Insurance For Warkari | वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण

Categories
Breaking News cultural Political social आरोग्य महाराष्ट्र

Insurance For Warkari | वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण

| लाखो वारकऱ्यांना दिलासा

Insurance For Warkari | पंढरपूरच्या आषाढी वारीत (Pandharpur Aashadhi Wari) सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी (Warkari) शासनातर्फे विमा संरक्षण (Insurance Coverage) देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना (Vitthal Rukmini Warkari insurance coverage) लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल.  (Insurance For Warkari)
यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल. (Pandharpur Aashadhi Wari)
वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे.
—-
Insurance for Warkari | Insurance coverage for Warkari now by the government |  Relief to millions of Warkari

Job Fair | MLA Sunil Kamble | आमदार सुनील कांबळे यांच्याकडून 5 जूनला नोकरी महोत्सवाचे आयोजन 

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Job Fair | MLA Sunil Kamble | आमदार सुनील कांबळे यांच्याकडून 5 जूनला नोकरी महोत्सवाचे आयोजन

| 80 कंपन्यांनी नोंदवला सहभाग

Job Fair | MLA Sunil Kamble | महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागा अंतर्गत राज्यभर इयत्ता दहावी व इयत्ता बारावी (10th, 12th students) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी योग्य तो मार्ग निवडण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचं (Job Guidance) आयोजन केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे शहर आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघांमध्ये (Pune cantonment constituency) डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, नाना पेठ, पुणे येथे सोमवार  ५ जून २०२३ रोजी मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेले आहे. त्याचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (deputy chief minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे.  अशी माहिती आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) यांनी दिली. (Job Fair | MLA Sunil Kamble)

आमदार कांबळे यांनी सांगितले कि, या शिबिराला जोडूनच पुणे शहर व परिसरातील बेरोजगार युवक व युवतींसाठी नोकरी महोत्सव आयोजित केलेला आहे. या नोकरी महोत्सवामध्ये जवळपास ८० कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणतः दहा हजार नोकऱ्यांची उपलब्धता त्यांच्याकडे आहे. या रोजगार मेळाव्यासोबत आम्ही विविध बँकांना सुद्धा आमंत्रित केलेले आहे. (employment)
बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना कर्ज उपलब्ध व्हावे व ते कर्ज कसे उपलब्ध होईल याची माहिती सदर बँका देणार आहेत. याशिवाय आम्ही विविध वर्गांसाठी राज्य शासनाने ज्या संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन केलेल्या आहेत उदाहरणार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), जिल्हा उद्योग केंद्र, वस्त्रोद्योग विभाग, कामगार विभाग यांच्यासाठी आम्ही स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामध्ये
लाभार्थ्यांसाठी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व मार्गदर्शन केले जाईल. असे आमदार कांबळे यांनी सांगितले. (Job Fair)
आमदार कांबळे यांनी पुढे सांगितले कि. त्याचप्रमाणे विविध वर्गातील नागरिकांसाठी शासनाने जी महामंडळे स्थापन केलेली आहे.  त्यामध्ये अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ या महामंडळाच्या ज्या योजना आहेत.  त्या योजना बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी कशा उपलब्ध करून दिल्या जातीलयाचे मार्गदर्शनही या मेळाव्यामध्ये होणार आहे. या नोकरी महोत्सवाचे मेळाव्याचे उद्घाटन सोमवार दिनांक पाच जून २०२३ रोजी सकाळी अकरा वाजता देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्ते व  चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री पुणे तसेच  गिरिषजी महाजन, ग्रामविकास, वैदयकिय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
सर्व बेरोजगार युवक युवतींना तसेच इयत्ता दहावी व
इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आव्हान करतो की आपण या व्यवसाय मार्गदर्शनमेळाव्याचा व रोजगारीची संधी उपलब्ध करून घेण्याचा लाभ घ्यावा या मेळाव्यामध्ये जास्तीतजास्त तरुण-तरुणींना नोकऱ्या देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

सुनील कांबळे, आमदार 
—-
——
News Title | Job fair organized by MLA Sunil Kamble on 5th June| 80 companies registered participation

