PM SVAnidhi Scheme | PMC Pune | फेरीवाल्यासाठी महत्वाची बातमी | कर्ज वाटपासाठी बँकेत कॅम्प चे आयोजन

Categories
Breaking News PMC social पुणे

PM SVAnidhi Scheme | PMC Pune | फेरीवाल्यासाठी महत्वाची बातमी | कर्ज वाटपासाठी बँकेत कॅम्प चे आयोजन

PM SVAnidhi Scheme | PMC Pune |  प्रधानमंत्री स्वनिधी योजने ( PM SVAnidhi Scheme) अंतर्गत १०,०००,२०,००० व ५०,००० हजार रुपया पर्यंत कर्ज वाटपासाठी (Loan Disbursement) २८ ऑगस्ट,  २९ ऑगस्ट,  ३० ऑगस्ट या दिवशी बँकेत कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महापालिका  उपायुक्त्त नितीन उदास (Deputy Commissioner Nitin Udas) यांनी दिली. (PM SVAnidhi Scheme | PMC Pune)
महापालिका उपायुक्त  नितीन उदास यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सर्व बँक अधिकारी व कर्मचारी यांची प्रधानमंत्री स्वनिधी योजने संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानुसार पुणे शहरातील सर्व पथविक्रेते, फेरीवाले, व छोटे मोठे सर्व व्यवसायिक यांना कळविण्यात आले आहे कि प्रधानमंत्री आत्मनिर्भर (पी.एम. स्वनिधी ) योजने अंतर्गत ज्या लाभार्थींनी १०००० रु.चे कर्जासाठी अर्ज केला आहे. अशा लाभार्थी साठी दिनांक २८ ऑगस्ट, २९ ऑगस्ट, ३० ऑगस्ट या तीन दिवशी शहरात बाजीराव रोड, भवानी पेठ, सोमवार पेठ,वडगाव बु. कात्रज, संगमवाडी ,बिबेवाडी, हडपसर या भागातील बँक शाखेमध्ये कर्ज वाटप करण्यासाठी खास कॅम्प चे
आयोजन करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation)
तरी शहरातील ज्या लाभार्थींनी पी. एम. स्वनिधी योजनेचा अर्ज भरला आहे . अशा नागरिकांनी आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक पासबुक घेऊन बाजीराव रोड,भवानी पेठ,सोमवार पेठ, वडगाव बु.कात्रज, संगमवाडी, बिबेवाडी, हडपसर याठिकाणच्या जेथे त्यांचे बँक खाते आहे. त्या शाखेमध्ये उपस्थित रहावे. या दिवशी बँक अधिकारी यांच्याकडून कर्ज मंजूर करून त्याच दिवशी वाटप करण्यात येणार आहे. तरी त्याचा सर्व लाभार्थींनी लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास व जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री कारेगावकर यांनी केले आहे. (PM SVAnidhi Scheme)
त्याशिवाय स्वनिधी से समृद्धी या योजनेतील फॅमिली प्रोफाईलिंगसाठी समाज विकास विभागाला सहकार्य करावे जेणेकरून शासनाच्या विविध कौशल्य प्रशिक्षण व इतर योजनेचा लाभ विक्रेत्यांच्या कुटुंबां पर्यंत पोहचला जाईल. असे ही उदास यांनी म्हटले आहे.
——
News Title | PM SVAnidhi Scheme | PMC Pune | Important news for hawker | Organization of camp in bank for loan disbursement

PMC Encroachment Department | गॅस सिलिंडर वापरणारे पथारी धारक आणि वितरक दोघांवरही गुन्हे दाखल होणार

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Encroachment Department | गॅस सिलिंडर वापरणारे पथारी धारक आणि वितरक दोघांवरही गुन्हे दाखल होणार

| पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सुरु केली तयारी

PMC Encroachment Department | शहरातील पथारी व्यावसायिकांना (Hawker’s) महापालिकेने दिलेल्या परवान्यानुसार पथारीच्या ठिकाणी अन्न पदार्थ शिजविण्यास अथवा तयार करण्यास बंदी आहे. तरीही अनेक पथारी धारक गॅस सिलिंडर (Gas Cylindres) वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा व्यावसायिकांवर महापालिकेकडून (PMC Pune) कारवाई केली जाणार आहे. तसेच, व्यावसायिकाला सिलिंडर देणाऱ्या वितरकावरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत. अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली आहे. (PMC Encroachment Department)

शहरात बंदी असतानाही तसेच महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) कार्यवाही सुरू असतानाही अनेक जण सिलिंडर वापरतच असल्याने प्रशासनाने या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक बोलावली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. शहरात रस्ता-पदपथावर जे पथविक्रेते अनधिकृतपणे सिलिंडरचा वापर करत असताना आढळून आल्यास अशा पथविक्रेत्यांवर सिलिंडर जप्तीची कारवाई करून तसेच संबंधित व्यावसायिकांवर व वितरकांवर पोलिसांमार्फत गुन्हे दाखल करण्याची कारवाई चालू करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी सांगितले.

