PMC Monorail Project  | नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोथरूड थोरात उद्यान मधील मोनोरेल प्रकल्प होणार नाही | महापालिका आयुक्त

Categories
Breaking News PMC Political पुणे

PMC Monorail Project  | नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोथरूड थोरात उद्यान मधील मोनोरेल प्रकल्प होणार नाही | महापालिका आयुक्त

|खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोथरूड मधील नागरिकांची आयुक्तांशी बैठक

| युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन

 

PMC Monorail Project – (The Karbhari News Service) –  शहरातील कोथरूड परिसरात असणाऱ्या थोरात उद्यान (Thorat Garden Pune) या ठिकाणी मनपाच्या वतीने मोनोरेल प्रकल्प (PMC Monorail Project) साकारत असून यामुळे सदर ठिकाणी झाडांची कत्तल केली जाणार असुन तसेच या उद्यान्यामधे यांत्रिकीकरण केले जाणार आहे. यामुळे उद्यान्यामधे मोकळा श्वास घेण्याकरिता जागा शिल्लक राहणार नाही, तसेच विकसित केलेले पदपथ, विरंगुळा केंद्र, लहान मुलांसाठी खेळणी आदी अनेक सुविधा काढाव्या लागणार आहेत. याचमुळे  प्रकल्पास नागरिकांतून विरोध होत असून कोथरूड मोनोरेल विरोधी कृती समिती आणि आदरणीय खा. वंदनाताई चव्हाण (MP Vandana Chavan) यांच्यावतीने या प्रकल्पाचे काम थांबवण्यात यावे, यासाठी मनपा आयुक्तांची (Dr Rajendra Bhosale IAS)  भेट घेण्यात आली. युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी (Girish Gurnani) यांच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी भेटीदरम्यान थोरात उद्यानाच्या सोबत मुठा नदी काठ सुशोभीकरण कामाबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. (Pune PMC News)

The Karbhari - Thorat Garden pune

कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ असणारे थोरात उद्यान हे अत्यंत जुने आणि प्रशस्त अशा ठराविक उद्यानांपैकी एक ऑक्सिजन हब आहे. थोरात उद्यान गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना चालण्यासाठी मोकळी जागा आणि मोकळा श्वास घेण्यासाठी आहे. खुली व्यायामशाळा, विरंगुळा केंद्र, लहान मुलांसाठी खेळणी, पदपथ अशा सुविधा या ठिकाणी मनपातर्फे विकसित करण्यात आल्या असून यामुळे हे उद्यान नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनले आहे.

परंतु गेल्या काही दिवसांपासून सदर ठिकाणी पुणे मनपाच्या मोटर वाहन विभागातर्फे मोनोरेल साकारण्यासाठी या ठिकाणी नागरिकांच्या इच्छेविरुद्ध काम सुरू करण्यात आले आहे. सदर कामासाठी अनेक वृक्षांची कत्तल केली जाणार असून या ठिकाणी बांधकाम केल्याने नागरिकांना मिळणारी मोकळी जागाही कमी होणार आहे. दोन बोगीच्या या मोनोरेलसाठी तब्बल ४०७ मीटरचा ट्रॅक बांधला जाणार असून नागरिकांतून याबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे. यामुळे आपण नैसर्गिक अधिवास नष्ट करून सिमेंटचे नवे जंगल उभारत आहोत, याचा लवलेशही मनपाला नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.

वाढते शहरीकरण आणि पुणे शहराचा गुदमरणारा श्वास तसेच प्रदूषण वाढत असताना निव्वळ मनोरंजनासाठी नागरिकांचा विरोध पत्करून नागरिकांसाठी केले जाणारे हे विकासकाम रोखण्यात यावे, अशी मागणी आज खा. वंदनाताई चव्हाण यांनी मनपाचे नवनियुक्त आयुक्त श्री. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन नागरिकांचे म्हणणे पटवून दिले. मोनोरेल या गोंडस नावाखाली निसर्गाला ओरबाडण्याचे पापकर्म आपण करत असून नागरिकांची कोणतीही मागणी नसल्याने उलटपक्षी विरोध असल्याने सदर प्रकल्पाचे काम त्वरित थांबवण्यात यावे, अशी विनंती कृती समितीच्या वतीने नागरिकांनी केली. यावेळी आयुक्तांनी नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोणताही उपक्रम राबविण्यात येणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.

