Har Ghar Tiranga | ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमांतर्गत पालकमंत्र्यानी निवासस्थानी उभारला राष्ट्रध्वज | नागरिकांना उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Har Ghar Tiranga | ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमांतर्गत पालकमंत्र्यानी निवासस्थानी उभारला राष्ट्रध्वज | नागरिकांना उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

Har Ghar Tiranga | स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळ्याच्या निमित्ताने   १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) (Har Ghar Tiranaga) उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी केले. पालकमंत्री श्री.पाटील यांनी स्वतः उपक्रमाचा शुभारंभ कोथरुडमधील आपल्या निवासस्थानी राष्ट्रध्वज (National Flag) उभारुन केला आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. (Har Ghar Tiranga)
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची सांगता  ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमाने होत असून त्याचाच एक भाग म्हणून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम गतवर्षीप्रमाणे राबविण्यात येत आहे. गतवर्षी या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. प्रत्येक देशवासीयांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन आपला देशाभिमान व्यक्त करण्यास स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करावे, असे आवाहन केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आले आहे.
९ ऑगस्ट रोजी ‘माझी माती माझा देश’ अंतर्गत संपूर्ण देशात स्वातंत्र्य योद्ध्यांना स्मरण करून पंचप्रण शपथ घेण्यात आली. गावपातळीवर यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून यात सहभागी होताना  पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज आपल्या कोथरुडमधील निवासस्थानी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना दिली.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. हजारो स्वातंत्र्य योद्ध्यांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे या अमृतमहोत्सवी वर्षात सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण केले जात आहे. त्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. प्रत्येकांनी यात सहभागी व्हावे, आणि आपला हा उत्सव आनंदाने उत्साहाने साजरा करावा. तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या योद्ध्यांना स्वातंत्र्य स्मरण करावे. राष्ट्रध्वज फडकवताना त्याचा सन्मान राखला जाईल याची दक्षता घ्यावी , असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Har Ghar Tiranga | PMC Pune | प्रत्येक पुणेकराने आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Har Ghar Tiranga | PMC Pune | प्रत्येक पुणेकराने आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

| पुणे महापालिकेकडून पालकमंत्र्यांना राष्ट्रध्वज सुपूर्द

Har Ghar Tiranga | स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा ९ ऑगस्टपासून सर्व देशभर सुरू झाला असून, प्रत्येक पुणेकराने ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) उपक्रमांतर्गत आपल्या घरी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज (National Flag) उभारुन मानवंदना द्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी केले. (Har Ghar Tiranaga | PMC Pune)
पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) पालकमंत्री श्री. पाटील यांना आज राष्ट्रध्वज सुपूर्द करुन शहरात राष्ट्रध्वज वाटप (National Flag Distribution) उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापालिकेच्या कोथरुड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त केदार वझे, आरोग्य निरीक्षक गणेश साठे, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. (Pune Municipal Corporation News)
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राष्ट्र म्हणून एकत्रितपणे घरोघरी राष्ट्रध्वज फडकविणे हे राष्ट्र उभारणीसाठीच्या आपल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. लोकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे आणि आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल अभिमानाची भावना वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. (Pune News)
 गेल्या वर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्व भारतीयांना प्रत्येक घरी आपला राष्ट्रध्वज उभारुन स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करावे असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानंतर गेल्यावर्षी प्रत्येक घरावर तिरंगा उभारला गेला. यंदा अमृतमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा आहे. त्यामुळे सर्व देशवासीयांनी आपल्या घरी पुन्हा तिरंगा उभारुन राष्ट्रध्वजाला मानवंदना द्यावी असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे.
0000
News Title | Har Ghar Tiranga | PMC Pune | Every Punekar should raise the national flag at his house and salute him! | Appeal of Guardian Minister Chandrakantada Patil

Har Ghar Tiranga | Procure National Flags for “Har Ghar Tiranga” Campaign at Rs. 25 from Post Offices

Categories
Breaking News cultural social देश/विदेश महाराष्ट्र

Har Ghar Tiranga | Procure National Flags for “Har Ghar Tiranga” Campaign at Rs. 25 from Post Offices

Har Ghar Tiranga | For the coming Independence Day on 15th August, 2023, the Government of India has launched “Har Ghar Tiranga” Campaign 2.0. All Citizens are encouraged to participate in hoisting the National Flag in their homes. (Har Ghar Tiranga)

In this campaign, the Department of Posts is the agency for sale and
distribution of quality National Flags at the rate of Rs. 25/- per flag.
Department of Posts is requesting all Government/Private Institutions,
Corporations, Local Bodies to communicate to them their requirement of National Flags from 10th August.  For bulk sale orders of flags please contact Panaji Head Office and Margao Head Office Or contact our marketing executive Rajesh Madkaikar Mobile No. 9890701601.

