Annasaheb Waghire College Otur | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर मध्ये “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० सप्ताह” उत्साहात साजरा

Categories
Breaking News cultural Education पुणे

Annasaheb Waghire College Otur | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर मध्ये “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० सप्ताह” उत्साहात साजरा

Annasaheb Waghire College Otur | ओतूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयांमध्ये दि.२४ ते २९ जुलै २०२३ या कालावधीमध्ये “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०” या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.  उपक्रमांतर्गत महाविद्यालयामध्ये “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०”या विषयावरील आधारित निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच विशेष व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे (Dr Abhay Khandagale) यांनी दिली. (Annasaheb Waghire College )Otur

आज महाविद्यालयामध्ये “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० “या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य खंडागळे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. आपल्या मनोगतामध्ये डॉ.खंडागळे यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदलते शिक्षणाचे प्रारूप, अभ्यासक्रमात तंत्रज्ञानाचा वापर, उच्च शिक्षणामध्ये आलेली क्रेडिट सिस्टीम, विद्यार्थ्यांना विषय निवडीचे असलेले स्वातंत्र्य, तसेच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काही कोर्स ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने पुर्ण करण्याची असलेली मुभा, विद्यार्थी केंद्रित व समाजाभिमुख शिक्षण या सर्व गोष्टींचा उल्लेख केला तसेच हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारताच्या उज्वल भविष्याची नांदी ठरणार आहे असेही मत व्यक्त केले.

सदर शैक्षणिक सप्ताहामध्ये “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण” २०२० या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पूर्वा कुटे, द्वितीय क्रमांक सायली अहिनवे तर तृतीय क्रमांक सुरज राजोरे यांनी मिळवला.
निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक घोलप तनुजा व डुंबरे अपेक्षा, द्वितीय क्रमांक आहेर प्रगती व डुंबरे अनुष्का यांनी तर तृतीय ठोंगिरे पायल यांनी क्रमांक मिळवला.
याचबरोबर पोस्टर स्पर्धेमध्ये अक्षदा पोपळे व श्रावणी सुर्यवंशी यांनी प्रथम क्रमांक तर सानिका गिजरे व सानिका डुंबरे यांनी द्वितीय क्रमांक तर सुरज वाघमारे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे, उपप्राचार्य डॉ.के.डी सोनवणे, उपप्राचार्य डॉ.व्ही.एम शिंदे, डॉ. बी.एम.शिंदे, डॉ.एस.एस लंगडे, डॉ.एस.बी वाळके आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.अमोल बिबे, डॉ.निलेश काळे,डॉ.वसंतराव गावडे,डॉ.अजय कवाडे तसेच कार्यालयीन कर्मचारी निखिल काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.


News Title | Annasaheb Waghire College Otur | “National Education Policy Week 2020” celebrated with enthusiasm in Annasaheb Waghire College Otur

विज्ञान कथेमध्ये भविष्याचा वेध घेण्याची क्षमता | डॉ. संजय ढोले

Categories
cultural Education पुणे महाराष्ट्र

विज्ञान कथेमध्ये भविष्याचा वेध घेण्याची क्षमता | डॉ. संजय ढोले

 “विज्ञान कथेमध्ये भविष्याचा वेध घेण्याची ताकद असते. विज्ञान कथा,  विज्ञान लेख,विज्ञान कादंबरी,विज्ञान विषयक लेखन इत्यादींमुळे मराठी साहित्य अधिकाधिक समृद्ध होत आहे. वैज्ञानिक संकल्पना, प्रयोग प्रस्थापित विज्ञानावर आधारित असतात. असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.संजय ढोले (भौतिक शास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी केले.

 पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर, ता-जुन्नर, जि-पुणे येथे, बुधवार दि.१५ मार्च २०२३ रोजी “लेखक आपल्या भेटीला” या उपक्रमांतर्गत “मराठी विज्ञान कथा स्वरूप व संकल्पना या विषयावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.संजय ढोले (भौतिक शास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
ते आपल्या मनोगतात म्हणाले,  “विज्ञान कथेमध्ये भविष्याचा वेध घेण्याची ताकद असते. विज्ञान कथा,  विज्ञान लेख,विज्ञान कादंबरी,विज्ञान विषयक लेखन इत्यादींमुळे मराठी साहित्य अधिकाधिक समृद्ध होत आहे. वैज्ञानिक संकल्पना, प्रयोग प्रस्थापित विज्ञानावर आधारित असतात. म्हणून विज्ञान कथा लिहिताना प्रस्थापित विज्ञानाला धक्का लागता कामा नये. विज्ञान कथेतील कथा काल्पनिक व विज्ञान मात्र सत्य असते.”
ढोले सरांनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.
पाहुण्यांचा परिचय डॉ.अजय कवाडे व प्रास्ताविक डॉ.वसंत गावडे  यांनी केले. ते  म्हणाले “ढोले सरांचे लेखन म्हणजे विज्ञान साहित्यातील एक मैलाचा दगड म्हणून त्याची नोंद साहित्याच्या इतिहासामध्ये घेतली आहे.” सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे यांनी भूषविले, ते आपल्या मनोगतात म्हणाले,”माणूस जीवन जगत असताना तो विज्ञानाला अनुसरूनच आपली प्रत्येक कृती करत असतो.”
 सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.एफ.ढाकणे, उपप्राचार्य डॉ.व्ही.एम शिंदे,डॉ. सुनिल लंगडे,डॉ.किशोर काळदंते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.छाया तांबे यांनी केले. आभार डॉ.के.डी सोनावणे यांनी मानले.

Marathi Bhasha Din | मातृभाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य” | प्रा.डॉ.वसंत गावडे

Categories
Breaking News cultural Education social पुणे महाराष्ट्र

मातृभाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य” |  प्रा.डॉ.वसंत गावडे

मराठी भाषेचा प्रचार,प्रसार व संवर्धन करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. मराठीला माहिती तंत्रज्ञानाकडे वळवा. भाषा म्हणजे आपली ओळख, मान,सन्मान आहे. असे प्रतिपादन डॉ वसंत गावडे यांनी केले.
 पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर, ता-जुन्नर, जि-पुणे येथे,सोमवार दि. २७ फेब्रुवारी २०२३ रोजी *मराठी भाषा गौरव दिन* मोठ्या आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. तसेच महाराष्ट्र गीत म्हणण्यात आले.त्यानिमित्ताने  महाविद्यालयात मराठी  विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मराठी भाषा स्वाक्षरी मोहीम *काव्यवाचन ,*तसेच प्रा. डॉ.वसंत गावडे यांचे  “मायबोली मराठी”या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ते आपल्या व्याख्यानात म्हणाले,”मराठी भाषेचा प्रचार,प्रसार व संवर्धन करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. मराठीला माहिती तंत्रज्ञानाकडे वळवा. भाषा म्हणजे आपली ओळख, मान,सन्मान आहे. मराठी भाषेचे व्यक्तित्व अनेक पदरी आहे. मराठीचा इतिहास केवळ अभिजात असण्यापेक्षाही कितीतरी भव्य दिव्य आहे भाषा हा संस्कृतीच्या हस्तांतरणाचा मार्ग आहे. मराठी ज्ञानभाषा म्हणून सक्षम होते आहे. मराठी भाषा अधिकाधिक सशक्त, समृद्ध, आणि सर्वसामान्य करायचा निर्धार आपण करूया.”
             सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे यांनी भूषविले, ते आपल्या मनोगत म्हणाले,”कुठलीही भाषा जितकी वापरत राहील तितकी ती अधिक बहरते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्थानिक भाषेला मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम म्हणून महत्त्व प्राप्त झाले.”सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.एफ.ढाकणे, उपप्राचार्य डॉ.व्ही.एम शिंदे, डॉ. के.डी.सोनवणे,डॉ. सुनील लंगडे,डॉ. दत्तात्रय टिळेकर, डॉ संतोष वाळके, डॉ.निलेश काळे,डॉ.रमाकांत कस्पटे, डॉ. छाया तांबे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. सूत्रसंचालन डॉ.अमोल बिबे यांनी केले.प्रा.रोहिणी मदने यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Marathi Language | आजच्या युवा पिढीने मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर पोहोचवावे – डॉ. पुरुषोत्तम काळे

Categories
Breaking News cultural Education पुणे महाराष्ट्र

आजच्या युवा पिढीने मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर पोहोचवावे – डॉ. पुरुषोत्तम काळे

 

जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर, ता-जुन्नर, जि-पुणे येथे १४जानेवारी ते २८ जानेवारी २०२३ दरम्यान *मराठी भाषा संवर्धन पंधरवडा* महोत्सव आयोजित करण्यात आला. त्यानिमित्ताने महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.* *मराठी भाषेचे संवर्धन* या विषयावर निबंध लेखन स्पर्धा, स्वरचित *काव्य लेखन स्पर्धा, मराठी भाषेशी संबंधित. *घोषवाक्य लेखन स्पर्धा* ,*प्रश्नमंजुषा*, *मराठी हस्ताक्षर स्पर्धा.*,*भिंतीपत्रक- पोस्टर्स स्पर्धा*,*कथा अभिवाचन स्पर्धा”, काव्यवाचन स्पर्धा “मराठी भाषेचे संवर्धन” या विषयावर प्रा.डॉ.पुरुषोत्तम काळे(महाराष्ट्र साहित्य पत्रिका, संपादक) यांचे विशेष व्याख्यान शनिवार,दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते.

ते आपल्या व्याख्यानात म्हणाले,”मराठी ही एक अत्यंत प्रगल्भ भाषा आहे.तिचा इतिहास हा दोन हजार वर्षाचा आहे. मराठी भाषेत अभिजात ग्रंथांचा ठेवा आहे. अनेक बोली मिळून मराठी भाषेची निर्मिती झालीआहे. आजच्या युवा पिढीने मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर बसवावे. आज इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या दर्जांपेक्षा मराठी माध्यमांच्या शाळेचा दर्जा सरस आहे. महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मातीत आदर्शांचा फार मोठा ठेवा आहे तो सर्व मराठीत प्रतिबिंबित झाला आहे. जगातला सर्वात मोठा कवी म्हणून मला तुकाराम महाराज हे श्रेष्ठ वाटतात. मराठी भाषेत अनेक नीती मूल्यांचे शिक्षण आहे. मराठीच्या अस्तित्वावर जर कोणी प्रहार करण्याचा प्रयत्न करणार असेल तर मराठी माणूस तो कदापिही सहन करणार नाही कारण मराठी बाणा हा ताठ कण्यासारखा आहे.”

महाराष्ट्रीय पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करून महोत्सवाचा समारोप करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.वसंत गावडे यांनी केले, सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.व्ही.एम.शिंदे, उपप्राचार्य डॉ.एस. एफ.ढाकणे, उपप्राचार्य,डॉ.के.डी.सोनावणे, डॉ. रमेश काशिदे हे मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सृष्टी महाकाळ या विद्यार्थिनीने केले., प्रा.रोहिणी मदने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे आभार डॉ. छाया तांबे यांनी मानले.

Dr. Vasant Gawde | NSS | एन.एस.एस. हे आदर्श संस्कारांचे व्यासपीठ | प्रा.डॉ. वसंत गावडे

