Nagar Road BRT | नगररोड येथील बीआरटी मार्ग काढल्याने कोट्यवधी रुपये पाण्यात! | डॉ सिद्धार्थ धेंडे यांचा आरोप

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Nagar Road BRT | नगररोड येथील बीआरटी मार्ग काढल्याने कोट्यवधी रुपये पाण्यात!

| डॉ सिद्धार्थ धेंडे यांचा आरोप

Nagar Road BRT | सर्वसामान्य लोकांची जीवनदायनी बीआरटी काढणाऱ्या राज्य शासन, महापालिका,  पीएमपीएल प्रशासनाला डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर (Dr Siddharth Dhende) यांनी खुले पत्र लिहिले आहे. धेंडे यांनी म्हटले आहे कि, सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या प्रवासाची जीवनदायी असलेला नगररोड येथील बीआरटी मार्ग काढून नागरिकांच्या खिशातून खर्च झालेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. (Nagar Road BRT)
धेंडे यांनी म्हटले आहे कि, बीआरटी हा प्रकल्प केवळ पुणे महापालिकेचा (Pune Municipal Corporation) नाही. आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रकल्प आणला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने निधीची तरतूद केली आहे. महापालिकेने राज्य सरकारसोबत करार केलेला होता. त्यामध्ये अटी शर्ती होत्या. शहरीकरनात वाढ होत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे काळाची गरज असल्याचे जगाने मान्य केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मेट्रो आणि बीआरटी मार्गासारखे प्रकल्प राबविले जातात. पुणे महापालिकेची भौगोलिक परिस्थिती आणि रस्त्याचे जाळे पाहता केवळ मेट्रो प्रकल्प राबवून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही. तर पीएमपीएल सक्षम करणे गरजेचे होते. त्यामुळे बीआरटी प्रकल्प राबवले गेले. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील काही भागात अतिशय सक्षमपणे बीआरटी मार्ग चालू आहे. पीएमपीएलचा वापर विद्यार्थी, वयोवृद्ध, दिव्यांग बांधव, कष्टकरी कामगार आदीसह सर्वसामान्य नागरिक करत असतात. नगररोड दरम्यान बीआरटी मार्गातून दर तासा ४ हजार ५०० प्रवासी प्रवास करत असल्याची नोंद आहे. एका दिशेला २ हजार ५०० प्रवासी दर तासाला प्रवास करतात. तर ४० बस दर तासा या मार्गाने धावत आहेत. दिवसाकाठी एक लाख प्रवासी संख्या होत असल्याची नोंद पीएमपीएमएल प्रशासनाकडे नोंद आहे. गेल्या चार वर्षात ही संख्या आणखीनच दुप्पट झाली आहे. प्रवाशी वाढल्याने पीएमपीएमएल प्रशासनाच्या तिजोरीतच भर पडत होती.
डॉ धेंडे पुढे म्हणाले, सार्वजनिक वाहतुकीसाठी शहरात स्वतंत्र व्यवस्था असावी, असे सर्वोच्च न्यायालयाने देखील नमूद केले आहे. त्यामुळे शहरातील बीआरटी हटवण्याचा आग्रह लोकप्रतिनिधी, शासनाने का केला ?  सर्वसामान्य लोकांच्या हिताचा विचार कोणालाच नाही का ?  येरवडा नगररोड दरम्यान काही भागात बीआरटी प्रकल्प राबवताना मेट्रोच्या पिलरला अडथळा येत असल्यामुळे तेवढेच बीआरटी मार्ग काढले जातील, असे महापालिका प्रशासन सांगत होते. दरम्यानच्या बीआरटीचे उद्घाटन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विकासात्मक दृष्टिकोणाला छेद देण्याचे काम पुन्हा झाले आहे. मध्यंतरी पीएमपीएल प्रशासनाने 300 इलेक्ट्रिक बस खरेदी केल्या आहेत. चार्जिंग स्टेशन अभावी त्या सध्या बंद आहेत. आणखीन 600  नवीन इलेक्ट्रिक बस प्रशासनाकडे दाखल होणार आहेत. जर बीआरटी  मार्गच काढायचे होते तर येवढ्या बसेसची खरेदी कशाला केली जात आहे ?
नागरिकांनी महापालिकेकडे कर भरले. त्यांच्या खिशातून बीआरटी मार्ग उभारले. त्यावर नागरिकांचा हक्क आहे. महापालिका प्रशासनाने सुयोग्य नियोजन करून हे मार्ग उभारणे गरजेचे होते. भविष्यातील अडचणींचा आधीच विचार करायला हवा होता. बीआरटीचे चुकीचे नियोजन हे महापालिकेचे काम आहे.
महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे अनेक वेळा या मार्गात अपघात झालेत. त्यासाठी बीआरटी मार्ग जबाबदार कसा ? ती सर्वस्वी महापालिकेची जबाबदारी आहे. अपघाताचे कारण देत बीआरटी मार्ग काढले जात असतील तर इतर ठिकाणी अपघात होतच नाहीत का ? बीआरटी बंद करून नागरिकांनी स्वतः वाहने घ्यावित का ? तसे झाले तर शहरात आणखीन वाहनांची भर पडून वाहतुकीच्या मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. याचा विचार कोण करणार ? बीआरटी मार्ग काढायचा होताच तर कोट्यवधी रुपये खर्च का केले ?  या पैशांची भरपाई कोण देणार ? या पैशांचा हिशोब बीआरटी मधून प्रवास करणारा सर्वसामान्य पुणेकर मागतोय. बीआरटी काढणाऱ्यांनी याचा जवाब द्यावा. भाजपाचे राज्य असलेल्या गुजरात मधील अहमदाबाद येथे बीआरटी मार्ग सक्षमपणे चालविला जातो. पालकमंत्री अजित पवार यांच्या शहरातील काही भागात हा प्रकल्प चालविला जातो. मात्र पुण्यातील नगररोड येथील बीआरटी मार्ग का हटवला जात आहे ? या मुळे रोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान, कामगारांची, महिला वर्गाची गैरसोय याला जबाबदार कोण ? याचे उत्तर मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांनी द्यावे. असे ही धेंडे म्हणाले.
—–

