Pune Municipal Corporation | तुमच्या परिसरात नालेसफाई झाली नाही? मग पुणे मनपाच्या या अधिकाऱ्यांना फोन करा

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Municipal Corporation | तुमच्या परिसरात नालेसफाई झाली नाही? मग पुणे मनपाच्या या अधिकाऱ्यांना  फोन करा 

 

| महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे आवाहन 

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या  (PMC Pune) वतीने दरवर्षी नाले सफाईची (Drainage cleaning) कामे केली जातात. पावसाळा (Monsoon) सुरु होण्याअगोदर कामे होणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी (PMC commissioner) ही बाब फारच गंभीरपणे घेतली आहे. तुमच्या परिसरात नाले सफाई झाली नसेल तर सरळ महापालिका उपायुक्तांना  (PMC Deputy commissioner) फोन करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांनी केले आहे.  (Pune Municipal Corporation)

पुणे शहराच्या विविध भागात  नाले सफाई, पावसाळी लाईन (Drainage Line) इत्यादींची कामे झालेली नसतील किंवा करावयाची शिल्लक असल्यास अशा पुणे शहरातील ठिकाणांची कामे पूर्ण होण्याकरिता या ठिकाणांची माहिती फोटो, जीपीएस लोकेशनसह (GPS Location) पुणे महानगरपालिकेचे उप आयुक्त महेश पाटील (आपत्ती व्यवस्थापन विभाग यांना 9689930531 (PMC deputy commissioner Mahesh patil) आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने (Disaster Management officer Ganesh sonune) यांना 9689935462 या मोबाईल नंबरवर पाठवा असे आवाहन पुणे महानगरपालिकेचे प्रशासक तथा पुणे  महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे. (PMC Pune news)

पुणे महानगरपालिका क्षेत्रात लवकरच पाऊस चालु होणार आहे. तयारीचा भाग म्हणून पुणे महापालिकेच्या हद्दीतून वाहणारे विविध नैसर्गिक प्रवाह / नाले व ओढे, मलःनिस्सारण वाहिन्या, पावसाळी लाईन व चेंबर्स इत्यादी मान्सूनपुर्व साफ-सफाई करण्याचे काम पुणे महापालिकेच्या मलःनिस्सारण विभागाकडून सुरू आहे. पुणे शहरात एकूण 433 नाले असून त्यांची लांबी 625 किलोमीटर इतकी आहे. पावसाळी लाईन 260 किलोमीटर असून 58 हजार 859 पावसाळी चेंबरची संख्या आहे. सदरील नाले सफाई व पावसाळी लाईन/चेंबर मान्सूनपुर्व कामकाज दि.५ जून २०२३ अखेर पुर्ण होणे अपेक्षित आहेत. त्यापार्श्वभुमीवर पुणे महापालिककडून आवाहन करण्यात आले आहे. (PMC Pune Marathi News)
—-
News Title | Pune Municipal Corporation |  No drainage in your area?  Then call these officials of Pune Municipality