Shasan Aaplya Dari | शासन आपल्या दारीला मिळणार महालाभार्थी पोर्टलची जोड

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

Shasan Aaplya Dari | शासन आपल्या दारीला मिळणार महालाभार्थी पोर्टलची जोड

– अभियानाची व्याप्ती वाढवा, सर्वाना सहजपणे लाभ मिळावेत | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Shasan Aaplya Dari | शासन आपल्या दारी योजनेची (Shasan Aaplya Dari Yojna) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महालाभार्थी पोर्टलचा (Mahalabharthi Portal) उपयोग करून घेण्यात येणार असून यामुळे या योजनेची व्याप्ती वाढणार आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे एक सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जास्तीत जास्त नागरिकांना सहज सुलभ लाभ मिळावेत म्हणून या पोर्टलचा देखील उपयोग व्हा अशी सुचना केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy chief minister Devendra Fadnavis) यांनीही महत्वाच्या सूचना केल्या. (Shasan Aaplya Dari)
बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Mahalabharthi Portal)
प्रारंभी या अभियानाची जबाबदारी सांभाळणारे मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव डॉ. अमोल शिंदे यांनी सादरीकरण केले व ही योजना कशारीतीने राबविण्यात येत आहे त्याची माहिती दिली. तर एमकेसीएलतर्फे विवेक सावंत यांनी महालाभार्थी पोर्टलचे (Mahalabharthi Portal) सादरीकरण केले.
शासन आपल्या दारी हा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात सुरु असून एकाच ठिकाणी एका छताखाली नागरिकांना वेगवेगळे लाभ मिळावेत अशा रीतीने याची योजना करण्यात आली आहे. देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आता याशिवाय महालाभार्थी पोर्टलमधून नागरिक स्वत: किंवा प्राधिकृत केंद्रावर आपली माहिती भरून सुद्धा योजनेचा लाभ घेऊ शकणार असल्याने याची व्याप्ती वाढेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. (Shasan Aaplya Dari Marathi News)

असे काम करणार पोर्टल

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) यांनी महालाभार्थी हे पोर्टल (Mahalabharthi Portal) तयार केले आहे. नागरिकाने या पोर्टलमध्ये स्वतःची माहिती सादर केल्यानंतर, कोणत्या शासकीय योजनांसाठी हा नागरिक पात्र ठरू शकेल याची एक संभाव्य यादी उपलब्ध होते. या प्रत्येक योजनेसाठी नागरिकाने कोठे  संपर्क साधणे अपेक्षित आहे व आवश्यक कागदपत्रे कोणती याचीही माहिती नागरिकास मिळते. यामुळे नागरिक सहजपणे संबंधित योजनांसाठी अर्ज करू शकतो.

*जिल्हा स्तरावर कशी होणार कार्यवाही*

जिल्ह्यातील एमएससीआयटी केंद्र, सीएससी केंद्र, इतर संगणक प्रशिक्षण केंद्र यांना यासाठीg प्राधिकृत करण्यात येईल. या केंद्राच्या नावांना प्रसिद्धी दिली जाईल जेणे करून नागरिक जवळच्या केंद्रावर जाऊन ‘महालाभार्थी’ पोर्टलवर नोंदणी करून लागू होणाऱ्या शासकीय योजनांची माहिती विनामूल्य मिळवू शकतील.
संबंधित केंद्राच्या प्रमुखाला महालाभार्थी पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. पोर्टल वापरण्याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात येईल.
‘महालाभार्थी’ पोर्टलवर नोंदणीसाठी केंद्रावर येणाऱ्या नागरिकास केंद्राद्वारे अर्जाचा छापील नमुना दिला जाईल. नागरिकाने स्वतः किंवा स्वयंसेवकाच्या मदतीने हा अर्ज आधार क्रमांकाच्या आधारे महालाभार्थी पोर्टलवर नागरिकाचे खाते तयार करण्यात येईल.

*मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या  स्वाक्षरीचे पत्र*

माहिती भरल्यानंतर पोर्टलद्वारे संबंधित नागरिकास लागू होणाऱ्या संभाव्य योजनांची माहिती देणारे, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे पत्र तयार करून या पत्राची प्रत नागरिकास देण्यात येईल. हे पत्र घेऊन नागरिक संबंधित कार्यालयात जाऊन, योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून योजनेसाठी अर्ज करू शकेल. किंवा, ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन योजनेचा अर्ज भरेल. या कामी  स्वयंसेवक नागरिकास मदत करतील. त्यामुळे नागरिकास आपल्याला लागू योजना व आवश्यक कागदपत्रे यांची योग्य माहिती सहजपणे मिळेल
एका जिल्ह्यात साधारणपणे ७५ हजार ते १ लाख नागरिकांची नोंदणी एक महिन्याच्या कालावधीत करण्यासाठी ४०-५० केंद्रे प्राधिकृत करावी लागतील. याशिवाय नागरिक स्वतः सुद्धा महालाभार्थी पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतात.

