Pune Drug Racket | Shivensena UBT | अमली पदार्थ व गुटख्याच्या विळख्यातून पुण्याला सोडवा | पुणे पोलिस आयुक्तांना शिवसेनेचे (UBT) निवेदन 

Categories
Breaking News Political social पुणे

Pune Drug Racket | Shivensena UBT | अमली पदार्थ व गुटख्याच्या विळख्यातून पुण्याला सोडवा | पुणे पोलिस आयुक्तांना शिवसेनेचे (UBT) निवेदन

 

Pune Drug Racket | Shivsena UBT | अमली पदार्थ व गुटख्याच्या (Pune Drug) विळख्यातून पुण्याला सोडवा, अशी मागणी शिवसेना पुणे (Shivsena Pune UBT) च्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पुणे पोलिस आयुक्तांना (CP Pune) निवेदन देण्यात आले आहे.

शिवसेनेच्या निवेदनानुसार  पुणे शहर विद्येचे माहेर घर म्हणून परिचित आहे, त्यासोबत भारतातील महत्वाचे आय टी हब म्हणून ही बघितले जाते. या शहरात तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, या तरुण पिढीला ड्रग, गांजा , गुटखा , या सारख्या अमली पदार्थ सेवन करण्यासाठी पुणे शहरात सहज उपलब्ध होत आहे. हे मागील काही शहरातील घटनांमधून निदर्शनास आले आहे. पुणे पोलीसांनी ड्रग्ज व्यावसायिकाला पकडल्यामुळे खूप मोठ रॅकेट हाती लागले आहे. त्याची पाळेमुळे खूप खोलवर रुजलेली आहेत. जे कोणी छोटे मोठे उत्पादक, व्यावसायिक, हितसंबंधित व्यक्ति अथवा राजकीय वरदहस्त ठेवलेले नेते या रॅकेटमधे सहभागी असतील त्या प्रत्येकावर कारवाई करून त्याचा तपास निष्पक्षपातीपणे व्हावा. अशी मागणी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही करत आहोत . यामुळे पुणे शहर पोलिसांचा नावलौकिक जागतिक पातळीवर उंचावला जाईल.

तसेच अत्यंत महत्वाचे पुणे शहरात शाळा महाविद्यालयांच्या जवळ, वस्ती भागात अनेक पान टपऱ्यांमध्ये , दुकानांमध्ये तसेच काही व्यक्तींकडे आरोग्याला घातक गोष्टी सहज उपलब्ध होत आहेत आणि सर्रास पणे विकल्या जात आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा पुण्यात सहज उपलब्ध होऊन सर्रास पणे विकला जात आहे. आमच्या माहितीप्रमाणे रोज 20 कोटी रू चा गुटखा पुण्यात आणला जातो. बिनदिक्कतपणे त्याची विक्री होते आणि त्याचे सेवन केले जाते. कॅन्सरचे प्रमाण याच कारणाने दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस प्रशासनाचा यावर वचक असावा, असे आपणास सूचित करावयाचे आहे. सध्या तरी असे दिसते कि याचे मोठे उदाहरण ससून हाॅस्पिटल मधील ड्रग्ज रॅकेट हे आहे ,

यावेळी बोलताना संजय मोरे म्हणाले शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहरातील तरुणांच्या आरोग्य , शिक्षण विषयात गांभीर्याने लक्ष देत असून आपण तत्पर यावर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना सामान्य पुणेकरांसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून सदर गुटखा भरलेल्या गाड्या अडवून संपूर्ण गुटख्याची होळी करून आम्ही जनआंदोलन घेण्यासही मागे पुढे पाहणार नाही .

यावेळी शिष्टमंडळात पुणे शहरप्रमुख संजय मोरे ,गजानन थरकुडे ,विधानसभाप्रमुख विशाल धनवडे, उत्तम भुजबळ, राजेश मोरे, अनंत घरत, मकरंद पेठकर उपस्थित होते.