दरम्यान या कारवाईबाबत जगताप यांच्या नियंत्रणाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिक्रमण विभाग, पोलीस विभाग, अन्न पुरवठा विभाग व गॅस वितरक कंपनीतील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत हा निर्णय संयुक्तपणे घेण्यात आल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. पुणे महापालिकेकडून आतापर्यंत अतिक्रमण कारवाईमध्ये जे व्यावसायिक व्यवसाय करताना सिलिंडरचा वापर करतात, अशा व्यावसायिकांवर 1021 सिलिंडर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. (PMC Pune News)

——

News Title | PMC Encroachment Department | Both the holders and distributors of gas cylinders will be charged| The encroachment department of Pune Municipal Corporation has started preparations

PMC Encroachment Department | कारवाई करण्यासाठी आता पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे FDA ला साकडे!

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Encroachment Department |  कारवाई करण्यासाठी आता पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे FDA ला साकडे!

PMC Encroachment Department | पुणे शहरातील (Pune City) रस्ता-पदपथांवर विविध ठिकाणी अन्न पदार्थ तयार करून विक्री करणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांवर (Illegal Hawker’s) कारवाई करण्याची मागणी पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) अन्न आणि औषध प्रशासनाकडे (FDA)  केली आहे. याबाबत अतिक्रमण विभागाकडून FDA ला पत्र देण्यात आले आहे. (PMC Encroachment Department)

पुणे शहरातील रस्ता -पदपथांवर खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून पावसाळी गटारे व ड्रेनेज
चेंबरमध्ये अनधिकृतपणे सांडपाणी, खरकटे व इतर टाकाऊ पदार्थ सातत्याने टाकले जात असल्यामुळे तेथील चेंबर व ड्रेनेज लाईन तुंबण्याचे प्रकार वारंवार होत असल्याने त्याबाबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी महापालिकेच्या अतिक्रमण कार्यालयाकडे वारंवार येत आहेत. तसेच असे व्यावसायिक रस्ता पदपथांवर उघड्यावर अन्नपदार्थ शिजवून तयार करताना व विक्री करताना कोणतेही स्वच्छते बाबत नियम व अटींचे पालन करत नसल्यामुळे नागरिकांना अस्वच्छ खाद्यपदार्थ विकले जात असल्यामुळे आरोग्यदायी परिस्थिती निर्माण होऊ शकते. असे व्यावसायिक मासे, चिकन-मटण व इतर खाद्यपदार्थ तयार करून विक्री करताना रस्ता-पदपथांवर पडलेले खरकटे अन्न तसेच तेलकटपणा व्यवसायानंतर स्वच्छ करत नसल्यामुळे दुर्गंधी तयार होऊन त्याचा स्थानिक नागरिकांना त्रास होत असतो. असे पथविक्रेते खाद्यपदार्थ तयार करणे करिता ज्वलनशील पदार्थांचा उदा.गॅम-
सिलेंडर, रॉकेल इ. वापर करत असल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी वारंवार दुर्घटना घडत आहेत. (PMC Pune)
तरी शहरातील अशा प्रकरच्या अनधिकृत/अधिकृत पथारी व्यवसायिकांवर FDA मार्फत  तपासणी पथकांमार्फत सातत्याने कारवाया करून त्यांचेवर नियंत्रण ठेवण्याची कार्यवाही करण्यात यावी. तसेच अशा व्यवसायिकांना खाद्यपदार्थ विक्रीबाबतचा FDA चा परवाणा अतिक्रमण कार्यालयाकडील रीतसर लेखी शिफारस घेतल्यानंतरच अपलेकडील परवाना देण्यात यावा. अशी मागणी अतिक्रमण विभागाने FDA कडे केली आहे.  आपले कार्यालयाकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवून त्यांचेवर योग्य ती कारवाई करून केलेल्या कार्यवाही बाबतचा साप्तहिक अहवाल आमच्याकडे पाठवावा. तसेच  या कामी पुणे महानगरपालिकेमार्फत काही मदत लगत असल्यास पुणे मनपाच्या पंधरा क्षेत्रिय कार्यालयांकडे संपर्क साधण्यात
यावा. असे पत्रात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation News)
—-
News Title | PMC Encroachment Department |  Pune Municipal Encroachment Department to FDA now to take action!