*स्वयंसेवकांची जबाबदारी*

नागरिकांना जवळच्या प्राधिकृत केंद्रावर जाण्यासाठी प्रोत्साहन देणे. नागरिक अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन जातील याची दक्षता घेणे, छापील अर्ज भरण्यासाठी नागरिकांना मदत करणे,केंद्रावर येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी प्रयत्न करणे. जसे नागरिकांचा खोळंबा होऊ नये यासाठी टोकन  सिस्टीम तयार करणे, इत्यादी, नागरिकाला योजनांची माहिती देणारे पत्र मिळाल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष योजनांचा लाभ मिळावा यासाठी पाठपुरावा यासाठी स्वयंसेवक नागरिकांना मदत करतील.

*“शासन पहिल्यांदाच पाहिलं….”*

शासन आपल्या दारी योजनेसाठी लाभार्थींचा प्रतिसाद वाढत असून संपूर्ण महसूल यंत्रणा तसेच इतर विभागही हिरीरीने यात उतरले आहेत, आणि त्यांच्यात स्पर्धा निर्माण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विशेषत: गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात दोन महिन्यात एक लाख लाभार्थी झाले असून, कल्याणमध्ये दीड लाख लाभार्थींना लाभ देण्यात येत आहे. पाटण येथे योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. याठिकाणी देखील लाभार्थींचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. काही लाभार्थींनी विनासायास योजनांचा लाभ आपल्याला आपल्या गावीच मिळतोय हे पाहून “शासन पहिल्यांदाच पाहिलं” अशी स्वाभाविक प्रतिक्रिया दिली आणि समाधान व्यक्त केले असेही यावेळी सांगण्यात आले. या अभियानासाठी १५ हजार १४६ योजना दूत नेमण्यात आले असून मुख्यमंत्री सचिवालयात मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष आणि जिल्हा पातळीवर जिल्हा जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आले आहेत. या कक्षांच्या माध्यमातून अभियानाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यात येते, समन्वय ठेवण्यात येतो अशीही माहिती देण्यात आली.
——
News Title | Shasan Aaplya Dari |  The government will get the addition of Mahalabharthi portal at Shasan Aaplya Dari – Expand the scope of the campaign, so that everyone can easily benefit |  Chief Minister Eknath Shinde

Devendra Fadnavis in Pune | वेताळ टेकडी, नदी सुधार बाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका : काय म्हणाले? वाचा सविस्तर

Categories
Breaking News PMC social पुणे

Devendra Fadnavis in Pune | वेताळ टेकडी, नदी सुधार बाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका : काय म्हणाले? वाचा सविस्तर

