Engineer’s Day | PMC Cycle Rally | पीएमसी इंजिनियर्स असोसिएशन च्या सायकल रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद

Categories
Breaking News PMC social पुणे

Engineer’s Day | PMC Cycle Rally | पीएमसी इंजिनियर्स असोसिएशन च्या सायकल रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद

Engineer’s Day | PMC Cycle Rally | अभियंता दिनाचे (Engineers Day) औचित्य साधून पीएमसी इंजिनियर्स असोसिएशन (PMC Engineers Association) च्या वतीने शनिवार ३० सप्टेंबर  रोजी पुणे शहरात भव्य सायकल रॅलीचे (Cycle Rally) आयोजन करण्यात आले. सायकल रॅलीस पुणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अशी माहिती असोसिएशनच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation)
सायकल रॅली दरम्यान पर्यावरण विषयक जनजागृती व स्वच्छता चे संदेश देण्यात आले. यावेळी गोवा येथील वर्ल्ड चैम्पियनशिप  स्पर्धा पूर्ण करणारे विशाल पाटील आणि एव्हरेस्ट बेसकॅम्प ट्रेक आणि ईतर सायकल रैली करणारे नितीन  देडगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane),  मनपा अधिकारी, सेवक उपस्थित होते. रॅली जंगली महाराज रस्त्याने अलका चौक, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता मार्गाने मनपा भवन या मार्गे संपन्न झाली. (PMC Pune)

Cycle tour | जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित फेरीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Categories
Breaking News cultural PMC देश/विदेश पुणे

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित सायकल फेरीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे | पुण्यात (pune) होणाऱ्या ‘जी-२०’ परिषदेबाबत (G 20 conference) नागरिकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने पुणे महापालिका सायकल क्लबतर्फे (PMC Cycle Club) सायकल फेरीचे (Cycle tour) आयोजन करण्यात आले.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार आणि विकास ढाकणे यांनी झेंडा दाखवून या फेरीचा शुभारंभ केला.

सायकल फेरीच्या माध्यमातून ‘जी-२०’ बाबत तसेच पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली. महापालिका मुख्य भवनापासून सुरू झालेली सायकल फेरी जंगली महाराज रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, थोरले बाजीराव रस्ता, शनिवार वाडा आणि पुन्हा महानगरपालिका इमारत अशा मार्गाने पूर्ण करण्यात आली.

सुमारे पंधराशे सायकलप्रेमी नागरिक या सायकल फेरीत सहभागी झाले. पुणे महापालिकेचे सर्व विभाग प्रमुखदेखील या सायकल फेरीत सहभागी झाले होते.

या सायकल फेरीचे नियोजन पुणे महानगरपालिका सायकल क्लबचे मुख्य समन्वयक सुरेश परदेशी आणि महापालिकेचे उपायुक्त (क्रीडा) संतोष वारुळे यांनी केले.

Yuvasena : इंधन दरवाढी निषेधार्थ युवा सेने काढलेल्या सायकल रॅलीला चांगला प्रतिसाद 

Categories
Political पुणे महाराष्ट्र

इंधन दरवाढी निषेधार्थ युवा सेने काढलेल्या सायकल रॅलीला चांगला प्रतिसाद

: मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित

पुणे: केंद्र सरकारने केलेल्या अवास्तव इंधन दरवाढीविरोधात निषेध नोंदविण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवासेनेतर्फे इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसेनेचे व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

: सारसबागेपासून झाली सुरुवात

पुण्यामध्ये या सायकल रॅलीला सारसबाग येथून सुरुवात झाली. पुढे बाजीराव रोडमार्गे शनिपार, अप्पा बळवंत चौकातून उजवीकडे वळून फरासखाना, दगडूशेठ मंदिर, समाधान चौक, पुन्हा उजवीकडे वळून लक्ष्मीरोड येथून अलका टॉकीज चौक, खंडूजी बाबा चौक येथे रॅलीची समाप्ती झाली.

यावेळी युवासेना महाराष्ट्र सहसचिव किरण साळी, पुणे शहर पदाधिकारी युवराज पारीख, सनी गवते, आकाश शिंदे, अक्षय फुलसुंदर, परेश खांडके, ज्ञानंद कोंढरे, कुणाल धनवडे, दशरथ किरीड, चेतन चव्हाण, मनीषा वाघमारे, कुणाल पवार, मनीष घरत व युवासैनिक उपस्थित होते

‘हेच का अच्छे दिन?’ असा सवाल करत युवासेनेतर्फे इंधन दरवाढी विरोधात निषेध नोंदवण्यात आला. अच्छे दिनचा नारा देऊन केंद्रात विराजमान झालेल्या मोदी सरकारने दीपावलीच्या तोंडावर जनतेला महागाईच्या दरीत लोटून अधिक संकटात टाकले असल्याचा आरोप देखील यावेळी निषेध कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. यावेळी युवासेनेने इंधन दरवाढीचा निषेध करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

युवासेनाप्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या माध्यमातून इंधन दरवाढ विरोधात सायकल रॅली आंदोलनाचे आयोजन केले गेले. संपूर्ण राज्यांतील जनतेच्या मनातील आक्रोश केंद्र सरकारपर्यंत पोहचवण्याकरिता याचा तीव्र निषेध म्हणून युवासेनेने सायकल रॅली काढली होती. रविवारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन झाले.

Yuvasena : Cycle Rally :इंधन दरवाढी विरोधात युवा सेनेच्यावतीने राज्यव्यापी ‘सायकल रॅली’चे आयोजन

Categories
Political पुणे महाराष्ट्र

इंधन दरवाढी विरोधात युवा सेनेच्यावतीने राज्यव्यापी ‘सायकल रॅली’चे आयोजन

: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे करणार नेतृत्व

पुणे – इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. ऐन दिवाळीत सामान्य माणसाचे दिवाळे निघणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात युवासेनेकडून रविवारी (दि.31) राज्यव्यापी सायकल रॅली काढण्यात येणार आहे. याचे नेतृत्व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे करणार आहेत.

पुणे शहर युवा सेनेच्यावतीने इंधन दरवाढीचा सायकल रॅलीद्वारे तीव्र निषेध करण्यात येणार आहे. सारसबाग येथे सकाळी 10.30 वाजता या सायकल रॅलीला सुरुवात होणार आहे. सिलाई चौक, शनिपार, अप्पा बळवंत चौक येथून उजवीकडे वळून फरासखाना, दगडूशेठ मंदिर, समाधान चौक, पुन्हा उजवीकडे वळून लक्ष्मीरोड येथून खंडूजी बाबा चौक येथे रॅलीची समाप्ती होणार आहे.

 

संपूर्ण राज्यभरात युवा सेनेच्यावतीने ही सायकल रॅली आयोजित करण्यात येणार आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई ही वाढते आहे. त्यामुळे केंद्र सरकारला जागे करण्यासाठी ही सायकल रॅली काढण्यात येणार आहे.

या सायकल रॅलीमध्ये आपल्या न्यायासाठी विद्यार्थी, तरुण-तरुणीसह पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युवा सेनेने केले आहे.