Stamp Duty | म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार

Categories
Breaking News PMC Political पुणे

Stamp Duty | म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार

| भाजपचे माजी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आणि माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

Stamp Duty | महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) वसाहतींच्या पुनर्वसनासाठी ज्या वर्षी सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडी रेकनर (Ready Reckoner) नुसार स्टॅम्प ड्युटी (Stamp Duty) आकरावी आणि आतापर्यंतचा दंड माफ करावा या मागणीला आज राज्य मंत्रिमंडळामध्ये मान्यता देण्यात आली.
अशा प्रकारची अभय योजना जाहीर करावी अशी मागणी भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) आणि माझी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांनी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून सरकारने ही मागणी आज मान्य केली. त्यासाठी उभयतांनी जुलै महिन्यात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)  यांची भेट घेतली होती.
या निर्णयाचा पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) क्षेत्रातील विविध वसाहतीत म्हाडाच्या ४० हजारांहून अधिक जुन्या सदनिकाधारकांना फायदा होणार आहे. या सदनिका जीर्ण झाल्या असून मोडकळीस आल्या आहेत. राज्य सरकारने या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी तीन एफएसआय जाहीर केला आहे. पुनर्विकास करताना अधिहस्तांतरण करणे आवश्यक आहे. महसूल विभागाकडून पूर्वी स्टॅम्प ड्युटी आकारली जात नव्हती. त्यावेळी काही रहिवाशांनी सदनिका हस्तांतरित केल्या. आता जुन्या स्टॅम्प ड्युटीसह दंडाची वसूल आकारली जात होती. या वसाहतीतील नागरिकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांना वाढीव स्टॅम्प ड्युटी आणि दंडाची रक्कम भरता येणे शक्य नव्हते. अधी हस्तांतरण झाले नसल्याने वसाहतीचा पुनर्विकास रखडला होता. विशेषता सर्वे क्रमांक 191 येरवडा येथे 22 हेक्टर जागेवर म्हाडाच्या मोठ्या वसाहतीतील सदनिका धारकांना या निर्णयाचा फायदा होईल, आम्ही सरकारचे अभिनंदन करतो, असे मुळीक आणि धेंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Constitution Day of India | संविधान दिनानिमित्त प्रभागात 50 जणांना सायकल वाटप | डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा उपक्रम

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Constitution Day of India | संविधान दिनानिमित्त प्रभागात 50 जणांना सायकल वाटप | डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा उपक्रम

 

| संविधानामुळे देशातील नागरिकांमध्ये एकसंधतेची भावना : डॉ. सिद्धार्थ धेंडे

 