Devendra Fadnavis in Pune | शहरातील प्रकल्पांबाबत पर्यावरणप्रेमींची काही मत आहेत त्याचा मी आदर करतो. त्यांच म्हणणं आम्ही निश्चित ऐकून घेणार आहोत. पण हे करत असताना काही लोकं हे केवळ विकास थांबला पाहिजे या मताचे जे असतात ज्यांच्याकडे कुठलंही लॉजिक नसत, तज्ज्ञ नसतात पण आमचच म्हणणं खरं आहे असा विचार करणार्यांचे आपल्याला ऐकता येणार नाही. अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. या लाखो पुणेकरांचं जीवनमान जर आपल्याला सुधरवायचं असेल तर महत्त्वाचे निर्णय घ्यावेच लागतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. (Devendra Fadnavis in Pune)
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी झालेल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी पौड फाटा बालभारती रस्ता (Pauda fata to Balbharti road) आणि नदी काठ सुधार प्रकल्प (River front Devlopment project) बाबत पर्यावरणवादी (Environmentalist) नागरिकांची बैठक घ्यावी अशी मागणी या कार्यक्रमात केली त्यावर फडणवीस यांनी भाष्य केले.
फडणवीस म्हणाले, जगामध्ये शाश्वत विकासासाठी ज्या उत्तम कार्यपद्धती आहेत ते आपण स्वीकारल्या पाहिजेत त्याला विरोध करण्याचे काही कारण नाही विकासामध्ये विनाश होऊ नये हे खरे असले तरी काहीजण कमी माहितीच्या आधारावर अर्धवट माहितीवर प्रकल्पाला विरोध करतात त्यामुळे प्रकल्प थांबतो जगाच्या पाठीवर जे प्रकल्प शाश्वत ठरलेले आहेत मग ते आपल्याकडे का होऊ नयेत असा प्रश्न देखील फडणवीस यांनी केला. पुण्यातील प्रकल्प करताना सर्वांच्या बाजू ऐकल्या जातील पण प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात एक तुमची बाजू एक आमची बाजू पण खरी बाजू समजून घ्यायचे असेल तर तज्ञांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेतले पाहिजे. म्हणून जे पर्यावरणवादी असतील किंवा ज्या लोकांना पुण्याच्या संदर्भात अतिशय आत्मियता आहे त्यांचे म्हणणं निश्चित ऐकून घेऊ. पुणे हे केवळ ऐतिहासिक शहर नाही तर हे भविष्यातला शहर देखील आहे. जगाच्या पाठीवर या २१व्या शतकांमध्ये नॉलेज सिटी म्हणून पुणे शहर आहे. महाराष्ट्र देशाच्या उत्पादन क्षेत्रामध्ये 20 टक्क्यांचा वाटेकरी आहे. या मध्ये सिंहाचा वाटा पुण्याचा आहे. त्यामुळे इथली वाढती लोकसंख्या ही विचारात घेता हे शहर राहण्यासाठी योग्य बनले पाहिजे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या सगळ्या गोष्टींचे मुबलक प्रमाणात उपलब्धता असली पाहिजे. या दृष्टीने पुण्यातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा प्रयत्न आहे . पुण्यामध्ये 27 हजार कोटी रुपये खर्च करून रिंग रोड निर्माण केला जाणार आहे पण या रिंग रोडच्या भोवती तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून हा रिंग रोड पुण्याचे ग्रोथ इंजिन असेल असेही फडणवीस म्हणाले. पुण्याला मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध असला तरी वितरण व्यवस्थेतील दोषांमुळे पुणे तहानलेले आहे त्यामुळे समान पाणीपुरवठा योजना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्याच्या पहिल्या टप्प्याचे आज उद्घाटन झालेले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
——
News Title | Devendra Fadnavis in Pune | Devendra Fadnavis clarified his position regarding Vetal hill, river improvement: What did he say? Read in detail

BJPs Ghar Ghar Chalo Sampark Abhiyan in pune | भाजपाच्या घर चलो संपर्क अभियानाचा पुण्यात शुभारंभ 

Categories
Breaking News Political पुणे

BJPs Ghar Ghar Chalo Sampark Abhiyan in pune | भाजपाच्या घर चलो संपर्क अभियानाचा पुण्यात शुभारंभ

| कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मोदीजींचे विकासकार्य जनतेपर्यंत पोहचवावे

| उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आवाहन

 

BJPs Ghar Ghar Chalo Samprak Abhiyan in pune | Devendra Fadnvis In pune |देशाचे लोकप्रिय पंतप्रधान  नरेंद्र मोदीजी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात गत नऊ वर्षांचा कार्यकाळ हा विकासपर्वचा काळ राहिला आहे. त्यामुळे  मोदीजींच्या नेतृत्वातील विकासपर्वचे काम कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनतेपर्यंत पोहचवावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केले. तसेच कर्नाटकच्या विजयावर आनंद व्यक्त करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोलाही यावेळी विरोधकांना लगावला. (BJPs Ghar Ghar Chalo Sampark abhiyan in pune)

भारतीय जनता पक्षाच्या ‘घर चलो’ या संपर्क अभियानाचा शुभारंभ आणि भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (BJP pune city president Jagdish Mulik) यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नामदार फडणवीस बोलत होते. (Devendra Fadnavis in Pune)

