Punit Balan Group | Oxyrich |  माधव जगताप यांची नोटीस चुकीची आणि बेकायदेशीर | पुनीत बालन 

Categories
Breaking News cultural PMC पुणे

Punit Balan Group | Oxyrich |  माधव जगताप यांची नोटीस चुकीची आणि बेकायदेशीर | पुनीत बालन

Punit Balan Group | Oxyrich | ऑक्सिरिच कंपनीच्या पुनीत बालन (Oxyrich punit Balan) यांना दहिहंडी उत्सवाचे दरम्यानचे कालावधीत अनधिकृत फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स इ. लावून सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण केल्याने 3 कोटी 20 लाखांचा दंड भरणेबाबतचे आदेश पुणे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी दिले होते. तसेच याबाबत बालन यांच्याकडून खुलासा देखील मागवण्यात आला होता. बालन यांनी आपला खुलासा माधव जगताप यांना सादर केला आहे. त्यात बालन यांनी म्हटले आहे कि, जगताप यांनी दिलेली सदर नोटीस चुकीची व बेकायदेशीर असून सदर नोटीस मंडळाना देण्याऐवजी जाणूनबुजून व वैयक्तिक आकसापोटी माझी बदनामी करिता माझ्या नावे नोटीस दिली आहे. दरम्यान बालन यांच्या खुलाश्यावर महापालिका काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. (PMC Sky Sign Department)

 पुनीत बालन यांचा सविस्तर खुलासा खालीलप्रमाणे :

सार्वजनिक उत्सव सादर करणे आणि त्यास निःशुल्क मान्यता देण्यासंदर्भात  मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली १४/०९/२०२३ रोजी बैठक घेवून निर्णय घेतला आहे असे  वृत्तपत्रात आले आहे. तसेच तुमचे पत्र जावक क्रमांक ई/५७४६ दिनांक ०४/०१/२०२३ सदर मा.उप सचिव, महाराष्ट्र शासन, गृह विभाग, मंत्रालय मुख्य इमारत, मुंबई यांजकडे सादर केलेले पत्र. सदर पत्रामध्ये तुम्ही नमूद केले आहे की पुणे शहरातील गणेशउत्सव कालावधीत रस्ता, पदपथावर उभारण्यात येणाऱ्या मान्य मापाच्या उत्सव मंडप/ स्टेज करिता पूर्वीपासूनच कोणतेही परवाना शुल्क आकारण्यात येत नव्हते. तसेच सन २०१९ पूर्वी स्थानिक पोलीस विभागाकडून मान्यता दिलेल्या स्वागत कमानी व रनिंग मंडप यांना आकारण्यात येत असलेले परवाना शुल्क देखील पुणे महानगरपालिका आकाशचिन्ह परवाना व विभाग मुख्य सभा ठराव क्रमांक ५६४ दिनांक ०९/०९/२०१९ अन्वये रद्द करण्यास मान्यता दिलेली असून त्याबाबत सन २०१९ पासून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

पुणे शहरात सन २०१९ गणेशउत्सव कालावधीत मोहरम / दहीहंडी आणि गणेशउत्सव मंडळाना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने देण्यात आलेल्या नि: शुल्क परवानगी ही पुढील ५ वर्षा करिता म्हणजेच सन २०२२ पासून सन २०२७ सालापर्यंत गृहीतधरणे बाबत पुणे महानगरपालिका, पुणे कडून सार्वजनिक गणेशउत्सव २०२२ करिता सर्व गणेश मंडळे, पोलीस अधिकारी व मनपा अधिकारी यांची ०८/०८/२०२२ रोजी झालेल्या बैठकीत एकत्रित निर्णय घेण्यात आलेला होता.
वरील सर्व गोष्टींचा विचार करता तुम्ही पाठवलेली नोटीस ही माझे व्यक्तिमत्व बदनाम करण्यासाठी जाणूनबुजून मला पाठवली आहे. तसेच तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा व आयोग्य असून त्यानुसार आपण क्रमांक एल-१०४३ ०३/१०/२०२३ ची आमच्या कार्यालयात ०४/१०/२०२३ रोजी देण्यात
आलेली नोटीस रद्द करण्यात यावी तसेच सदर नोटीस केल्या बाबत प्रसारमाध्यमांना देखील कळवावेसबब, ज्याअर्थी या शासनानेच निर्बंधमुक्त” उत्सवाची घोषना केलेली आहे. त्याअर्थी आपणा दंड / विद्रुपीकरण शुल्क इत्यादिची मागणी आमच्याकडे करणे बेकायदेशीर व चुकीचे आहे. तसेच अश्या वसुली मिळकतकरातून करण्याबाबत उल्लेख देखील बेकायदेशीर आहे याचीही नोंद घ्यावी.

Shetkari Athvade Bajar | शेतकरी आठवडे बाजारासाठी पुणे महापालिकेकडून नियमावली!

Categories
Breaking News PMC social पुणे

Shetkari Athvade Bajar | शेतकरी आठवडे बाजारासाठी पुणे महापालिकेकडून नियमावली!

