Water Distribution planning | उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी महापालिका आणि जलसंपदा खात्याची उद्या बैठक

Categories
Breaking News PMC social पुणे

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी महापालिका आणि जलसंपदा खात्याची उद्या बैठक

| महापालिकेकडून जलसंपदा खात्याला बैठकीचे निमंत्रण

पुणे | तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजनासंदर्भात महापालिकेकडून एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका भवनात ही बैठक होणार असून जलसंपदा खात्यासोबत ही बैठक असणार आहे. सद्यस्थितीत धरणामध्ये 16.95 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. उन्हाळ्यातील पाण्याची मागणी पाहता नियोजन करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे. असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. (PMC Pune)

या वर्षी मार्च महिन्यापासूनच तीर्व उन्हाळा चालू झाला असून, नागरिकांच्या पाण्याच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. तसेच, या वर्षी पावसाळा समाधानकारक होईल अगर कसे, याबाबत आत्ताच खात्री देता येणार नाही. या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासंदर्भात महापालिका आयुक्त यांनी गुरुवार रोजी सायंकाळी ४.३० वाजता बैठक आयोजित केली आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाच्या  अधिनस्त अधिकारी यांनी सदर बैठकीस आवश्यक त्या माहितीसह महापालिका आयुक्त कार्यालय येथे उपस्थित राहावे. असे निमंत्रण आयुक्त कार्यालयाकडून जलसंपदा खात्याला धाडण्यात आले आहे. (Department of water resources) 

दरम्यान खडकवासला साखळीच्या चार धरणामध्ये 16.95 टीएमसी पाणी शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात 16.60 टीएमसी पाणी उपलब्ध होते. आगामी काळात म्हणजे जुलै महिन्यापर्यंत महापालिकेला 7 टीएमसी हुन अधिक पाण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी ही बैठक महत्वाची मानली जात आहे. (Khadakwasla dam chain)
– असा आहे पाणीसाठा
धरण               टीएमसी    टक्केवारी
खडकवासला.    1.0.           50.63
पानशेत             6.8.           57.13
वरसगाव            9.46.         73.74
टेमघर               0.41.          10.97
एकूण               16.95.        58.12
—-

Boil and filter water | धरणातून येणाऱ्या पाण्यामध्ये गढुळपणा वाढला

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण परिसरात गेल्या तीन दिवसांत जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणातून येणाऱ्या पाण्यामध्ये गढुळपणा वाढला आहे. महापालिकेकडून सदरचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध करण्यात येत असून पिण्यासाठी पूर्णपणे योग्य आहे. तरी नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Dams Water | चार धरणातील पाणीसाठा  पोहोचला ५ टीएमसी वर | धरण क्षेत्रात संततधार सुरूच 

Categories
Breaking News PMC social पुणे

चार धरणातील पाणीसाठा  पोहोचला ५ टीएमसी वर

| धरण क्षेत्रात संततधार सुरूच

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या तीन दिवसापासून  जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडवासाला या चारही धरणाचा एकूण पाणीसाठा ४.९३ टीएमसी  झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा ८.६६ टीएमसी इतका होता.

हा पाणी साठा २ जुलै रोजी २.५१ टीएमसी पर्यंत खाली आला होता. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसापासून या चारही धरणात पावसाला सुरुवात झाली होती.  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने आता ३ महिन्यांचे पाणी वाढले आहे.

 

सोमवारी सायंकाळी हा पाणीसाठा २.७६ टीएमसी होता तो मंगळवारी सकाळी ०.२० ने वाढून २.९६ झाला  तर बुधवारी सकाळी हा पाणी साठा ३.६७ टीएमसी झाला. गुरुवारी सायंकाळी हा पाणी साठा ४.९३ टीएमसी झला आहे. या चारही धरणात अद्यापही पासून सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला १० मिमी, पानशेत ४०  मिमी, वरसगाव ३३  मिमी तर टेमघर धरणात ३६  मिमी पावसाची नोंद गेल्या २४ तासात झाली आहे.

Rain Water | Dams | चार धरणातील पाणी साठ पोहोचला ३.६७ टीएमसी वर  | धरण क्षेत्रात जोरदार पाऊस 

Categories
Breaking News social पुणे

चार धरणातील पाणीसाठा  पोहोचला ३.६७ टीएमसी वर

| धरण क्षेत्रात जोरदार पाऊस

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या तीन दिवसापासून  जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडवासाला या चारही धरणाचा एकूण पाणीसाठा ३.६७ टीएमसी  झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा ८.६७ टीएमसी इतका होता.

हा पाणी साठा २ जुलै रोजी २.५१ टीएमसी पर्यंत खाली आला होता. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसापासून या चारही धरणात पावसाला सुरुवात झाली होती. तर सोमवारी रात्री नंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने रात्रीत शहराचे ८ दिवसांचे पाणी वाढले आहे.

 

सोमवारी सायंकाळी हा पाणीसाठा २.७६ टीएमसी होता तो मंगळवारी सकाळी ०.२० ने वाढून २.९६ झाला असल्याची पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. तर बुधवारी सकाळी हा पाणी साठा ३.६७ टीएमसी झाला हे. या चारही धरणात अद्यापही पासून सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला १९ मिमी, पानशेत ६८  मिमी, वरसगाव ७०  मिमी तर टेमघर धरणात ६५  मिमी पावसाची नोंद गेल्या २४ तासात झाली आहे.

Water for a day | सोमवार पासून पुढील 8 दिवसांसाठी एक दिवसाआड पाणी  | पुणे महापालिकेने जारी केले वेळापत्रक

Categories
Breaking News PMC social पुणे

सोमवार पासून पुढील 8 दिवसांसाठी एक दिवसाआड पाणी

| पुणे महापालिकेने जारी केले वेळापत्रक

पुणे |  यंदाचे वर्षी पाऊस खूप लांबल्याने, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमधील पाणी साठा अत्यंत कमी झालेला आहे. सद्य:स्थितीत असणारा पाणीपुरवठा तसाच सुरु ठेवल्यास व पाऊस लांबल्यास पुणे शहरास मिळणाऱ्या पाणीपुरवठयाची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच येत्या काही दिवसांमध्ये पाऊस न झाल्यास व पर्यायाने धरणांमधील पाणी साठा योग्य प्रमाणात न वाढल्यास, पुणे शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होऊ नये यासाठी पुणे महानरपालिकेने पुणे शहरामध्ये एक दिवसा आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केलेले आहे.
 नियोजन हे सोमवार दिनांक ०४.०७.२०२२ पासून करण्यात येऊन, सुरुवातीला ०८ दिवसांसाठी म्हणजेच दिनांक ११.०७.२०२२ पर्यंत करण्यात येणार आहे. या दरम्यान पडणारा पाऊस व धरणांमधील पाणी साठा याचा विचार करून, पाणी वितरण व्यवस्थे संदर्भात पुढील नियोजन करण्यात येणार आहे. सोबत एक दिवसा आड करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठयाचे वेळापत्रक पुणे महानगरपालिकेच्या https://www.pmc.gov.in/sites/default/files/water_supply_timetable.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व भागांमध्ये सध्याच्या वेळेतच परंतु एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दिनांक ०४.०७.२०२२ पासून दिनांक ११.०७.२०२२ पर्यंत सदर नमूद वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येईल. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन पुणे महानगरपालिकेस सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी केले आहे.
| वेळापत्रक इथे पहा