NCP Pune | CP Pune | पुणे राष्ट्रवादीने पुणे पोलिस आयुक्तांकडे केली ही मागणी 

Categories
Breaking News Political social पुणे

NCP Pune | CP Pune | पुणे राष्ट्रवादीने पुणे पोलिस आयुक्तांकडे केली ही मागणी

 

NCP Pune | CP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP Pune)वतीने पुणे शहर पोलिस आयुक्तांना (CP Pune) निवेदन देण्यात आले आहे. आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील आक्षेपार्ह गोष्टीवर नजर ठेवण्याची मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या निवेदनानुसार  सातारा येथे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुराच्या वादातून धार्मिक हिंसा घडली. तरी आगामी सर्वधर्मीय उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात अशी घटना घडू नये यासाठी पुणे पोलीस प्रमुख म्हणून पुणे पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या ‘सायबर सेल’ ला आवश्यक सूचना देऊन असे गैरप्रकार रोखावेत व कोणी असा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात महिला व मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे.यातील बहुतांश मुली या अल्पवयीन असून अशा बेपत्ता मुलींचा शोध घेण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे. या अनुषंगाने पुणे शहरात विशेष उपाययोजना करण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने आज पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री.रितेश कुमार,सह. पोलीस आयुक्त श्री.संदीप कर्णिक यांच्याकडे केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष श्री. प्रशांत जगताप, माजी आमदार मा.जयदेवराव गायकवाड,माजी शहराध्यक्ष श्री. रविंद्रआण्णा माळवदकर,राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्ष सुषमाताई सातपुते,अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर बाबू शेख,तनवीर शेख,तालीब मदारी,आदी उपस्थित होते.

Pune Bangladeshi Citizens | Shivsena Pune | पुण्यात बेकादेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी लोकांविरुद्ध कारवाई करा | शिवसेना शहर प्रमुखांची पोलीस आयुक्त यांच्याकडे मागणी

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे

Pune Bangladeshi Citizens | Shivsena Pune | पुण्यात बेकादेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी लोकांविरुद्ध कारवाई करा | शिवसेना शहर प्रमुखांची पोलीस आयुक्त यांच्याकडे मागणी

Pune Bangladeshi Citizens | Shivsena Pune | पुणे शहरात बेकायदेशीरपणे रहात असणाऱ्या बांगलादेशीविरुद्ध (Illegal Bangladeshi in Pune) कारवाई करण्याची मागणी शहर शिवसेना प्रमुख प्रमोद भानगिरे (Pramod Bhangire) यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Pune Ritesh Kumar) यांच्याकडे केली आहे. (Pune Bangladeshi Citizens | Shivsena Pune)

शहर प्रमुखांच्या निवेदनानुसार  पुणे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असून राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे सुविख्यात आहे.  गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात बेकायदा पद्धतीने ५,००० बांगलादेशी रहात असल्याचे गुप्तचर विभागाच्या सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे. पुण्यात लष्कराचे दक्षीण मुख्यालय येथे आहे. तसेच पुण्यात देहु, खडकी ही लष्कराच्या दृष्टीने महत्वाची ठिकाणे आहेत. तसेच रिझर्व बँकेचे महत्त्वाचे कार्यालय देखील पुण्यात आहे. पुणे शहरात यापूर्वीही दोनदा बॉम्बस्फोट झालेले आहेत. तसेच नुकतेच पुणे शहरात दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून तरुणांची माथी भडकवणारा इसीस संबंधित डॉक्टर जेरबंद करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर ५,००० बांगलादेशी नागरिक पुण्यात बेकायदेशीरपणे राहत असणे, शहराच्या दृष्टीने धोकादायक आहे. बांगलादेशी नागरिकांचे राहणीमान, आपल्या
भारतातील पश्चिम बंगाल या राज्यातील लोकांशी मिळतेजूळते असल्याने, त्याचा गैरफायदा घेत बांगलादेशी पुण्यात रहात आहे. या बांगलादेशी लोकांना शोधण्यासाठी पुण्यात भाडे करार करुन राहणाऱ्या व्यक्तींनी मुळ मालकाशी योग्य तो करार केला आहे का? मुळ मालकाने त्यांच्या कागदपत्रांची पोलीस पडताळणी केली आहे का? हे माहिती असणे आवश्यक आहे. अनेक घरमालकांनी याबाबत अनास्था दाखवली आहे. ज्यामुळे पुणे शहराला धोका निर्माण होवू शकतो. तरी मोहिम उघडून संयुक्तिक कारवाई करावी तसेच अवैधरित्या शहरात राहणाऱ्या परदेशी नागरिकांवर निर्बंध आणावेत. असे भानगिरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. (Bangladeshi  Citizens in Pune)
——–
News Title | Pune Bangladeshi Citizens | Shivsena Pune | Take action against Bangladeshi people living illegally in Pune Shiv Sena city chief’s demand to police commissioner