Archana patil | महिलांच्या भव्य तिरंगा ध्वज दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

महिलांच्या भव्य तिरंगा ध्वज दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे: स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानाला सुरुवात करण्यात आली. या पार्श्वभूमीवर प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवावा आणि स्वातंत्र्य दिनाचा उत्सव व्हावा असे आवाहन  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केले होते. देशाबद्दल प्रत्येकाला अभिमान वाटावा आणि त्यांच्यात देशभक्तीची भावना जिवंत राहावी यासाठी पुणे शहराच्या भारतीय जनता पक्षाच्या महिला अध्यक्षा सौ. अर्चना तुषार पाटील यांच्या माध्यमातून आज महिलांसाठी भव्य तिरंगा ध्वज रॅलीचे आयोजन केले होते.

यावेळी कार्यकर्ते, नागरिक आणि असंख्य महिलांचा सहभाग होता. यावेळी शहाराध्यक्ष जगदीशजी मुळीक आणि उमाताई खापरे यांच्या हस्ते ध्वज फडकावून रॅलीला सुरुवात करण्यात आली.
जंगली महाराज रस्ता येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली. शहरभरातून सुरू झालेल्या या रॅलीचा डेक्कन- दत्तवाडी- सिंहगड रस्ता- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समारोप झाला.

देशाप्रती असलेल्या प्रेम, अभिमान, आदर या भावनेतून असंख्य नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला. या जनजागृतीतून ‘हर घर तिरंगा’ या अभियानाची खरी पूर्तता होणार असल्याची भावना पुणे शहराच्या भारतीय जनता पक्षाच्या महिला अध्यक्षा अर्चना तुषार पाटील यांनी व्यक्त केली.

Har Ghar Tiranga | बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण भागात ११,००० तिरंगा वाटपाचा संकल्प | अमोल बालवडकर फाऊंडेशनचा उपक्रम

Categories
Breaking News cultural Political social पुणे

बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण भागात ११,००० तिरंगा वाटपाचा संकल्प

| अमोल बालवडकर फाऊंडेशनचा उपक्रम

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण भागात ११,००० तिरंगा वाटपाचा संकल्प अमोल बालवडकर फाऊंडेशन  आणि भाजपा सक्रिय महिला यांच्या वतीने केला आहे.

याबाबत अमोल बालवडकर यांनी सांगितले कि, आज या अभियानाची सुरुवात योग्य व्यक्तीच्या हाती पहिला तिरंगा देऊन करावी असे मनात होते. या अनुषंगाने आपल्या देशाच्या सेवेसाठी आपल्या मुलाला प्रोत्साहन देणार्या शूरवीराच्या मातोश्री सौ.मित विज यांना पहिला तिरंगा देऊन या अभियानाला सुरुवात झाली. आपल्या प्रभागातील एक युवक लेफ्टनंट गुरप्रितसिंग विज हे भारतीय सैन्य दलात मोलाची कामगिरी बजावत असुन त्यांच्या मातोश्री सौ.मित विज व त्यांचा संपुर्ण परिवार कायमच गुरप्रित सिंग यांना प्रोत्साहन देत असतात. यावेळी गुरप्रित सिंग सैन्य दलात बजावत असलेल्या कर्तव्याबाबत त्यांच्या मातोश्रींकडुन माहिती घेतली.

खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य सैनिक, सीमेवरचे सैनिक किंवा देशसेवा करणारे सगळे लोक जेव्हा देशासाठी आपले योगदान देतात तेव्हा फक्त तेच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण परिवाराचे योगदान मोठे असते. त्यामुळे या सर्वांच्या हिमतीने आणि त्यागामुळे आज देश ताठ मानेने उभा आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या-ज्या सैनिकांनी बलिदान दिले आणि आजही आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी व सेवेसाठी जे-जे सैनिक स्वतःचे मौलिक योगदान देत आहेत अशा सर्व सैनिकांना माझा मानाचा मुजरा! असे ही बालवडकर म्हणाले.

