणार ? | कामगार नेते सुनील शिंदे

पुणे:- कामगार कायद्यातील बदलांमुळे रोजगारामध्ये वाढ होईल, असे केंद्रीय कामगार मंत्री यांनी पुणे येथे जाहीर केले. हा त्यांचा दावा पूर्णपणे हास्यास्पद आहे. असे राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले वास्तविक पाहता नवीन रोजगार निर्मिती होईल व त्यांना कायम काम मिळेल. असे कोणतेही धोरण व तरतूद कामगार कायद्यामध्ये नाही. याउलट कामगारांना कायम न करता, कोणतेही लाभ न देता, कसे काम करून घेता येईल असे “फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट” सारखा काळा कायदा करण्याचं काम केंद्र सरकारकडून सुरू आहे. यामुळे यापुढे कायम कामगार ही संज्ञा संपुष्टात येईल. अशी भीती कामगार वर्गात निर्माण झाली आहे. आठ वर्षांमध्ये किती कामगारांना कायम रोजगार मिळाला. ते कामगार मंत्र्यांनी जाहीर करावे. जर आकडेवारी आपण पाहिली तर असे निदर्शनास येते की, कायम कामगारांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत असून, त्याठिकाणी कंत्राटी कामगार व तात्पुरत्या स्वरूपाचे कामगार, रोजंदार कामगार, असंघटित कामगार ही संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. आपल्या देशात काम करत असणाऱ्या कामगारांपैकी 95 ते 97 टक्के कामगार हे असंघटित क्षेत्रांमध्ये आलेले असून 3 ते 5 टक्के कामगार हे फक्त संघटित क्षेत्रामध्ये राहिले आहेत. परंतु कामगार कायद्यातील नवीन होऊ घातलेल्या धोरणामुळे कायम कामगार संख्या संपुष्टात येऊन, फक्त रोजंदारी, कंत्राटी आणि असंघटित कामगार हेच त्या ठिकाणी राहतील. त्यामुळे कामगारांना कोणताही फायदा मिळणार नाही.

दुसऱ्या बाजूला असंघटित कामगारांची नोंदणी केली. अशा बढाया कामगार मंत्री मारत आहेत. कोरोना महामारी च्या, लॉकडाउनच्या कालावधीमध्ये देशांमध्ये असंघटित कामगारांची अवस्था काय आहे. हे जगाने पाहिले आहे. त्या वेळेला सामाजिक संस्था, कामगार संघटना, न्यायालय यांनी सरकारला जाब विचारल्यावर, मग या कामगारांची नोंदणी करण्याचे काम केंद्र सरकारने सुरू केलं. आणि म्हणून ईश्रम पोर्टल या नावाखाली अनेक कामगारांची नोंदणी केली, परंतु या पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांना सरकारने काय दिले? तेही कामगार मंत्र्यांनी जाहीर करावे. या सर्व कामगारांना कोणताही फायदा आतापर्यंत देण्यात आलेले नाही. किंबहुना आहे ते कामगार कायदे शिथिल करायचे, कामगार संघटना कमजोर करायच्या आणि उद्योग धारजिने धोरण स्वीकारायचे. असे धोरण केंद्र सरकारने अवलंबलेले आहे. त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो.

असंघटित कामगारांमध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर सामील झाला आहे. त्याच्यामध्ये स्विगी, झोमॅटो, ओला, उबेर यासारख्या कंपन्या कामगारांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करीत आहेत. त्यांच्यासाठी कोणताही कायदा करायचं काम कोठेही कामगारमंत्री करीत नाहीत. आणि म्हणून नवीन कामगार धोरणामुळे व कामगार कायद्यामध्ये होऊ घातलेल्या सुधारणांमुळे देशांमध्ये रोजगार निर्मिती होईल, हे केंद्रीय कामगार मंत्री यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. आता तरी त्यांनी जागे होऊन या सर्व कामगारांना, कामगार संघटना ना भेट देऊन, चर्चा करून, त्यावर अपेक्षित बदल ते सर्वसमावेशक करावेत. असे कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले.

contract workers in the crematorium | स्मशानभूमी मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत महापालिकेत बैठक

Categories
PMC पुणे

स्मशानभूमी मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत महापालिकेत बैठक

| कामगारांना विविध सुविधा देण्याची केली गेली मागणी

पुणे महानगर पालिकेतील स्मशानभूमी मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता (देखभाल व दुरुस्ती)  श्रीनिवास कंदूल यांच्याकडे बैठक झाली. या बैठकीमध्ये आपल्या संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे, उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, स्मशान भूमी कर्मचाऱ्यांचे नेते, बाबा कांबळे व इतर पदाधिकारी, कंत्राटदार अधिकारी हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये खालील निर्णय घेण्यात आले.