Constitution Day of India | भारत हा विविध जाती-धर्म, संस्कृतीने नटलेला देश आहे. देशातील नागरिकांमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे तत्व रुजविण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr Babasaheb Ambedkar) प्रचंड अभ्यासातून याची निर्मिती केली. त्यामुळेच भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा देश अशी ओळख झाली आहे. संविधानामुळे (Constitution) देशातील नागरिकांमध्ये एकसंधतेची भावना निर्माण करण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहे, असे प्रतिपादन पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांनी केले. (Constitution Day of India)

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन (PMC Pune ward No 2) मध्ये डॉ. धेंडे यांच्या पुढाकारातून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संविधानाच्या प्रास्ताविक प्रतीचे या वेळी सामूहिक वाचन करण्यात आले. या निमित्त प्रभागाती 50 गरजूंना सायकल वाटप करण्यात आले.

या वेळी नामदेव घाडगे, यशवंत शिर्के, डॉनियल मगर, डॉ. सुमेध मेश्राम, दिलीप मस्के, शेखर शेंडे, कविता घाडगे, सरबजीत सिंग, रशिद शेख आदीसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी विष्णु श्रीमंगले यांनी संविधान आणि पर्यावरण या विषयावर उपस्थित लोकांना मार्गदर्शन करत प्रबोधन केले. या उपक्रमादरम्यान बुद्धीका रणदिवे हीचा सत्कार करणयत आला. बुद्धीकाने 70 देशाचे प्रतिनिधीत्त्व करणाणार्‍या वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या थायलंड येथील कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधीत्व करत बाजु मांडल्या बद्दल हा सन्मान करण्यात आला.
———————–

Vishrantwadi-Dhanori road | Dr Siddharth Dhende | विश्रांतवाडी-धानोरी रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Vishrantwadi-Dhanori road | Dr Siddharth Dhende | विश्रांतवाडी-धानोरी रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

| काम सुरू करण्याला पुणे महापालिका आयुक्तांची परवानगी

|  माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

Vishrantwadi-Dhanori road | Dr Siddharth Dhende | विश्रांतवाडी चौकातून धानोरी कडे जाणार्‍या रस्ता रुंदीकरणाचा मार्ग (Vishrantwadi-Dhanori road) अखेर मोकळा झाला आहे. या मार्गावरील बुद्ध विहाराचे इतर ठिकाणी स्थलांतर करून संबंधीत खासगी जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही पुर्ण झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू करण्याला पुणे महापालिका आयुक्तांनी (PMC Pune Commissioner) मंजूरी दिली आहे. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांनी या कामासाठी सकारात्मक तोडगा काढत पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. (Pune Municipal Corporation)

विश्रांतवाडी चौकातून धानोरी कडे जाणारा रस्ता अरुंद होता. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न सातत्याने निर्माण होत असे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण करण्याबाबत महापालिका स्तरावर विचारविनिमय सुरू होता. मात्र या मार्गावर खासगी जागेत असणार्‍या बुद्ध विहाराच्या स्थलांतराचा अडथळा निर्माण झाला होता. सामाजिक भावनांचा आदर करून तसेच महापालिका प्रशासनाच्या विकासात आडकाठी न येता माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी या वर सकारात्मक तोडगा काढला. बुद्ध विहाराचे स्थलांतर करताना पर्यायी जागेची उपलब्धता करावी, असे सुचविले. त्यानुसार बुद्ध विहाराला पर्यायी जागा देण्याचे ठरले आहे. विहार बांधकामाला परवानगी मिळाली आहे. विकसकाकडून लवकरच त्याचे बांधकाम करून देण्यात येणार आहे. (PMC Pune)

सध्या सर्व जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी रस्ता रुंदीकरणाच्या कामाला मंजूरी दिली आहे. लवकरच प्रत्यक्ष या कामाला सुरूवात होणार असून वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.

