NCP | Pune | पुण्यात राष्ट्रवादी कडून जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुण्यात राष्ट्रवादी कडून जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन

महाराष्ट्रातील लाखो तरुणांचा आशेचा किरण असणारी पोलीस भरती रद्द केल्याच्या निषेधार्थ तसेच राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला पळविल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लाल बहादूर शास्त्री रोड येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

“राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने महाराष्ट्रातला युवक बेरोजगार केला आहे. राज्यात युवकांचे भवितव्य अधिक गडद होत असल्या बाबत पालकांच्या पोटाला पीळ पडला आहे अनेक मोठमोठे उद्योग बाहेर पाठवले गेले , पोलीस भारतीचा बनाव करून युवक निराश झाला आहे.महाराष्ट्राचे पुढील भवितव्य अंधारात आहे याची खंत वाटते महाराष्टाच्या हिताचे निर्णय घेण्यास हे सरकार अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रात अनेक लोकांहिताचे प्रश्न आ वासून उभे आहेत. युवक बेरोजगारीने हंबरडा फोडत आहेत. आजपर्यंत आपला पोशिंदा राजा बळीराजा पूर्ण पणे कोलमडला आहे. लाखो आत्महत्या पहायला मिळत आहेत. आता वेळ आली आहे या महाराष्ट्रातला युवक वर्ग बेरोजगारीने पिचला जात असून त्यांच्या हाताला काम देण्याचे धोरण सरकार कडे नाही. हे चित्र बदलण्यात शिंदे सरकार कडे ठोस कुठलेही धोरण नाही” , असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

याचा निषेध करत राष्ट्रवादी युवक च्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले. “शिंदे फडणवीस खातात महाराष्ट्राची भाकरी करतात गुजराती चाकरी” , “द्या आमच्या रोजगाराची हमी, बंद करा गुजरातची गुलामी” , “पन्नास खोके महाराष्ट्राला धोके” अशा घोषणांनी यावेळी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, ” राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे – फडणवीस सरकारने तरुणांचा पूर्णपणे भ्रमनिरास केला असून, कुठलाही नवीन प्रकल्प त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे मागण्याची शिंदे फडणवीस सरकारमध्ये इच्छाशक्ती नसताना राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात आलेले प्रकल्प देखील यांना टिकवता आलेले नाही. त्यामुळे खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या अडचणीत सापडल्या असून त्याच बरोबर महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली पोलीस भरती देखील या सरकारने स्थगित करून तरुणांच्या शासकीय नोकऱ्यांचा मार्ग देखील बिकट केला आहे. राज्यातील सुशिक्षित तरुणवर्गास राज्य शासनाकडून मोठ्या अपेक्षा असतात या अपेक्षा पूर्ण करण्यात शिंदे सरकारला पूर्णपणे अपयश आले असून लवकरात लवकर या सर्व भरत्या घेण्यात याव्या यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने आम्ही घेत आहोत”.

या आंदोलन प्रसंगी शहराघ्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, किशोर कांबळे,मनोज पाचपुते,अजिंक्य पालकर, श्रीहरी दबडे,बापू डाकले , संगीता बराटे , गिरीष गुरुनानी , आनंद सागरे,गजानन लोंढे , कुलदीप शर्मा,योगेश सुतार, मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP Pune | Agitation | महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळविण्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निषेध आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळविण्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निषेध आंदोलन

राज्यात नव्याने सुरू झालेल्या “मुंबई – अहमदाबाद रोजगार भगाओ एक्सप्रेस” चे चालक व मालक शिंदे व फडणवीस सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मामलेदार कचेरी येथे आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीच्या निवेदनानुसार वेदांता फॉक्सकॉन,मरीन अकॅडमी, बल्क ड्रग पार्क,मेडिकल डिवाईस पार्क हे सर्व मोठे उद्योग महाराष्ट्र बाहेर गुजरातला हलवल्यानंतर आता टाटा एअरबस प्रकल्प देखील बडोद्याला पळविण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात उत्कृष्ठ इन्फ्रास्ट्रक्चर, चोवीस तास वीज, मुबलक पाणी व सुशिक्षित तरुण या सगळ्या सोयीच्या गोष्टी असताना देखील, या राज्यातून प्रकल्प बाहेर जात आहेत. कारण राज्यातील सत्ताधारी सरकार जरी महाराष्ट्र सरकार असले तरी, केंद्रातील गुजराती मालकाच्या इशाऱ्यावर काम करणारे सरकार असून, राज्यातील जनतेच्या हितापेक्षा केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांचे हित जपणे हे या सरकारचे आद्य कर्तव्य असल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे.