त्याचप्रमाणे खडकवासला धरण क्षेत्राच्या लगत वाढत असलेल्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात तेथील मैला पाणी खडकवासला धरणामध्ये मिसळत आहे. याबाबत सुद्धा लवकरात लवकर मार्ग काढणे आवश्यक आहे ही बाब सुद्धा  आयुक्त  यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

या दोन्ही स्थितींमध्ये आपण विकास साधत असताना ज्या निसर्गात वास्तव्य करतो, त्या निसर्गाकडे सहजासहजी दुर्लक्ष करून पर्यावरणाचा समतोल ढासळत आहोत, याची कल्पना आदरणीय आयुक्तांना देण्यात आली. भविष्यातही कोणताही उपक्रम हाती घेतल्यानंतर शाश्वत विकास साधला जावा आणि नागरिकांचे कायमस्वरूपी कल्याण चिंतून निर्णय प्रक्रिया पार पडावी, ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या दोन्ही मुद्द्यांवर आदरणीय आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोणताही उपक्रम न राबविण्याचा तसेच पर्यावरणीय विचार करण्याचा शब्द दिला आहे.

या वेळी नितीन कदम ,श्वेता यादवाडकर, स्वप्नील दुधाने, किरण आढागळे, सुनील जानोरकर थोरात उद्यान वाचवा कृती समितीचे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Monorail Project Pune |  थोरात उद्यानातील मोनोरेल प्रकल्पास विरोध!

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Monorail Project Pune |  थोरात उद्यानातील मोनोरेल प्रकल्पास विरोध!

| राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार) कोथरुड विधानसभा मतदारसंघाने विचारले प्रश्न

 

पुणे – ( The Karbhari News Service) – Monorail Project Pune | राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार) कोथरुड विधानसभा मतदारसंघाचा थोरात उद्यानातील मोनोरेल प्रकल्पास विरोध केला आहे.

कोथरूड येथे मध्यवस्तीत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अनेक वर्षांपासून थोरात उद्यान नामक सुंदर, मोठे आणि मनमोहक असे पुणे मनपाचे एक उद्यान स्थित आहे. हे उद्यान गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना चालण्यासाठी मोकळी जागा आणि घेण्यासाठी मोकळा श्वास देत आले आहे. खुली व्यायामशाळा, विरंगुळा केंद्र, लहान मुलांसाठी खेळणी, पदपथ अशा सुविधा या ठिकाणी मनपातर्फे विकसित करण्यात आल्या असून यामुळे हे उद्यान नागरिकांच्या सोयीचे बनले आहे.

परंतु गेल्या काही दिवसांपासून सदर ठिकाणी मोनोरेल साकारण्यासाठी पुणे मनपाच्या मोटार वाहन विभागातर्फे काही बांधकाम सुरू करण्याचे नियोजन आहे. या ठिकाणी प्रस्तावित मोनोरेलसाठी वृक्षांची कत्तल केली जाणार असून अनेक ठिकाणी बांधकाम करणेही मनपाला आवश्यक आहे. यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असून विरोधही केला जात आहे.

सदर ठिकाणी नागरिकांतून कोणतीही मागणी नसताना हा प्रकल्प साकारला जात आहे. असे युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी म्हणाले.

या प्रकल्पामुळे पर्यावरणीय नुकसान तर अटळ असून याचसह मनपातर्फे आजवर विकसित करण्यात आलेल्या सुविधाही हटवल्या जातील, ज्यामुळे आजवर या सुविधांवर नागरिकांच्या कररूपी निधीतून केलेला खर्च पाण्यात जाणार आहे. एक सुजाण नागरिक म्हणून या प्रकल्पाला विरोध करत नैसर्गिक उद्यान चिरंतन ठेवणे, हे नक्कीच आमचे कर्तव्य आहे.