CP Pune | PMC Pune | पावसाळ्यात पुणेकरांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्या | पुणे पोलीस आयुक्तांच्या पुणे महापालिकेला सूचना

Categories
Breaking News PMC social पुणे

CP Pune | PMC Pune | पावसाळ्यात पुणेकरांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्या | पुणे पोलीस आयुक्तांच्या पुणे महापालिकेला सूचना

CP Pune | PMC Pune | यावर्षी पावसाळा (Monsoon) सुरु होणेपुर्वी शहरातील वॉटर लॉगींगचे ठिकाणांची (Water Logging Places) व ड्रेनेजच्या झाकणांची (Drainage Covers) पाहणी करा. तसेच रस्त्यावरील खड्यांची (Potholes) पाहणी करुन तात्काळ दुरुस्ती आणि उपाययोजना करुन घेणे उचित होणार आहे. जेणेकरुन वाहतूक कोंडी (Traffic Jam) होणार नाही.  तसेच नागरीकांना नाहक त्रास होणार नाही. अशा सूचना पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Pune Ritesh Kumar) यांनी पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) केल्या आहेत. (CP Pune | PMC Pune)

विकासकाम झाल्यानंतर काळजी घेतली जात नाही

पोलीस आयुक्तांनी महापालिकेला दिलेल्या पत्रानुसार पुणे शहरामध्ये विविध विकासकामे (Devlopment Works) सुरु असुन विविध विकासकामांकरीता रस्ते खोदाई ( ड्रेनेज लाईन / पिण्याचे पाईपलाईन / इलेक्ट्रीसीटी केबल / गॅस लाईन ) करण्यात येते. मात्र काम पूर्ण झालेनंतर त्या कामाकरीता खोदलले रस्ते तात्काळ दुरुस्त केले जात नाहीत. कंपनीने नियुक्त केलेला ठेकेदार खोदलेला रस्ता व्यवस्थित बुजवत नाहीत. खडी, माती टाकून बुजवलेल्या रस्त्यावरुन गाडी गेल्यास रस्ता लगेच खचून तो वाढतच जातो. त्यात पाणी साचल्याने खड्डे तयार होतात व असे खड्डे अपघातास कारणीभूत होतात.  विकास कामांकरीता रस्ते खोदाई झालेनंतर खोदलेला भाग बऱ्याच ठिकाणी तसाच ठेवला जात असून त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठया गैरसोयीला सामोरे जावे लागते. प्रसंगी अपघात होण्याची शक्यता वाढते. (Pune Police)

मेट्रोच्या कामाने अडचणी वाढल्या

पुणे शहरामधील अनेक रस्त्यावर मेट्रोचे कामकाज (Pune Metro) चालु असुन त्या कामाच्या अनषंगाने रस्त्यावर खोदण्याचे कामे करण्यात आलेली आहे. काम पुर्ण झालेनंतर त्याकारीता खोदलेले रस्ते दुरूस्त केले गेलेले नाहीत. त्यामध्ये तात्पुरती खडी, माती टाकुन ते बुजविण्यात येतात. या ठिकाणावरून वाहने जाऊन रस्ता खचला जातो. त्यामुळे मोठा खड्डा होऊन पावसाचे पाणी साठवुन अपघात होण्याची शक्यता असते. मेट्रोच्या कामाचा राडारोडा रस्त्यावर तसाच पडुन वाहतुकीची कोंडी होवुन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मेट्रोच्या कामकाजाकरीता बरेच ठिकाणी बॅरीकेडस् करण्यात आले असुन मेट्रोचे कामकाज पुर्ण झालेनंतरही सदर ठिकाणाचे बॅरीकेडस् तसेच असल्याने वाहतुकीस कॅरेज वे कमी मिळुन अडथळा होवुन पावसाळयामध्ये सदर बॅरीकेडस् चुकविण्यात पावसाच्या पाण्यामुळे वाहने घसरून अपघात होतात. मेट्रोच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेली मशिनरी रोडवर तशीच ठेवण्यात आलेली आहे.  त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असुन वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. (Pune Municipal Corporation News)