CP Pune | PMC Pune | पावसाळ्यात पुणेकरांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्या | पुणे पोलीस आयुक्तांच्या पुणे महापालिकेला सूचना

Categories
Breaking News PMC social पुणे

CP Pune | PMC Pune | पावसाळ्यात पुणेकरांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्या | पुणे पोलीस आयुक्तांच्या पुणे महापालिकेला सूचना

CP Pune | PMC Pune | यावर्षी पावसाळा (Monsoon) सुरु होणेपुर्वी शहरातील वॉटर लॉगींगचे ठिकाणांची (Water Logging Places) व ड्रेनेजच्या झाकणांची (Drainage Covers) पाहणी करा. तसेच रस्त्यावरील खड्यांची (Potholes) पाहणी करुन तात्काळ दुरुस्ती आणि उपाययोजना करुन घेणे उचित होणार आहे. जेणेकरुन वाहतूक कोंडी (Traffic Jam) होणार नाही.  तसेच नागरीकांना नाहक त्रास होणार नाही. अशा सूचना पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Pune Ritesh Kumar) यांनी पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) केल्या आहेत. (CP Pune | PMC Pune)

विकासकाम झाल्यानंतर काळजी घेतली जात नाही

पोलीस आयुक्तांनी महापालिकेला दिलेल्या पत्रानुसार पुणे शहरामध्ये विविध विकासकामे (Devlopment Works) सुरु असुन विविध विकासकामांकरीता रस्ते खोदाई ( ड्रेनेज लाईन / पिण्याचे पाईपलाईन / इलेक्ट्रीसीटी केबल / गॅस लाईन ) करण्यात येते. मात्र काम पूर्ण झालेनंतर त्या कामाकरीता खोदलले रस्ते तात्काळ दुरुस्त केले जात नाहीत. कंपनीने नियुक्त केलेला ठेकेदार खोदलेला रस्ता व्यवस्थित बुजवत नाहीत. खडी, माती टाकून बुजवलेल्या रस्त्यावरुन गाडी गेल्यास रस्ता लगेच खचून तो वाढतच जातो. त्यात पाणी साचल्याने खड्डे तयार होतात व असे खड्डे अपघातास कारणीभूत होतात.  विकास कामांकरीता रस्ते खोदाई झालेनंतर खोदलेला भाग बऱ्याच ठिकाणी तसाच ठेवला जात असून त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठया गैरसोयीला सामोरे जावे लागते. प्रसंगी अपघात होण्याची शक्यता वाढते. (Pune Police)

मेट्रोच्या कामाने अडचणी वाढल्या

पुणे शहरामधील अनेक रस्त्यावर मेट्रोचे कामकाज (Pune Metro) चालु असुन त्या कामाच्या अनषंगाने रस्त्यावर खोदण्याचे कामे करण्यात आलेली आहे. काम पुर्ण झालेनंतर त्याकारीता खोदलेले रस्ते दुरूस्त केले गेलेले नाहीत. त्यामध्ये तात्पुरती खडी, माती टाकुन ते बुजविण्यात येतात. या ठिकाणावरून वाहने जाऊन रस्ता खचला जातो. त्यामुळे मोठा खड्डा होऊन पावसाचे पाणी साठवुन अपघात होण्याची शक्यता असते. मेट्रोच्या कामाचा राडारोडा रस्त्यावर तसाच पडुन वाहतुकीची कोंडी होवुन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मेट्रोच्या कामकाजाकरीता बरेच ठिकाणी बॅरीकेडस् करण्यात आले असुन मेट्रोचे कामकाज पुर्ण झालेनंतरही सदर ठिकाणाचे बॅरीकेडस् तसेच असल्याने वाहतुकीस कॅरेज वे कमी मिळुन अडथळा होवुन पावसाळयामध्ये सदर बॅरीकेडस् चुकविण्यात पावसाच्या पाण्यामुळे वाहने घसरून अपघात होतात. मेट्रोच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेली मशिनरी रोडवर तशीच ठेवण्यात आलेली आहे.  त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असुन वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. (Pune Municipal Corporation News)

वाहनचालकांना करावी लागते कसरत

विविध कामांमुळे रस्त्यांची दूरावस्था होवून त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, पादचाऱ्यांना नेहमी जीव मुठीत घेवून रस्त्यावर चालावे लागत आहे. अनेक भागात सांडपाण्याची वाहिनी तुंबल्यामुळे अगर फुटल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचल्यामुळे रस्ता वाहतूकीस उपलब्ध होत नाही. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. अनेक ठिकाणी ड्रेनेजची तुटलेली झाकणे, रस्त्यावर अर्धवट बाहेर आलेली झाकणे यामुळे अपघातास निमंत्रण ठरते व रस्त्यावरचे खड्डे व अशी तुटलेली झाकणे चुकविण्याचे नादात वाहनचालकांचे वाहनावरचे लक्ष विचलीत होवून पायी चालणाऱ्या नागरिकांचा तसेच इतर वाहनचालकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. (Pune police commissioner)

अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई आवश्यक

पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी फुटपाथ, रस्ते या ठिकाणी विशेषतः शहराचे मध्यवर्ती भागात मोठया प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत परिणामी वाहतूकीस रस्ता कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने वाहतूक
कोंडीच्या घटना घडत आहेत, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अशा ठिकाणी वाहनचालक रस्त्यातच वाहन उभे करीत असतात, फुटपाथवर झालेल्या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालावे लागते त्यामुळेही अपघात होण्याची शक्यता वाढते. याकरीता अशी अतिक्रमणे काढण्यात येवून फेरीवाले, पथारीवाले यांचेवर दैनंदिन कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना फुटपाथवरुन चालणे शक्य होवून पादचाऱ्यांचे अपघात कमी होतील. तसेच त्यामुळे वाहतूक कोंडीही कमी होण्यास मदत होईल. (Hawker’s in Pune)

पार्किंग व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक

पुणे शहरामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाहनांकरीता पार्किंग उपलब्ध नसल्याने रोडवर वाहने पार्क होत असतात, याकरीता पुणे महानगरपालिके तर्फे जास्तीत जास्त पार्किंग व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक आहे. शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाजारपेठ / भाजीमंडई आहे अशा ठिकाणी महानगरपालिकेमार्फत पार्किंगची व्यवस्था / पार्किंग प्लाझा करणे गरजेचे आहे. (Parking Management)

सिग्नल यंत्रणा असणे गरजेचे

पुणे शहरामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा उपलब्ध नसल्याने वाहतूक नियमन करणे जिकिरीचे होत आहे. त्यातच पुणे शहरातील प्रवेशाचे ठिकाणी जेथे अवजड वाहतूकीची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी रस्त्यांची रुंदी जास्त असणे तसेच चौकामध्ये सिग्नल व्यवस्था असणे गरजेचे आहे. (Signal Management)

वाहतूक कोंडीवर उपाययोजनासठी बैठक आवश्यक

पुणे शहरामध्ये वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वरील सर्व स्टेक होल्डर्स यांची संयुक्त बैठक झाल्यास एकत्रित चर्चा होऊन पावसाळयापुर्वी उपाययोजना करणेबाबत तात्काळ अंमलबजावणी करणे सोयीचे होईल. जेणेकरुन पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या समस्यांमुळे व वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार नाही. तसेच पोलीसांना वाहतूक नियमन करणे सोईस्कर होईल. ( Pune Traffic update)

पावसाळ्यात खड्डे होणार नाहीत याची दक्षता घ्या

पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडल्याने तसेच विविध कारणांमुळे रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी साठून वाहतूक कोंडी झाल्याने वॉटर लॉगींगचे ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात येवून वॉटर लॉगींग होणाऱ्या ठिकाणी उपाययोजना होणे आवश्यक आहे. मागील वर्षी पावसाचे पाणी साठून वॉटर लॉगींग
झाल्याने त्याचा परिणाम शहरातील वाहतूकीवर झाला होता, शहरामध्ये जागोजागी प्रचंड प्रमाणात वाहतूक
कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय झाली होती. त्यामुळे नागरिकांना इच्छितस्थळी पोहोचणेसाठी त्रास सहन करावा लागला होता. वॉटर लॉगींगचे ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था होऊन लहान मोठे अपघात झाले. तसेच जागोजागी ड्रेनेजचे झाकणातुन तुंबलेले पाणी रस्त्यावर येऊन बरीचशी वाहने रस्त्यात अडकुन पडल्याने
नागरिकांना त्रास झाल्याने प्रशासनास नागरिकांचा रोष सहन करावा लागला. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी
पावसाळयापुर्वीच ड्रेनेज झाकणांची दुरुस्ती तसेच रस्त्यांची दुरुस्ती वेळेत होणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरुन नागरिकांना तसेच प्रशासनास नाहक त्रास सहन करावा लागणार नाही व नागरिकांची गैरसोय
होणार नाही. माहितीचे अनुषंगाने यावर्षी पावसाळा सुरु होणेपुर्वी अशा वॉटर लॉगींगचे ठिकाणांची व ड्रेनेजच्या झाकणांची पाहणी तसेच रस्त्यावरील खड्यांची पाहणी करुन तात्काळ दुरुस्ती / उपाययोजना करुन घेणे उचित राहील जेणेकरुन वाहतूक कोंडी होणार नाही तसेच नागरीकांना नाहक त्रास होणार नाही. असे पोलिस आयुक्तांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
—-
News Title | CP Pune |  PMC Pune |  Take care that Pune residents do not face any hardship during monsoon season  Notice of Pune Police Commissioner to Pune Municipal Corporation

