Police Bharti Exam 2023 | सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी २३ जुलै रोजी लेखी परीक्षा

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Police Bharti Exam 2023 | सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी २३ जुलै रोजी लेखी परीक्षा

Police Bharti Exam 2023 |समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ दौंड यांच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) या रिक्त असलेल्या ११० पदांची लेखी परीक्षा २३ जुलै २०२३ रोजी परिक्रमा शैक्षणिक संकुल काष्टी, ता. श्रीगोंदा (जि. अहमदनगर) येथे होणार आहे. (Police Bharti Exam 2023)

पोलीस शिपाई (पुरुष) यांची रिक्त असलेल्या ११० पदाकरीता मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे. मैदानी चाचणीमध्ये प्राप्त गुणांच्या व सामाजिक तसेच समांतर आरक्षणाप्रमाणे लेखी परीक्षाकरीता पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. (Police Bharti News)

जे उमेदवार लेखी परीक्षेकरीता पात्र झालेले आहेत अशा उमेदवारांचे लेखी परीक्षा प्रवेश पत्र https://policerecruitment2022.mahait.org व www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. उमेदवारांनी प्रवेशपत्रावर दिलेल्या सूचनेप्रमाणे लेखी परीक्षेकरीता हजर रहावे, असेही राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ च्या समादेशक राजलक्ष्मी शिवणकर यांनी कळविले आहे.
0000

News Title | Police Bharti Exam 2023 | Written Exam on 23rd July for Armed Police Constable Recruitment

Primary Health Centers | बारामती आणि दौंड तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्मचारी निवासासाठी १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर | खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Primary Health Centers | बारामती आणि दौंड तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्मचारी निवासासाठी १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर

| खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती

Primary Health Centers | राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील (Baramati Lok sabha constituency) बारामती आणि दौंड तालुक्यांत (Baramati and Daund taluka) प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health centers) तसेच कर्मचारी निवासस्थानांसाठी एकूण १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी ही माहिती दिली. (Primary Health Centers)

या निधीमधून बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २ कोटी ७६ लाख रुपये मंजूर झाले आहेत. तर सांगवी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ३ कोटी ६५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. (MP supriya Sule News)

याबरोबरच दौंड तालुक्यातील रावणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत आणि कर्मचारी निवासस्थान बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी ६ कोटी २२ लाख रुपये मंजूर झाले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. (Baramati News)


News Title |12 crores 63 lakhs sanctioned for primary health centers and staff accommodation in Baramati and Daund talukas Information from MP Supriya Sule

President | MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण

दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे यांनी काल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या अल्पोपहाराच्या वेळी झालेल्या भेटीत त्यांना बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड आणि इंदापूर तालुक्यांना भेट देण्याची विनंती सुळे यांनी केली.

आपल्या मतदार संघातील विकास कामे आणि नागरिकांच्या हितासाठी खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच आग्रही असतात. त्याचीच प्रचिती कालही दिल्लीमध्ये आली. अल्पोपहाराच्या निमित्ताने देशाच्या राष्ट्रापतींना भेटण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांच्याशी चर्चा करताना खासदार सुळे यांनी दौंड आणि इंदापूर तालुक्यांचा विशेष उल्लेख केला. दौंड येथील रेल्वे जंक्शन तसेच भिगवण येथे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणारे परदेशी फ्लेमिंगो पक्षी हे इंदापूरचे खास वैशिष्ट्य आहे. या दोन्ही तालुक्यांना भेट देण्यासाठी राष्ट्रपतींनी जरूर यावे, अशी विनंती त्यांनी केली.

Vande Bharat Express | वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा | खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा

| खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

मुंबईहून सोलापूर साठी उद्यापासून (दि. १०) सोडण्यात येणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला दौंड येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे याबाबत मागणी करत दौंड हे किती महत्वाचे जंक्शन आहे, हे निदर्शनास आणून दिले आहे.