वाहनचालकांना करावी लागते कसरत

विविध कामांमुळे रस्त्यांची दूरावस्था होवून त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, पादचाऱ्यांना नेहमी जीव मुठीत घेवून रस्त्यावर चालावे लागत आहे. अनेक भागात सांडपाण्याची वाहिनी तुंबल्यामुळे अगर फुटल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचल्यामुळे रस्ता वाहतूकीस उपलब्ध होत नाही. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. अनेक ठिकाणी ड्रेनेजची तुटलेली झाकणे, रस्त्यावर अर्धवट बाहेर आलेली झाकणे यामुळे अपघातास निमंत्रण ठरते व रस्त्यावरचे खड्डे व अशी तुटलेली झाकणे चुकविण्याचे नादात वाहनचालकांचे वाहनावरचे लक्ष विचलीत होवून पायी चालणाऱ्या नागरिकांचा तसेच इतर वाहनचालकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. (Pune police commissioner)

अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई आवश्यक

पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी फुटपाथ, रस्ते या ठिकाणी विशेषतः शहराचे मध्यवर्ती भागात मोठया प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत परिणामी वाहतूकीस रस्ता कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने वाहतूक
कोंडीच्या घटना घडत आहेत, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अशा ठिकाणी वाहनचालक रस्त्यातच वाहन उभे करीत असतात, फुटपाथवर झालेल्या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालावे लागते त्यामुळेही अपघात होण्याची शक्यता वाढते. याकरीता अशी अतिक्रमणे काढण्यात येवून फेरीवाले, पथारीवाले यांचेवर दैनंदिन कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना फुटपाथवरुन चालणे शक्य होवून पादचाऱ्यांचे अपघात कमी होतील. तसेच त्यामुळे वाहतूक कोंडीही कमी होण्यास मदत होईल. (Hawker’s in Pune)

पार्किंग व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक

पुणे शहरामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाहनांकरीता पार्किंग उपलब्ध नसल्याने रोडवर वाहने पार्क होत असतात, याकरीता पुणे महानगरपालिके तर्फे जास्तीत जास्त पार्किंग व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक आहे. शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाजारपेठ / भाजीमंडई आहे अशा ठिकाणी महानगरपालिकेमार्फत पार्किंगची व्यवस्था / पार्किंग प्लाझा करणे गरजेचे आहे. (Parking Management)

सिग्नल यंत्रणा असणे गरजेचे

पुणे शहरामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा उपलब्ध नसल्याने वाहतूक नियमन करणे जिकिरीचे होत आहे. त्यातच पुणे शहरातील प्रवेशाचे ठिकाणी जेथे अवजड वाहतूकीची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी रस्त्यांची रुंदी जास्त असणे तसेच चौकामध्ये सिग्नल व्यवस्था असणे गरजेचे आहे. (Signal Management)

वाहतूक कोंडीवर उपाययोजनासठी बैठक आवश्यक

पुणे शहरामध्ये वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वरील सर्व स्टेक होल्डर्स यांची संयुक्त बैठक झाल्यास एकत्रित चर्चा होऊन पावसाळयापुर्वी उपाययोजना करणेबाबत तात्काळ अंमलबजावणी करणे सोयीचे होईल. जेणेकरुन पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या समस्यांमुळे व वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार नाही. तसेच पोलीसांना वाहतूक नियमन करणे सोईस्कर होईल. ( Pune Traffic update)