Har Ghar Tiranga | महापालिका खरेदी करणार 5 लाख तिरंगा ध्वज! | 85 लाखांचा येणार खर्च | मेडिकल कॉलेजच्या कामातून  वर्गीकरण केले जाणार 

Categories
Breaking News PMC social पुणे

महापालिका खरेदी करणार 5 लाख तिरंगा ध्वज! | 85 लाखांचा येणार खर्च

| मेडिकल कॉलेजच्या कामातून  वर्गीकरण केले जाणार

पुणे | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत ‘ हर घर तिरंगा ‘ उपक्रम राबविणेकरीता महापालिका 5 लाख तिरंगा ध्वज पायल इंडस्ट्रीज, पुणे यांचेकडून खरेदी करणार आहे. यासाठी  84,82,500 अर्थात  चौऱ्यांऐंशी लक्ष ब्याऐंशी हजार पाचशे रुपये चा खर्च येणार आहे. ही रक्कम मेडिकल कॉलेज साठी प्रस्तावित केलेल्या रकमेतून वर्ग केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या  पर्वानिमित्त दिनांक 12/03/2021 ते दिनांक 5/08/2023 या कालावधीत “आजादी का अमृत महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत केंद्र शासनाने कळविले आहे. त्यानुसार राज्यात सदर कालावधीमध्ये “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याबाबत निर्णय / शासन पत्रांद्वारे यापूर्वीच वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. केंद्र शासनाच्या संस्कृति मंत्रालयाने जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात हावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत 11 ऑगस्ट 2022 ते  17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये देशभरात “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचना एकत्रित करून  राज्य शासनाने शासन परिपत्रक प्रसृत केलेले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत ‘ हर घर तिरंगा ‘ उपक्रम राबविणेकरीता तिरंगा ध्वज पुरविणे या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यात 3 ठेकेदारांनी सहभाग घेतला होता. त्यानुसार पायल इंडस्ट्रीज ने 84 लाख 82 हजार 500 इतका कमी दर दिला होता. त्यामुळे महापालिका संबंधित कंपनीला काम देणार आहे. ही रक्कम मेडिकल कॉलेज साठी प्रस्तावित केलेल्या रकमेतून वर्ग केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. यावर समितीच्या पुढील बैठकीत चर्चा होईल.

Har Ghar Tiranga | हर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न करणार |  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News cultural Political देश/विदेश

हर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न करणार |  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण ठेवत असताना येणाऱ्या काळात भारताला आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा कार्यक्रमाबाबत केद्रींय सांस्कृतिक विभागाशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी उपस्थित होते.

आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बगेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नागालँडचे मुख्यमंत्री नैफीयू रीओ, आसामचे मुख्यमंत्री हिमानता बिस्वा सर्मा यांनी यावेळी आपल्या सूचना मांडल्या.

या बैठकीसाठी मंत्रालयातून मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्रयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते.

हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर लोकसहभाग घेण्यात येणार आहे.आपल्यामधील असलेले राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम या अभियानाअंतर्गत करणार असून राज्यातील शेतकरी, महिला, शाळकरी मुले याबरोरबच स्वयंसेवी संस्था, वेगवेगळया सहकारी संस्था या सर्वांचा सहभाग यामध्ये घेतला जाणार आहे. राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर आणि वार्ड किंवा ग्राम स्तरीय स्तरावर लोकसहभागातून कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या प्रत्येकाची आठवण आपण ठेवणे हे आपल्या प्रत्येकाचे काम असून आजच्या पिढीला त्यांचे महात्म्य, त्यांचे कार्य आणि विचार समजणे यासाठी राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा हे अभियान महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर यशस्वी करण्यात येईल.

