Tag: Divisional Commissioner
PMC Pune new Villages | समाविष्ट 34 गावांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे राज्य सरकारचे आदेश
| विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश
समाविष्ट ३४ गावांना न्याय देण्यासाठी या समितीची स्थापना होणे आवश्यक आहे. त्यानुसार आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करत होतो. त्यानुसार आमच्या मागणीला यश आले आहे. विभागीय आयुक्तांनी लवकरात लवकर समितीची स्थापना करावी.
समाविष्ट गावांमध्ये मुलभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे. त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार सरकारने समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. आता विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होणार आहे. मात्र सद्यस्थितीत आमदार यांच्याशिवाय कुणी लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळे या समितीत स्थानिक आमदार यांनाच प्राधान्य देणे गरजेचे आहे. तशी आमची मागणी आहे.
Palkhi Sohala 2023 Update| पालखी सोहळ्यात केंद्र सरकारच्या ९ वर्षांच्या कामाची माहिती
| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते भारत सरकारच्या बहुमाध्यम वाहन प्रदर्शनाचे उद्घाटन
Palkhi Sohala 2023 Update |संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) निमित्ताने केंद्र सरकाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत (Information and Broadcasting Ministry) पुणे येथील केंद्रीय संचार ब्युरो प्रादेशिक कार्यालयच्यावतीने केंद्र सरकाचे ९ वर्षातील कार्य व प्रमुख योजनांची माहिती (9 years work of Central Government) देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या फिरत्या बहुमाध्यम वाहन प्रदर्शनाचे (Government of India’s multimedia vehicle exhibition) उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांच्या हस्ते करण्यात आला. (Palkhi Sohala 2023 Update)
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव (Divisional Commissioner Saurabh Rao) , केंद्रीय संचार ब्युरोचे उपसंचालक निखिल देशमुख, विभागीय उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल आदी उपस्थित होते. (Palkhi Sohala 2023)
यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, योजनांचा प्रत्यक्ष लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. माहिती अभावी नागरिक चांगल्या योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या ९ वर्षाच्या कालावधीत केंद्र सरकारने अनेक चांगल्या योजना सुरू केल्या आहेत. मातृवंदना योजना, आयुष्यमान भारत योजना यासह शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णयदेखील घेण्यात आले. याची माहिती नागरिकांना देण्यासाठी केंद्रीय संचार ब्युरोने चित्ररथ तयार केला असून हा स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. वारीत येणाऱ्या लाखो भाविकांना चित्ररथाच्या माध्यातून देण्यात येणाऱ्या माहितीचा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (9 years work of Central Government)
प्रास्ताविकात श्री.देशमुख यांनी चित्ररथाद्वारे केंद्र सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे सांगितले.
आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण देशाभरातून येणारे वारकरी व भक्तांसाठी केंद्र सरकारच्या विविध विकासात्मक उपक्रमांची माहिती बहुमाध्यम प्रदर्शच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच सांस्कृतिक कलापथकांद्वारे मनोरंजन व अभंगाच्या माध्यमातून उद्बोधन व प्रबोधन करण्यात येणार आहे. बहुमाध्यम वाहन प्रदर्शनात एलइडी स्क्रीन लावण्यात आली असून या स्क्रीनद्वारे केद्र सरकारचा ९ वर्षातील कार्यकाळात विकासात्मक व जनतेच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या प्रमुख योजनांची माहिती देण्यात येणार आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी भक्तीपर चित्रपटदेखील दाखविण्यात येणार आहेत. (9 years work of Central Government)
News Title | Palkhi Sohala 2023 Update| Information about 9 years work of Central Government in Palkhi ceremony | Guardian Minister Chandrakantada Patil inaugurated the Government of India Multimedia Vehicle Exhibition
G20 Summit in Pune | Sinhagad Fort | Foreign guests of the G 20 conference will visit Sinhagad Fort!
| Divisional Commissioner’s order to beautify Sinhagad road
G 20 summit in pune | Sinhagad Fort | G 20 परिषदेतील परदेशी पाहुणे करणार सिंहगडाची सफर!
