PMC Contract Employees | ESIC | कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी हेळसांड नको, अशी मागणी करत कामगार युनियनची निदर्शने!

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Contract Employees | ESIC | कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी हेळसांड नको, अशी मागणी करत कामगार युनियनची निदर्शने!

PMC Contract Employees | ESIC |  पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) कंत्राटी कामगारांच्या (Contract Employees) प्रमुख प्रश्नांबाबत आज ई.एस.आय.सी.(ESIC) ऑफिस-बिबवेवाडी, येथे निदर्शने करण्यात आली. मोठ्या संख्येने कंत्राटी कामगारांनी  उपस्थित राहत निदर्शन यशस्वी पार पाडले. या वेळी शिष्टमंडळाने वैद्यकीय अधीक्षक डॉ.बन्सल यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली आणि विविध मागण्या केल्या. (PMC Contract Employees | ESIC)
खालील प्रश्नांवर चर्चा करण्यात आली :-
1) ई.एस.आय.सी. (ESIC) ची वेतन मर्यादा 21,000 रुपये वरुन वाढवुन 35,000 रुपये केली पाहिजे.
2) ई.एस.आय.सी. (ESIC) ने  खाजगी हॉस्पिटलच्या सुविधा नाकारणारे, दि.-28-04-2023 रोजी काढलेले आदेश रद्द करुन नविन सुसज्ज हॉस्पिटल सुरु होईपर्यंत पुर्विप्रमाणे खाजगी हॉस्पिटलच्या सुविधा देण्यात याव्यात.
3) पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत कार्यरत असणार्‍या सर्व कंत्राटी कामगारांना ई.एस.आय.सी. (ESIC) कार्ड, ई-पेहचान कार्ड, त्वरीत मिळाली पाहिजे.
वरील सर्व प्रश्न लक्षात घेऊन त्यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वसन यावेळी देण्यात आले. अशी माहिती कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आली.
—-

ESIC Benefit | PMC Contract employees | कंत्राटी कामगारांना ईएसआईसी चे फायदे देण्यासाठी महापालिका पुढाकार घेईल| शिवाजी दौंडकर

Categories
Breaking News PMC social पुणे

 कंत्राटी कामगारांना ईएसआईसी चे फायदे देण्यासाठी महापालिका पुढाकार घेईल| शिवाजी दौंडकर

पुणे मनपा (PMC Pune) मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी (Contract employees) कामगार राज्य महामंडळाचे (ESIC) फायदे कसे घ्यावेत या संदर्भामध्ये मनपा व कामगार राज्य विमा महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामगार सल्लागार तथा सह महापालिका आयुक्त शिवाजी दौंडकर (Labor Adviser and Joint Municipal Commissioner Shivaji Daundkar) आश्वासन दिले कि पुणे महानगरपालिका सर्व कंत्राटी कामगारांना ईएसआईसी चे फायदे देण्यासाठी पुढाकार घेईल व प्रयत्न करेल. (Pune Municipal corporation)

या कार्यशाळेमध्ये ई एस आय सी चे पुणे रिजनचे उपनिदेशक हेमंत पांडे , डेप्युटी संचालक चंद्रकांत पाटील, तर मनपाचे कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर, कामगार अधिकारी नितीन केंजळे, अरुण खिलारी हे उपस्थित होते. ही कार्यशाळा कामगार नेते व इ एस आय सी चे स्थानीय सल्लागार समितीचे सदस्य सुनील शिंदे (Sunil Shinde) यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.(PMC Pune)

या कार्यशाळेमध्ये हेमंत पांडे यांनी ईएसआयसी च्या वेगवेगळ्या कायद्याबाबत माहिती दिली. चंद्रकांत पाटील यांनी वेगवेगळे लाभ कसे घ्यावेत या संदर्भातले सविस्तर प्रेझेंटेशन दिले. शिवाजी दौंडकर यांनी पुणे महानगरपालिका सर्व कंत्राटी कामगारांना ईएसआईसी चे फायदे देण्यासाठी पुढाकार घेईल व प्रयत्न करेल असे सांगितले. सुनील शिंदे यांनी एस आय सी चे लाभ घेण्यासाठी त्याची नोंदणी सर्व कामगारांनी तात्काळ करून घ्यावी व त्याचे लाभ व नोंदणी करण्यासाठी संघटनेच्या कार्यालयामध्ये मोफत संगणक व मार्गदर्शक नेमण्यात येणार असून त्याद्वारे सर्व कंत्राटी कामगारांनी एस आय सी चा लाभ घ्यावा. असे आवाहन यावेळी केले. त्याचबरोबर ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी मनपाचे आयुक्त विक्रमकुमार व अतिरिक्त आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांनी परवानगी दिल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले.

केंजळे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यशाळेचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे करण्यात आले होते. यासाठी मोठ्या संख्येने पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार हे उपस्थित होते. (ESIC)