त्वरित हा प्रकल्प थांबवण्याची सूचना केली असून असे न केल्यास भविष्यात जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही गुरनानी यांनी दिला.

MLA Sunil Kamble | NCP Youth Kothrud | भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे

MLA Sunil Kamble | NCP Youth Kothrud | भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

 

MLA Sunil Kamble | NCP Youth Kothrud |भाजपा आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble MLA BJP) यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP Youth Kothrud) कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरूनानी (Girish Gurnani) यांनी अनोखे आंदोलन केले.

या वेळी कोथरूड मध्ये ठिकठिकाणी बॅनर लावून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सुनील कांबळे यांचा निषेध व्यक्त केला. ससून हॉस्पिटल उद्घाटन कार्यक्रमांमध्ये स्टेजवरून उतरत असताना तोल जाऊन पडणाऱ्या सुनील कांबळे यांना सावरणाऱ्या पोलिसाच्या कानशिलात लगावल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप आमदार आमच्या रक्षकांचे भक्षक बनले असल्याच्या घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने यावेळी जनतेचे लक्ष वेधून घेतले. अध्यक्ष गिरीश गुरूनानी यांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितले की हा एका पोलिस कर्मचाऱ्याचा नसून संपूर्ण महाराष्ट्र पोलिसाचा व त्याबरोबरच सामान्य जनतेचाही अपमान आहे. जर ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी मीडिया व कॅमेरा असताना आणि जनतेने गजबजुन भरलेल्या समारंभाच्या ठिकाणी भाजप आमदार असे वागत असतील तर जनतेने विचार करायला हवा की हे त्यांच्याशी कसे वागतील असेही गिरीश गुरूनानी यांनी सांगितले.

भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरूनानी यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवली आहे.

या वेळी राष्ट्रवादी युवक चे ऋषिकेश शिंदे,तेजस बनकर,सचिन यादव,आयुष बोडके,स्वप्नील धारिया,पृथ्वी दहिवाळ,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…

Kothrud Vidhansabha Constituency | कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नूतन कार्यकारिणीचा पद वाटप कार्यक्रम

Categories
Breaking News Political पुणे

Kothrud Vidhansabha Constituency | कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नूतन कार्यकारिणीचा पद वाटप कार्यक्रम

Kothrud Vidhansabha Constituency | पुणे :  शहर कोथरूड विधानसभा मतदारसंघातील (Kothrud Vidhansabha Constituency) नूतन कार्यकारिणीचा पद वाटप कार्यक्रम काल संपन्न झाला. मा. खा. वंदनाताई चव्हाण, मा. पुणे शहराध्यक्ष श्री. प्रशांतदादा जगताप, मा. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. अंकुश अण्णा काकडे, पुणे शहर महिला अध्यक्षा मा. मृणालिनी ताई वाणी, पुणे शहर युवक अध्यक्ष मा. किशोरजी कांबळे, पुणे शहर युवती अध्यक्षा मा. सुषमा ताई सातपुते आणि पुणे शहर विद्यार्थी शहराध्यक्ष मा. विक्रम जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

शरद पवार यांच्या  पुरोगामी विचारांचा वसा एका पिढीकडून नव्या पिढीच्या नव्या शिलेदारांकडे हस्तांतरित करताना विशेष आनंद झाला. याप्रसंगी कोथरूड विधानसभेचे विविध सेलचे आम्ही सारे पदाधिकारी एका व्यासपीठावर एकत्र येऊन हा कार्यक्रम संपन्न झाल्याने नूतन कार्यकारिणीचा आत्मविश्वास वाढण्यास सहाय्य झाले. भविष्यात अशाच एकजुटीने आणि आत्मविश्वासाने आम्हा सर्वांना एकत्र येऊन आपल्या महाराष्ट्रासाठी आणि पर्यायाने आपल्या देशासाठी कार्य करायचे आहे.