हर घर तिरंगा अभियानातून घराघरात देशभक्तीची चेतना निर्माण होईल
■ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

आज भारत वेगवेगळया क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहेत. गेल्या 75 वर्षांत भारताने केलेला प्रवास जगाने पाहिला आहे. पुढील 25 वर्षांमध्ये आपला देश वेगवेगळया क्षेत्रांमध्ये आघाडीवर असणार आहे. आजादी का अमृतमहोत्सव साजरा करताना राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानातून भारतातील प्रत्येक घराघरात देशभक्तीची चेतना निर्माण होईल असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.

श्री. शहा म्हणाले की, हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान देशातील सुमारे 20 कोटी घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार असून संपूर्ण देश भारतमातेच्या सेवेत समर्पित असल्याचा एक संदेश आपण जगाला देणार आहोत. हे अभियान केंद्र शासनाचे जरी असले तरी राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा आणि लोकसहभागाशिवाय हे अभियान अपूर्ण आहे. हर घर तिरंगा अभियानाचा प्रचार आणि प्रसार करणे, अभियानासाठी प्रत्येक घरी तिरंगा पोहोचेल आणि 13 ते 15 दरम्यान घरावर हा तिरंगा फडकेल अशा तीन टप्प्यांमध्ये या अभियानाची पूर्तता होणार आहे. हर घर तिरंगा या अभियान यशस्वी होण्यासाठी प्रत्येक राज्याने राज्यातील प्रत्येक घरासाठी झेंडा मिळेल याची तयारी करावी. 11 ते 14 ऑगस्ट दरम्यान प्रभात फेरीच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्याची लढाई कशी होती याची माहिती प्रभात फेरीच्या माध्यमातून लोकांसमोर नेण्याचा प्रयत्न करण्यात यावा. गावांमध्ये, तालुक्यांमध्ये 1 तास प्रभातफेरी काढण्यात यावी. केंद्र शासनामार्फत सुध्दा वेगवेगळया माध्यमातून राज्यांसाठी झेंडे उपलब्ध करण्यात येणार असून पोस्ट ऑफीसमध्ये सुध्दा तिरंगा मिळणार आहे. केंद्र शासनाने सुरु केलेल्या संकेतस्थळावर आपले फोटो आणि सेल्फी पाठवून आपण या अभियानात मोठया प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. आपल्या शहिदांनी दिलेले बलिदानाची आठवण ठेवत त्यांनी केलेले काम आजच्या पिढीला, तरुण वर्गाला समजावे, माहिती व्हावे आणि आपल्यामध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण व्हावी यासाठीच हर घर तिरंगा हा उपक्रम देशभरात मोठया उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात येणार आहे.भारताने गेल्या 75 वर्षात केलेली प्रगती याबरोबरच पुढील 25 वर्षांत भारत जगात आपली वेगळा कसा ठरेल याचा संकल्प करण्याचा सुध्दा प्रयत्न यामध्ये होणार आहे. संकल्प से सिध्दी या कार्यक्रमाद्वारे भारताची पुढची 25 वर्षातील वेगवेगळया क्षेत्रातील प्रगती यावर लक्ष देण्यात येणार आहेत. कृषी, उत्पादन, सेवा, सहकार , शिक्षण, पायाभूत सुविधा यामध्ये येणाऱ्या काळात भारताची प्रगती जगभरासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास वाटत असल्याचे केंद्रीय गृह मंत्री यावेळी म्हणाले.

आजादी का अमृतमहोत्सव साजरा करणे हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देताना अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान देले आहे. गेल्या 75 वर्षांत भारताने देशाचे स्वातंत्रय मिळविताना अनेक संकटांचा सामना केला मात्र आज जगभरात भारताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. येणाऱ्या काळात ही ओळख टिकवून ठेवत अनेक क्षेत्रातील भारताचे सर्वोच्च स्थान टिकवून ठेवणे यालाच प्राधान्य असणार आहे. येत्या 22 जुलैपासून या अभियानाची सुरुवात होणार असून प्रत्येक राज्याने सुध्दा त्यांच्या त्यांच्या संकेतस्थळावर, फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम अशा सोशल मिडीयावर याबाबत प्रचार आणि प्रसिध्दी सुरु करावी. हर घर तिरंगा याबाबतची माहिती देत असताना वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक मिडीया या माध्यमांचा सुध्दा यामध्ये वापर करण्यात यावा असेही श्री. शहा यावेळी म्हणाले.