डॉ. धेंडे यांचा पाठपुरावा –

महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी यापुर्वीच बैठक आयोजित केली होती. या बैठकीस आमदार सुनिल टिंगरे, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी नगरसेवक अशोक कांबळे, मंगेश गोळे, माजी नगरसेवक अनिल टिंगरे, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, मिळकतधारक आगरवाल, बुद्धविहाराचे अध्यक्ष राजीव बेंगाळे आदीसह आदीसह महापालिका अधिकारी उपस्थित होते. यामध्ये काही बाबींवर निर्णय घेण्यात आले. यामध्ये मिळकतधारक राधेशाम आगरवाल यांनी बुद्ध विहाराच्या जागेच्या मोबदल्यात सर्व्हे नंबर 46 मधील वॉटर वर्क्सकरिता आरक्षित जागेतील झोपड्या काढून 2 आर क्षेत्र बुद्धविहारासाठी द्यावे. त्याचे बांधकाम करावे. वॉटर वर्क्स आरक्षित क्षेत्राचा मोबदला आगरवाल यांना टीडीआर स्वरूपात द्यावा. 60 फूट डीपी रस्त्यामधील बुद्ध विहाराची जागा रिकामी झाल्यानंतर उर्वरीत क्षेत्राचा प्रलंबित टीडीआर देण्याची कार्यवाही करावी, आदी विषयावर एकमत झाले.

——–

रस्ता रुंदीकरण करताना सध्याच्या बुद्ध विहाराचे योग्य ठिकाणी स्थलांतर होणे अपेक्षित आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. पर्यायी जागेत बुद्ध विहार स्थलांतर करून त्याचे बांधकामही विकसकाने करून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच बौद्ध बांधवांच्या भावनांचाही आधार केला जाणार आहे.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका
—————

Dr Siddharth Dhende | Nagar Road BRTS | अन्यथा बीआरटीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलन छेडू | डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा इशारा

Categories
Breaking News Political social पुणे

Dr Siddharth Dhende | Nagar Road BRTS | अन्यथा बीआरटीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलन छेडू

| पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा इशारा

– मेट्रोचे काम नसलेल्या ठिकाणी बीआरटी पूर्ण क्षमतेने सुरू करा ; डॉ. धेंडे यांची मागणी

 

Dr Siddharth Dhende | Nagar Road BRTS |वाहतूकीला अडथळा होत असल्याचा चुकीचा संदेश देऊन काही जण बीआरटी मार्ग (BRTS Route) बंद करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्यांचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रकार आहे. गोरगरिब नागरिकांची जीवनदायी असणारा बीआरटी मार्ग बंद करू नये. अन्यथा संविधानिक मार्गाने आंदोलन छेडू, असा इशारा पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांनी दिला आहे. पुणे महापालिकेचे आयुक्‍त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांना दिलेल्या निवेदनात हा इशारा देण्यात आला आहे. (Dr Siddharth Dhende | Nagar Road BRTS)

डॉ. धेंडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पुणे शहरामध्ये 2007 नंतर मोठ्या प्रमाणात आयटी क्षेत्राचा विस्तार झाला आहे. या बरोबरच पुणे शहरात रोजगार उपलब्ध व्हावा याकरीता इतरही क्षेत्र विकसित झाले. त्याचा ताण पुणे शहरातील पायाभूत सुविधांना झालेला आहे. भविष्याचा वेध बघून पुणे शहरामध्ये मेट्रो होण्याअगोदर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होण्यासाठी बीआरटी संकल्पना कार्यान्वित झाली. सोलापूर रोड, सातारा रोड, नगररोड, जुना मुंबई पुना रोड, आळंदी रोड या ठिकाणी राबविण्यात आली. या करीता केंद्र शासन राज्य शासन व पुणे महानगरपालिका यांनी संयुक्तपणे हजारो कोटी रूपये बीआरटी सक्षमीकरणासाठी खर्च केले. (Pune Municipal Corporation)

खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा, पर्यावरणाचा व्हास कमी करणे या उद्देशाने बीआरटी प्रकल्प राबविला. त्याचा शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग व्यक्ति, कामगार आदींना त्याचा मोठा फायदा होत आहे. नगररोड दरम्यानची बीआरटी ही कार्यान्वित झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच या बीआरटीचे उद्घाटन केले आहे. गेल्या काही वर्षांपासून नगररोड बीआरटी वर मेट्रोची सेवा चालू होणार आहे. त्याकरीता येरवडा ते विमाननगर पर्यंतची बीआरटी पूर्णपणे बंद केली आहे. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत मेट्रोचे काम व बंद बीआरटी मुळे वाहतूक कोंडी मोठया प्रमाणावर होत आहे. असे असताना बीआरटीमुळे वाहतूक कोंडी होते, असा चुकीचा संदेश दिला जात आहे. त्यामुळे तीन वर्षापासून बंद असलेला बीआरटीचा मार्ग मेट्रोचे काम सुरू नसलेल्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे. पीएमपीएलच्या ताफ्यात नव्याने एक हजार बसेस दाखल होणार आहेत. त्या बीआरटी मार्गावर कार्यान्वित झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल.