महाराष्ट्रातील प्रकल्प इतरत्र जात असल्याने राज्यातील तरुणांचे मोठे नुकसान होत आहे.टाटा-एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातच होणे गरजेचे होते. महाराष्ट्रातील प्रकल्प पळविले जाताय, ही महाराष्ट्रातील नागरिकांसाठी चिंताजनक बाब आहे.सुमारे २२ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेला एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात होणे अपेक्षित असतांना सदरचा प्रकल्प गुजरातला होत आहे.

महाराष्ट्रात येणारे अनेक महत्वाचे प्रकल्प हे इतर राज्यात पळविले जात आहे, ही बाब महाराष्ट्रातील युवकांसाठी अतिशय चिंताजनक बाब असून असेच जर चालत राहिले तर जसे बिहार – उत्तर प्रदेश मधून तरुण रोजगारासाठी महाराष्ट्रात येतात तसे महाराष्ट्रातील तरुणांना देखील गुजरातमध्ये कंपन्यांच्या गेट उभे राहावे लागेल, इतिहासात अशी वेळ महाराष्ट्र राज्यावर कधीही आलेली नाही.परंतु आता ही वेळ येण्याची शक्यता वाटत आहे.

“शिंदे फडणवीसांच्या स्वप्नातील महाराष्ट्रात तरुणांनी केवळ आरत्या, मोर्चे, दहीहंडी, आणि फटाके फोडणे हेच आहे का …? याचा खुलासा देखील राज्याच्या मुख्यमंत्री – उप मुख्यमंत्र्यांकडून होणे गरजेचे आहे.
महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीत काम करणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सद्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किमान कुठलाही प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही. तसेच अधिक गुंतवणूक येईल याकडे लक्ष द्यावे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला लवकरच मोठा प्रकल्प केंद्राकडून गिफ्ट मिळणार आहे, असे सांगितले. मात्र एकामागे एक प्रकल्प इतरत्र जात आहे. याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असून देशाचे नेते हे संपूर्ण राष्ट्राचे नेते आहे. त्यांनी केवळ गुजरातचे नेते म्हणून मर्यादित राहू नये” असे मत शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

 

या आंदोलनप्रसंगी प्रवक्ते प्रदीप देशमुख , वनराज आंदेकर, महेंद्र पठारे,प्रकाश कदम, फारुक इनामदार, सुधीर कोंढरे, मृणालिनी वाणी,किशोर कांबळे,अजिंक्य पालकर, मनोज पाचपुते,महेश शिंदे,शांतिलाल मिसाळ , गणेश नलावडे, निलेश वरे, महेश हांडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP Youth Congress | महाराष्ट्र सरकार चालवणारेच जर गुजरातची चाकरी करत असतील तर युवकांनी दाद मागायची कोणाकडे..? | राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अभिनव आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकार चालवणारेच जर गुजरातची चाकरी करत असतील तर युवकांनी दाद मागायची कोणाकडे..?

| राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अभिनव आंदोलन

महाराष्ट्र राज्यासाठी महत्त्वपूर्ण, दोन लाख कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातमध्ये नेण्यात आला. राज्यातील युवकांना रोजगार मिळवण्याचे हेतूने अत्यंत महत्त्वाचा असणारा हा प्रकल्प राज्यातून निघून गेल्यामुळे हतबल झालेले युवकांनी बुट पॉलिश करत, रद्दी विकत अभिनव स्वरूपाचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आयोजित केलेले आंदोलनास उपस्थित राहत युवकांच्या मागणीस पाठिंबा दर्शवला व राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारचा निषेध व्यक्त केला.

महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर याचा दीर्घकालीन परिणाम होणार असून महाराष्ट्राच्या हितासाठी राज्य सरकारनं यात तातडीनं हस्तक्षेप करत महाराष्ट्राबाहेर जाणारी गुंतवणूक थांबवत प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी युवकांनी यावेळी केली. वेदांत ग्रुपच्या वतीनं या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्यालाच प्रथम पसंती देण्यात आली होती. तळेगांव येथील कंपनीच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ऑटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी, ‘जेएनपीटी’ बंदराशी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्यानं वेदांत ग्रुपनं तळेगांव येथील एक हजार एकर जागेची निवड केली होती. मात्र राज्यात सत्तांतर होताच महाराष्ट्राच्या हिताचा असणारा हा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये नेण्याचा घाट घातला जात आहे. महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे राज्याचे ‘जीएसटी’चे सुध्दा मोठे नुकसान होईल. हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित केला असून महाराष्ट्रातील तळेगांवच्या तुलनेत ही जागा प्रकल्पाच्या उभारणीसाठी अगदीच सामान्य आहे. भाजपशासित गुजरातचे मुख्यमंत्री व वेदांतचे प्रमुख हे सांमजस्य करार (एमओयू) केले आहेत , महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे,असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक सचिन दोडके ,प्रदीप गायकवाड ,युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे,मनोज पाचपुते,अजिंक्य पालकर,उदय महाले,नानासाहेब नलावडे,भूषण बधे, गोविंद जाधव,कुलदीप शर्मा,अमोल ननावरे,राकेश कामठे ,महेश हांडे,मयूर गायकवाड,स्वप्निल जोशी,किरण खैरे ,गजानन लोंढे,पूजा काटकर आदी पदाधीकारी उपस्थित होते.