यावेळी कोथरूड विधानसभेचे युवक अध्यक्ष मा. गिरीश गुरनानी, महिला अध्यक्षा ज्योतीताई सूर्यवंशी, विद्यार्थी अध्यक्ष आदिराज कसबे, युवती अध्यक्षा ऋतुजा गायकवाड, ओबीसी सेल अध्यक्ष संतोष चव्हाण, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विनोद हणवते या सर्वांनी स्वतःची कार्यकारणी जाहीर करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पद वाटप करण्यात आले.

यावेळी आदरणीय शरद पवार साहेब, सुप्रियाताई, जयंतरावजी पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक जोमाने आम्हा सर्वांना काम करायचे असून त्या अनुषंगाने सर्वांनीच आपले अनुभव कथन करत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारी व कर्तव्यांची जाणीव करून दिली. तसेच हे शिवधनुष्य पेलण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोत, असा विश्वासही दर्शविण्यात आला.

NCP Youth Kothrud | प्रा. नामदेवराव जाधव यांच्या विरुद्ध तक्रार | कोथरूड युवक राष्ट्रवादीच्या वतीने दिले निवेदन

Categories
Breaking News Political social पुणे

NCP Youth Kothrud | प्रा. नामदेवराव जाधव यांच्या विरुद्ध तक्रार

| कोथरूड युवक राष्ट्रवादीच्या वतीने दिले निवेदन

NCP Youth Kothrud | समाजात तेढ निर्माण करणे तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी प्रा. नामदेवराव जाधव यांच्या विरोधात कोथरूड येथील युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष गिरीश गुरनानी (Girish Gurnani) यांनी कोथरूड पोलीस स्टेशन (Kothrud Police Station) येथे तक्रार नोंदवली आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जाधव यांनी अनेक व्हिडिओ तसेच मुलाखती प्रसार माध्यमांच्या मार्फत प्रकाशित केल्या होत्या ज्यामध्ये त्यांनी मराठा समाजाला आरक्षण न मिळण्याचे कारण असल्याचा ठप्पा शरद पवार यांच्यावर ठेवला आहे. तसेच काही वादग्रस्त व टोकाची भूमिका घेणारे शब ही वापरले आहेत. मराठा आणि इतर मागासवर्गीय समाज यांच्या मध्ये संघर्ष निर्माण करणारे अनेक वक्तव्य केल्याचे तसेच शरद पवार यांचे नाव वारंवार घेऊन अनेक बिनबुडाचे आरोप त्यांच्यावर केले असल्याचे नमूद करत गुरनानी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

कोथरूड पोलीस स्टेशन येथे निवेदन देत नामदेवराव जाधव यांच्यावर फौजदारी गुन्हा भा. द. वी. कलम १९७, १५३, १५३(अ), १५३(ब), २९५(अ), २९८, ४९९, ५००, ५०३, ५०४, ५०५ (२) प्रमाणे दाखल करावा अशी मागणी केली आहे. असे न केल्यास सदरील व्यक्ति जोमाने जाती धर्माच्या नावाखाली सोशल मीडिया वर खोटी व बनावट माहिती प्रसारित करुन तरुणांना दंगली घडविण्यासाठी प्रोत्साहित करेल याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची राहील हे ही गुरनानी यांनी नमूद केले.

या वेळी कोथरूड सामाजिक न्याय विभागाचे विनोद हनवते आणि राष्ट्रवादी युवतीच्या ऋतुजा देशमुख देखील उपस्थित होत्या….

Jayant Patil | Kothrud | राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे कोथरूड मध्ये जल्लोषात स्वागत 

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

Jayant Patil | Kothrud | राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे कोथरूड मध्ये जल्लोषात स्वागत

 

Jayant Patil | Kothrud | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील  (Jayant Patil) यांनी कोथरूड मधील प्रमुख गणेश मंडळांना भेट दिली. रात्री ९ वाजता एरंडवने मित्र मंडळाची गणपतीची आरती करून त्यांनी कोथरूड मध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी कोथरूड मतदारसंघच्यावतीने (NCP Kothrud)  भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले होते.