PMC Pune Deputy commissioner Madhav Jagtap | उपायुक्त माधव जगताप को कारण बताओ नोटिस जारी 

Categories
Breaking News PMC social पुणे हिंदी खबरे

PMC Pune Deputy commissioner Madhav Jagtap | उपायुक्त माधव जगताप को कारण बताओ नोटिस जारी

 |  महापालिका आयुक्त द्वारा कार्रवाई किए जाने की संभावना

PMC Pune deputy commissioner Madhav Jagtap | पुणे महापालिका (PMC Pune) अतिक्रमण विभाग (PMC Encroachment Department) के उपायुक्त माधव जगताप (Deputy commissioner Madhav Jagtap) को फेरीवालों के खाने के स्टॉल को लात मारना महंगा पड़ेगा.  जगताप की लात मारने का वीडियो सोशल मीडिया पर वायरल होने के बाद शहर के राजनीतिक दलों, पथरी पेशेवर संघों, सामाजिक संगठनों ने आक्रामक रुख अपनाते हुए जगताप को पद से हटाने और निलंबित करने की मांग की.  इस बीच पीएमसी कमिश्नर विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) ने भी इस मामले को गंभीरता से लिया है और इस मामले में जगताप को कारण बताओ नोटिस (Show cause notice) जारी किया गया है.  उसके बाद आयुक्त विक्रम कुमार ने बताया कि इस घटना के संबंध में खुलासा कर उनके खिलाफ आगे की कार्रवाई की जाएगी.  (Deputy commissioner Madhav Jagtap News)

:  पुराना वीडियो वायरल किया गया

 माधव जगताप का वायरल वीडियो फर्ग्यूसन स्ट्रीट का है और 5 अप्रैल का है.  इस वीडियो में जगताप अपने सिक्युरिटी गार्ड के साथ होटल स्टाफ से बहस करते नजर आ रहे हैं और कुछ देर बाद वे फूड स्टॉल को लात मारकर उड़ा देते हैं.  साथ ही स्टॉल को दो से तीन बार लात मारकर पीछे धकेला गया है।  यह वीडियो 16 मई को वायरल हुआ था और कहा जा रहा है कि जगताप के वायरल न होने के दबाव के कारण यह देर से सामने आया।  वीडियो सामने आने के बाद सांसद सुप्रिया सुले सहित कई राजनीतिक दलों के नेताओं ने जगताप के कृत्य की सोशल मीडिया पर वायरल कर निंदा की.  वे कानूनी कार्रवाई के हकदार हैं।  हालांकि, यह पूछने पर कड़ी कार्रवाई की मांग की जा रही है कि हिंसक होने और इस तरह लात मारने का अधिकार किसने दिया।  (Pune Municipal Corporation Hindi News)
 —/——
PMC Pune Deputy Commissioner Madhav Jagtap Show cause notice issued to Deputy Commissioner Madhav Jagtap| Possibility of action by Municipal Commissioner

PMC Deputy Commissioner Madhav Jagtap | उपायुक्त माधव जगताप यांना कारणे दाखवा नोटीस

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Deputy Commissioner Madhav Jagtap | उपायुक्त माधव जगताप यांना कारणे दाखवा नोटीस

| महापालिका आयुक्त यांच्याकडून कारवाई होण्याची शक्यता

PMC Deputy Commissioner Madhav Jagtap  | महापालिकेच्या (PMC Pune) अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Deputy commissioner Madhav Jagtap) यांना पथारी व्यावसायिकाच्या (Hawkers) अन्न पदार्थासह, स्टॉलला लाथ मारणे चांगलेच महागात पडणार आहे. जगताप यांचा हा लाथ मारण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर शहरातील राजकीय पक्ष, पथारी व्यावसायिक संघटना, सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेत जगताप यांचा पदभार काढून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांनीही घेतली असून या प्रकरणी जगताप यांना कारणे दाखवा नोटीस (Show cause Notice) बजाविण्यात आली आहे. त्यानंतर या घटनेबाबत त्यांच्याकडून खुलासा घेऊन त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले. (Deputy commissioner Madhav Jagtap News)