Vedanta Foxconn project | महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठीच वेदांता गुजरातला हलविला  |खासदार सुप्रिया सुळे | राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार आंदोलन

Categories
Breaking News Commerce Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठीच वेदांता गुजरातला हलविला  |खासदार सुप्रिया सुळे

| राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार आंदोलन

पुणे – वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार बुडाला आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी कऱण्यासाठी वाटेल ते केले जात असून हा प्रकल्प गुजरातला हलविण्यामागे हीच मनोवृत्ती कारणीभूत आहे. मराठी माणूस व महाराष्ट्राच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी राज्याला गंभीर मुख्यमंत्र्याची गरज असून गरज पडली तर दोन मुख्यमंत्री नेमा पण मराठी तरुणांचा रोजगार हिसकावून घेऊ नका अशी खोचक टिपण्णी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यातील स प महाविधालय, टिळक रोड येथे आयोजित आंदोलनात सुप्रियाताई सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती दिल्लीपुढे न झुकण्याची राहिली आहे, परंतु सध्याच्या ईडी सरकारचे सर्व निर्णय दिल्लीत होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात नवीच संस्कृती उदयास येत आहे असेही सुप्रियाताई म्हणाल्या. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले. घोषणाबाजी करुन त्यांनी आसमंत दणाणून सोडला.
या आंदोलनात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदिप देशमुख म्हणाले की, राज्यातील एक ते सव्वा लाखांहून अधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता असणारा सुमारे १ लाख ५८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. महाविकास आघाडी सरकारने सर्व काही सुरळीतपणे पार प्रक्रिया पार पाडून हा प्रकल्प महाराष्ट्रात साकारण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे काम केले होते. परंतु राज्यातील सत्तांतरानंतर खोके संस्कृतीचे पाईक असणाऱ्या ईडी सरकारने तरुणांच्या हक्काचा घास हिरावून घेतला आहे.

सदर आंदोलनात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उपरोधिक पध्दतीने ढोल ,ताशे व नगारे वाजवून पुढील काळात राज्यातील मोठ मोठे उद्योग रोजगार जर असेच परराज्यात गेले तर आम्हाला फक्त दहीहंडी व इतर सभा समारंभा मध्ये सामील होवून ढोल वाजवणे एवढेच काम शिल्लक राहणार आहे त्याची आम्ही आतापासूनच तयारी सुरू केली आहे अशी उदिग्न प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली
या सदर आंदोलनात प्रवक्ते प्रदीप देशमुख सौ मृणालिनी वाणी,सौ अश्विनी कदम,दीपक जगताप,विक्रम जाधव,विशाल तांबे,संतोष नांगरे,नाना नलावडे , काका चव्हाण वैष्णवी सातव,रत्ना नाईक,अश्विनी भागवत ,मनीषा होले,रोहन पायगुडे , फईम शेख व इतर कार्यकर्ते मोठेया संख्येने उपस्थित होते.

7 th pay commission | 9 लाखांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाची भेट | डीएमध्ये 3 टक्के वाढ

Categories
Breaking News Commerce Education देश/विदेश

7 th pay commission | 9 लाखांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाची भेट | डीएमध्ये 3 टक्के वाढ

 7 व्या वेतन आयोग DA वाढ: 7 व्या वेतन आयोगाच्या (7 व्या वेतन आयोग) अंतर्गत, गुजरात सरकारने 15 ऑगस्ट रोजी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ केली.
 7 वा वेतन आयोग DA Hike: गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यातील 9 लाखांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी बातमी दिली आहे.  7व्या वेतन आयोगाअंतर्गत (7वा वेतन आयोग) राज्य सरकारने 15 ऑगस्ट रोजी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ केली.  यासोबतच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत उपलब्ध कल्याणकारी योजनांमध्येही विस्ताराची घोषणा करण्यात आली आहे.  राज्यातील स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर बोलताना पटेल यांनी लोकांना सर्व गोष्टींपेक्षा त्यांच्या हृदयात राष्ट्रहिताची भावना जागृत करण्याचे आवाहन केले.

 DA (महागाई भत्ता) कधी वाढणार?