Shetkari Athvade Bajar | महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात (Pune Municipal Corporation) संत शिरोमणी सावता माळी रयत शेतकरी आठवडे बाजार (Sant Shiromani Savta Mali Rayat Shetkari Athvade Bajar) आयोजित करणारे शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी बचत गट व आयोजक यांची बैठक उप आयुक्त अतिक्रमण महानगरपालिका यांच्या अध्यक्षते खाली आयोजित करणेत आली होती. बैठकी मध्ये शेतकरी आठवडे बाजार भरविताना महापालिकेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या बाबत माधव जगताप उप आयुक्त अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग (PMC Deputy commissioner Madhav Jagtap) यांनी शेतकरी आठवडे बाजार आयोजक यांना मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी आठवडे बाजार नियोजन करिता काही  निर्णय घेण्यात आले. (PMC Pune)

शेतकरी आठवडी बाजार आयोजकांसाठी पुणे महानगरपालिके मार्फत करण्यात आलेली नियमावली पुढील प्रमाणे
१) शेतकरी आठवडी बाजार आयोजन करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी किवा शेतकऱ्यांची सहकारी संस्था असणे बंधनकारक असावे. संस्थेचे किमान २५० शेतकरी सभासद असावेत.
२) आयोजक संस्थेचे स्थापने पासून आज अखेरीस नियमित लेखा परीक्षण व विविध कर भरणा केलेला असावा.
३) बाजार आयोजन करत असतांना आवश्यक कर, भाडे अथवा फी ची भरणा नियमित करून त्या संबंधित अहवाल कार्यलयाकडे सादर करावा.
४) शेतकरी बाजार चालू करण्यापूर्वी साधारणपणे शेतकरी गट अथवा शेतकरी कंपन्यांची नोंदणी महानगरपालिका कार्यालयात करून अधिकृत मान्यता घ्यावी व त्यानंतरच शेतकरी बाजार सुरु करावा.
५) शेतकरी बाजारांमध्ये शेतमाल विक्री करणारे शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी कंपन्या संस्था यांना आयोजक संस्थेचे कायम स्वरूपी सभासद करून घेणे बंधनकारक आहे.
६) सभासद फी व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची अनामत रक्कम अथवा इतर कोणत्याही स्वरुपात अवाजवी रक्कम स्वीकारता येणार नाही. अशाप्रकारची कोणतीही बाब निदर्शनास आल्यास तात्काळ आयोजकांची परवानगी रद्द करण्यात येईल.
७) शेतकरी आठवडी बाजार अनाधिकृतपणे रस्त्यावर अथवा फूटपाथवर अतिक्रमण करून सुरू करता येणार नाही.
८) महापालिकेच्या मालकीच्या अमेनिटी स्पेस अथवा राखीव जागेवर विना परवानगी शेतकरी आठवडे बाजार सुरू करता येणार नाही.
९) सहभागी गटांनी ओळखपत्र, गणवेश, गटांचे प्रोफाईल, नोंदणी प्रमाण पत्र, कृषी अधिकाऱ्यांचे शिफारस पत्र, इत्यादी कागदपत्रे स्वतः जवळ कायमस्वरूपी ठेवणे व त्याची एक प्रत आयोजक संस्थेकडे ठेवणे गरजेचे आहे.
१०) सहभागी होणाऱ्या गटांचे उत्पादित होणारे व भविष्यात नियोजित असलेले शेतमाल यांची यादी आयोजक संस्थेने देणे व त्याप्रमाणे मालाचे नियोजन करणे आवश्यक आहे.
११) शेतकरी बाजारांमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही तसेच अस्वच्छता व ग्राहकांना त्रास होईल अश्या प्रकारचे कोणतेही वर्तन केले जाणार नाही व तसे आढळल्यास कार्यवाहीस सहकार्य करण्याबाबतचे हमीपत्र सहभागी गट, शेतकरी यांनी आयोजक संस्थेकडे देणे कंधनकारक राहील.
१२) शेतकरी बाजारांमध्ये ताजा, स्वच्छ, निवडक व गुणवतापूर्ण शेतमाल विक्री करण्याबाबत तसेच स्वच्छ्ता, शांतता नीटनेटकेपणा ठेवण्याच्या सूचना सहभागी गटांना देऊन त्याप्रमाणे अंमलबजावणी
करण्याबाबतची जबाबदारी आयोजकांची असावी.
१३) शेतकरी बाजार हि संकल्पना शेतकरी यांना उत्पन्न व ग्रामिण युवकांना रोजगार या उद्देशाने अस्तित्वात आली असल्यामुळे सदैव याच घटाकांचे हित जपण्याचे तसेच शेतकरी व ग्रामिण तरुणाना प्रोत्साहित करण्याचे आयोजकाचे धोरण असल्याबाबतचे हमीपत्र बंधनकारक असावे.
१४) शेतमाल विक्रीस शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गट यांनी जागेची मागणी केल्यास अशा संस्थाना अथवा व्यक्तीना शेतकरी आठवडे बाजार आयोजकांनी योग्य कारणाशिवाय जागा नाकारल्यास सदर आयोजकांची परवानगी रद्द करणेत येईल.
१५) पुणे शहरामध्ये शेतकरी आठवडी बाजार भरविताना प्रथम प्रकल्प संचालक आत्मा पुणे कृषि विभाग व पुणे महानगरपालिकेची परवानगी घेतल्या शिवाय पुढील शेतकरी आठवडे बाजार भरविता येणार नाहीत. आत्मा संस्थेकडे अर्ज दाखल केल्याची प्रत व हमीपत्र सादर केल्यानंतर महापालिकेची परवानगी देण्याची कार्यवाही करणेत येणार आहे