पावसाळ्यात खड्डे होणार नाहीत याची दक्षता घ्या

पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडल्याने तसेच विविध कारणांमुळे रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी साठून वाहतूक कोंडी झाल्याने वॉटर लॉगींगचे ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात येवून वॉटर लॉगींग होणाऱ्या ठिकाणी उपाययोजना होणे आवश्यक आहे. मागील वर्षी पावसाचे पाणी साठून वॉटर लॉगींग
झाल्याने त्याचा परिणाम शहरातील वाहतूकीवर झाला होता, शहरामध्ये जागोजागी प्रचंड प्रमाणात वाहतूक
कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय झाली होती. त्यामुळे नागरिकांना इच्छितस्थळी पोहोचणेसाठी त्रास सहन करावा लागला होता. वॉटर लॉगींगचे ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था होऊन लहान मोठे अपघात झाले. तसेच जागोजागी ड्रेनेजचे झाकणातुन तुंबलेले पाणी रस्त्यावर येऊन बरीचशी वाहने रस्त्यात अडकुन पडल्याने
नागरिकांना त्रास झाल्याने प्रशासनास नागरिकांचा रोष सहन करावा लागला. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी
पावसाळयापुर्वीच ड्रेनेज झाकणांची दुरुस्ती तसेच रस्त्यांची दुरुस्ती वेळेत होणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरुन नागरिकांना तसेच प्रशासनास नाहक त्रास सहन करावा लागणार नाही व नागरिकांची गैरसोय
होणार नाही. माहितीचे अनुषंगाने यावर्षी पावसाळा सुरु होणेपुर्वी अशा वॉटर लॉगींगचे ठिकाणांची व ड्रेनेजच्या झाकणांची पाहणी तसेच रस्त्यावरील खड्यांची पाहणी करुन तात्काळ दुरुस्ती / उपाययोजना करुन घेणे उचित राहील जेणेकरुन वाहतूक कोंडी होणार नाही तसेच नागरीकांना नाहक त्रास होणार नाही. असे पोलिस आयुक्तांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
—-
News Title | CP Pune |  PMC Pune |  Take care that Pune residents do not face any hardship during monsoon season  Notice of Pune Police Commissioner to Pune Municipal Corporation

Peace and Order in Pune | पुणे शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात शहर काँग्रेसच्या वतीने पोलीस आयुक्त यांना निवेदन

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Peace and Order in Pune | पुणे शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात शहर काँग्रेसच्या वतीने पोलीस आयुक्त यांना निवेदन

Peace and Order in Pune | पुणे शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात शहर काँग्रेसच्या (Pune City Congress) वतीने पोलीस आयुक्त (CP Pune) यांना निवेदन देण्यात आले. (Peace and Order in Pune)

कॉंग्रेस च्या निवेदनानुसार  पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी (Cultural Capital) असून शांतता, सुव्यवस्था व सुरक्षा या शहरामध्ये उत्तमपणे गेली कित्येक वर्षे पाहावयास मिळते. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील नगर (Ahamadnagar), औरंगाबाद (Aurangabad), कोल्हापूर (Kolhapur), संगमनेर(Sangamner) आदी शहरांमध्ये काही अनुचीत प्रकार घडलेले आहेत. या प्रकारांचे पर्यावसण सांप्रदायिक वाद – विवाद व दंगलीमध्ये होत असल्याचे चित्र आहे. एखाद्या चूकीच्या प्रकाराबद्दल मोर्चे काढणे व त्यास जातीयवादी रंग देणे व शहराची शांतता आणि सुव्यवस्था बिघडविणे असे प्रकार आपल्याला पहावयास मिळाले आहेत. (Pune News)

     पुण शहरामध्ये असे कोणतेही प्रकार घडू नयेत या दृष्टीने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंध करणारे उपाय तातडीने पोलीसांनी अमंलात आणावेत. जी मंडळी अशा प्रकारचे उद्योग करतात त्यांच्यावर लक्ष ठेवावे या संदर्भात आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त मा. रितेश कुमारजी साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक  उपस्थित होते. (Pune Congress)

     यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्‍यवहारे, प्रदेश महिला उपाध्यक्षा संगीता तिवारी, अजित दरेकर, मुनाफ शेख, सनी रणदिवे, रघुराज दरेकर आदी उपस्थित होते. –


News Title |A statement on behalf of the City Congress to the Commissioner of Police regarding the maintenance of peace and order in the city of Pune

 

Pune Congress | राजकीय गुन्हे सरसकट माफ करावे, ही शहर काँग्रेसची अधिकृत भूमिका नाही | शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचे स्पष्टीकरण 

Categories
Breaking News Political पुणे

राजकीय गुन्हे सरसकट माफ करावे, ही शहर काँग्रेसची अधिकृत भूमिका नाही | शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचे स्पष्टीकरण