 मुख्यमंत्री पटेल म्हणाले की, 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत (7 व्या वेतन आयोग) गुजरात सरकारी कर्मचार्‍यांचा DA (महागाई भत्ता) तीन टक्क्यांनी वाढवला जात आहे आणि ही वाढ 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल.
 राज्य सरकार, पंचायत सेवेतील सुमारे 9.38 लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार असल्याचे ते म्हणाले.  यामुळे राज्य सरकारच्या आर्थिक भारात वार्षिक सुमारे 1,400 कोटी रुपयांची वाढ होणार आहे.

 NFSA योजनेचा विस्तार केला

 पटेल यांनी NFSA कार्डधारकांसाठी प्रति कुटुंब योजनेत प्रति कार्ड एक किलो हरभरा (मसूर) वाढविण्याविषयी सांगितले आणि कायद्यांतर्गत लाभार्थींचा समावेश करण्यासाठी उत्पन्न मर्यादा पात्रता निकष वाढविण्याची घोषणा केली.
 ते म्हणाले की, राज्यातील सर्व 250 तालुक्यांतील 71 लाख NFSA कार्डधारकांना प्रति कार्ड एक किलो हरभरा (मसूर) सवलतीच्या दराने देण्यात येईल.  सध्या ५० विकसनशील तालुक्यांतील लोकांनाच योजनेचा लाभ मिळत आहे.
 वाढीव उत्पन्न मर्यादा
 यासोबतच त्यांनी सांगितले की, NFSA योजनेत समावेश करण्यासाठी उत्पन्न मर्यादा वाढवून 15,000 रुपये प्रति महिना करण्यात आली आहे.  सध्या ते 10,000 रुपये आहे.

WHO : Corona Death : कोरोना मृत्यू मोजण्याच्या पद्धतीवर वाद : WHO चे प्रमुख देणार गुजरातला भेट 

Categories
Breaking News Political आरोग्य देश/विदेश

कोरोना मृत्यू मोजण्याच्या पद्धतीवर वाद

: WHO चे प्रमुख देणार गुजरातला भेट

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या कोरोनामुळे झालेल्या रुग्णांचे मृत्यू मोजण्याच्या पद्धतीवर भारताने आक्षेप घेतल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओ प्रमुख गुजरातला भेट देणार आहेत. WHO चे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयसस (Dr Tedros Ghebreyesus) हे सोमवारी गुजरातच्या तीन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत.

यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घेब्रेयसस18 एप्रिलला राजकोटला पोहोचतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते जामनगरमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. येथे ते WHO च्या ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन (GCTM) च्या पायाभरणी समारंभाला उपस्थित राहतील.राजकोटचे जिल्हाधिकारी महेश बाबू यांनी रविवारी सांगितले की, GCTM ही पारंपारिक औषधांसाठी जगातील पहिली आणि एकमेव जागतिक आऊटपोस्ट असेल. ते म्हणाले की, गेब्रेयसस गुरुवारी गांधीनगरला जाणार आहेत. याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आयुष इंन्व्हेस्टमेंट आणि इनोव्हेशन शिखर परिषदेत होणार आहे.
मॉरिशसचे पंतप्रधानही देणार भेट
 राजकोटचे महापौर प्रदिव दाव यांनी सांगितले की, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ हे देखील सोमवारी राजकोटला पोहोचणार आहेत. येथे त्यांचे विमानतळावर सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्वागत करण्यात येणार आहे. त्यांच्या सन्मानार्थ विशेष सांस्कृतिक कार्यक्रम तयार करण्यात आल्याचे डाव यांनी सांगितले. ठिकठिकाणी खास होर्डिंग्जही लावण्यात आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, भारताने याबाबत सदस्य देशांशी आपली चिंता व्यक्त केली आहे. याबाबत WHO ला सहा पत्रेही लिहिली आहेत. खरं तर, नुकत्याच आलेल्या न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार भारत WHO ला कोरोनामुळे जगभरातील मृत्यूची संख्या सार्वजनिक करण्यापासून रोखत आहे. या रिपोर्टमध्ये भारतात कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांचा अधिकृत आकडा 5.20 लाख आहे. तर, WHO च्या अंदाजानुसार, या महामारीमुळे देशात 40 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. या आकडेवारीवरून काँग्रेस पक्षाने केंद्रावर प्रश्न उपस्थित केले आहेत.कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीमुळे मृत्यूची गणना करण्याच्या WHO च्या पद्धतीवर भारताने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेभारत सरकार म्हणते की विशाल भौगोलिक आकार आणि मोठ्या लोकसंख्येच्या आपल्या देशात मृत्यूचा अंदाज लावण्यासाठी कोणतेही गणितीय मॉडेल वापरणे योग्य असू शकत नाही.