Categories
Breaking News Education social पुणे

एन.एस.एस. हे आदर्श संस्कारांचे व्यासपीठ | प्रा.डॉ. वसंत गावडे

एन.एस.एस.हे आदर्श संस्कारांचे व्यासपीठ व व्यक्तिमत्व विकासाचे विद्यापीठ आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अनेक सुप्त कलागुणांना वाव मिळत असतो. विद्यार्थ्यांमध्ये समाज सेवेची भावना दृढ होते.  स्वावलंबनाचे धडे मिळतात. असे प्रतिपादन प्रा. डॉ. वसंत गावडे यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे ,राष्ट्रीय सेवा योजना आणि भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे, प्रितम प्रकाश महाविद्यालय (कला व वाणिज्य) इंद्रायणीनगर ,भोसरी, पुणे३९. यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत, “युवकांचा ध्यास ग्राम- शहर विकास” या उपक्रमांतर्गत ‘विशेष श्रमसंस्कार शिबिर’ शुक्रवार दि.१६ डिसेंबर २०२२ ते गुरुवार दि.२२डिसेंबर २०२२ या कालावधीत मु.पो.कोहिनकरवाडी ता.खेड, जि.पुणे, येथे मोठ्या आनंदी वातावरणात संपन्न होत आहे. सदर शिबीरात दररोज प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.१७ डिसें.२०२२रोजी प्रबोधनपर बौद्धिक व्याख्यानात “राष्ट्रीय सेवा योजना व व्यक्तिमत्व विकास”या विषयावर बोलताना प्रा.डॉ.वसंत गावडे म्हणाले,” “एन.एस.एस.हे आदर्श संस्कारांचे व्यासपीठ व व्यक्तिमत्व विकासाचे विद्यापीठ आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अनेक सुप्त कलागुणांना वाव मिळत असतो. विद्यार्थ्यांमध्ये समाज सेवेची भावना दृढ होते.  स्वावलंबनाचे धडे मिळतात. स्वच्छता अभियान,आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय एकात्मता सामाजिक एकता वाढीसाठी विद्यार्थी तयार होतात. तसेच संभाषण कौशल्य, नेतृत्व गुण, स्वावलंबन, श्रमाचे मूल्य, तडजोडीचे तत्त्व, संभाषण कौशल्य, ग्राम जीवनाचा अनुभव, इत्यादी पैलू राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना शिकायला मिळतात. व्यक्तिमत्त्व विकासासाठी ते आत्मसात होऊन विकसित होतात . लोकशाही मूल्य जोपासली जाऊन प्रेमाची भावना, बंधुत्व व सांघिक भावना ,जोखीम घेण्याची क्षमता,मानसिक क्षमता व शारीरिक क्षमता वाढते. आदर्श व्यक्तिमत्व जवळून अनुभवण्याची संधी मिळते. अनुभव व कृतिशीलता वाढते.विविध प्रकारच्या शिबिरांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. या सर्वांमधून सामाजिक उत्तरदायित्वाची भावना निर्माण होते. सहकार्य,स्वावलंबन काय असतो हे शिकायला मिळते. या सर्वांचा परिपाक म्हणजे सामाजिक उत्तरदायित्वाची भावना एन.एस.एस.च्या स्वयंसेवकांमध्ये तयार होऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. म्हणून राष्ट्रीय सेवा योजना ही संस्कार देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे असे मला वाटते”

सदर व्याख्यानासाठी शिबिरार्थी व ग्रामस्थ हे उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी

Reading Inspiration Day | पुस्तक हे युवकांना ज्ञानाचे ऊर्जा स्रोत पुरविणारे साधन | डॉ वसंत गावडे  | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा 

Categories
Breaking News cultural Education पुणे महाराष्ट्र

पुस्तक हे युवकांना ज्ञानाचे ऊर्जा स्रोत पुरविणारे साधन | डॉ वसंत गावडे

| अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

पुणे | ” पुस्तक हे युवकांना ज्ञानाचे ऊर्जा स्रोत पुरविणारे साधन आहे. महान व्यक्तिमत्वही वाचनातूनच घडलेली आहेत. आपला वाचनाचा वेग विवेकानंदांप्रमाणे असावा. वाचनासाठी बैठक ही महत्त्वाची आहे.आपण वाचन केलेल्या साहित्यकृतीचे आपण चिंतन मनन केले पाहिजे.” असे प्रतिपादन प्रा. डॉ वसंत गावडे यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर, ता-जुन्नर,जि-पुणे. येथे मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ,भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलामांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” विविध उपक्रम राबवून मोठ्या आनंदी वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. “वाचनाचे महत्त्व” या विषयावरील ‘घोषवाक्य स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती.

“डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम वाचन कट्टा “याचे उद्घाटन प्राचार्य उपप्राचार्य व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या “काव्यवाचन” स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. तसेच “वाचनाचे महत्त्व” या विषयावर प्रा डॉ.वसंत गावडे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.

ग्रंथालय विभागाच्या वतीने शंभर विद्यार्थ्यांना पुस्तक परीक्षणासाठी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम व देशासाठी महान कार्य करणाऱ्या विभूतींची पुस्तके देण्यात आली.

अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे म्हणाले,” वाचन हे आपले जीवन समृद्ध करते.अर्थपूर्ण वाक्य बोलण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. आजच्या युवकांनी मोबाईलला प्राधान्य न देता वाचनाला प्राधान्य द्यावे. वाचनामुळे आपल्याला ज्ञान संपादन करता येते.आपण काय वाचतो यावर आपले व्यक्तिमत्व ठरते.चांगले विचार आपल्याला फक्त वाचनातूनच मिळतात.”