जुना video वायरल करण्यात आला 


माधव जगताप यांचा व्हायरल झालेला व्हीडीओ हा फर्ग्युसन रस्त्यावरील असून तो 5 एप्रिलचा आहे. या व्हिडीओमध्ये जगताप हे आपल्या सुरक्षा रक्षकासह हॉटेल चालकांशी वाद घालत असल्याचे दिसून असून काही वेळानंतर त्यांनी खाद्यपदार्थ ठेवलेल्या स्टॉलवर लाथ मारत हे पदार्थ उडवून लावले आहेत. तसेच दोन ते तीन वेळा लाथा मारून स्टॉल मागे ढकलला आहे. हा व्हीडीओ 16 मे रोजी व्हायरल झाला असून जगताप यांच्याकडून तो व्हायरल करू नये, म्हणून दबाव टाकण्यात आल्याने तो उशिरा बाहेर आल्याची चर्चा आहे. हा व्हीडीओ समोर आल्यानंतर, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सोशल मिडीयावर तो व्हायरल करत जगताप यांच्या कृतीचा निषेध केला आहे. त्यांना कायद्याने कारवाईचा अधिकार आहे. मात्र, अशा प्रकारे हिंसक होऊन लाथा मारण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल करत कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे. (Pune Municipal Corporation News)

—/——

News Title | PMC Deputy Commissioner Madhav Jagtap  Show cause notice to Deputy Commissioner Madhav Jagtap

Madhav Jagtap | PMC Pune | भाडेतत्वावर पथारी देणाऱ्या पथारी धारकांची खैर नाही! | परवाना रद्द करणार असल्याची उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

Categories
Breaking News PMC social पुणे

भाडेतत्वावर पथारी देणाऱ्या पथारी धारकांची खैर नाही!

| परवाना रद्द करणार असल्याची उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

पुणे | शहरात व्यवसाय करत असताना आपली पथारी भाडेतत्वावर (On Rent) देण्याचे प्रमाण वाढले आहे. नियम डावलून पथारी धारक (Hawkers) अशा पद्धतीचे काम करत आहेत. त्यामुळे अतिक्रमण विभागाने (Encroachment department) अशा पथारीधारकावर गंभीरपणे कारवाई करण्याचे काम हाती घेतले आहे. क्षेत्रीय कार्यालय (Ward Office) स्तरावर अशा पथारी धारकांवर तीव्र कारवाई सुरु करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या पथारी धारकाचा परवाना (License) रद्द करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप (Deputy commissioner Madhav Jagtap) यांनी दिली.
महापालिकेच्या (PMC Pune) अतिक्रमण विभागाने शहरातील फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा नेमून दिल्या आहेत. अधिकृत व्यवसायिकांना सर्टिफिकेट देखील देण्यात आले आहे. मात्र हे फेरीवाले आपले दुकान भाडे तत्वावर चालवण्यास देत आहेत. ही गोष्ट नियमबाह्य आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. याबाबत उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले कि, अशा फेरीवाल्याना अगोदर समाज देण्यात आली आहे. आता विभागाचे कर्मचारी शहरात ठिकठिकाणी पाहणी करतील. त्यावेळी संबंधित दुकानात जाऊन मालकाचे सर्टिफिकेट स्कॅन करतील. त्यावरून लक्षात येईल कि दुकान भाडेतत्वावर आहे कि नाही. दुकान भाडेतत्वावर असेल तर तात्काळ संबंधित मालकाचा परवाना रद्द करण्यात येईल. आता ही कारवाई तीव्र करण्यात येत आहे. असेही माधव जगताप म्हणाले. (Pune Municipal Corporation)

 PM svanidhi scheme | फेरीवाल्यांसाठी मोठी बातमी | सरकारने घेतला मोठा निर्णय

Categories
Breaking News Commerce Political social देश/विदेश महाराष्ट्र लाइफस्टाइल

