Congress | Fuel price hike | हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरल ठेवून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरल ठेवून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन

सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीच्या (fuel price hike) निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी व रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आज हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडचे कार्यालय येथे काँग्रेस पक्षाच्या (congress party) वतीने अनोखे आंदोलन (agitation) करण्यात आले.

हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरेल ठेवून गेल्या सहा महिन्यात झालेल्या इंधन वाढीची माहिती बॅनर वर लिहून मोर्चा हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन पुणे मुख्य कार्यालयाकडे पोहोचला.

या ठिकाणी केंद्र सरकारच्या विरुद्ध घोषणा देण्यात आले.यावेळी बोलताना वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की सहा महिन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव 129 डॉलर प्रति बॅरल होते. त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर शंभर रुपयापेक्षा अधिक होते. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर प्रति बॅलर 76 डॉलर ते 80 डॉलरच्या दरम्यान आहे. असे असताना सुद्धा आज पेट्रोलचा भाव 106 रुपये तर डिझेलचा भाव 94 रुपये प्रतिलिटर आहे.यामुळे सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. केंद्र सरकारने जनतेच्या हिताकरिता त्वरित पेट्रोल आणि डिझेलचे दर 70 रुपये प्रति लिटर करावे,अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण शहरभर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना माजी गृराज्यमंत्री प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे चे भाव वाढले आहे. सर्व तेल कंपन्यांकडे तेलाचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. रशियाने भारतला कच्च्या तेलाचा साठा पुरवला आहे. कच्च्या तेलाचे साठा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे भारत इंधन फ्रान्स, हॉलंड व अनेक देशांना निर्यात करीत आहे.एकीकडे इंधन निर्यात करून तेल कंपनी व सरकार मोठ्या प्रमाणावर नफा मिळवत आहे आणि दुसरीकडे कच्च्या तेलाचे भाव कमी असताना सुद्धा ग्राहकांना जास्तीच्या दराने इंधन देत आहे हे अन्याकारक आहे. काँग्रेसपक्ष नेहमी जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करत असते जर केंद्र सरकारने इंधन चे दर कमी केले नाही तर काँग्रेस पक्षातर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल.

यानंतर काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापक श्री मनीष अग्रवाल यांना भेटून निवेदन दिले.

याप्रसंगी नगरसेवक रवींद्र धंगेकर अविनाश बागवे,नरुद्दीन सोमजी, रमेश अय्यर,प्रशांत सुरसे, शेखर कपोते, शाबिर खान,चेतन आगरवाल, मंजूर शेख, शिलार रतनगिरी, स्वाती शिंदे,कान्होजी जेधे, बबलू कोळी, सुनील घाडगे ,प्रदीप परदेशी, दया आडगळे,रोहित अवचिते, अंजली सोलापुरे, दिलीप थोरात ,संगीता थोरात, रॉबर्ट डेव्हिड,क्लेमेंट, लाजरस , सुनील बावकर , हुसेन शेख ,अस्लम बागवान , रामदास मारणे, सुरेश कांबळे, फैयाज शेख, विपुल उमंदे, सोनिया ओव्हाळ,सनी ओव्हाळ, मंगला चव्हाण, व असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protest against fuel and diesel price hike : इंधन व डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

इंधन व डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन

पुणे : केंद्र सरकार अन्यायकारक पद्धतीने करत असलेल्या इंधन व डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

“२०१४ साली महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांचे भांडवल करत भारतीय जनता पार्टी सत्तेत आली. सत्तेत आल्यानंतर मात्र ज्या सर्वसामान्य भारतीयांनी भारतीय जनता पार्टीला सत्तेत बसवले, त्या सर्वसामान्य जनतेचा मात्र भाजपला विसर पडला.त्यावेळेस ३००/- रुपयांना मिळणारा सिलेंडर आज तब्बल १०००/- रुपयांवर गेला आहे. पेट्रोल,डिझेल यांच्या दराने शंभरी पार केली आहे. तरीसुद्धा सातत्याने दररोज हे दर वाढवून सर्वसामान्यांची सामान्यांची लुटमार ही सुरूच आहे. निवडणुका आल्या की दर स्थिर ठेवायचे, निवडणुका गेल्या पुन्हा सर्व सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकायचा, हीच खरी भाजपची नीती आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आता भाजपला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. इथून पुढच्या काळात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारास पराभूत करत महागाई विरोधातला हा राग आपण व्यक्त करावा” असे आवाहन शहराध्यक्ष  शांत जगताप यांनी या आंदोलन प्रसंगी केले.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी गॅस सिलेंडरला प्रतीकात्मक पद्धतीने फासावर लटकवले. तसेच “मोदी तेरा अजब खेल सस्ती दारु, मेहेंगा तेल”, “मोदी सरकार हाय हाय” , “सर्व सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.


आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,प्रवक्ते प्रदीप देशमुख, संदीप बालवडकर, महिला शहराध्यक्षा मृणालिनी वाणी, संतोष फरांदे, उदय महाले, काकासाहेब चव्हाण, संतोष नांगरे, गणेश नलावडे, महेश हांडे, दिलशान आतार, अनिता पवार, शिल्पा भोसले यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Yuvasena : इंधन दरवाढी निषेधार्थ युवा सेने काढलेल्या सायकल रॅलीला चांगला प्रतिसाद 

Categories
Political पुणे महाराष्ट्र

इंधन दरवाढी निषेधार्थ युवा सेने काढलेल्या सायकल रॅलीला चांगला प्रतिसाद

: मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित

पुणे: केंद्र सरकारने केलेल्या अवास्तव इंधन दरवाढीविरोधात निषेध नोंदविण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवासेनेतर्फे इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसेनेचे व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

: सारसबागेपासून झाली सुरुवात

पुण्यामध्ये या सायकल रॅलीला सारसबाग येथून सुरुवात झाली. पुढे बाजीराव रोडमार्गे शनिपार, अप्पा बळवंत चौकातून उजवीकडे वळून फरासखाना, दगडूशेठ मंदिर, समाधान चौक, पुन्हा उजवीकडे वळून लक्ष्मीरोड येथून अलका टॉकीज चौक, खंडूजी बाबा चौक येथे रॅलीची समाप्ती झाली.

यावेळी युवासेना महाराष्ट्र सहसचिव किरण साळी, पुणे शहर पदाधिकारी युवराज पारीख, सनी गवते, आकाश शिंदे, अक्षय फुलसुंदर, परेश खांडके, ज्ञानंद कोंढरे, कुणाल धनवडे, दशरथ किरीड, चेतन चव्हाण, मनीषा वाघमारे, कुणाल पवार, मनीष घरत व युवासैनिक उपस्थित होते

‘हेच का अच्छे दिन?’ असा सवाल करत युवासेनेतर्फे इंधन दरवाढी विरोधात निषेध नोंदवण्यात आला. अच्छे दिनचा नारा देऊन केंद्रात विराजमान झालेल्या मोदी सरकारने दीपावलीच्या तोंडावर जनतेला महागाईच्या दरीत लोटून अधिक संकटात टाकले असल्याचा आरोप देखील यावेळी निषेध कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. यावेळी युवासेनेने इंधन दरवाढीचा निषेध करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

युवासेनाप्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या माध्यमातून इंधन दरवाढ विरोधात सायकल रॅली आंदोलनाचे आयोजन केले गेले. संपूर्ण राज्यांतील जनतेच्या मनातील आक्रोश केंद्र सरकारपर्यंत पोहचवण्याकरिता याचा तीव्र निषेध म्हणून युवासेनेने सायकल रॅली काढली होती. रविवारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन झाले.

Yuvasena : Cycle Rally :इंधन दरवाढी विरोधात युवा सेनेच्यावतीने राज्यव्यापी ‘सायकल रॅली’चे आयोजन

Categories
Political पुणे महाराष्ट्र

इंधन दरवाढी विरोधात युवा सेनेच्यावतीने राज्यव्यापी ‘सायकल रॅली’चे आयोजन

: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे करणार नेतृत्व

पुणे – इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. ऐन दिवाळीत सामान्य माणसाचे दिवाळे निघणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात युवासेनेकडून रविवारी (दि.31) राज्यव्यापी सायकल रॅली काढण्यात येणार आहे. याचे नेतृत्व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे करणार आहेत.

पुणे शहर युवा सेनेच्यावतीने इंधन दरवाढीचा सायकल रॅलीद्वारे तीव्र निषेध करण्यात येणार आहे. सारसबाग येथे सकाळी 10.30 वाजता या सायकल रॅलीला सुरुवात होणार आहे. सिलाई चौक, शनिपार, अप्पा बळवंत चौक येथून उजवीकडे वळून फरासखाना, दगडूशेठ मंदिर, समाधान चौक, पुन्हा उजवीकडे वळून लक्ष्मीरोड येथून खंडूजी बाबा चौक येथे रॅलीची समाप्ती होणार आहे.

 

संपूर्ण राज्यभरात युवा सेनेच्यावतीने ही सायकल रॅली आयोजित करण्यात येणार आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई ही वाढते आहे. त्यामुळे केंद्र सरकारला जागे करण्यासाठी ही सायकल रॅली काढण्यात येणार आहे.

या सायकल रॅलीमध्ये आपल्या न्यायासाठी विद्यार्थी, तरुण-तरुणीसह पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युवा सेनेने केले आहे.