| सिंहगड रस्त्याचे सुशोभीकरण करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश
G 20 summit in pune | Sinhagad Fort | (Author: Ganesh Mule) | पुण्यात जून महिन्यात G- २० परिषद (G 20 Summit in Pune) होणार आहे. या परिषदेसाठी निमंत्रित परदेशी पाहुण्याना महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी (Maharashtrian Culture) अवगत करायचे आहे. त्यानुसार पुण्यापासून जवळच असलेल्या सिंहगड किल्ल्याची (Sinhagad Fort) सफर या पाहुण्यांना घडवून आणली जाणार आहे. त्यानुसार या पर्यटन भेटीकरिता पुणे ते सिंहगड रस्त्याची डागडुजी, दुरुस्ती, व सुशोभिकरण (Sinhagad Road Maintenance and beautification) करुन घेण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी (Divisional Commissioner) पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) , जिल्हा परिषद (Pune Zilla parishad) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला(PWD) दिले आहेत. (G 20 summit in pune | Sinhgadh Fort)
G-20 Summit Pune | जी-२० परीषदेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न
G-20 Summit Pune | पुणे येथे जूनमध्ये होणाऱ्या जी-२० प्रतिनिधींच्या (G 20 Summit) बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव (Divisional Commissioner Saurav Rao) यांच्या अध्यक्षतेखाली व भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे उपसचिव अनुपम अनिश चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे बैठक घेण्यात आली. (G – 20 summit 2023 pune)
बैठकीस पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner vikram kumar), राज्याचे क्रीडा आयुक्त सुहास दिवसे (sport commissioner suhas Diwase), विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त ए. राजा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (ZP CEO Ayush prasad), पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (PMC additional commissioner vikas Dhakane), वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे वैज्ञानिक संजय कौल, लवजीत सिंग, राष्ट्रीय ई-गव्हर्नन्सचे (एनजीईडी) मुख्य कार्यकारी अधिकारी जगमोहन कथैत, अनुज कौशल आदी उपस्थित होते.
जी-२० राष्ट्रसमुहाच्या परिषदेचे आयोजन भारतासह तीन देशात करण्यात आले आहे. यापूर्वी पुणे शहरात जानेवारीमध्ये जी-२० ‘इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप’ची बैठक यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली होती. आता जूनमध्ये तिसरी ‘डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप’ बैठक आणि चौथी ‘एज्युकेशन वर्किंग ग्रुप’ बैठक अशा दोन बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. (Pune Municipal corporation)
यावेळी विभागीय आयुक्त श्री. राव यांनी सांगितले, जी-२० च्या जानेवारीमधील यशस्वी आयोजनाचा अनुभव लक्षात घेत सर्व आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी कमीत कमी कालावधीत शहर सौंदर्यीकरणावर लक्ष केंद्रित करुन चांगले काम केले होते. पोलीस विभागाने सुरक्षिततेच्यादृष्टीने सर्व काळजी घेतली. भारताचे, महाराष्ट्राचे आणि पुण्याचे डिजिटल क्रांतीतील सामर्थ्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा, वैविध्य जगासमोर आणण्यासाठी चांगल्या पद्धतीने तयारी करण्यात येत आहे, असेही श्री. राव यांनी सांगितले. (G 20 summit in pune)
यावेळी पुणे महानगरपालिकेने गतवेळच्या आयोजनाप्रसंगी राबविलेले उपक्रम, शहर सौंदर्यीकरण आदींविषयी चित्रफीत दाखविण्यात आली. सायकल फेरी (सायक्लॉथॉन), वॉकॅथॉन, स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग, शिक्षण संस्थांमध्ये जी-२० बाबत विद्यार्थ्यांसाठी माहिती सत्रांचे आयोजन, चौक सुशोभिकरण, प्रकाशमान करणे मुख्य मार्गांलगतच्या भिंतींवर आकर्षक, रंगकाम आदी उपक्रम कमीत कमी कालावधीत चांगल्याप्रकारे राबवण्यात आल्याचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांनी सांगितले. आगामी बैठकीसाठीही सर्व तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
क्रीडा आयुक्त श्री. दिवसे यांनी शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील पायाभूत सुविधांची माहिती दिली. बैठकीत महाराष्ट्र पर्यटन विभागाने तयार केलेल्या चित्रफीत दाखविण्यात आल्या.