तसेच नगररोड बीआरटी ही येरवडयापासून कल्याणीनगर मार्गे वळविण्यात आली त्यामुळे येरवड्यापासून ते रामवाडी पर्यंत बीआरटीला अडथळा होत नाही, असे डॉ. धेंडे म्हणाले.

 इतरांनाही परवानगी द्या –

बीआरटीच्या मार्गांवर बसेस, एसटी, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहने, स्कूल बसेस यांनाही परवानगी द्यावी, अशी मागणी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली आहे. त्यामुळे नगर रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. पुणे महापालिकेने वेळेत मेट्रो कॉर्पोरेशन ला सांगून बीआरटीची तोडफोड केलेली आहे तेथे दुरूस्तीचे काम तात्काळ करून घ्यावे. तत्काळ वॉर्डनची नियुक्‍ती करावी, अशीही मागणी करण्यात आली.
——————-

News Title | Dr. Siddharth Dhende Nagar Road BRTS | Otherwise we will start agitation for BRT through constitutional means | Former Deputy Mayor of Pune Municipal Corporation Dr. Siddharth Dhende’s warning

Dr Siddharth Dhende | चाइल्ड केअर सेंटर उपक्रम नागरिकांसाठी वरदान ठरेल | डॉ. सिद्धार्थ धेंडे

Categories
Breaking News PMC Political social आरोग्य पुणे

Dr Siddharth Dhende | चाइल्ड केअर सेंटर उपक्रम नागरिकांसाठी वरदान ठरेल | डॉ. सिद्धार्थ धेंडे

| प्रभाग क्रमांक 2 मधील छत्रपती शिवराय दवाखान्यात चाईल्ड केअर सेंटरचे उद्घाटन

| माजी उपमहापौर डॉ.  सिद्धार्थ धेंडे यांचा पाठपुरावा

Dr Siddharth Dhende | पुणे महानगरपालिका (Pune Municipal corporation) व अर्बन 95 (Urban 95g संस्थेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 2 मध्ये अनेक स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. नुकतेच छत्रपती शिवराय दवाखान्यात चाईल्ड केअर सेंटर (Child Care Centre) सुरू करण्यात आले आहे. पुणे शहरातील हा पहिला प्रकल्प सुरू होत आहे. त्याचा प्रभागातील नागरिकांना, लहान बालकांना मोठा फायदा होणार आहे. या अगोदरही पुणे शहरातील पहिले “हर्बल गार्डन ” तसेच लुंबिनी उद्यानातील पहिला ” बाल मेळावा ” नागरिकांच्या सहकार्याने सुरू करता आला, असे प्रतिपादन पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ.  सिद्धार्थ धेंडे (Former Deputy Mayor Dr Siddharth Dhende) यांनी केले.
डॉ. धेंडे यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नांमुळे प्रभाग क्रमांक दोन मधील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथील छत्रपती शिवराय दवाखाना या ठिकाणी चाइल्ड हेल्थ केअर सेंटर आणि आयटीसी सुरू करण्यात आले. पुणे महानगरपालिका व अर्बन 95 संस्थेच्या माध्यमातून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. धेंडे बोलत होते.
या वेळी नामदेवराव घाडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिती वर्पे, अर्बन 95 संस्थेचे सर्वेसर्वा दीक्षित आणि त्यांचे सहकारी, प्रेरणा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सांडभोर आणि त्यांचे सहकारी, चैतन्य हास्य योग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश आम्रे आणि त्यांचे सहकारी या सर्वांच्या शुभहस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, त्रिदलनगर, शांतीरक्षक सोसायटी व नागपूर चाळ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कैलास रणपिसे, विजय कांबळे, गजानन जागडे, हेमंत मोरे, प्रताप धुमाळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
——-