प्रा.डॉ. वसंत गावडे आपल्या विशेष व्याख्यानात म्हणाले,” पुस्तक हे युवकांना ज्ञानाचे ऊर्जा स्रोत पुरविणारे साधन आहे. महान व्यक्तिमत्वही वाचनातूनच घडलेली आहेत. आपला वाचनाचा वेग विवेकानंदांप्रमाणे असावा. वाचनासाठी बैठक ही महत्त्वाची आहे.आपण वाचन केलेल्या साहित्यकृतीचे आपण चिंतन मनन केले पाहिजे.”

प्रास्ताविकात ग्रंथपाल डॉ. निलेश हांडे म्हणाले,” आजच्या विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृतीचा विकास करून पुढच्या पिढीला हा समृद्ध ठेवा दिला पाहिजे. ग्रंथालये ही ज्ञानाचे साठे आहेत. आजचा विद्यार्थी मोबाईलच्या युगातही वाचन करतो. पण ते वाचन तुकड्या तुकड्याचे न होता पुस्तकाच्या माध्यमातून सलग होणे व टिपण तयार करणे हे महत्त्वाचे आहे.” डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील अनेक प्रसंग डॉ.हांडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. ”

सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपप्राचार्य डॉ. एस.एफ. ढाकणे उपप्राचार्य डॉ. व्ही. एम.शिंदे,उपप्राचार्य.डॉ.के.डी सोनावणे उपस्थित होते. महाविद्यालयातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.सुनील लंगडे डॉ. विनायक कुंडलिक, डॉ. किशोर काळदंते उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.छाया तांबे व आभार प्रा. रोहिणी मदने यांनी मानले.

Dr. Vasant Gawde | राष्ट्रीय सेवा योजना ही भारतातील युवकांची सर्वात मोठी चळवळ |  डॉ वसंत गावडे

Categories
Breaking News Education पुणे

राष्ट्रीय सेवा योजना ही भारतातील युवकांची सर्वात मोठी चळवळ |  डॉ वसंत गावडे

राष्ट्रीय सेवा योजना युवकांची सर्वात मोठी चळवळ असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुण विकासाबरोबरच समायोजन कौशल्य, लोकशाही मूल्य, स्वावलंबन, श्रमाचे मूल्य, तडजोडीचे तत्व, संभाषण कौशल्य व ग्रामीण जनजीवनाचा अनुभव याबरोबरच आपत्कालीन परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याची क्षमता विकसित होते असे मत डॉ वसंत गावडे व्यक्त केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरामध्ये स्वच्छता अभियान तसेच “ओळख राष्ट्रीय सेवा योजनेची” या विषयावरील डॉ वसंत गावडे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे व कार्यक्रमाधिकारी डॉ. अमोल बिबे यांनी दिली.

सदर कार्यक्रमामध्ये डॉ. वसंत गावडे यांनी आपल्या व्याख्यानामध्ये राष्ट्रीय सेवा योजना युवकांची सर्वात मोठी चळवळ असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुण विकासाबरोबरच समायोजन कौशल्य, लोकशाही मूल्य, स्वावलंबन, श्रमाचे मूल्य, तडजोडीचे तत्व, संभाषण कौशल्य व ग्रामीण जनजीवनाचा अनुभव याबरोबरच आपत्कालीन परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याची क्षमता विकसित होते असे मत व्यक्त केले.

तसेच आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास तसेच महाविद्यालय आणि समाजाच्या विकासासाठी आवश्यक असणारी मूल्य युवकांमध्ये रुजवली जातात असे मत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, उपप्राचार्य डॉ. एस एफ ढाकणे, डॉ. व्ही एम शिंदे, डॉ. के डी सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अमोल बिबे यांनी केले व सूत्रसंचालन डॉ. निलेश काळे यांनी तर आभार प्रदर्शन भूषण वायकर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. अजय कवाडे, डॉ. रमाकांत कसपटे, डॉ. अनिल लोंढे, डॉ. नंदकिशोर उगले यांनी विशेष परिश्रम घेतले.

