Pune Congress | डॉक्टरांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार : मनपा आयुक्त्त विक्रमकुमार

Categories
Breaking News PMC Political social आरोग्य पुणे

डॉक्टरांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार : मनपा आयुक्त्त विक्रमकुमार

पुणे शहर काँग्रेस कमिटी आणि पुणे शहर डॉक्टर सेल तर्फे मागील आठवड्यात डॉक्टरांचा  मेळावा घेण्यात आला. त्यात काही प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. त्या अनुषन्गाने शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष  अरविंद शिंदे आणि डॉक्टर सेल  अध्यक्ष डॉ संभाजी करांडे यांच्या पुढाकारातून पुणे मनपा आयुक्त आणि डॉक्टर सेल  पदाधिकारी यांच्यात मीटिंग पार पडली.

यामध्ये प्रामुख्याने नव्याने समाविष्ट 23गावातील नवीन हॉस्पिटल रजिस्ट्रेशन त्यातील अडचणी ,परवाना नूतनीकरण आकारण्यात येणाऱ्या अवास्तव चार्जेस ,छोट्या क्लिनिक बायोमेडिकल वेस्ट संकलनात येणाऱ्या अडचणी  याची संख्या 10000च्या घरात असताना त्याच्या संकलनात सुसूत्रता नाही .अश्या अनेक अडचणींना रोज सामोरं जावं लागत आहे म्हणून डॉक्टर सेल माध्यमातून डॉक्टरांना येणाऱ्या अडचणी त्यावर तातडीने बांधकाम खात्यातील अधिकारी ,पास्को अधिकारी यांचेबरोबर मीटिंग घेऊन तात्काळ उपाययोजना योजून मार्ग काढू. अशी ग्वाही पुणे मनपा आयुक्त  विक्रमकुमार यांनी आज डॉक्टर सेल शिष्टमंडळ याना दिली.

याप्रसंगी शहराध्यक्ष मा अरविंद शिंदे मा रमेशदादा बागवे नगरसेवक अविनाश बागवे डॉक्टर सेल अध्यक्ष डॉ संभाजी कारंडे, मा .अध्यक्ष डॉ रवींद्रकुमार काटकर ,सेक्रेटरी डॉ अनिकेत गायकवाड उपाध्यक्ष डॉ अण्णासाहेब गरड डॉ भरत कदम डॉ ऋषिकेश नाईक इ  डॉक्टर सेल पदाधिकारी उपस्थित होते.

Walk For Health | वॉकेथॉन’मध्ये ५०० डॉक्टरांचा सहभाग

Categories
Breaking News आरोग्य पुणे महाराष्ट्र

वॉकेथॉन’मध्ये ५०० डॉक्टरांचा सहभाग

बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे आजार टाळण्यासाठी नियमित चालण्याचा व्यायाम करा असे आवाहन डॉ. शशांक शहा यांनी दिला.

डॉक्टर दिनानिमित्त शहर भाजपच्या वैद्यकीय आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वॉक फॉर हेल्थ’ या वॉकेथॉनचा शुभारंभ करताना डॉ. शहा बोलत होते. वॉकेथॉनमध्ये ५०० हून अधिक डॉक्टरांनी सहभाग घेतला.

भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार शरद ढमाले, डॉ. शशांक शहा, डॉ. संदीप बुटाला, डॉ. धनंजय जोशी, डॉ. प्रदीप सेठीया, डॉ. उज्ज्वला हाके, डॉ. शुभदा कामत, डॉ. मनिषा जाधव, डॉ. सुनील चव्हाण, डॉ. रोशन जैन, दिलीप वेडे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. शहा पुढे म्हणाले, मधुमेह, लठ्ठपणा अशा आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या आजारांमुळे ८० टक्के इतर आजार होण्याची भिती असते. त्यासाठी चालण्या सारखा व्यायाम महत्त्वाचा आहे.

मुळीक म्हणाले, नियमित व्यायाम करण्याचा संदेश देण्यासाठी डॉक्टरांचा सहभाग असणारा हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे मत मुळीक यांनी व्यक्त केले. डॉक्टरांनी रुग्णांना सेवा देताना, स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Prithviraj Sutar : PMC: महानगरपालिकेत अत्यावश्यक सेवेसाठी कायमस्वरूपी M.B.B.S डॉक्टरची व ॲम्बुलन्सची व्यवस्था करा

Categories
PMC Political पुणे

 महानगरपालिकेत अत्यावश्यक सेवेसाठी कायमस्वरूपी M.B.B.S डॉक्टरची व ॲम्बुलन्सची व्यवस्था करा

: शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांची मागणी

पुणे : पुणे महानगरपालिका आवारात आरोग्य विषयक कोणती घटना घडल्यास तातडीने आरोग्य विषयक सेवा देणारी व्यवस्था नाही. मागील एक वर्षात नगरसेवक, पालिकेचे कर्मचारी, येणारे नागरिक यांच्याबाबत अशा काही घटना घडल्या आहेत की त्यांना प्रशासन आरोग्य विषयक कोणत्याही तातडीच्या सुविधा पुरवू शकले नाही व हे निश्चितच संतापजनक आहे, त्यामुळे महानगरपालिकेमध्ये तातडीने कायमस्वरूपी M.B.B.S डॉक्टरची व ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी शिवसेना गटनेते नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे. 

 महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आलेल्या निवेदनात सुतार यांनी म्हंटले आहे की, महानगरपालिकेमध्ये रोज हजारो नागरिक, लोकप्रतिनिधी येत असतात. हजारोंच्या संख्येने या ठिकाणी कर्मचारी काम करीत आहेत. त्यांना जर आरोग्याशी निगडीत कोणतीही अपत्कालीन मदत लागली तर ती देण्याची व्यवस्था महापालिकेत नाही.

पालिकेत  स्ट्रेचरची व्यवस्था नसल्यामुळे कोणती घटना घडल्यास रुग्ण व्यक्तीला झोळीमध्ये घेऊन जावे लागते. तसेच ॲम्बुलन्स नसल्यामुळे कोणाच्यातरी गाडीची वाट पहावी लागते आणि डॉक्टर कायमस्वरुपी नसल्यामुळे त्यांना डॉक्टर शोधण्यास धावाधाव करावी लागते. यामुळे सदरच्या रुग्णाच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. आरोग्य विषयक तातडीने सेवा देण्याची व्यवस्था महापालिकेत नसणे हे खेदजनक आहे.

तरी आमची शिवसेना पक्षाच्या वतीने मागणी आहे की आपण त्वरीत एक महिला व पुरुष डॉक्टर यांची नेमणूक करावी.त्याचबरोबर एक ॲम्बुलन्स पालिकेच्या आवारात तैनात करावी व एक बेसिक उपचारासाठी OPD ची व्यवस्था करावी. या मागणीची त्वरीत अंमलबजावणी करावी नाहीतर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा पृथ्वीराज सुतार यांनी दिला आहे.