 फेरीवाल्यांसाठी मोठी बातमी | सरकारने घेतला मोठा निर्णय

 PM svanidhi scheme : आयटी आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की 2023 मध्ये, रस्त्यावरील विक्रेत्यांच्या म्हणजेच फेरीवाल्यांच्या 3,000 ते 5,000 रुपयांपर्यंतच्या छोट्या कर्जाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सोप्या पद्धतीने क्रेडिट सुविधा पुरविण्यावर विशेष लक्ष दिले जाईल.
 पीएम स्वानिधी योजना: आयटी आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, 2023 मध्ये, डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने, सरकार रस्त्यावरील विक्रेत्यांना 5,000 रुपयांपर्यंत सूक्ष्म-क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देईल.  डिजिटल इंडिया पुरस्कार वितरण समारंभात वैष्णव म्हणाले, 2023 मध्ये रस्त्यावर विक्रेत्यांसाठी 3,000 ते 5,000 रुपयांच्या छोट्या कर्जाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सोप्या पद्धतीने क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष लक्ष दिले जाईल.
 ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकाला डिजिटल पद्धतीने जोडण्यासाठी देशातील सर्व भागात 4G आणि 5G दूरसंचार सेवा देण्यासाठी सुमारे 52,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.  मंत्री म्हणाले की, देशात या वर्षी स्वदेशी विकसित 4G आणि 5G तंत्रज्ञानाची अंमलबजावणी होताना दिसेल.
 ते म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनविण्याच्या पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेनुसार लवकरच देशात इलेक्ट्रॉनिक चिप निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे.
 SVANidhi योजना जून 2020 मध्ये सुरू झाली
 प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी (SVANidhi) योजना जून 2020 मध्ये सूक्ष्म-क्रेडिट सुविधा म्हणून सुरू करण्यात आली.  कोविड-19 महामारीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी रस्त्यावरील विक्रेत्यांना सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
 पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची रक्कम तुम्ही 1 वर्षाच्या कालावधीत परत करू शकता.  कर्जाची रक्कम दरमहा हप्त्यांमध्ये परत केली जाऊ शकते.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
 अर्ज करण्यासाठी या प्रक्रियेचे अनुसरण करा
 या योजनेसाठी कोणत्याही सरकारी बँकेतून अर्ज करता येतो.
 सरकारी बँकेतून पंतप्रधान स्वानिधी योजनेचा फॉर्म भरा
 फॉर्मसोबत आधार कार्डची प्रत जोडावी
 अर्ज मंजूर झाल्यावर, पहिला हप्ता तुमच्या खात्यात येईल.

Hawkers | PMC | भाडे तत्वावर पथारी देणाऱ्या पथारी धारकांची खैर नाही  | आजपासून जोरदार कारवाई 

Categories
Breaking News PMC पुणे

भाडे तत्वावर पथारी देणाऱ्या पथारी धारकांची खैर नाही

| आजपासून जोरदार कारवाई

पुणे | शहरात व्यवसाय करत असताना आपली पथारी भाडे तत्वावर देण्याचे प्रमाण वाढले आहे. नियम डावलून पथारी धारक अशा पद्धतीचे काम करत आहेत. त्यामुळे अतिक्रमण विभागाने अशा पथारी धारकावर गंभीरपणे कारवाई करण्याचे काम हाती घेतले आहे. आजपासून अतिक्रमण विभाग जोरदार कारवाई करणार आहे. अशी माहिती महापालिका अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा नेमून दिल्या आहेत. अधिकृत व्यवसायिकांना सर्टिफिकेट देखील देण्यात आले आहे. मात्र हे फेरीवाले आपले दुकान भाडे तत्वावर चालवण्यास देत आहेत. ही गोष्ट नियमबाह्य आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. याबाबत उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले कि, अशा फेरीवाल्याना अगोदर समाज देण्यात आली आहे. आता विभागाचे कर्मचारी शहरात ठिकठिकाणी पाहणी करतील. त्यावेळी संबंधित दुकानात जाऊन मालकाचे सर्टिफिकेट स्कॅन करतील. त्यावरून लक्षात येईल कि दुकान भाडेतत्वावर आहे कि नाही. दुकान भाडेतत्वावर असेल तर तात्काळ संबंधित मालकाचा परवाना रद्द करण्यात येईल. आजपासून ही कारवाई तीव्र करण्यात येत आहे. असेही माधव जगताप म्हणाले.

Encroachment Dept.| PMC | पथारी व्यावसायिकांना दिलासा | जुलै अखेर पर्यंत तीन हफ्त्यात थकबाकी द्यावी लागणार 

Categories
Breaking News PMC social पुणे

पथारी व्यावसायिकांना दिलासा | जुलै अखेर पर्यंत तीन हफ्त्यात थकबाकी द्यावी लागणार

| अतिक्रमण विभागाकडून हमीपत्र घेण्यास सुरुवात

पुणे : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून थकबाकी न देणाऱ्या नोंदणीकृत पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. विभागाने तुळशी बाग, सारस बाग येथील व्यावसायिकांवर कारवाई करत त्यांना व्यवसाय करण्यास बंदी आणली होती. मात्र याला प्रचंड विरोध होऊ लागला होता. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी काही अटींवर व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार अतिक्रमण विभागाने हमीपत्र तयार केले आहे. हमीपत्र भरून देणाऱ्यांनाच व्यवसाय करायला परवानगी दिली जात आहे. या हमीपत्रानुसार जुलै अखेर पर्यंत तीन हफ्त्यात थकबाकी द्यावी लागणार आहे. प्रशासनाने तीन वेगवेगळी हमीपत्र तयार केली आहेत.