Marathi Language Day : Annasaheb Waghire College : अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात “मराठी भाषा गौरव दिन” विविध उपक्रमांनी साजरा 

Categories
cultural Education पुणे

अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात “मराठी भाषा गौरव दिन” विविध उपक्रमांनी साजरा

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर ता- जुन्नर जि-पुणे येथे मराठी विभागाच्या वतीने “मराठी भाषा गौरव दिन” विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यामध्ये “भाषा स्वाक्षरी मोहीम” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत पहिल्याच दिवशी 158 विद्यार्थी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

यावेळी  सुप्रसिद्ध लेखक, कवी व गझलकार प्रा.जयसिंग गाडेकर यांचे “मराठी भाषेचे संवर्धन” या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन झाले. ते आपल्या व्याख्यानात म्हणाले “मराठी भाषेतील ज्ञानाचे भांडार आजच्या विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे. आपल्या भाषेतील ज्ञानाचा ठेवा दुसऱ्या भाषेत अनुवादित केला पाहिजे व दुसऱ्या भाषेतील ज्ञान आपल्या भाषेत आणले पाहिजे. अनेक विषयांवरील कोशनिर्मिती आपण केली पाहिजे. विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील शब्दांना आपण पारिभाषिक संज्ञा तयार केल्या पाहिजेत. मराठी भाषेत ज्ञानरूपी अमृताचा कुंभ भरलेला आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत  ज्ञानाचा ठेवा कसा जाईल याविषयी आपण काम केले पाहिजे. आजच्या काळातील तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी भाषा जास्तीत जास्त जगभर पोहोचविण्याचा आपण संकल्प केला पाहिजे. मराठी भाषेतील ज्ञानाचे भांडार जगभर पोहोचविण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली पाहिजे. दुसऱ्या भाषेतील दर्जेदार साहित्याचा अनुवाद मराठी भाषेमध्ये केला गेला पाहिजे. असे ही गाडेकर म्हणाले.

मराठी भाषा ही ज्ञानभाषा : डॉ वसंत गावडे

प्रा डॉ वसंत गावडे आपल्या प्रास्ताविकपर भाषणात म्हणाले,  मराठी भाषेला जगामध्ये एक महत्त्वपूर्ण दर्जा आहे. मराठीच्या बोलींनी मराठी भाषा समृद्ध झाली आहे. मराठी भाषा अधिकाधिक सकस, समृद्ध व सक्षम बनविण्याचे काम प्रत्येकाचे आहे . मातृभाषा हे संस्काराचे विद्यापीठ आहे. आपले जीवन समृद्ध करण्यात भाषेचे स्थान हे महत्त्वपूर्ण आहे. मराठी भाषा ही अभिजात आणि माझ्या मते मराठी भाषा ही ज्ञानभाषा आहे. तिच्यावर कोणीही तज्ञ किंवा विचारवंत यांना शिक्कामोर्तब करण्याची गरज नाही. आपण प्रत्येकाने म्हटले पाहिजे माझ्या मराठी भाषेला अभिजात व ज्ञानभाषेचा दर्जा आहेच.”

अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ .एस. एफ.ढाकणे म्हणाले, “मराठी भाषेच्या माध्यमातून शिक्षण घेऊन यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केलेली अनेक उदाहरणे आहेत. त्या थोर व्यक्तिमत्त्वांनी इंग्रजी भाषेचा आग्रह कधीही धरला नाही. आपल्या यशामध्ये मराठी माध्यम कधीही आड आले नाही. यशस्वी होण्यामध्ये मातृभाषेचा आणि मराठी भाषेच्या माध्यमाचा कोणत्याही प्रकारे अडसर येत नाही. आपल्याला आपली भाषा गौरवास्पद असावी असे मला वाटते.”

भाषा गौरव दिना  निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . सदर कार्यक्रमासाठी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुनील लंगडे, डॉ.भूषण वायकर,  डॉ.रमेश काशीदे, डॉ. नंदकिशोर उगले, प्रा जनार्दन नाडेकर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एम. शिंदे व उपप्राचार्य डॉ.के .डी. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम करण्यात आला.डॉ. छाया तांबे यांनी आभार मानले. प्रा.रोहिणी मदने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Annasaheb Waghire College : मराठी भाषा सकस, समृद्ध व सक्षम बनविण्याचे काम प्रत्येकाचे : डॉ. वसंत गावडे यांचे प्रतिपादन 

Categories
cultural Education पुणे महाराष्ट्र

मराठी भाषा  सकस, समृद्ध  व सक्षम बनविण्याचे काम प्रत्येकाचे

: डॉ. वसंत गावडे यांचे प्रतिपादन

 

पुणे : मराठी भाषेला जगामध्ये एक महत्त्वपूर्ण दर्जा आहे. मराठीच्या बोलींनी मराठी भाषा समृद्ध झाली आहे. मराठी भाषा अधिकाधिक सकस व समृद्ध ,सक्षम बनविण्याचे काम प्रत्येकाचे आहे. असे प्रतिपादन ओतूरच्या अण्णासाहेब वाघिरे  महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.वसंत गावडे यांनी केले.