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून सोलापूर येथे जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस उद्या पासून सुरु होत आहे. ही गाडी दौंड मार्गेच सोलापूरकडे रवाना होणार आहे. तथापि तिला दौंड रेल्वेस्थानक थांबा देण्यात आलेला नाही. उद्या गाडीचा पहिलाच दिवस असल्याने उद्या मात्र ही गाडी दौंडला थांबणार आहे. त्यानंतर मात्र दौंड स्थानक कायमस्वरुपी वगळण्यात आले आहे. ही बाब लक्षात येताच खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने ट्विट करत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना रेल्वेच्या बाबतीत दौंडचे महत्व लक्षात आणून दिले आहे.

दौंड हे रेल्वेच्या सोलापूर मार्गावरील अतिशय महत्त्वाचे जंक्शन आहे. इतकेच नाही, तर दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारे सर्वात मोठे रेल्वेस्थानक दौंड येथे आहे. हजारो प्रवासी या मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे या परिसरातील नागरीकांच्या सोयीसाठी या ट्रेनला या स्थानकावर थांबा देण्याची आत्यंतिक गरज आहे. तरी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ला दौंड येथे थांबा देण्याबाबत आवश्यक ते सोपस्कार पार पाडावेत, असे सांगत ते आपल्या मागणीचा नक्कीच सकारात्मक विचार करतील, असे सुळे यांनी म्हटले आहे.

MP Supriya Sule | दौंड, पुरंदर तालुक्यांतील रेल्वेशी संबंधीत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी | खा. सुप्रिया सुळे यांची विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसोबत बैठकीत मागणी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

दौंड, पुरंदर तालुक्यांतील रेल्वेशी संबंधीत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी

| खा. सुप्रिया सुळे यांची विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसोबत बैठकीत मागणी

पुणे – बारामती लोकसभा मतदारसंघातील रेल्वे खात्याशी संबंधित विविध समस्यांबाबत मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांची भेट घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज चर्चा केली. दौंड रेल्वे स्थानकाचा रेल्वेच्या पुणे विभागीय कार्यक्षेत्रात समावेश करणे आणि अन्य मुद्द्यांचा यात समावेश आहे.

दौंड रेल्वेस्थानक हे सोलापूर पेक्षा पुणे शहराशी जवळचे स्थानक असून आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी येथील प्रवाशांना पुणे विभागीय कार्यालय सोयीचे आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक विचार व्हावा, अशी मागणी खासदार सुळे यांनी यावेळी केली. या मुख्य मुद्द्यासह बारामती लोकसभा मतदार संघातील पुरंदर तालुक्यातील रेल्वेशी संबंधीत समस्यांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

दौंड तालुक्यातील रेल्वे रुळांखालील कानगाव – पाटस रोड (एल.सी. नंबर १५),कडेठाण – वरवंड रोड (एल.सी. नंबर १४) आणि गिरिम वायरलेस फाटा ते नानवीज ट्रेनिंग सेंटर रस्ता (एल.सी. नंबर १७) येथील मोऱ्यांची कामे अत्यंत संथ गतीने सुरु आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचे पाणी मोऱ्यांमध्ये साचून वाहतुकीला अडथळा ठरत आहे. याशिवाय काम सुरु असल्याने पर्यायी रस्त्याचे गेटही बंद आहेत. परिणामी वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. या मोऱ्यांचे काम तातडीने पूर्ण व्हावे, अशी मागणी सुळे यांनी यावेळी केली.

पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे जेजुरी एमआयडीसी जवळील मोरीचे काम तातडीने सुरु करण्याची गरज असून जेजुरी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील वस्त्यांसाठी सर्विस रोड करण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याबरोबरच पुरंदर तालुक्यातील अन्य ठिकाणी राहिलेली मोऱ्यांची कामेही तातडीने पूर्ण करावी. आंबळे येथील अंडरपासच्या संरक्षक भिंत, शाळेजवळील उड्डाण पूल कोथळे येथील मोरीचे काम अर्धवट अवस्थेतील काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली.