Ganesh Utsav | ढोल-ताशाच्या सरावामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करणार! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Ganesh Utsav | ढोल-ताशाच्या सरावामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करणार! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

Ganesh Utsav | गणेशोत्सव (Ganesh Utsav Pune) जवळ येत असताना पुणे शहरात पारंपरिक ढोल-ताशा पथकांचे (Dhol Tasha Groups) सराव सर्वच ठिकाणी सुरू झाले आहेत. अनेक ठिकाणी सरावाला परवानगी मिळत नसल्याने, संयोजकांना आणि वादकांना अडचणी येत आहेत. त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करु, तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी (Ganesh Immersion Rally) घालण्यात येणाऱ्या बंधनांसंदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी आज दिली. (Ganesh Utsav)
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नमुवि येथील ढोल ताशा पथक महासंघाच्या सरावाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, ढोल ताशा महासंघाचे प्रमुख पराग ठाकूर यांच्यासह ढोल ताशा महासंघाचे पदाधिकारी आणि वादक उपस्थित होते. (Pune News)
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, गणेशोत्सव काळात ढोल ताशा पथकासारख्या पारंपरिक वाद्यांना सर्वांचीच पसंती असते. अनेक वादक यासाठी अनेक महिने सराव करत असतात. त्यामुळे त्यांच्या सरावामध्ये येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करु, अशी ग्वाही दिली. तसेच, लक्ष्मी रोड प्रमाणेच कुमठेकर रोड आणि टिळक रोड येथे देखील परवानगी मिळावी यासाठी पोलीस आयुक्तांशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेऊ असे यावेळी आश्वस्त केले. (Ganesh Utsav News)
ते पुढे म्हणाले की, कोथरुड हे पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीचे माहेरघर आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव काळात लोकसहभागातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प केला आहे. त्यात ढोल ताशा पथकांनाही प्राधान्य देणार असून, महासंघाने यासाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महासंघाचे प्रमुख पराग ठाकूर यांनी कर्वेनगर डीपी रोड येथे सरावाला परवानगी मिळावी, तसेच विसर्जन मिरवणुकीवेळी रात्री १२ नंतर पारंपरिक वाद्यांना लक्ष्मी रोड प्रमाणेच कुमठेकर रोड आणि टिळक रोड येथे परवानगी मिळावी अशी मागणी केली होती.
—–
News Title | Ganesh Utsav | Will eliminate the difficulties in the practice of drumming! | Guardian Minister Chandrakantada Patil’s testimony

Dhol Tasha | MP Girish Bapat | Anurag Thakur | खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली ‘ही’ मागणी

Categories
Breaking News Political Sport देश/विदेश पुणे महाराष्ट्र

ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्या

| खासदार गिरीश बापट यांची केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडे मागणी

पुणे  : ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्यावी अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री  अनुराग ठाकूर हे काल पुणे दौऱ्यावर आले असता त्यांना केली.

यावेळी खासदार बापट यांनी सांगितले महाराष्ट्र राज्यामध्ये ढोल-ताशा या खेळाला आगळे महत्त्व आहे. जसा पंजाबचा भांगडा, गुजरातचा गरबा, तसा महाराष्ट्राचा ढोल-ताशा कोणताही उत्सव असो वा देवकार्य, मंगलकार्य वा मिरवणूक त्यासमोर ढोल-ताशांचे वादन हे अपरिहार्यच अगदी कुस्तीच्या मैदानात देखील पैलवान मंडळींमध्ये जोश निर्माण करण्यासाठी हलगीचे वादन केले जाते. पुरातन काळापासून ढोल-ताशा हे रणवाद्य तसेच मंगलवाद्य म्हणून अनेक ठिकाणी त्याचे वादन केले जाते. सैन्यांमध्ये जोश आणि उत्साह निर्माण करण्याची ताकद या वाद्यांमध्ये आहे. तसेच स्थानिक उत्सवामध्ये देवादिकांच्या मिरवणुकांमध्ये मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी ढोल-ताशाचे वादन केले जाते. ढोल-ताशा या वाद्यांना पुरातन संदर्भ आहेत. ढोल, ताशा, शिंग, दुंदुभी वाद्य ऐतिहासिक कालापासून वापरात आहेत. याचा शोध घ्यायचा झाल्यास नेमका निर्मितीचा काळ निश्चित करता येत नाही.
आपल्या सर्व देवादिकांच्या हातामध्ये शस्त्रा बरोबर वाद्यांचा देखील समावेश आहे. सरस्वतीची विना, कृष्णाचा शंख, आणि बासरी, शंकराचा डमरू अशी उदाहरणे आपल्या समोर आहेत. ढोल-ताशा ही लोकवाद्य या प्रकारात मोडतात. महाराष्ट्रात घराघरात मंगलकार्य असेल तर तसा पुरणा-वरणाचा नैवद्य दाखवला जातो. तव्दत मंगल कार्यासाठी ढोल-ताशांचे वादन केले जाते. संपूर्ण महाराष्ट्रात ढोल-ताशांची माहिती असे नाही, तर आता गुजरात, गोवा, सेलवासा, आंध्र प्रदेश अशा राज्यातून देखील ढोल ताशा खेळाचा प्रकार आणि प्रसार होतो आहे. आपल्या देशाचे कर्तुत्ववान पंतप्रधान माननीय नरेंद्र जी मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले असता, त्यांचे स्वागत देखील ढोल-ताशा खेळाने झाले आणि माननीय पंतप्रधानांनी स्वतः ढोल वादनाचा आनंद घेतला.

2019 साली अमेरिकेमध्ये डल्लास येथे BMM Convocation ढोल ताशा खेळांची स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये सुमारे ६ संघातील १०० वादकांनी सहभाग घेतला होता. त्याचे परीक्षण पुण्यातून ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रातर्फे करण्यात आले होते. आता या ढोल ताशा खेळाची व्याप्ती केवळ भारतापुरती मर्यादित राहिली नसून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या ठिकाणी देखील लोकप्रिय होत आहे. पुण्यनगरीत सुमारे २०० ढोल-ताशांचे संघ असून सुमारे 25००० वादक आपली वादन कला याद्वारे लोकांपुढे सादर करतात. नाशिक, मुंबई, ठाणे, अमरावती, नागपूर, कोल्हापूर येथील ढोल-ताशा खेळ विशेष प्रसिद्ध आहे.

ढोल-ताशां खेळाला अद्यापि खेळ म्हणून राज मान्यता मिळाली नाही ही सर्व वादकांची खंत आहे. हे संपूर्ण चराचरात मंगलमांगल्य निर्माण करण्याचे काम ही ढोल-ताशा खेळाची वादक मंडळी आपल्या वादनातून करत असतात. अनेक समारंभात जाण निर्माण करण्याची ताकद या खेळा आहे. ढोल-ताशा वादनासाठी झांजा, ध्वज, लेझीम वाचविण्यासाठी प्रचंड ताकदीची उत्साहाची आणि एनर्जीची आवश्यकता असते. ७ ते ८ तास न थांबता, न थकता आणि घामाने वादन करणे हे कुठल्याही खेळाशी म्हणजेच क्रिकेट, फुटबॉल, हॉकी खेळातील दमणुकीशी साधणारे आहे. याव्यतिरिक्त अबालवृद्धांना या ढोल-ताशा वादनाने मिळणारा आनंद अवर्णनीय आहे. काही मंडळी वादनाचा आनंद घेतात, काही मंडळी या तालावर थिरकण्याचा, नाचण्याचा आनंद घेतात, तर उर्वरित मंडळी यातून निर्माण होणाऱ्या कर्णमधुर लोकसंगीताचा आनंद घेतात. यामुळे महाराष्ट्रातील लोकप्रिय अशा लोक संगीताशी संबंधित ढोल-ताशा या खेळास खेळ म्हणून सरकार दरबारी मान्यता मिळावी, अशी विनंती खासदार बापट यांनी केली.