यावेळी व्यासपीठावर आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे,राहुल कुल, सिद्धर्थ शिरोळे,भीमराव तापकीर, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, मेधा कुलकर्णी, बापू पठारे, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी,राजेश पांडे, चिटणीस वर्षा डहाळे यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नामदार देवेंद्रजी फडणवीस म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक गतीने विकास केला. कोरोना काळानंतर अनेक देश मंदीच्या सावटाखाली आहेत. पण आपला देश विकासाच्या वाटेवर आजही मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे विकसित देश देखील आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहे. आज माननीय मोदीजींचे नेतृत्व जगमान्य झाले आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे देखील माननीय मोदीजींशी बोलण्यासाठी आतूर असतात. त्यामुळे मोदीजींच्या नेतृत्वातील विकासपर्वचे काम कार्यकर्त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ते पुढे म्हणाले की, आज कर्नाटक निवडणुकीतील विजयावर विरोधक आनंदोत्सव साजरा करत आहेत. बेगामी शादी में अब्दुल दिवाना अशी स्थिती आहे. आज विरोधकांनी कितीही आनंदोत्सव साजरा केला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत २८ पैकी २५ जागांवर भारतीय जनता पक्ष नक्कीच विजय होईल. वास्तविक, विरोधकांनी आत्मचिंतन केले पाहिजे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत अर्धा टक्का ही मतं मिळू शकली नाहीत. असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांचे मूल्यमापन नेहमीच होत असते. कोरोना काळात भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरून काम करत होता. त्यामुळे जगदीश मुळीक यांनी असेच आपले कार्य सातत्याने सुरू ठेवावे अशी सूचना केली. तसेच घर चलो संपर्क अभियानाद्वारे कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ओबीसी आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले.‌तर स्वागत गणेश घोष यांनी केले.

News Title |BJPs Ghar Ghar Chalo Sampark Abhiyan in Pune BJP’s Ghar Chalo Sampark campaign launched in Pune

BJP’s Ghar Ghar Chalo Sampark | भाजपचे पुण्यातही  घर चलो संपर्क अभियान

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

BJP’s Ghar Ghar Chalo Sampark | भाजपचे पुण्यातही  घर चलो संपर्क अभियान

| १५ मे ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

 

BJP’s Ghar Ghar Chalo Sampark | उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (Deputy Chief minister Devendra Fadnvis)  सोमवारी (१५ मे) पुणे दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या हस्ते शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण, घर चलो संपर्क अभियानाचा (Ghar Ghar Chalo sampark abhiyan) शुभारंभ आणि शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. (BJPs Ghar Ghar chalo sampark abhiyan)

शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन आणि घर चलो संपर्क अभियान शुभारंभ देवेंद्र जी यांच्या शुभहस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अण्णा भाऊ साठे हॉल, येरवडा येथे दुपारी साडेचार करण्यात येणार आहे.

| विविध विकासकामाचे लोकार्पण 

बाणेर बालेवाडी येथे 24×7 पाणी पुरवठा योजना फेज 1 चे लोकार्पण तसेच सूस महाळूंगे 70 कोटींच्या योजनेचे भूमिपूजन तसेच गंगाजल पूजन सायंकाळी 6 वाजता, बालेवाडी हाय स्ट्रीट मैदान, कमिन्स कंपनी समोर केले जाणार आहे.

कर्वेनगर सनसिटी येथे 37 कोटी 4 लाख खर्चाचे मुठा नदीवर पूल चे भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल. या सर्व कार्यक्रमांना पक्षाचे शहरातील सर्व आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

—–

BJP’s Ghar Ghar Chalo Sampark | BJP’s Ghar Chalo Sampark campaign in Pune too| Launched by Deputy Chief Minister Devendra Fadnavis on May 15

Ajit Pawar | Rajgad | पुणे जिल्हयातील या तालुक्याचे नामांतरण “राजगड” करण्याची अजित पवारांची मागणी 

