Naturopath Wing | BJP | भाजपा महाराष्ट्र प्रदेश “नॅचरोपॅथ विंग” चे थाटात उद्घाटन  | प्रदेश संयोजक म्हणून डॉ. सुनिल चव्हाण तर सहसंयोजक म्हणून डॉ. क्रांती कुमार महाजन यांची निवड

Categories
Breaking News Political आरोग्य महाराष्ट्र

भाजपा महाराष्ट्र प्रदेश “नॅचरोपॅथ विंग” चे थाटात उद्घाटन

| प्रदेश संयोजक म्हणून डॉ. सुनिल चव्हाण तर सहसंयोजक म्हणून डॉ. क्रांती कुमार महाजन यांची निवड

| संपूर्ण राज्यातील निसर्गोपचारकांचा भरगच्च सहभाग

यंदाच्या जागतिक निसर्गोपचार दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या वतीने नरीमन पॉईंट, मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये भव्य समारंभपूर्वक ‘नॅचरोपॅथी विंग’ चे उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र विधान परिषदेचे गटनेते मा. आमदार श्री. प्रविणजी दरेकर, महाराष्ट्राचे विधी, न्याय व पर्यटन मंत्री म   मंगलप्रभाजी लोढा, भाजपा आमदार  निलेशजी राणे, मा. आमदार श्री. प्रसादजी लाड, भाजपा प्रदेश प्रवक्तेl उपाध्ये, भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश संयोजक डॉ. अजितजी गोपछडे, सहसंयोजक डॉ. बाळासाहेब हरपाळे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मधुमेह चिकित्सक डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या शुभहस्ते भाजपा ‘नॅचरोपॅथी विंग’ चे समारंभपूर्वक उद्घाटन करण्यात आले.
याप्रसगी भाजपा प्रदेशाध्यक्ष    चंद्रशेखरजी बावनकुळे, भाजपा वैद्यकीय आघाडी, महाराष्ट्र प्रदेशाचे प्रभारी  गिरीषजी महाजन (राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) व प्रदेश संयोजक डॉ. अजितजी गोपछडे यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हयाच्या ‘नॅचरोपॅथी विंग’ ची कार्यकारीणी गठीत करून नियुक्त पदाधिका-यांना सन्मानपूर्वक ‘नियुक्ती पत्रे’ बहाल करण्यात आली. त्या अंतर्गत भाजपा नॅचरोपॅथी विंगचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक म्हणून सुप्रसिध्द निसर्गोपचार तज्ञ डॉ. सुनिल चव्हाण व सह-संयोजक म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तिमान निसर्गोपचार लेखक डॉ. क्रांती कुमार महाजन यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचसोबत याप्रसंगी भाजपा नॅचरोपॅथी विंग च्या महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हयाचे व विभागाचे संयोजक व सह संयोजक यांना समारंभपूर्वक नियुक्तीपत्रे बहाल करण्यात आली.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हयातील सर्व निसर्गोपचार व योग चिकित्सकांना एकत्र करणे, जिल्हास्तरावर शहर व ग्रामीण भागामध्ये कार्यकारीणी गठीत करणे, नॅचरोपॅथी व योगशास्त्राचे प्रशिक्षण देणा-या महाराष्ट्र राज्यातील सर्व व्यक्ति, धर्मदाय संस्था, प्रशिक्षण संस्था, महाविद्यालये व विद्यापीठे यांना एकीकृत करणे, निसर्गोपचार तज्ञ प्रशिक्षक तयार करणे, आरोग्य मेळावे आयोजित करणे, नॅचरोपॅथी हॉस्पिटल निर्माण करणे, निसर्गोपचार कार्यशाळा व अभ्यास दौरे आयोजित करणे, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे, स्वस्थ भारत अभियानाच्या ध्यये धोरणानुसार मानवी आरोग्यासाठी तत्पर राहून सेवा देणे, पंचगव्य चिकित्सेचा व पंचगव्य आयुर्वेद ज्ञानाचा प्रचार प्रसार करणे, गोशाळा निर्माण करणे, निसर्गोपचार तज्ञांना कायदेशीर संरक्षण देणे, निसर्गोपचार कायदे या विषयापर जनजागृती करणे, दरवर्षी ‘जागतिक निसर्गोपचार दिवस’ व ‘जागतिक योग ‘ साजरा करणे, महाराष्ट्र राज्यामध्ये शासन स्तरावर नॅचरोपॅथी कॉन्सिल निर्माण व्हावी यासाठी कृतीशील ठोस कार्यक्रम अंमलबजावणी करणे, इत्यादी प्रमुख उद्दीष्टे महाराष्ट्र प्रदेश भाजपा ‘नॅचरोपॅथी विंग’ च्या वतीने जाहीर करण्यात आले.