पगार प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला देण्याचा आदेश कंत्राटदाराला करण्यात आला.  कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याला नेमून दिलेल्या कामाच्या ठिकाणी त्याच्या पदापेक्षा वेगळे काम सांगू नये. असे आदेश दिले. विनाकरण कोणाचीही बदली करू नये. अचानक कामाच्या ठिकाणमध्ये बदल करू नयेत.
कोणतेही अतिरिक्त काम कर्मचाऱ्यांना सांगू नये.

प्रत्येक कर्मचाऱ्याला पगार स्लिप, सुरक्षेची सर्व साधने, ई एस आय सी कार्ड व प्रॉ. फंडाचे डिटेल्स कंत्राटदाराने प्रत्येक कर्मचाऱ्याला द्यावेत असे आदेश कंत्राटदाराला यावेळी दिला.

कामगार नेते सुनील शिंदे साहेबांनी 2015 ते 2021 या कालावधीचा राहिलेल्या किमान वेतनाच्या फरकाची रक्कम द्यावी.  15 ऑगस्ट, 26 जानेवारी, एक मे आणि दोन ऑक्टोबर, या राष्ट्रीय सणांचा डबल पगार, एक सुट्टी देण्यात यावी, रजा व बोनस कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात यावा. अशी मागणी कंदुल यांच्याकडे केली.
या मागण्यांबाबत  कंदुल यांनी आपण मनपा आयुक्त यांच्याकडे ही बाब निर्णयासाठी पाठवू. असे सांगितले व यासंदर्भात आयुक्तच निर्णय घेतील असे सांगितले.

Salary details of contract workers | कंत्राटी कामगारांची प्रत्येक महिन्याच्या वेतनाची माहिती संगणक प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याचे आदेश  | सर्व विभागांना महापालिका सहायक आयुक्तांचे आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

 कंत्राटी कामगारांची प्रत्येक महिन्याच्या वेतनाची माहिती संगणक प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याचे आदेश

| सर्व विभागांना महापालिका सहायक आयुक्तांचे आदेश

पुणे | महानगरपालिकेत विविध विभागांमार्फत कामकाजाकरिता निविदाधारकांची नियुक्ती करण्यात येते. या नियुक्त करण्यात आलेल्या निविदाधारकांमार्फत कामकाजाकरिता कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात येते. सदर नियुक्त निविदाधारकांनी त्यांच्यामार्फत नेमण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांचे महिनेमहाचे वेतन वेळेत देणेस आवश्यक आहे. तथापि असे निदर्शनास आले आहे की, सदर कंत्राटी सेवकांचे दर महिनेमहाचे वेतन उशिरा देण्यात येत असल्याने महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त, मुख्य कामगार अधिकारी यांच्याकडे कंत्राटी कामगारांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे कंत्राटी कामगारांची प्रत्येक महिन्याच्या वेतनाची माहिती संगणक प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याचे आदेश सहायक महापालिका आयुक्त यांनी महापालिकेच्या सर्व विभागांना दिले आहेत.

सहायक महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार  विविध विभागांकडील निविदाधारकांमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी सेवकांना महिनेमहाचे वेतन देण्यात आल्याचे सद्यस्थितीबाबतची माहिती देणेकामी ऑनलाईन संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. याकरिता
contractemployee.pmc.gov.in ही संगणक प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांनी त्यांच्या विभागांचे ऑनलाईन User Id व Password कामगार सल्लागार यांचेमार्फत घेण्यात यावेत. तदनुषंगाने आपले विभागाकडील निविदाधारकांची माहिती व कंत्राटी मनुष्यबळाच्या कंत्राटी सेवकांच्या वेतनाबाबतचा डाटा एन्ट्री करणे अपेक्षित आहे. कंत्राटी सेवकांचे दर महिनेमहाचे वेतन अदा केल्याबाबतची माहिती अद्ययावत करण्यात यावी. माहिती व तंत्रज्ञान विभाग व कामगार सल्लागार विभागामार्फत सदर संगणक प्रणालीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल. याबाबत संबंधित सर्व विभागांनी ८ दिवसात सर्व माहितीसह डाटा एन्ट्री पूर्ण करावी व वेळोवेळी माहिती अद्ययावत करण्यात यावी.