PMC Sky Sign Department | परवाना निरीक्षक राजेंद्र केवटे, सुरेंद्र राऊत, लक्ष्मीकांत शिंदे यांचे निलंबन

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Sky Sign Department | परवाना निरीक्षक राजेंद्र केवटे, सुरेंद्र राऊत, लक्ष्मीकांत शिंदे यांचे निलंबन

| उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

PMC Sky Sign Department | पुणे – नियमांचे उल्लंघन करून टिळक चौकात संभाजी पोलिस चौकीच्या मागे होर्डिंग (Hoardings) उभारणीचे काम सुरू होते. मात्र त्याकडे कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने तीन परवाना निरीक्षकांचे (Licence Inspector) निलंबन करण्यात आले आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी दिली. यामध्ये परवाना निरीक्षक राजेंद्र केवटे, सुरेंद्र राऊत, लक्ष्मीकांत शिंदे यांचा समावेश आहे. (PMC Sky Sign Department)
महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागातर्फे (Pune Municipal Corporation Sky Sign Department) संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून परवानग्या दिल्या जातात. पण अनेकदा कागदावर सगळे योग्य असले तरी प्रत्यक्षात नियमांचे उल्लंघन केलेले असते. असाच प्रकार शहराच्या मध्यवर्ती भागात संभाजी पोलिस चौकीच्या (Sambhaji Police Chowki) मागे उभारलेल्या होर्डिंगमुळे उघडकीस आला आहे. या ठिकाणी तीन होर्डिंगला परवानगी दिल्यानंतर त्यामध्ये नियमानुसार एक मीटरचे अंतर ठेवणे बंधनकारक होते. पण संबंधित व्यावसायिकाने सलग १०० फुटांचे होर्डिंग उभारले आहेत. हे काम सुरू असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात होते. याबाबत भाजप नेते तुषार पाटील यांनी देखील तक्रार केली होती. यावर अतिरिक्त  आयुक्त डॉ. खेमनार, उपायुक्त माधव जगताप, अविनाश सकपाळ यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता त्यामध्ये अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे परवाना निरीक्षकांना यावर कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा करण्यास सांगितले होते. पण त्यांनी खुलासा सादर केला नाही. होर्डिंग व्यावसायिकाला होर्डिंगवर जाहिरात लावण्यास मनाई केलेली असतानाही तेथे जाहिरात लावण्यात आली आहे. त्याकडेही परवाना निरीक्षक राजेंद्र केवटे, सुरेंद्र राऊत, लक्ष्मीकांत शिंदे यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या तिघांना निलंबित करण्याचा आदेश उपायुक्त माधव जगताप यांनी काढला आहे. (Pune Municipal Corporation)

| या कारणांमुळे केले निलंबित

 होर्डिंगमध्ये एक फुटाचे अंतर न ठेवता १०० फूट लांबीचे एकच होर्डिंग उभारले. संभाजी पुलाच्या भरावाला छेद देऊन होर्डिंग उभारले आहे. होर्डिंग उभारताना वृक्षतोड करण्यात आली, पण त्याच्या परवानगीबाबत स्पष्टता नाही. जागा नदीपात्रात असूनही पूर रेषेबाबत पाटबंधारे विभागाचा अभिप्राय नाहीजागेचा मोजणी नकाशा नाही. पोलीस  विभागाचा अभिप्राय नाही. जमीन महापालिकेच्या मालकीची आहे की नाही याची खात्री नाही. (PMC Pune)
—–
News Title | PMC Sky Sign Department | Suspension of license inspectors Rajendra Kevate, Surendra Raut, Laxmikant Shinde Information of Deputy Commissioner Madhav Jagtap

PMC Environment Report 2022-23 | पीएमपीच्या सीएनजी व इलेक्ट्रिक बस मुळे पुणे शहराच्या वायू आणि ध्वनी प्रदूषणात घट

Categories
Breaking News Education PMC social आरोग्य पुणे

PMC Environment Report 2022-23 | पीएमपीच्या सीएनजी व इलेक्ट्रिक बस मुळे पुणे शहराच्या वायू आणि ध्वनी प्रदूषणात घट 

 

| महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून करण्यात आला दावा 

PMC Environment Report 2022-23 | पुणे शहरात PMPML च्या एकूण २०७९ बसेस कार्यरत असून त्यांपैकी १४२१ सी. एन. जी. (PMPML CNG Bus) + ४५८ इलेिक्ट्रक बस (PMPML Electric Bus) मिळून स्वच्छ इंधन वर चालणाऱ्या एकूण १८७९ बसेस आहेत. सदर चे प्रमाण एकूण २०७९ बस ताफ्याच्या ९०% आहे. इलिक्ट्रक व सी. एन. जी. बसेसमुळे पुणे शहरातील वायू प्रदूषणाबरोबरच (Pune Air Pollution) ध्वनी प्रदूषणाची पातळी (Pune Sound Pollution) देखील कमी होत आहे. PMPML च्या ४५८ इलेक्ट्रिक बस डिसेम्बर २०२२ पर्यंत एकूण इलिक्ट्रक बसेस चा प्रवास ३.५० कोटी कि.मी. पेक्षा जास्त झाला आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या  पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल 2022-23 यामध्ये मांडण्यात आली आहे. (PMC Environment Report 2022-23)
पर्यावरण अहवालात पुढे म्हटले आहे कि, पुणे शहरात जून २०२३ पर्यंत एकूण ३५,९४,१३२ नोंदणीकृत वाहने. सन २०२१ ( १,६९,५५२) च्या तुलनेत सन २०२२ मध्ये नवीन २,५५,७५७ वाहनांची भर पडली आहे. महापालिका प्रशासनाकडून हा अहवाल स्थायी समितीला सादर करण्यात आला आहे. यावेळी आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त, डॉ कुणाल खेमणार, उपायुक्त माधव जगताप, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे आदी उपस्थित होते. (Pune Municipal Corporation)

पर्यावरण अहवालातील काही ठळक गोष्टी 

पुणे शहर व परिसरात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्साठी हॉटस्पॉट ठरलेल्या नैसर्गिक अधिवासांचे ई- बर्ड या वेबसाईटवरील मॅपींग वरून पुणे शहराच्या पूर्व भागातील कवडीपाठ या ठिकाणी सर्वाधिक २६३ प्रजाती, तर ARAI टेकडीवर २५३, पाषाण तलाव परिसरात २३६ प्रजातींचे पक्षी आढळून आले आहेत. (PMC Pune)

शहरात प्रतिदिन तयार होणारा घनकचरा: २१०० ते २२०० मे.टन. ओला कचरा ९५० मे. टन यावर कंपिस्टिंग, बायोगॅस, बल्क वेस्ट जनरेटर, होम कम्पिोस्टंग, शेतकऱ्यामार्फत जिरवला जाणारा कचरा, ओल्या कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅसमधून (सीबीजी) वापर PMPML बसेस साठी इंधन स्वरुपात वापरण्यास सुरुवात. सुका कचरा १२०० मे. टन : सुका कचऱ्यावर RDF रीफ्युस डीराईव्हड फ़ुएल, MRF- मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी, कचरा वेचकां माफर्त रिसायकल, सिमेंट कंपनीस थेट वापर. २०० सोसायटीमध्ये राबाविलेलेया ४० अभियानाच्या माध्यमातून ६८ टन ई-वेस्ट संकलित. स्वच्छ संस्थेच्या ‘वी कलेक्ट च्या माध्यमातून २४२ अभियानांतगर्त ६२ टन ई-वेस्ट संकलित. पुणे शहरातील विविध ठिकाणी कायर्रत कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये १००% कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. उरुळी फुरसुंगी कचरा डेपो येथे बफर झोन अमृत वन अंतर्गत २१,००० वृक्षांची लागवड केली आहे.

हवा प्रदूषण मधील PM १० व PM २.५ या घटकांचे सन २०२२ मध्ये पी.एम. १० चे सरासरी प्रमाण शिवाजीनगर व हडपसर या ठिकाणी सर्वात जास्त नोंदविले गेले

२४ x ७ पाणीपुरवठा योजनेच्या कामामध्ये नियोजित १५५० कि.मी. जलवाहिन्यांची लांबी पैकी ८३० कि.मी. चे काम पूर्ण झाले आहे. ट्रान्समिशनच्या कामामधील ११५ कि.मी. पैकी ७३ कि. मी. लांबीचे काम पूर्ण झाले आहे. ३,१८,८४७ AMR मीटर पैकी १,१९,७४६ मीटर्स बसविण्यात आले आहेत.
मैलाजलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी बांधकामासाठी वापरणे बंधनकारक करण्याकरिता कायार्लयीन परिपत्रक लागू केले आहे. यासाठी PMC STP WATER TANKER SYSTEM नावाचा मोबाईल अॅप तयार केला आहे. विविध बांधकाम व्यावसायिकांनी याचा वापर सुरु केला आहे. (PMC Pune news)
सन २०२०-२१ मध्ये पुणे शहराचा एकूण ऊर्जा वापर ४४६३.५९ MU ( Million Units) इतका होता तर सन २०२१-२२ मध्ये वाढून ४९८२.८९ MU इतका झाला. रहिवासी भागात सन २०२०-२१ मध्ये ऊर्जा वापर २०४५ MU इतका होता तर सन २०२१-२२ मध्ये वाढून २१४४ MU इतका झाला. उर्जेची मागणी रहिवासी भागांत सवार्त जास्त, तर त्या खालोखाल औद्यगिक आणि व्यावसायिक भागात होती.

 पुणे शहराची वाटचाल कार्बन न्यूट्रॅलिटीच्या दिशेने कशी व्हावी यासाठी महानगरपालिका, शासकीय संस्था, शैक्षणिक संस्था या क्षेत्रात काम करणारे तज्ञ व स्वयंसेवी संस्था मिळून क्लायमेट अॅक्शन सेल तयार करण्यात आला आहे.
सन २०२२ मध्ये ११२२ मि. मि. पावसाची नोंद. सर्वाधिक तापमान ४१.८ डिग्री सेल्सियस तर सर्वात कमी तापमान ८.५ डिग्री सेल्सियस

आय. जी. बी. सी. ग्रीन सिटी रेटिंग सिस्टीम अंतर्गत पुणे शहराला प्लॅटीनम रेटिंग प्राप्त झाले. शहराचा हरित विकास, ग्रीन बिल्डिंग, घनकचरा व्यवस्थापन, पाण्याची
उपलब्धता पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये इलेक्ट्रिक बस चा वापर इ. पर्यावरण संवर्धन संबंधी केलेल्या कामासाठी प्लॅटीनम रेटिंग असलेले महाराष्ट्रातील प्रथम व भारतातील दुसरे शहर झाले आहे.
पुणे शहरामध्ये शहरांमध्ये शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय G20 शिखर परिषदे अंतगर्त पायाभूत सुविधांवर कार्यागटाची पहिली मोठी बैठक झाली. शहरांचा विकास, शहरिकरणामुळे निमार्ण झालेल्या समस्यांवर उपाय, शहरे विकसित करण्यासाठी जागतिक स्तरावरून उपलब्ध होऊ शकणारा निधी शाश्वत जीवनशैली इत्यादी सारख्या
विषयांवर बैठकित चर्चा झाली.

माझी वसुंधरा मध्ये पुणे शहराला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
—-/
News Title | PMC Environment Report 2022-23 | Reduction in air and noise pollution of Pune city due to CNG and electric buses of PMP

PMC Bogus Identity Card | पुणे महापालिकेत बोगस ओळखपत्र धारकांचा सुळसुळाट | सुरक्षा विभागाने जप्त केली 175 बोगस ओळखपत्र 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Bogus Identity Card | पुणे महापालिकेत बोगस ओळखपत्र धारकांचा सुळसुळाट | सुरक्षा विभागाने जप्त केली 175 बोगस ओळखपत्र

PMC Bogus Identity Card | पुणे महापालिकेच्या लोगोचा (PMC Pune Logo) आणि नावाचा वापर करून बोगस ओळखपत्र (Bogus Identity card) तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये ठेकेदार, त्यांचे कामगार, माजी नगरसेवकांचे कार्यकर्ते, मानधनावर काम करणारे, लायझनिंग करणारे कर्मचारी अशा लोकांचा समावेश आहे. मागील आठवड्यपासून महापकिकेने ओळखपत्र तपासण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये महापालिकेला असे 175 बोगस ओळखपत्र धारक सापडले आहेत. तूर्तास तरी सुरक्षा विभागाने (PMC Security Department) या लोकांना तंबी देऊन सोडले आहे. आगामी काळात मात्र अशा लोकांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा सुरक्षा विभागाकडून देण्यात आला आहे. उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी ही माहिती दिली. (PMC Bogus Identity Card)
महापालिकेत वेगवेगळ्या कामासाठी नागरिक येत असतात. मात्र यातील काही लोक हे महापालिकेत पार्किंग करण्यासाठी, काही कारण नसताना येत असलेले आढळले आहे. यामुळे पार्किंग करण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. तसेच हकनाक गर्दी दिसते. पुणे हे दहशतवाद्यांचे सॉफ्ट टार्गेट आहे हे नुकतेच काही प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सुरक्षा विभागाने महापालिकेत येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी सुरु केली आहे. हे काम तृतीय पंथीयांना देण्यात आले आहे. ओळखपत्र दाखवल्याशिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नाही. यामध्येच महापालिकेला बोगस ओळखपत्र मिळाले. महापालिकेच्या लोगोचा यासाठी वापर करण्यात येत आहे. (Pune Municipal Corporation)
याबाबत मुख्य सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी सांगितले कि, महापालीकेच्या कर्मचाऱ्यांना स्वतंत्र स्मार्ट कार्ड देण्यात आली आहेत. त्यावर सेवक कोड नंबर आणि आधार कोड आहे. मात्र बोगस ओळखपत्रावर असे काही आढळून आले नाही. त्यामुळे अशी 175 ओळखपत्र आम्ही जप्त केली आहेत. यामध्ये ठेकेदार, त्यांचे कामगार, माजी नगरसेवकांचे कार्यकर्ते, मानधनावर काम करणारे कर्मचारी अशा लोकांचा समावेश आहे. विटकर यांनी सांगितले कि तूर्तास तरी या लोकांना आम्ही सक्त ताकीद दिली आहे कि असे ओळखपत्र न वापरता तुमच्या कंपनीचे किंवा ठेकेदाराचे ओळखपत्र वापरा. आगामी काळात असे प्रकार घडले तर फौजदारी कारवाई केली जाईल. (PMC Pune News)
विटकर यांनी पुढे सांगितले कि नुकतेच नेमलेले तृतीयपंथी हे काम चांगले करत आहेत. तसेच सहायक सुरक्षा भारत जाधव, सुरक्षा जमादार – राजू येनपुरे हे यात मदत करत आहेत. पालिकेत येताना ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तसेच महापालिका कर्मचाऱ्यांनी कामावर असताना ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. असे ही विटकर यांनी सांगितले.
——
जे लोक महापालिकेत अशा पद्धतीने बोगस ओळखपत्र वापरतात त्यांनी आपल्या कंपनीचे किंवा ठेकेदाराच्या नावाचे ओळखपत्र बनवणे आवश्यक आहे. याबाबतचे आदेश देखील अतिरिक्त आयुक्तांनी जारी केले आहेत.  आम्ही हे जप्त केलेले ओळखपत्र सामान्य प्रशासन विभागाकडे देणार आहोत.
माधव जगताप, उपायुक्त, सुरक्षा विभाग 
—–
महापालिकेत जे लोक  बोगस ID कार्ड धारण करतील त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच असे ओळखपत्र बनवून देणाऱ्या लोकांना देखील कारवाई केली जाईल. मनपा कर्मचाऱ्यांनी कामावर असताना ओळखपत्र घालणे आवश्यक आहे.
राकेश विटकर, मुख्य सुरक्षा अधिकारी 
———-
News Title | PMC Bogus Identity Card | In Pune Municipal Corporation, bogus identity card holders are in trouble Security department seized 175 fake identity cards

PMC Encroachment Department | आपली बेवारस वाहने रस्त्यावरून हटवा | अन्यथा 5 हजार ते 25 हजारा पर्यंत द्यावे लागतील चार्जेस 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Encroachment Department | आपली बेवारस वाहने रस्त्यावरून हटवा | अन्यथा 5 हजार ते 25 हजारा पर्यंत द्यावे लागतील चार्जेस

PMC Encroachment Department | पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या (PMC Encroachment Department) वतीने बेवारस वाहनांवर (Abandoned vehicles) कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. असे वाहन रस्त्यावर किंवा फुटपाथवर आढळल्यास गाडी जप्त केली जाईल. ती गाडी सोडवण्यासाठी गाडी मालकाला 5 हजार पासून ते 25 हजार पर्यंत दंड (Removal Charges) होऊ शकेल. अतिक्रमण विभागाकडून अशा लोकांना नोटीस देखील पाठवणे सुरु केले आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. (PMC Encroachment Department)

पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत रस्ता, पदपथावर इत्यादी ठिकाणी बंद / बेवारस वाहने, पडीक नादुरुस्त वाहने आढळ होत आहेत. अशी वाहने रस्त्यावर थांबल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे तसेच सदर वाहने जागेवरून न हलविल्यामुळे कचरा तयार होऊन दुर्गंधी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वी रस्त्यावरील बंद / बेवारस वाहने उचलणेची कारवाई करणेत आली आहे. रस्त्यावरील  बंद / बेवारस वाहनांबाबत नागरिकांच्या देखील तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत.  त्यामुळे अशी वाहने पुणे महानगरपालिकेकडील क्षेत्रिय कार्यालयामार्फत कारवाई करून जप्त करणेत येणार आहेत.  (PMC Pune News)

-जप्त केलेल्या वाहनांसाठी  रिमुव्हल चार्जेस खालील प्रमाणे –

1. अवजड वाहनासाठी (प्रवासी बस, ट्रक इ.) = २५,०००/-
2. हलकी वाहने (१० टना पर्यंत) = २०,०००/-
3. चार चाकी वाहने (कार, जीप इ.) = १५,०००/-
4. तीन चाकी (रिक्षा, टेम्पो) = १०,०००/-
5. दुचाकी (स्वयंचलित) र= ५०००/-
अतिक्रमण विभागाच्या माहितीनुसार  संबंधित वाहन मालक १ महिन्याचे कालावधीमध्ये सोडवून घेऊ शकेल. सदर वाहनांवर क्षेत्रिय कार्यालयामार्फत नोटीस लावण्यात येणार असून याकरिता ७ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. संबंधित वाहनधारकांनी ७ दिवसांच्या मुदतीत वाहन काढून न घेतल्यास सदर वाहनावर पुणे महानगरपालिकेकडून जप्तीची कारवाई करण्यात येत आहे, त्यानुसार शहरात २२ वाहने जप्त करण्यात आली असून १८ वाहनांना नोटीस लावण्यात आल्या आहेत. असे ही खात्याकडून सांगण्यात आले. (Pune Municipal Corporation News)
—–
News Title | PMC Encroachment Department | Get your abandoned vehicles off the road Otherwise charges ranging from 5 thousand to 25 thousand have to be paid

PMC Unique Pune Walk | पुणे महापालिकेचा पहिला “युनिक पुणे वॉक”

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Unique Pune Walk | पुणे महापालिकेचा पहिला “युनिक पुणे वॉक”

PMC Unique Pune Walk | पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्या (Pune Municipal Corporation Cycle Club) वतीने इतिहास, पर्यावरण, फिटनेस आणि पर्यटनासाठीच्या नागरी सुविधा या सर्वांचा मेळ घालणारा पहिला “युनिक पुणे वॉक” (Unique Pune Walk) तळजाई टेकडी येथे शनिवार  १ जुलै रोजी सकाळी ६.३० ते ८.०० या वेळेत आयोजित करण्यात आला होता. या वॉक मध्ये जवळपास ४० अधिकारी सहभागी झाले होते. (PMC Unique Pune Walk)
 प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी अशा प्रकारच्या वॉकचे (Pune Walk) शहरात विविध ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे. ह्या वॉक मध्ये  विकास ढाकणे, अतिरिक्त महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका (PMC Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी सहभाग घेऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन माधव जगताप उपायुक्त, अतिक्रमण विभाग (Deputy Commissioner Madhav Jagtap) व सायकल क्लबचे सुरेश परदेशी (Suresh Pardeshi) यांनी केले.
—-
News Title | PMC Unique Pune Walk | Pune Municipal Corporation’s first “Unique Pune Walk”