: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर  येथे मराठी भाषा विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यामध्ये ‘”मराठी भाषा” या विषयावरील घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ,”नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेचे स्थान” या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या प्रतिभा शक्तीला व सृजनक्षमतेला चालना देण्यासाठी “मराठी भाषेची महती” या विषयावर स्व:रचित “काव्य लेखन स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. तसेच “प्रश्नमंजुषा”हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने विविध विषयांवर मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्‍यात आले होते.

महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.वसंत गावडे यांनी मराठी भाषेचे महत्त्व” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .प्रा .डॉ .छाया तांबे यांनी “मराठी भाषेचा इतिहास” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. गणेश चौधरी यांनी “वाचनाचे महत्त्व “या विषयावर समारोपीय भाषण केले.
सदर कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेतला असला तरीही मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्गाने आपला सहभाग नोंदविला.

प्रा.डॉ.वसंत गावडे यांनी “मराठी भाषेचे”महत्व या विषयावर व्याख्यान दिले ते आपल्या व्याख्यानात म्हणाले, “मराठी भाषेला जगामध्ये एक महत्त्वपूर्ण दर्जा आहे.मराठीच्या बोलींनी मराठी भाषा समृद्ध झाली आहे. मराठी भाषा अधिकाधिक सकस व समृद्ध ,सक्षम बनविण्याचे काम प्रत्येकाचे आहे.मातृभाषा हे संस्कारांचे विद्यापीठ आहे.आपले जीवन समृद्ध करण्यात भाषेचे स्थान हे महत्त्वपूर्ण आहे.मराठी भाषा ही अभिजात आणि माझ्या मते मराठी ही ज्ञानभाषा आहे. तिच्यावर कोणीही तज्ञ किंवा विचारवंत यांनी शिक्कामोर्तब करण्याची गरज नाही .आपण प्रत्येकाने म्हटले पाहिजे माझ्या मराठी भाषेला अभिजात व ज्ञानभाषा याचा दर्जा आहेच.”

प्रा. डॉ.छाया तांबे यांनी “मराठी भाषेचा इतिहास ” याविषयी आपले विचार व्यक्त करताना त्या म्हणाल्या “मराठी भाषेला संपन्न आणि समृद्ध वारसा आहे.मराठी भाषेचा इतिहास पाहताना लोकसाहित्य, लोकसाहित्याची मौखिक परंपरा यांचाही विचार होणे गरजेचे आहे. शिलालेख,ताम्रपट यांचाही अभ्यास महत्त्वाचा आहे . मराठी भाषा ही संत, पंत ,तंत यांनी समृद्ध केली आहे .मराठी भाषेला प्राचीनत्वाचा वसा आणि वारसा लाभलेला आहे.”

: दैनंदिन जीवनात वाचनाला महत्त्व द्या : डॉ. गणेश चौधरी

“भाषा पंधरवडा” समारोप कार्यक्रमात अनंतराव पवार महाविद्यालय,पिरंगुट चे डॉ. गणेश चौधरी यांनी “वाचनाचे महत्व” या विषयावर व्याख्यान दिले. आपल्या विवेचनात ते म्हणाले, “दैनंदिन जीवनात वाचनाला महत्त्व द्या. भाषेला वाचवायचे असेल तर त्या त्या भाषेतील उत्तमोत्तम ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. जो माणूस ग्रंथाला गुरू मानतो तो एकाकी कधीही असू शकत नाही. वाचनाने श्रवण, वाचन,भाषण,लेखन ही भाषिक कौशल्ये विकसित होतात. वाचनाने विचारक्षमता वाढीस लागते. व्यक्तिमत्व विकासासाठी आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी ग्रंथांचे वाचन विद्यार्थी वर्गाने केले पाहिजे. “भाषा पंधरवडा या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .व्ही .एम शिंदे, उपप्राचार्य डॉ .एस .एफ ढाकणे, उपप्राचार्य डॉ .के.डी. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.