शहरातील सामाजिक, राजकीय आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले राजकीय गुन्हे सरसकट मागे घेण्याची मागणी कॉंग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्ते, नेते यांनी नुकतीच पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे. मात्र याबाबत काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आक्षेप घेतला नाही. सरसकट गुन्हे माफ करण्याची भूमिका ही एका गटाची आहे. ती शहर काँग्रेसची भूमिका नाही. असे शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यामुळे मात्र काँग्रेस मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

सामाजिक, राजकीय आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले राजकीय गुन्हे मागे घेण्याची मागणी काँग्रेसच्या एका गटाकडून  पुण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे करण्यात आली होती. यावेळी  प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहनदादा जोशी,  माजी राज्यमंत्री रमेशदादा बागवे , संजय बालगुडे, विरेन्द्र किराड, नगरसेवक रवींद्र धंगेकर, नगरसेवक अविनाश बागवे, रमेश अय्यर आदी उपस्थित होते. मात्र यावर शहर अध्यक्ष शिंदे यांनी तीव्र आक्षेप घेत ही फक्त एका गटाची भूमिका असून शहर काँग्रेस ची भूमिका नाही, असे म्हटले आहे.

शिंदे यांनी  पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार   सरसकट राजकीय गुन्हे माफी करणेपूर्वी सदर गुन्हे पडताळणी होणे गरजेचे आहे. नुकतेच काही महिन्यांपूर्वी पुणे भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन च्या इमारतीवर झुंडीने हल्ला करून जोरदार दगडफेक केली व आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या प्रतिमेचे विद्रुपीकरण केले. सदर गुन्हा गंभीर असून सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली राजकीय गुन्हा म्हणून नोंदविण्यात आलेला आहे. पुणे शहरात काँग्रेस भवन ही ऐतिहासिक महत्व असलेली पवित्र वास्तू आहे. राजकीय आंदोलनातील घोषणाबाजी अगर गर्दी यास राजकीय गुन्हे संबोधने ही बाब एक वेळ मान्य करता येते मात्र काँग्रेस पक्षाची खाजगी मालमत्ता असलेल्या काँग्रेस भवन या वास्तूत विना परवाना घुसखोरी करणे, दगडफेक करणे, वास्तुचे विद्रुपीकरण करणे हे निश्चितच संघटित गुन्हेगारीचे स्पष्ट प्रकरण आहे. सदर गुन्ह्याबाबत आम्ही न्यायालयात दाद मागत आहोत. असे गंभीर गुन्हे राजकीय गुन्हया आड लपवून माफ करणेस आमचा तीव्र आक्षेप आहे.

शिंदे यांनी पुढे म्हटले आहे कि आमच्या पक्षाच्या नेत्यांची या शासन निर्णयानुसार दिशाभुल झालेली असावी. त्यामुळेच काँग्रेस भवनमध्ये विनापरवाना घुसखोरी, विदुपीकरण, दगडफेक इ. बाबी
राजकीय समजून माफी देण्याची त्यांनी मागणी अनावधानाने केली असावी. करोना काळात सर्वसामान्य नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे तातडीने माफ करण्यात यावेत या मागणीस आमचा ठाम पाठिंबा आहे मात्र राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे राज्य शासनामार्फत शासन निर्णय (जीआर) प्रमाणे परिमंडळ उपायुक्तांमार्फत समिती गठीत करून आयुक्त स्तरावर गुन्ह्याची व्याप्ती पडताळणी करण्यात यावी. अशी आमची अधिकृत मागणी आहे. गुन्हेगारी वर्तनाला राजकीय गुन्हा संबोधित करून अप्रत्यक्ष संरक्षण देण्याचा घातक प्रघात पुणे पोलीसांनी पाडू नये. राज्य सरकारने या संदर्भात आदेश दिले असून पुणे पोलिसांनी राजकीय,
सामाजिक गुन्ह्यांची पारदर्शक निःपक्षपाती पडताळणी करून योग्य कारवाई करावी अशी आमची मागणी व पुणे शहर काँग्रेस कमिटीची अधिकृत भूमिका आहे. या पूर्वी काँग्रेसच्या काही गटांनी दिलेले निवेदन हे पक्षाची अधिकृत भूमिका नाही.