 या सुविधा मिळणार

पुणे महापालिका आणि अर्बन 95 संस्थांमार्फत लहान मुलांच्या बौद्धिक वाढीकरिता आणि सर्वांगीण विकासाकरिता तसेच जेष्ठ नागरिक, महिलांच्या सुविधेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. पुणे शहरात प्रथम त्याच धर्तीवर प्रभाग क्रमांक 2 मध्ये डॉ. धेंडे यांच्या पाठपुराव्यामुळे हर्बल गार्डन तयार करण्यात आले. आयटीसी फ्रेन्डली प्रायमरी हेल्थ केअर सेंटर मध्ये गरोदर महिलांना गर्भ संस्कार स्वतंत्र कक्ष, हिरकणी कक्ष, बालसंगोपन कक्ष, जेष्ठ नागरिकांना अद्ययावत विरंगुळा कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी वाहन पार्किंग कक्ष निर्मिती करण्यात येणार आहे.
——————-
पुणे महापालिका आणि अर्बन 95 अंतर्गत अनेक चांगले उपक्रम राबविले जात आहेत. त्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 2 मध्ये चाईल्ड केअर सेंटर सुरू करता आले. त्याचा लहान मुलांना फायदा होणार आहे. तसेच आयटीसी सेंटरच्या माध्यमातून महिलांना उपचार घेता येणार आहेत.
डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका

Dr Siddharth Dhende | सावली संस्थेतील निराधार मुलांना शैक्षणिक मदतीचा आधार | माजी उपहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

Categories
Breaking News Education Political social पुणे

Dr Siddharth Dhende | सावली संस्थेतील निराधार मुलांना शैक्षणिक मदतीचा आधार | माजी उपहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

| संस्थेतील १०० विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याची मदत

Dr Siddharth Dhende | शिक्षणापासून वंचित असणाऱ्या निराधार मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांनी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने पुण्यातील ताडीवाला रोड येथील सावली संस्थेतील (Savali Organization) १०० निराधार मुलांना (Orphans) त्यांनी शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने (आठवले गट)  पुण्यातील कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
या वेळी सावली संस्थेचे अमित मोहिते, आरपीआयचे जेष्ठ नेते बाळासाहेब जानराव, माजी नगरसेवक अशोक कांबळे, मंदार जोशी, बाबुराव घाडगे, बसवराज गायकवाड आदींसह विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त १३२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचा संकल्प डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केला होता. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली जाणार असल्याचा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला होता. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी हा उपक्रम आयोजित केला. ताडीवाला रोड येथील सावली संस्थेमार्फत फुटपाथवर फिरणारी मुले, अनाथ मुले यांचा सांभाळ करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले जात आहे. या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत गती देण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.
या वेळी आरपीआयचे जेष्ठ नेते बाळासाहेब जानराव म्हणाले की, आई वडिलांचे लहानपणीच छत्र हरविल्यानंतर मुलांचे आयुष्य भरकटले जाते. त्यांना शिक्षण, नोकरी, योग्य जगण्याचे मार्गदर्शन होत नाही. शिक्षणापासून मुले दूर झाली तर ती गैरमार्गाला लागण्याची शक्यता असते. तसेच देशाची प्रगती देखील खुंटते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा डॉ. धेंडे यांचा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. अनेकांनी हा उपक्रम हाती घेणे गरजेचे असल्याचे जानराव म्हणाले.
——————-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी माझे काम करतो. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त 132 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार उचलण्याचा मी संकल्प केला होता. त्यानुसार विविध समाजातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक हातभार लावण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सावली संस्थेतील या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटत मला करावेसे वाटले. त्याचे मला समाधान आहे. शिक्षण घेतलेली विद्यार्थ्यांची पिढी घडली तर देश देखील समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका
——-

PMC Polyclinic | नागपूर चाळ, समतानगर येथे पॉलिक्लिनिक सुरू करा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे आरोग्य प्रमुखांना निवेदन