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

   पुणे जिल्हयातील वेल्हे तालुक्याचे नामांतरण “राजगड” करण्याची अजित पवारांची मागणी

पुणे | पुणे जिल्ह्यातील (Pune District) वेल्हे तालुक्याचे (Taluka Velhe) नाव राजगड (Rajgad) करावे, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition leader) यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री (DCM Devendra Fadnvis) यांना अजित पवार (Ajit pawar) यांनी पत्र दिले आहे. (Rajgad)
(Ajit Pawar’s demand to change the name of Velhe taluka in Pune district to “Rajgad”)
अजित पवार यांच्या पत्रानुसार  पुणे जिल्हयातील वेल्हे तालुक्याचे नामांतरण राजगड तालुका करणेबाबत लोकभावना तीव्र आहेत. याबाबत जिल्हा परिषद पुणे यांचे २२.११.२०२१ रोजीच्या सर्वसाधारण सभेत ठराव करुन वेल्हे तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी ५८ ग्रामपंचायतींना वेल्हे तालुक्याचे नाव राजगड असे करणेबाबत सकारात्मक ठराव दिले आहे. वेल्हे तालुक्यामध्ये स्थित असलेल्या राजगड या किल्ल्याशी तालुक्यामधील तमाम नागरिकांचे जिव्हाळयाचे संबंध असून सदर किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज
यांची प्रथम राजधानी असलेने सदर ठिकाणावरुन छत्रपती शिवाजी महाराज यांनी २७ वर्षे शासन चालविले असल्याने वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड असे करण्यात यावे अशी वेल्हे तालुक्यातील नागरिकांची तीव्र इच्छा आहे. (Opposition Leader Ajit pawar)
पवार यांनी पुढे म्हटले आहे कि वेल्हे तालुका हा शिवकालीन व ऐतिहासिक वारसा असलेला आणि किल्ले मालिकेतील किल्ले राजगड व किल्ले तोरणा असे दोन महत्वपूर्ण किल्ले समाविष्ट असलेला तालुका आहे. या तालुक्याचे जुने दस्त पाहता किल्ले तोरणाचे नाव प्रचंडगड या नावाने तालुक्याची ओळख होती. तथापी, सदर तालुक्याचे मुख्य ठिकाण हे वेल्हे बु. घेरा या ठिकाणी असलेने तालुक्याचे नाव वेल्हे असे नमूद आहे. वेल्हे तालुक्यातील तमाम नागरिकांच्या भावना या राजगड किल्ल्याशी जोडलेल्या असून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी या तालुक्यामध्ये स्थित असल्याने किल्ले राजगड वरुन या तालुक्याचे नामकरण “राजगड” करणेबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी. असेही पवार यांनी म्हटले आहे. (Ajit Pawar)

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी उपयुक्त – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी उपयुक्त
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

| मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 लोकार्पण कार्यक्रम

मुंबई दि 24:- शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अतिशय उपयुक्त ठरणार असून शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठीची ही ‘फ्लॅगशीप’ योजना सर्व जिल्ह्यांमध्ये अतिशय प्रभावीपणे राबविण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या एक दिवसीय परिषदेत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना- 2.0 च्या लोकार्पणाचा कार्यक्रम झाला.

यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर, अपर मुख्य सचिव दीपक कपूर, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, प्रधान सचिव एकनाथ डवले, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, विजय सिंगल, पी अन्बलगन, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी, तसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी उपस्थित होते. यावेळी मिशन- 2025 या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेती आणि शेतकरी राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे कायम उभे आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कारण ही स्वस्त आणि हरित ऊर्जा आहे. क्रॉस सबसिडी कमी होण्याच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रालाही ही योजना चालना देणारी ठरेल. या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त फीडर हे सौर ऊर्जेवर आणण्यावर भर देण्यात येणार आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणारा जिल्हा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रयत्नशील रहावे.

या प्रकल्पांमध्ये जमिनीची उपलब्धता कालबद्ध होणे हे अत्यंत गरजेचे असल्याने यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरण सब स्टेशनच्या पाच ते दहा किलोमीटरमध्ये असणाऱ्या शासकीय व निमशासकीय जमिनींची माहिती गोळा करावी. त्यातील ज्या जमिनी प्रकल्प उभारण्यासाठी सुयोग्य असतील त्या जमिनी आवश्यक ती सगळी प्रक्रिया करून या सर्व प्रकल्पांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