PMC Encroachment Department | गॅस सिलिंडर वापरणारे पथारी धारक आणि वितरक दोघांवरही गुन्हे दाखल होणार

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Encroachment Department | गॅस सिलिंडर वापरणारे पथारी धारक आणि वितरक दोघांवरही गुन्हे दाखल होणार

| पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सुरु केली तयारी

PMC Encroachment Department | शहरातील पथारी व्यावसायिकांना (Hawker’s) महापालिकेने दिलेल्या परवान्यानुसार पथारीच्या ठिकाणी अन्न पदार्थ शिजविण्यास अथवा तयार करण्यास बंदी आहे. तरीही अनेक पथारी धारक गॅस सिलिंडर (Gas Cylindres) वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा व्यावसायिकांवर महापालिकेकडून (PMC Pune) कारवाई केली जाणार आहे. तसेच, व्यावसायिकाला सिलिंडर देणाऱ्या वितरकावरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत. अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली आहे. (PMC Encroachment Department)

शहरात बंदी असतानाही तसेच महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) कार्यवाही सुरू असतानाही अनेक जण सिलिंडर वापरतच असल्याने प्रशासनाने या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक बोलावली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. शहरात रस्ता-पदपथावर जे पथविक्रेते अनधिकृतपणे सिलिंडरचा वापर करत असताना आढळून आल्यास अशा पथविक्रेत्यांवर सिलिंडर जप्तीची कारवाई करून तसेच संबंधित व्यावसायिकांवर व वितरकांवर पोलिसांमार्फत गुन्हे दाखल करण्याची कारवाई चालू करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी सांगितले.

दरम्यान या कारवाईबाबत जगताप यांच्या नियंत्रणाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिक्रमण विभाग, पोलीस विभाग, अन्न पुरवठा विभाग व गॅस वितरक कंपनीतील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत हा निर्णय संयुक्तपणे घेण्यात आल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. पुणे महापालिकेकडून आतापर्यंत अतिक्रमण कारवाईमध्ये जे व्यावसायिक व्यवसाय करताना सिलिंडरचा वापर करतात, अशा व्यावसायिकांवर 1021 सिलिंडर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. (PMC Pune News)

——

News Title | PMC Encroachment Department | Both the holders and distributors of gas cylinders will be charged| The encroachment department of Pune Municipal Corporation has started preparations

PMC Pune Deputy Commissioner | अतिक्रमण विभागाची जबाबदारी आता दोन उपायुक्तांकडे | माधव जगताप यांच्याकडून पर्यावरण विभागाची जबाबदारी काढून घेतली 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Deputy Commissioner | अतिक्रमण विभागाची जबाबदारी आता दोन उपायुक्तांकडे | माधव जगताप यांच्याकडून पर्यावरण विभागाची जबाबदारी काढून घेतली

| महापालिका आयुक्तांच्या आदेशाने प्रशासकीय अडचणी वाढण्याची शक्यता

PMC Pune Deputy commissioner | पुणे महापालिकेच्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाची जबाबदारी (PMC Pune encroachment department l) आता दोन उपायुक्त सांभाळणार आहेत. उपायुक्त माधव जगताप (Deputy commissioner Madhav Jagtap) यांच्याकडील काही जबाबदारी काढून घेत नुकतेच प्रतिनियुक्तीवर आलेले राजू नंदकर (Deputy commissioner Raju Nandkar) यांना जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. मात्र यामुळे अतिक्रमण विभागातील प्रशासकीय अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान उपायुक्त माधव जगताप यांच्याकडून पर्यावरण विभागाची देखील जबाबदारी काढून घेतली आहे. (PMC Pune Deputy commissioner)
महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांनी नुकतेच काही उपायुक्तांच्या कामाच्या जबाबदारी बाबत निर्देश दिले आहेत. काही उपायुक्त यांच्याकडून त्यांच्याकडील जबाबदारी काढून घेतली आहेत तर नवीन लोकांना संधी दिली आहे. उपायुक्त माधव जगताप त्यांच्या कामाच्या पद्धतीने वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यामुळे त्यांच्याकडील काही पदभार काढून घेतला अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे. जगताप यांच्याकडील पर्यावरण विभाग काढून घेतला आहे. तसेच अतिक्रमण विभागाची पूर्ण जबाबदारी न देता जगताप यांच्याकडे परिमंडळ 3,4 आणि 5 ची जबाबदारी दिली आहे. मात्र यामुळे अतिक्रमण विभागात प्रशासकीय अडचणी वाढणार आहेत. (Pune Municipal Corporation)
अतिक्रमण विभागातील अनुभवी अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानुसार अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात 4 टप्प्यात काम चालते. पहिले म्हणजे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम कारवाई, दुसरे p परवाना आणि वसूली तिसरे फेरीवाला धोरण आणि त्याची अंमलबजावणी आणि चौथा भाग म्हणजे प्रशासकीय. आता विभागाचे विभाजन केल्याने कामात गोंधळ निर्माण होणार आहे. प्रकरणात वादविवाद होऊ शकतात. माहिती अधिकारात उत्तरे देताना दोन्ही अधिकाऱ्यांना कसरत करावी लागणार. याबाबत आयुक्त काय निर्णय घेणार, हे महत्वाचे ठरणार आहे. (PMC Pune encroachment department)

| कुठल्या उपायुक्तांकडे कुठली जबाबदारी?