पौड फाटा ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक,आझाद नगर,गुजरात कॉलनी, वनाज कॉर्नर,जय भवानी नगर,या भागातील अनेक मंडळांना प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी भेट दिल्या .राष्ट्रवादी काँग्रेस चे कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाने व युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी (Girish Gurnani) यांनी रॅली चे व कोथरूड मंडळ भेटीचे नियोजन केले होते.

कोथरूड मध्ये सर्व भागात प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.अनेख नागरिकांनी फोटो काढले.लहान मुलां-मुलींनी सेल्फी घेतल्या.

या वेळी सिध्दार्थ मित्र मंडळाच्या वतीने जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते शिव सन्मान पुरस्कार डॉ मेजर विपुल पाटील यांना देण्यात आला.

या वेळी शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप ,सचिन भाऊ तावरे,किशोर भाऊ कांबळे,ज्योती ताई सूर्यवंशी,नंदिनी पाणेकर,स्वप्नील खवले,ऋषिकेश शिंदे,अमोल गायकवाड,प्रमित गोरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते….

Chandani Chaowk Flyover | NCP Pune| चांदणी चौक (एनडीए चौक) प्रकल्पातील रस्त्यांचे अर्धवट कामे असताना उद्घाटनाची घाई का करण्यात आली? | राष्ट्रवादी कॉंग्रेस चा सवाल

Categories
Breaking News Political पुणे

Chandani Chaowk Flyover | NCP Pune| चांदणी चौक (एनडीए चौक) प्रकल्पातील रस्त्यांचे अर्धवट कामे असताना उद्घाटनाची घाई का करण्यात आली? | राष्ट्रवादी कॉंग्रेस चा सवाल