Categories
Breaking News PMC Political social आरोग्य पुणे

PMC Polyclinic | नागपूर चाळ, समतानगर येथे पॉलिक्लिनिक सुरू करा

| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे आरोग्य प्रमुखांना निवेदन

PMC Polyclinic | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) प्रभाग 2 मध्ये नागपूर चाळ, समतानगर येथील छत्रपती शिवराय दवाखाना इमारतीमध्ये पॉलिक्लिनिक (Polyclinique) सुरू करा, अशी मागणी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांनी केली आहे. या बाबत महापालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. भगवान पवार (PMC Health Department Head Dr Bhagwan Pawar) यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी केली आहे. (PMC Polyclinic)
डॉ. धेंडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पुणे महापालिकेमधील प्रभाग क्र २ नागपूर चाळ, फुलेनगर या प्रभागामध्ये पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत छत्रपती शिवराय दवाखाना येथे बाहय रूग्ण विभाग व मॅटर्निटी होम सध्या चालू आहे. या दवाखाण्याच्या परिसरामध्ये राहणारे सुमारे ४० हजार नागरिक या दवाखान्यातून आरोग्य सुविधेचा लाभ घेत आहेत. या भागामध्येच प्रामुख्याने झोपडपट्टी व अल्प उत्पन्न गटाचे नागरीक राहत आहेत. त्यांना अद्ययावत चांगली आरोग्य सुविधा देणे ही मनपाची प्राथमिक जबाबदारी आहे. (PMC Pune)
केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय शहरी आरोग्य योजना या योजनेअंतर्गत पुणे शहरामधील विविध प्रभांगांमध्ये पॉलिक्लिनीक उभारावयाचे काम चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर समतानगर येथील छत्रपती शिवराय दवाखाण्याची इमारत देखील अद्ययावत उभारलेली असून त्या इमारतीमध्ये पॉलिक्लिनिक चालू केल्यास नागरिकांची आरोग्य बाबत होणारी गैरसोय टळेल. या भागातील नागरीकांना अद्ययावत आरोग्य सुविधा मिळतील. या पूर्वी या इमारतीची पाहणी देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन येथे पोलिक्लिनिक चालू करावे, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी केली. (Pune Municipal Corporation News)
—-
News Title | PMC Polyclinic | Start Polyclinic at Nagpur Chal, Samtanagar | Former Deputy Mayor Dr. Siddharth Dhende’s statement to the PMC Health Chief

Pune Water Cut | पुणेकरांना रोज पाणी मिळेल याची व्यवस्था करा | माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Water Cut | पुणेकरांना रोज पाणी मिळेल याची व्यवस्था करा

| माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांची मागणी

Pune Water Cut | पुणे शहरात जो काही पाणी कपातीचा निर्णय घेतलेला आहे. तो रद्द करावा  आणि पुणेकरांना रोज पाणी मिळेल याची व्यवस्था करावी. अशी मागणी माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे (Ex Deputy Mayor Dr Siddharth Dhende) यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे. (Pune Water Cut)

डॉ धेंडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार पावसाने ओढ दिल्यामुळे प्रत्येक गुरूवारी पुणे शहराचा पाणी कपातीचा निर्णय दिला होता. त्याला पुणेकरांनी सहकार्य केलेले आहे. परंतू गेल्या १५ दिवसामध्ये आपल्या धरणक्षेत्रामध्ये दमदार पाउस होत असून ६० टक्केच्या वरती धरण भरलेली आहेत. आणि खडकवासला धरणामधून नदीपात्रामध्ये विसर्गही

चालू झालेला आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने पुढील २ महिने पाउस होणार असे प्रसिध्दीपत्रक दिलेले आहे. खडकवासला धरण (Khadakwasla Dam) साखळीबरोबर भामा आसखेड या धरणामध्ये देखील ६० टक्के धरण भरलेले आहे. (Pune Municipal Corporation)
भामा आसखेड मधून होणाऱ्या पाणी पुरवठा क्षेत्रामध्ये गुरूवार नंतर पुढील दोन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत राहत आहे. त्यामुळे नागरीकांना प्रचंड मनस्ताप व त्रास होत आहे. तरी पुणेकरांवरती जी काही पाणी कपात लादलेली आहे, ती रद्द करावी आणि पुणेकरांना रोज पाणी मिळेल याची व्यवस्था करावी. असे डॉ धेंडे यांनी म्हटले आहे. (Pune Rain)

—-
News Title |Pune Water Cut | Make sure that the people of Pune get water every day| Former Deputy Mayor Dr. Siddharth Dhende’s demand

Pune City Traffic Update | सह्याद्री लेन ते बदामी चौक दरम्यानची जड वाहतूक बंद होणार

