PMC Health Officer | आरोग्य प्रमुखांचा अतिरिक्त पदभार डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे!

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

PMC Health Officer | आरोग्य प्रमुखांचा अतिरिक्त पदभार डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे!

PMC Health Officer | पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ भगवान पवार (Dr Bhagwan Pawar) यांची राज्य सरकारकडून बदली करण्यात आली आहे. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त पदभार उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत (Dr Kalpana Baliwant) यांच्याकडे देण्यात आला आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. (PMC Health Department)
डॉ भगवान पवार यांच्याकडे सहायक संचालक, आरोग्य सेवा (अंधत्व नियंत्रण कार्यक्रम), मुंबई हा पदभार देण्यात आला आहे. पवार यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. दरम्यान यामुळे पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख (PMC Health Officer) पद पुन्हा एकदा रिक्त झाले आहे. आता तरी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला पूर्ण वेळ आरोग्य प्रमुख होण्याची संधी दिली जाणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. सध्या तरी या पदाचा अतिरिक्त पदभार उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत देण्यात आला आहे. (PMC Health Department)
—-
News Title | PMC Health Officer | Dr. Kalpana Balivant has the additional charge of health chief!

Additional Charge | आरोग्य अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

आरोग्य अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे

पुणे | महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ आशिष भारती यांची राज्य सरकारकडून बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य अधिकारी तथा आरोग्य विभाग प्रमुखाचे पद रिक्त झाले आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे देण्यात आला आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
डॉ आशिष भारती यांचा महापालिकेतील कार्यकाळ संपुष्टात आल्याने राज्य सरकारकडून त्यांची बदली करण्यात आली आहे. उपसंचालक, आरोग्य सेवा या पदावर त्यांची बदली केली आहे. दरम्यान डॉ भारती यांच्या बादलीने महापालिकेचे आरोग्य अधिकारी हे पद रिक्त झाले आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे देण्यात आला आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्याकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Health Officer | डॉ कल्पना बळिवंत यांची उप आरोग्य अधिकारी पदी वर्णी! |आगामी काळात महापालिकेचाच होऊ शकतो आरोग्य प्रमुख

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

डॉ कल्पना बळिवंत यांची उप आरोग्य अधिकारी पदी वर्णी!

|आगामी काळात महापालिकेचाच होऊ शकतो आरोग्य प्रमुख

पुणे | महापालिकेच्या आरोग्य विभागात सहायक आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या डॉ कल्पना बळिवंत यांची पदोन्नती द्वारे उप आरोग्य अधिकारी (वर्ग 1) या पदावर वर्णी लागली आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान सेवाजेष्ठतेच्या नियमानुसार आगामी काळात डॉ बळिवंत यांच्या रूपाने महापालिकेला महापालिकेचाच अधिकारी आरोग्य प्रमुख म्हणून मिळू शकतो. महापालिकेचा कुठलाही अधिकारी आरोग्य प्रमुख या पदासाठी पात्र ठरत नसल्याने राज्य सरकारचा अधिकारी प्रतिनियुक्ती द्वारे नियुक्त करावा लागत होता. मात्र आता महापालिकेला आता प्रतिनियुक्ती ची आवश्यकता भासणार नाही. अशी चर्चा केली जात आहे.
पुणे सारख्या महापालिकेला महापालिकेचाच अधिकारी आरोग्य प्रमुख असावा, अशी शहरातून मागणी होत होती. कारण इथला माणूस शहराची आरोग्य व्यवस्था चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो. त्यामुळे नगरसेवक देखील अशी मागणी करत होते. मात्र महापालिकेचे अधिकारी या पदासाठी पात्र ठरत नव्हते. त्यामुळे अधिकारी मिळू शकत नव्हता. यामुळे महापालिकेला सरकारचा अधिकारी प्रति नियुक्ती वर नेमावा लागत आहे. डॉ एस टी परदेशी निवृत्त झाल्यानंतर महापालिकेचा अधिकारी उप आरोग्य प्रमुख देखील होऊ शकला नव्हता. याला अधिकाऱ्यांमधील कुरघोडी कारणीभूत होती. सगळे अधिकारी हे सहायक आरोग्य प्रमुखच होते. मात्र आता पदोन्नती नुसार सहायक आरोग्य अधिकारी असणाऱ्या डॉ कल्पना बळिवंत यांना उप आरोग्य अधिकारी या पदावर वर्णी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले आहेत.
दरम्यान यामुळे मात्र आगामी काळात महापालिकेचा अधिकारी हा आरोग्य प्रमुख होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सेवाज्येष्ठेतेच्या नियमानुसार डॉ बळिवंत त्यासाठी पात्र होत आहेत. कारण आरोग्य अधिकारी तथा आरोग्य प्रमुख हा तीन पद्धतीने नियुक्त केला जातो. निवड पद्धतीने, प्रतिनियुक्तीने आणि पदोन्नतीने, अशा या तीन पद्धती आहेत. पदोन्नती साठी एमडी पीसीएम ही शैक्षणिक पात्रता आणि 3 वर्ष वर्ग 1 या पदावर काम करणे आवश्यक आहे. डॉ बळिवंत या यासाठी पात्र होत आहेत. दरम्यान आरोग्य अधिकारी नियुक्त करणे हे सर्वस्वी महापालिका आयुक्त आणि सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयावर अवलंबून असेल.