Chandani Chaowk Flyover | NCP Pune | कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे  सर्व सेल  अध्यक्ष यांनी राष्ट्रीय महामार्गाचे उपमहाप्रबंधक व परियोजना निदेशक (तांत्रिक) एस.एस. कदम  यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चांदणी चौक प्रकल्पातील अर्धवट रस्त्यांच्या कामांबाबत तसेच नव्याने काही महत्त्वाचे अत्यावश्यक विकासकामे या ठिकाणी करण्याबाबत प्रत्यक्ष भेटून सविस्तर निवेदन देण्यात आले. (Chandani Chaowk Flyover | NCP Pune)
याप्रसंगी  कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष  स्वप्नील दुधाने (Swapnil Dudhane), युवक अध्यक्ष  गिरीश गुरनानी (Girish Gurnani), कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या महिला अध्यक्षा  ज्योती सूर्यवंशी (Jyoti Suryavanshi), कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या युवती अध्यक्षा ऋतुजा देशमुख (Rutuja Deshmukh) उपस्थित होते. दोनच दिवसांपूर्वी चांदणी चौकामध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहिल्यानंतर निदर्शनास आलेल्या गोष्टी खालील निवेदनामध्ये प्रामुख्याने नमूद करण्यात आल्या आहेत.
१) पुणे शहराचे मुख्य प्रवेशव्दार समजले जाणारे राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील (नवे नामकरण एनडीए चौक) अनेक रस्त्यांचे जवळ पास १७ किलोमीटर रस्ते विकसित करण्याच्या – प्रकल्पाचे उद्घाटन दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी पार पडले.
संपूर्ण चौक हा भुलभुलैया झाला असून अनेक वर्षापासुन चांदणी चौक कोथरूड परिसरात – राहणारे नागरिक सुध्दा दिशादर्शक फलक स्पष्ट नसल्याने रस्ता चुकत आहे. आपण लावलेले छोटे फ्लेक्स व चुकीच्या दिशादर्शक फलकांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमा-अवस्था असुन योग्य दिशादर्शक फलक हे चौक व रस्ते सुरु होण्यापुर्वी काही अंतरावर लावावे जेणे करुन वाहनचालकांना याबाबत स्पष्ट कळेल.
२) वेद भवन समोर सुरु असलेले नवीन भुयारी मार्गाच्या कामामुळे कामामुळे मुंबईकडे व साताराकडे जाणाऱ्या मुख्य राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या वाहतुक कोंडीचा होणारा त्रास कमी करण्याकरिता कायमस्वरूपी वाहतुक वार्डनची नेमणुक करावी.
३) राष्ट्रीय महामार्गालगत विकसित केलेल्या एकाही रस्त्यालगत (१७ रस्ते) नागरिकांकरिता एकही फुटपाथ अथवा पादचारी व्यवस्था करण्यात आलेली नाही. “म्हणजे आपण पादचारी नागरिकांचा विचार सुध्दा केलेला दिसत नाही. तरी या बाबत राष्ट्रीय नवा महामार्ग वगळता खालील व बाजुच्या सेवारस्त्यावर नव्याने त्वरित फुटपाथ, पादचारी व्यवस्था उभारुन नागरिकांची गैरसोय दुर करावी ही विनंती.
४) राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर, चांदणी चौका मध्ये पडलेले खड्डे, आजुबाजुचे मोठ-मोठे राडारोडाचे ढीग उचलुन संपुर्ण चौकातील रस्त्यांवरील अर्धवट कामे पुर्ण करावीत.
५) मुळशीकडुन सातारा कडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर पुन्हा आपण नव्याने आरसीसी पडदी व रस्त्याचे काम चालु केल्याचे निदर्शनास दिसते आहे. या ठिकाणी मुळशीकडुन सातारा कडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर उतरण्याकरिता केलेल्या पुलावरील तीव्र उतार असल्यामुळे वाहनांची वेग मर्यादा जास्त असल्याचे पाहण्यास मिळाले त्यामुळे भविष्यात अपघात होण्याचे प्रकार होऊ शकतात यावर योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.
६) राष्ट्रीय महामार्गावर म्हणजेच बरोबर चांदणी चौक पुलाखाली अनेक नागरिक कोल्हापुर-सातारा कडे जाण्याकरिता वाहनांची प्रतिक्षा करत थांबलेले दिसतात. तसेच या ठिकाणी रिक्षांचा थांबा सुध्दा अनधिकृत पणे उभा असल्याचे दिसते. हे अतिशय धोकादायक असुन सदर स्पॉट संपुर्ण पणे मानव विरहित असणे आवश्यक आहे. भविष्यात अनुचित प्रकार घडु नये या करिता येथे कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात.
७) सेवारस्त्यालगत खोदलेल्या डोंगराचे कठडे हे धोकादायक असून बऱ्याच ठिकाणी या कठड्यांवर कॉक्रीट अथवा जाळीत बसविल्याने हे लुज झालेले दगड कधीही पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या डोंगर कठडयाला लागुन सेवारस्ता असल्याने वाहनांवर व नागरिकांवर पडण्याची भिती निर्माण झाली आहे.
८) सर्वात म्हत्वाचे म्हणजे आपण या संपूर्ण प्रकल्पाच्या विविध ठिकाणी केलेली रंगरंगोटी व सुशोभिकरणाचा दर्जा इतका खराब आहे की महिन्या पूर्वी केलेली ही सर्व कामे काही वर्षापुर्वीची असलेली वाटत आहेत. हा संपूर्ण चांदणी चौक प्रकल्प पुणे शहराचे मुख्य प्रवेशव्दार असल्याने या ठिकाणी पडलेली राडारोडाचे ढीग, अर्धवट कामे, वाहतुक कोंडी, सुशोभिकरणाचे  रंगरंगोटीचे दर्जाहीन काम, नागरिकांसाठी चालण्याकरिता न केलेली फुटपाथची कामे, दिशादर्शक फलकांची व्यवस्था नसल्याने हा संपुर्ण प्रकल्पाचा नागरिकांना उपयोग नाही तर मनस्ताप होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
त्यामुळे संभ्रमित झालेल्या वाहनचालकांचा, स्थानिक कोथरुड करांचा आपल्यास प्रश्न आहे की कामे अपूर्ण असतानाही उद्घाटन का उरकले ? असा सवाल करण्यत आला आहे.