पुण्यातील ऐतिहासिक महत्त्वाची वारसा ठिकाणे, शैक्षणिक ठिकाणे, माहिती तंत्रज्ञान संबंधीत तसेच इतर उद्योग, पायाभूत सुविधा आदी ठिकाणी परिषदेतील प्रतिनिधींच्या भेटींचे नियोजन येईल. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सौंदर्यीकरणाचे काम गतीने सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बैठकीस विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त वर्षा उंटवाल लढ्ढा यांच्यासह पर्यटन विभाग, उद्योग विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, आरोग्य, महसूल विभाग आदींचे अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेच्या बदली प्रक्रियेत सरकारने हस्तक्षेप करावा
| पुणे काँग्रेस ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
या आहेत मागण्या
गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तात्काळ ‘या’ उपाययोजना करा
: विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे महापालिकेला आदेश
पुणे : विद्यापीठ चौकातील प्रस्तावित दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करतेवेळी गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या विकास आराखड्याप्रमाणे हे रुंदीकरण करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक जागा ताब्यात घेण्यावरून मात्र संभ्रम कायम आहे. दरम्यान याबाबत आता विभागीय आयुक्तांनी महापालिकेला आदेश दिले आहेत. त्यानुसार विद्यापीठ चौकामध्ये प्रस्तावित असलेल्या मेट्रो सह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करतेवेळी विद्यापीठ चौक व गणेशखिंड रस्त्यावरील अस्तित्वातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पुणे महानगरपालिके मार्फत उपाय योजनांची तत्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. असे आदेशात म्हटले आहे.
: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रुंदीकरण आवश्यक
: या कराव्या लागणार उपाययोजना
१) विद्यापीठ चौक ते सेनापती बापट चौक या साधारणतः २५० मी लांब रस्त्याचे डाव्या बाजूचे पुणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्या नुसार रुंदीकरणकरणेसाठी जमीन भूसंपादित / हस्तांतर करून घेणे, अस्तित्वातील सेवा वाहिन्यांचे स्थलांतर करणे व आवश्यकत्या परवानग्या घेऊन सदर रस्त्याचे बांधकाम मेट्रो सवलतकार कंपनी यांच्यामार्फत करणेसाठी जागा उपलब्ध करून देणे.
२) सदर आराखड्यामधील पर्यायी रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यासाठी संबंधित संस्था किंवा विभाग यांच्याशी समन्वय साधणे व रस्ते खुले करणेची कार्यवाही करणे,
३) मंजूर करण्यात आलेल्या Traffic Diversion Plan प्रमाणे दोन वर्तुळाकार महामार्गावर वळण भागामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा (Chamfering)करणे व अतिक्रमणे काढून घेणे.
४) सेनापती बापट चोकातीलJ. W.Marriott Hotel समोरील दुभाजक काढून टाकण्यासाठी परवानगी देणे.
५) सेनापती बापट चौकामध्ये धोत्रे पथ वरून वाहने उजव्या बाजूस वळण्यासाठी J. W. Marriott Hotel समोरील Junction भागात रस्त्याचे फुटपाथ कमी रुंदीकरण करणे तसेच या भागातले आकाश चिन्हे फलक (Display / advertising board)हटवावेत.
६) संगन्ना धोत्रे पथ व अभिमानश्री रस्ता या दोन रस्त्यावर No Parking Zoneकरावा.
७) अभिमानश्री रस्त्यावर विद्यापीठ चौक व पाषाण कडून येणारी वाहने अस्तित्वातील रस्त्याच्या दुभाजका मधून विलीन (Merging) होण्यासाठी अस्तित्वातील Divider cut ची लांबी वाढविणे.
८) रस्ता रुंदीकरणास व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे विद्युत खांब, CCTV खांब व दिशा दर्शक फलक काढून घ्यावेत.
या उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठीची कार्यवाही तत्काळ पुणे महानगरपालिके मार्फत हाती घेण्यात यावी. असे आदेशात म्हटले आहे.