दरम्यान महापालिका आयुक्तांनी इतर काही उपायुक्तांना नव्याने जबाबदारी दिली आहे. उपायुक्त महेश डोईफोडे (Deputy commissioner Mahesh Doifode) यांच्याकंडील मोटार वाहन विभाग (Vehicle Department) काढून घेत त्यांच्याकडे पर्यावरण, मंडई विभाग, बीओटी सेल आणि तांत्रिक विभागाची जबाबदारी दिली आहे. मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचा उपायुक्त अजित देशमुख (Deputy commissioner Ajit Deshmukh) यांचा अतिरिक्त पदभार हलका करत तो उपायुक्त महेश पाटील (Deputy commissioner Mahesh Patil) यांच्याकडे देण्यात आला आहे. महेश पाटील यांच्याकडे आता दक्षता, मालमत्ता व व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी असणार आहे. प्रतिनियुक्तीने नुकतेच रुजू झालेले राजू नंदकर यांच्याकडे मोटार वाहन विभाग, अतिक्रमण|अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग परिमंडळ 1 आणि 2, प्राथमिक शिक्षण विभाग, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग, आणि महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी याची जबाबदारी असणार आहे. तर माधव जगताप यांच्याकडे सुरक्षा विभाग, आकाशचिन्ह परवाना विभाग, अतिक्रमण|अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग परिमंडळ 3,4 आणि 5 ची जबाबदारी असणार आहे.
—-
News Title | PMC Pune Deputy Commissioner The responsibility of the Encroachment Department is now with two Deputy Commissioners The responsibility of environment department was taken away from Madhav Jagtap

PMC Pune Deputy commissioner Madhav Jagtap | उपायुक्त माधव जगताप को कारण बताओ नोटिस जारी 

Categories
Breaking News PMC social पुणे हिंदी खबरे

PMC Pune Deputy commissioner Madhav Jagtap | उपायुक्त माधव जगताप को कारण बताओ नोटिस जारी

 |  महापालिका आयुक्त द्वारा कार्रवाई किए जाने की संभावना

PMC Pune deputy commissioner Madhav Jagtap | पुणे महापालिका (PMC Pune) अतिक्रमण विभाग (PMC Encroachment Department) के उपायुक्त माधव जगताप (Deputy commissioner Madhav Jagtap) को फेरीवालों के खाने के स्टॉल को लात मारना महंगा पड़ेगा.  जगताप की लात मारने का वीडियो सोशल मीडिया पर वायरल होने के बाद शहर के राजनीतिक दलों, पथरी पेशेवर संघों, सामाजिक संगठनों ने आक्रामक रुख अपनाते हुए जगताप को पद से हटाने और निलंबित करने की मांग की.  इस बीच पीएमसी कमिश्नर विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) ने भी इस मामले को गंभीरता से लिया है और इस मामले में जगताप को कारण बताओ नोटिस (Show cause notice) जारी किया गया है.  उसके बाद आयुक्त विक्रम कुमार ने बताया कि इस घटना के संबंध में खुलासा कर उनके खिलाफ आगे की कार्रवाई की जाएगी.  (Deputy commissioner Madhav Jagtap News)

:  पुराना वीडियो वायरल किया गया

 माधव जगताप का वायरल वीडियो फर्ग्यूसन स्ट्रीट का है और 5 अप्रैल का है.  इस वीडियो में जगताप अपने सिक्युरिटी गार्ड के साथ होटल स्टाफ से बहस करते नजर आ रहे हैं और कुछ देर बाद वे फूड स्टॉल को लात मारकर उड़ा देते हैं.  साथ ही स्टॉल को दो से तीन बार लात मारकर पीछे धकेला गया है।  यह वीडियो 16 मई को वायरल हुआ था और कहा जा रहा है कि जगताप के वायरल न होने के दबाव के कारण यह देर से सामने आया।  वीडियो सामने आने के बाद सांसद सुप्रिया सुले सहित कई राजनीतिक दलों के नेताओं ने जगताप के कृत्य की सोशल मीडिया पर वायरल कर निंदा की.  वे कानूनी कार्रवाई के हकदार हैं।  हालांकि, यह पूछने पर कड़ी कार्रवाई की मांग की जा रही है कि हिंसक होने और इस तरह लात मारने का अधिकार किसने दिया।  (Pune Municipal Corporation Hindi News)
 —/——
PMC Pune Deputy Commissioner Madhav Jagtap Show cause notice issued to Deputy Commissioner Madhav Jagtap| Possibility of action by Municipal Commissioner