Sign Campaign | Manipur Violence | मणिपूर हिंसाचारात महिलांवर झालेल्या अत्याचाराला जबाबदार कोण?? | एक सही संतापाची मोहीमेला सर्व पक्षीयांची उपस्थिती

Categories
Breaking News Political पुणे

Sign Campaign | Manipur Violence | मणिपूर हिंसाचारात महिलांवर झालेल्या अत्याचाराला जबाबदार कोण?? | एक सही संतापाची मोहीमेला सर्व पक्षीयांची उपस्थिती

Sign Campaign | Manipur Violence |  मणिपूर मधील हिंसाचाराच्या  व महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात “एक सही मणिपूर हिंसाचाराच्या व महिलांवरील अत्याचाराच्या विरोधाची.. संतापाची..”  कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड गावठाण,  छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोथरूड या ठिकाणी सोमवार रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजक गिरीश गुरनानी अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा, राम थरकुडे युवा सेना प्रमुख पुणे शहर आणि  राज जाधव अध्यक्ष NSUI कोथरूड यांनी कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने युवकांचा व परिसरातील नागरिकांचा सहभाग होता. (Sign Campaign | Manipur Violence)
या प्रसंगी प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुशआण्णा काकडे, आमदार श्री.रवींद्र धंगेकर,माजी आमदार श्री. चंद्रकांत मोकाटे,राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरजभैय्या शर्मा, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, संगीताताई तिवारी, आमिर शेख, स्वप्नील दुधाने,योगेश मोकाटे,किशोर कांबळे ,आदी मान्यवर उपस्थित होते.

Mi Sharad Mitra | NCP Youth | मी शरद मित्र मोहिमेची कोथरूड मधून सुरुवात

Categories
Breaking News Political पुणे

Mi Sharad Mitra | NCP Youth | मी शरद मित्र मोहिमेची कोथरूड मधून सुरुवात

Mi Sharad Mitra | NCP Youth |  कोथरूड विधानसभा (Kothrud Constituency) मधे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पुढाकाराने आज “मी शरद मित्र” (Mi Sharad Mitra) या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.  ही संकल्पना कोथरूड राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील दुधाणे आणि युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी (Girish Gurnani) यांनी राबविली आहे. आज या अभियानाची सुरुवात होत असताना पुढील चार दिवस कोथरूड मतदार संघातील विविध प्रभागातील जवळपास ९ ठिकाणी ही सदस्य नोंदणी अभियान होनार आहे. (Mi Sharad Mitra | NCP Youth)
मध्यंतरी झालेल्या राजकीय उलथापालथी च्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी असलेल्या मतदारांमध्ये समन्वय साधण्याची मुहूर्तमेढ या माध्यमातून होईल तसेच पवार साहेबांचे पुरोगामी विचार मतदार संघातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या सदस्य नोंदणी अभिनंदन होणार आहे असे कोथरूड राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वप्नील दुधाणे यांनी सांगितले. (Pune News)
महाराष्ट्रात प्रथमच ही संकल्पना राबविण्यात येत असल्याचे युवक राष्ट्रवादीच्या गिरीश गुरनानी यांनी सांगितले. तसेच या मोहिमेतून लोकांची पवार साहेबांप्रती असलेले प्रेम व आदर भावना व्यक्त होण्यास माध्यम मिळेल असेही ते म्हणाले. (NCP Campaign)
या प्रसंगी प्रशांत जगताप तसेच अंकुश काकडे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या वेळी माध्यमांशी बोलत असताना प्रशांत जगताप यांनी स्वप्नील दुधाणे व गिरीश गुरनानी यांची प्रशंसा केली व म्हणाले की ही अभिनव कल्पना जी या दोघांच्या इच्छाशक्ती आणि सहेबांप्रतीच्या प्रेमातून जन्मली आहे ती संपूर्ण पुण्यात 100 ठिकाणी राबविण्यात येणार असून या माध्यमातून ५ लाख शरद मित्र जोडले जाण्याची संकल्पना आहे.
अंकुश काकडे यांनीही या मोहिमेचे कौतुक करत असताना वडीलधाऱ्या व्यक्तीला त्यांच्या या वयात सोडून जाने योग्य नाही असे सांगीतले.  मी शरद मित्र कल्पनेतून साहेबांचे नवीन योद्धे तयार होतील व याचा प्रभाव येणाऱ्या निवडणुकांमध्ये नक्कीच दिसेल असे ही ते म्हणाले.
या कार्यक्रम प्रसंगी पक्षाचे मा.नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने, अजिंक्य पालकर,दीपक कामठे,ज्योती सूर्यवंशी,सिताराम तोंडे पाटील, प्रमोद शिंदे, अमोल गायकवाड, ऋतुजा देशमुख , किशोर शेडगे, नंदिनी पानेकर व आदी पदधिकारी/ मान्यवर उपस्थित होते.
———
News Title | Mi Sharad Mitra | NCP Youth | Me Sharad Mitra campaign started from Kothrud

Sambhaji Bhide | NCP Youth | संभाजी भिडे यांनी गांधीजी बद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक कडून निषेध

Categories
Breaking News Political social पुणे

Sambhaji Bhide | NCP Youth | संभाजी भिडे यांनी गांधीजी बद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक कडून निषेध

| कोथरूड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्याबाबत निवेदन

Sambhaji Bhide | NCP Youth | महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या बद्दल चुकीचे विधान केल्या प्रकरणी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर्ती गुन्हा दाखल व्हावा,  असे निवेदन राष्ट्रवादी युवक (NCP youth Kothrud) काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने कोथरूड पोलीस स्टेशन चे सिनिअर पी आय हेमंत पाटील यांना देण्यात आले. कोथरूड विधानसभा युवक  अध्यक्ष गिरीश गुरनानी (Girish Gurnani) यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले आणि कठोर कारवाही ची मागणी करण्यात आली. (Sambhaji Bhide | NCP Youth)
संपूर्ण भारत देशाचे गौरव असलेले महात्मा गांधीजी ज्यांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष केला,अशा या महापूरशाबाबत बेताल वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. संभाजी भिडे यांनी आताच नव्हे तर असे बऱ्याचदा महपूर्षांवर्ती व महिलांवरती बेताल वक्तव्य करून देशात अशांती निर्माण करण्याचे प्रयत्न केला आहे असे गुरनानी म्हणाले. त्यातच त्यांनी जे आपले महापुरुष म्हणून आपण ज्यांना संबोधित करतो असे आपले बापू म्हणजेच महात्मा गांधी यांचा अपमान केला आहे.हा फक्त महात्मा गांधीचाच अपमान नसून संपूर्ण भारत देशाचा अपमान आहे असे निवेदनात गिरीश गुरनानी यांनी म्हंटले आहे. (Mohandas Karamchand Gandhi)
या अपमानास्पद वत्व्यामुळे संभाजी भिडे यांच्यावर कलम ५०४,५०५ व २६८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा असे निवेदनात गुरनानी यांनी म्हंटले आहे. संभाजी भिडे यांच्यावरती त्वरित कारवाही करावी जेनेकरून यापुढे कोणीही कुठल्याही प्रकारचे महापुरुषांबद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर करून, समाजामध्ये आणि नागरिकांमध्ये तेढ निर्माण होणार नाही. (Sambhaji Bhide News)
या वेळी राष्ट्रवादी युवकचे अमोल गायकवाड,ऋषेकेश शिंदे,तेजस बनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
——-
News Title | Sambhaji Bhide | NCP Youth | Nationalist youth protest against Sambhaji Bhide’s statement about Gandhiji