ग्रामपंचायत अंतर्गत विविध सुविधाही सौर ऊर्जेवर
पुढील टप्प्यात ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध सुविधा, कार्यालये पूर्णपणे सौर ऊर्जेवर करण्यावर भर देण्यात येणार आहे. सौर ऊर्जा विकासाच्या क्षेत्रात मोठे उद्योग येण्यास उत्सुक आहेत. बॅटरीवरील पंपही भविष्यात मोठे बदल घडवून आणणारे ठरतील. सर्व जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजनेचा संबंधित जिल्ह्यांत अधिकाधिक प्रचार -प्रसार करावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला प्रास्ताविकात म्हणाल्या, वीज क्षेत्रात गेल्या दशकात मोठे बदल झाले आहेत. २०१७ मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना नावाने भविष्याचा वेध घेणारी महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली. याद्वारे किफायतशीर सौर ऊर्जेचा फायदा औद्योगिक ग्राहकांसह शेतकऱ्यांनाही कसा करून देता येईल याचा विचार करण्यात आला. सुरुवातीच्या काळातील या योजनेच्या अंमलबजावणीचे उत्साहवर्धक परिणाम दिसून आले आहेत.
या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिवसा पुरवठा उपलब्ध होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचा सिंचनाच्या वेळी होणारा त्रासही कमी होणार असल्याचे शुक्ला यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना- २.० – ‘मिशन २०२५’
देशाने अपारंपारिक ऊर्जेच्या वापरासाठी ४५० गिगाव्हॅट क्षमता २०३० पर्यंत उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दृष्टीने देखील मिशन २०२५ ची अंमलबजावणी महत्त्वाची ठरेल. याद्वारे फक्त शेतीसाठी आणि एका राज्यात ७ हजार मेगावॅट पेक्षा जास्त सौर ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. इतर अनेक क्षेत्राप्रमाणे शेती क्षेत्रही विजेच्या मागणीत देशभरात अग्रेसर असून
महाराष्ट्रातील सुमारे ४५ लाख शेती वीज पंपांची संख्या ही देशात सर्वाधिक आहे. राज्यातील एकूण विजेच्या वापरापैकी २२ टक्के वीज वापर शेतीसाठी होतो.
शेतीला परवडणाऱ्या दरात वीज मिळावी यासाठी शासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात अनुदान तर दिले जातेच पण वीज वितरण कंपनीच्या इतर ग्राहकांकडून क्रॉस सबसिडी देखील दिली जाते. शेतकऱ्यांना माफक, सवलतीच्या दरात वीज पुरवठा केला जातो.भविष्यामध्ये क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून शेतीचे वीजदर मर्यादित ठेवण्यावर मोठ्या प्रमाणात मर्यादा येणार आहे. त्यादृष्टीने वीज ग्राहक, शेतकरी व वीज वितरण कंपनी या सर्वांच्या हिताची अशी ही योजना आहे. शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना दिवसा अखंडीत व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी हे अभियान आहे.
डिसेंबर २०२५ पर्यंत ३० टक्के शेतीच्या वाहिन्या सौर ऊर्जेवर
मिशन २०२५ च्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अजून महत्त्वाकांक्षीपणे मोठ्या प्रमाणात व वेगाने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिशन २०२५ द्वारे डिसेंबर २०२५ पर्यंत सर्व जिल्ह्यातील किमान ३० टक्के शेतीच्या वाहिन्या अशा प्रकल्पांव्दारे सौर ऊर्जेवर आणण्याचे उद्दिष्ट असून ‘मिशन २०२५’ द्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी अनेकविध प्रोत्साहनात्मक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यात शेतकरी व सौर उद्योग या दोघांसाठीही फायद्याच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. शेतकरी या प्रकल्पांसाठी जमीन भाड्याने द्यायला तयार आहेत. त्यांना दर हेक्टरी एक लाख २५ हजार रुपये दरवर्षी एवढा भाडेपट्टा देण्याची तरतूद आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना खात्रीच्या उत्पन्नाचा एक मार्ग उपलब्ध होऊ शकेल.
ज्या ठिकाणी शासकीय जमिनी महावितरणच्या सब स्टेशनच्या जवळ उपलब्ध आहेत, तिथे या जमिनी सुद्धा सर्व प्रकल्पांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. त्यामुळे असे प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवणे शक्य होईल.
सौर ऊर्जेच्या संदर्भातली इकोसिस्टीम तयार होणार
शेतकऱ्यांच्या बरोबरच उद्योजकांनीही या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन वेगाने शेतकरी हिताचे प्रकल्प उभारावेत यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. त्याचबरोबर ज्या गावांमध्ये हे प्रकल्प उभे राहतात अशा ग्रामपंचायतींना देखील पहिली तीन वर्षे पाच लाख रुपये प्रति वर्ष असे अनुदान दिले जाईल. या सर्व उपाययोजनांमुळे ग्रामीण भागामध्ये संपूर्ण सौर ऊर्जेच्या संदर्भातली इकोसिस्टीम तयार होईल. ग्रामीण युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी तयार होतील. त्यांच्यामध्ये सौर ऊर्जा संदर्भातील आवश्यक कौशल्यांचा विकास होईल.
राज्याच्या अर्थव्यवस्थेला व शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे मिशन
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या अभियानांतर्गत अपेक्षित आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला व शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे हे मिशन २०२५ महत्त्वाकांक्षी योजना आहे. मिशन २०२५ ची अंमलबजावणी फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर सर्व देशासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. मिशन २०२५ अंतर्गत देण्यात येणारे प्रोत्साहनात्मक अनुदान, जमिनीची उपलब्धता वाढवण्यासाठी करण्यात येणारी प्रक्रिया अशा अनेक उपाययोजना राष्ट्रीय स्तरावर देखील कुसुम योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक ठरतील. त्या दृष्टीने देखील महाराष्ट्र मिशन २०२५ ची यशस्वी अंमलबजावणी करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Maratha Samaj | मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचा निर्धार | सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचा निर्धार

| सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार

| नवा आयोग नेमून मराठा समाजाचे विस्तृत आणि शास्त्रीय सर्वेक्षण करणार

मुंबई |  मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत. राज्य शासन हे आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाम असून अधिक मजबूत कायदेशीर लढा लढण्यात येईल. यासाठी उपचारात्मक याचिका (क्युरेटिव्ह याचिका) दाखल करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी नवा आयोग नेमून विस्तृत आणि शास्त्रीय सर्वेक्षण परत करण्यात यावे असेही ठरले.

आज सह्याद्री अतिथिगृह येथे मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य अध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण, तसेच आमदार प्रवीण दरेकर, माजी न्या. एम जी गायकवाड, महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ, एड विजय थोरात, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची बैठक झाली.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की,क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, याशिवाय आपल्याला आता मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी विस्तृत सर्वे करावा लागेल. हा सर्वे करतांना नेमण्यात येणारी संस्था सुद्धा निष्पक्ष, कार्यक्षम असणे गरजेचे आहे. या संस्थेस सर्व प्रकारच्या सुविधा, मनुष्यबळ, प्रशासनाचे सहकार्य उपलब्ध करून देण्यात यावे.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे म्हणाले की, मराठा समाजाच्या ३१०० उमेदवारांना राज्य शासनाने अधिसंख्य पदावर नियुक्ती दिली आहे. सारथीच्या माध्यमातून समाजाच्या मुलांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे.

Pune Municipal Corporation | उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुणे महानगरपालिकेचा गौरव

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुणे महानगरपालिकेचा गौरव

2022-23 या वर्षामध्ये पुणे महापालिकेने केलेल्या विविध उल्लेखनीय कामामुळे पुणे महानगरपालिकेला आज 20 एप्रिल रोजी नगरविकास दिनानिमित्त मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे शुभहस्ते गौरविण्यात आले.

नागरी स्थानिक संस्थांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी माहे ऑगस्ट 2022 मध्ये मुख्य परिमाण क्षेत्र (KRA) निश्चित केले होते. सदर (KRA) मधील विविध निर्देशांकची पुढील वर्गवारी करून मूल्यांकन करण्यात आले.त्यामध्ये नागरी वित्त व प्रशासनातील मालमत्ता कराची वसुली, महसुली जमा व खर्च, आस्थापना खर्चाचे प्रमाण या बाबी पाहण्यात आल्या. त्याचप्रमाणे केंद्र पुरस्कृत योजेनेमधील स्वच्छ भारत मिशन, अमृत मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, पी एम स्वनिधी यांची कामगिरी बघून मूल्यांकन करण्यात आले.
# सदर निर्देशकांचे संबंधित माहितीच्या आधारे मूल्यांकन करण्याकरिता आयुक्त तथा संचालक,नगर पालिका प्रशासन संचालनालय यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय त्रिसदस्यी समिती गठीत करण्यात आली होती यामध्ये पुणे महानगरपालिकेला तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे.

20 एप्रिल या नगर विकास दिनाचे औचित्य साधून एनसिपी ए, मुंबई येथे झालेल्या भव्य संभारभा मध्ये मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन पुणे मनपाचे आयुक्त व प्रशासक मा. विक्रम कुमार यांचा गौरव करण्यात आला. या वेळी विधानसभा अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर , शालेय शिक्षण मंत्री मा. दीपकजी केसरकर , राज्याचे मुख्य सचिव मा. श्री मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक मुख्य सचिव मा. श्री भूषण गगराणी , प्रधान सचिव मा. श्रीमती सोनिया सेठी , आयुक्त तथा संचालक श्री किरण कुलकर्णी हे उपस्थित होते.