Categories
Breaking News Political social पुणे

Pune City Traffic Update | सह्याद्री लेन ते बदामी चौक दरम्यानची जड वाहतूक बंद होणार

 | डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

| वाहतूक बंद करण्याबाबत पुणे वाहतूक शाखेचा निर्णय

Pune City Traffic Update | शास्त्रीनगर, सह्याद्री हॉस्पीटल समोरून शांतीरक्षक मार्गे महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथून बदामी चौकाकडे जड वाहनांची होणारी वाहतूक बंद (Heavy Vehicles Traffic) करण्यात येणार आहे. त्या बाबत पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांनी पुणे वाहतूक शाखेला (Pune City Traffic Police) निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. संबंधीत मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यात येणार असून त्या बाबत नागरिकांच्या सूचना पाहून त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्‍त विजयकुमार मगर (Deputy Police Commissioner Vijaykumar Magar) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहिर केले आहे. (Pune City Traffic Update)
येरवड्यातील शास्त्रीनगर चौकातील (Shastrinagar Chowk Yerwada) सह्याद्री हॉस्पिटल (Sahyadri Hospital) लेन येथून बदामी चौक (Badami Chowk), जुना एअरपोर्ट रस्ता (Old Airport Road) येथे जाणारी व एअरपोर्ट रोडवरील (Airport Road m) बदामी चौकीतून सह्याद्री हॉस्पिटल च्या रस्त्याने नगर रोड कडे जाणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी करण्याचा निर्णय वाहतूक शाखेचे पोलीस उपयुक्त विजय मगर यांनी सोमवारी घेतला आहे. सह्याद्री हॉस्पिटल मार्गे बदाम चौकाकडे जाताना अरुंद रस्त्यामुळे होणारे वाहतूक कोंडी तसेच सातत्याने होणारे अपघात यासाठी स्थानिक नागरिकांच्या वतीने माजी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी मागील दोन महिन्यांपासून या विषयाचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. कालच कॉमर्स झोन जवळील मेंटल हॉस्पिटलच्या समोर अज्ञात जड वाहनाने चिरडल्यामुळे एका स्थानिक युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. या सर्व गंभीर परिस्थितीची तात्काळ माहिती घेऊन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त यांनी आज सोमवारी (दि. 10) हा निर्णय घेतला आहे. (Pune Traffic Update)
या भागातील जड वाहतूक बंद केल्यानंतर पर्यायी रस्ता म्हणून शास्त्रीनगर चौक येथून सरळ गोष्ट चौकातून उजवीकडे वळून एअरपोर्ट रोडने बदामी चौकातून वाहनांना पुढे जाता येईल तसेच बदामी चौकाकडून सरळ गोल क्‍लब चौकाच्या डावीकडे वळून शास्त्रीनगर चौकातून नगर रस्त्याने या वाहनांना पुढे जाता येणार आहे. पुणे शहर वाहतूक शाखेने घेतलेले या निर्णयाचे माजी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी स्वागत केले आहे.

|  वाहतूक शाखेचा आदेश

शास्त्रीनगर चौकातील सह्याद्री हॉस्पीटल लेन येथुन बदामी चौक, जुना एअर पोर्ट रोड येथे जाणारी व एअरपोर्ट रोडवरील बदामी चौक येथून सह्याद्री हॉस्पीटल लेन मार्गे नगर रोडकडे जाणाऱ्या जड वाहनांचे वाहतूकीस बंदी करण्यात येत आहे.त्या ऐवजी शास्त्रीनगर चौक सरळ गोल्फ चौक, उजवीकडे वळुन एअरपोर्ट रोडने बदामी चौक पुढे इच्छितस्थळी जाता येणार आहे. तसेच बदामी चौक सरळ गोल्फ क्‍लब चौक डावीकडे वळण घेवुनशास्त्री नगर चौक पुढे इच्छितस्थळी जाता येणार आहे. 10 ते 25 जुलै पर्यंत लेखी स्वरूपात नागरीकांच्या सूचना व हरकतींचा विचार करुन अंतिम आदेश काढण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले. (Pune City Traffic Police)
——
या भागातील गंभीर अशी वाहतूक कोंडी व सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी जड वाहनांची वाहतूक बंद करणे आवश्‍यक होते. त्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. त्याची दखल वाहतूक शाखेने घेतली त्याचे मी स्वागत करतो.  नागरिकांनी कायम स्वरुपी जड वाहतुक बंद करावी, या करिता वाहतूक शाखेला सूचना कराव्यात असे या निमित्त मी आवाहन करत आहे.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.
———-
News Title | Pune City Traffic Update |  Heavy traffic between Sahyadri Lane and Badami Chowk will be closed  |   Success in pursuit of Dr. Siddharth Dhende