Tag: DA
7th pay Commission |केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! | नवीन वर्षात महागाई भत्ता (DA) मोजण्याचे सूत्र बदलणार!
7th Pay Commission | 18 महिन्यांच्या DA थकबाकीबाबत मोठी बातमी | केंद्र सरकारने सांगितले केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पैशाचे काय होणार?
18 महिन्यांची DA थकबाकी मिळणार नाही
पेन्शनधारकांनीही आशा गमावली
कर्मचारी संघटना आंदोलन करणार आहे
34,000 कोटी रुपयांची बचत झाली
मनपा कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता (DA) देण्याबाबतचे परिपत्रक जारी
| फरकासह महागाई भत्ता नोव्हेंबर पेड इन डिसेंबर च्या वेतनातून दिला जाणार
पुणे | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता (Dearness Allowance) अदा करण्यात येतो. 1 जुलै पासून महागाई भत्ता 4% ने वाढवून तो 38% इतका करण्यात आला आहे. त्यानुसार मनपा कर्मचाऱ्यांनाही (PMC Pune employess) याचा लाभ मिळणार आहे. याला आयुक्तांनीही मंजूरी दिली आहे. याबाबतचे परिपत्रक (Circular) येणे बाकी होते. मुख्य वित्त व लेखा विभागाकडून हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. याचा लाभ कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर पेड इन डिसेंबर (November paid in December) च्या वेतनात मिळेल. असे महापालिका प्रशासनाकडून (PMC Official) सांगण्यात आले. तर सेवानिवृत्त सेवकांना डिसेंबर पेड इन जानेवारी च्या वेतनात अदा होईल.
पुणे महानगरपालिका अधिकारी / सेवकांना दिनांक ०१.११.१९७७ पासून मे. केंद्र शासनाचे सेवकांप्रमाणे महागाई भत्ता देण्यास तसेच त्या मध्ये वेळोवेळी होणारे बदल जसेच्या तसे लागू करण्यास मनपा मुख्य सभा ने २३.१२.१९७७ ला धोरणात्मक मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार वेळोवेळी कार्यवाही करण्यात येत आहे. सद्यस्थितीत दिनांक ०१/०१/२०२२ पासुन ३४% दराने महागाई भत्ता आदा करण्यात येत आहे. ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याचा दर दिनांक ०१/०७/२०२२ पासुन ३४% वरून ४% ने वाढवून ३८% इतका करण्यात आलेला आहे. (Pune Municipal corporation)
महानगरपालिकेतील अधिकारी / सेवकांना व सेवानिवृत्ती अधिकारी / कर्मचारी सेवकांना कुंटूंबनिवृत्ती वेतनधारक यांना दिनांक ०१/०७/२०२२ पासुन ४% दराने महागाई भत्ता वाढवुन म्हणजेच एकुण ३८% दराने महागाई भत्ता फरकासह आदा करणेस महापालिका आयुक्त यांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार परिपत्रक जारी करण्यात आले आहे. (circular of DA)


Dearness allowance | महागाई भत्त्याची फाईल मोदी मंत्रिमंडळात पोहोचली | आता केव्हाही जाहीर होऊ शकते | जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट
वर्षभरात दुसऱ्यांदा महागाई भत्त्यात वाढ होणार आहे
महागाईचा स्तर लक्षात घेऊन महागाई भत्ता वाढतो
52 लाख कर्मचारी आणि 63 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे
केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली
| त्यांच्या महागाई भत्त्यात किती वाढ होणार, हे आता निश्चित
| जूनचे AICPI-IW निर्देशांक जाहीर झाले आहेत.
महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढणार
निर्देशांक संख्या 129.2 वर पोहोचली
38% DA कधी जाहीर होईल?
पगार किती वाढणार?
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी
मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांना जून-जुलैमध्येच अनेक आनंदाचे क्षण एकत्र येणार आहेत. जुलैमध्ये महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर दुसरीकडे घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्ता यासह ४ भत्ते देखील वाढणार आहेत.
सुधारित दराने महागाई भत्त्याचा 4 महिन्याचा फरक मे पेड इन जून वेतनात
: महापालिका प्रशासनाचा निर्णय
पुणे महानगरपालिका अधिकारी / सेवकांना दिनांक ०१.११.१९७७ पासून मे केंद्र शासनाचे सेवकांप्रमाणे महागाई भत्ता देण्यास तसेच त्या मध्ये वेळोवेळी होणारे बदल जसेच्या तसे लागू करण्यास मनपा सभा २३.१२.१९७७ ने धोरणात्मक मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार वेळोवेळी कार्यवाही करण्यात येत आहे. सद्यस्थितीत दिनांक ०१ / ०१ / २०२२ पासुन ३१% दराने महागाई भत्ता आदा करण्यात येत आहे. ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याचा दर दिनांक ०१/०१/२०२२ पासुन ३१% वरून ३% ने वाढवून ३४ % इतका करण्यात आलेला आहे. हा ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित दर ३% वाढवून ३१% वरून ३४% इतका करणेत आला आहे. सदरचा दर ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित करण्यात आलेल्या वेतन श्रेण्यांना लागू करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेतील अधिकारी / सेवकांना व सेवानिवृत्ती अधिकारी / कर्मचारी सेवकांना कुंटूंबनिवृत्ती वेतनधारक यांना
दिनांक ०१/०१/२०२२ पासुन ३% दराने महागाई भत्ता वाढवुन म्हणजेच एकुण ३४% दराने महागाई भत्ता फरकासह आदा करणेस आयुक्त यांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.


सुधारित महागाई भत्ता जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतनात मिळणार!
: महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा
: काय म्हटले आहे परिपत्रकात?
पुणे महानगरपालिका अधिकारी/सेवकांना दिनांक ०१.११.१९७७ पासून मे.केंद्र शासनाचे सेवकांप्रमाणे महागाई भत्ता देण्यास तसेच त्या मध्ये वेळोवेळी होणारे बदल जसेच्या तसे लागू करण्यास मा, मनपा सभा ठ.क्र.३७२ दिनांक २३.१२.१९७७ ने धोरणात्मक मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार वेळोवेळी कार्यवाही करण्यात येत आहे.
पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना मे. केंद्र शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या दराने महागाई भत्ता देण्याचे धोरण असून त्याप्रमाणे केंद्र शासनाच्या धोरणानुसार वेळोवेळी सुधारित महागाई भत्ता मनपा अधिकारी व कर्मचारी यांना देणेत येतो , संदर्भ क्र. २ चे मान्यतेनुसार सद्यस्थितीत दिनांक ०१/०७/२०२१ पासुन महागाई भत्त्याचा सुधारित दर २५% ने वाढवून १६४% वरून १८९% दराने महागाई भत्ता माहे ऑगस्ट पेड सप्टेंबर२०२१ बिलातून फरक सह अदा केले आहे. संदर्भ क्र.१ अन्वये ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित दर ३% बाढवून २८% वरून ३१% इतका करणेत आला आहे. सदरचा दर हा ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित करण्यात आलेल्या वेतन श्रेण्यांना लागू करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या ज्ञानपानुसार पुणे महानगरपालिकेतील अधिकारी/सेवकांना ३% दराने महागाई भत्ता वाढवुन २८% वरून म्हणजेच एकुण ३१ % दराने महागाई भत्ता फरकासह आदा करणेस मा. महापालिका आयुक्त यांनी संदर्भ क्र.३ चे ठरावान्वये मान्यता दिली आहे. परंतु माहे जुलै २०२१ ते माहे ऑक्टोबर २०२१ या चार माहिनेच्या कालावधीतील महागाई भत्ता थकबाकी रक्कम ७ व्या वेतन आयोगप्रमाणे फरक अदा करतेवेळी अदा करण्यात येईल.
२. माहे नोव्हेबर २०२१ ते डिसेंबर २०२१ या दोन माहिन्याचे ७ व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता सुधारित दराने (२८%वरून ३१%)फरक माहे जानेवारी २०२२ पेड इन फेब्रुवारी २०२२ चे वेतनातून अदा करणे.
सर्व मा.खातेप्रमुख/मा.महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी त्यांचे नियंत्रणाखालील सर्व संबंधीत सेवकांना जरूर त्या सुचना देऊन या बाबत पुर्तता करावी.