तुळशीबागेतील व्यावसायिकांसाठी असे असेल हमीपत्र

मी खाली सही करणार या हमीपत्राद्वारेवर लिहून देते/देतो की, दि. / / २०२२ रोजी माझे वरील व्यवसाय जागेवर वरिष्ठ अतिक्रमण अधिकारी यांचेमार्फत अचानक तपासणी करण्यात आली असून त्यावेळी
माझ्याकडून झालेल्या परवाना अटी/शर्तीचा भंग झालेबाबत त्यांचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने त्यांनी माझे व्यवसाय साधन बंद करून त्यास कार्यालयीन सील लावण्यात आले होते व सदर बाब मला मान्य आहे.
नेमून दिलेल्या जागेवर मान्य व्यवसाय करताना भविष्यात माझेकडून परवान्यामधील/प्रमाणपत्रामधील नमूद कोणत्याही अटी/शर्तीचा भंग होणार नाही, याची मी कायम दक्षता घेईन. मनपाने नेमून दिलेल्या मान्य
मापाच्या जागेवर मान्य साधनामध्ये स्वतः मान्य व्यवसाय करीन. माझा परवाना इतर कोणासही भाड्याने अथवा अनाधिकृतपणे चालविणेस देणार नाही. मनपाकडील मान्य परवानाशुल्काची माहे जून २०२२ अखेरपर्यंत असलेली थकबाकी माहे जुलै २०२२ अखेर पर्यंत ३ हत्यांमध्ये अथवा एकवट रकमेद्वारे मी भरून घेईन. दिलेल्या मुदतीनंतर थकबाकी राहिल्यास मनपाकडून माझेवर जी कारवाई केली जाईल ती मला मान्य राहील. तसेच यापुढील परवाना शुल्क नियमानुसार मुदतीमध्ये भरले जाईल. वरील नमूद सर्व बाबींची पूर्तता करणेची संपूर्ण जबाबदारी माझी असून ती मी सातत्याने पाळणार असलेबाबत हे स्वयंघोषित हमीपत्र मी लिहून देत आहे व ते माझ्यावर संपूर्णपणे बंधनकारक आहे.

सारस बागेतील व्यावसायिकांसाठी असे असेल हमीपत्र

मी खाली सही करणार या हमीपत्राद्वारेवर लिहून देते/देतो की, दि. / / २०२२ रोजी माझे वरील व्यवसाय जागेवर वरिष्ठ अतिक्रमण अधिकारी यांचेमार्फत अचानक तपासणी करण्यात आली असून त्यावेळी माझ्याकडून झालेल्या परवाना अटी/शर्तीचा भंग झालेबाबत त्यांचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने त्यांनी माझे व्यवसाय साधन बंद करून त्यास कार्यालयीन सील लावण्यात आले होते व सदर बाब मला मान्य आहे. नेमून दिलेल्या जागेवर मान्य व्यवसाय करताना भविष्यात माझेकडून परवान्यामधील/प्रमाणपत्रामधील नमूद कोणत्याही अटी/शर्तीचा भंग होणार नाही, याची मी कायम दक्षता घेईन. तसेच सदर माझे परवान्यासंबंधित खालील बाबींची
देखील माझ्याकडून पूर्तता करण्यात येईल.
१) स्टॉल समोरील मनपा जागेत गिहाईकांकरिता अनधिकृतपणे टेबल, खुर्च्या मांडल्या जाणार नाहीत. तसेच अनधिकृतपणे पत्राशेड / ओनियन शेड टाकण्यात येणार नाही. महानगरपालिकेकडून रितसर परवानगी मिळाल्यानंतरच टेबल, खुर्च्या यांचा वापर सुरु करील.
२) मान्य मापाच्या स्टॉलमध्ये स्वतः व्यवसाय करीन. सदर स्टॉलमध्ये कामगारांना रात्रीच्यावेळी राहण्यास ठेवले जाणार नाही. स्टॉल बाहेरील जागेत कोणतीही अनधिकृत पक्क्या स्वरूपातील अतिक्रमणे केली जाणार
नाहीत.
३) महानगरपालिकेकडून नव्याने सदर ठिकाणी फूड प्लाझा (खाऊगल्ली) बाबत धोरण निश्चित करून नियोजित प्लॅन / योजना मान्य करून अमलात आणली जाईल, त्यावेळेस त्यामधील सर्व अटी, शर्ती व नवीन परवाना
शुल्क दर मला मान्य राहील.
४) स्टॉल समोरील यापूर्वी टाकलेल्या फरशा/काँक्रीट व मागील मनपा जागेवरील अनधिकृत पक्क्या स्वरूपातील बांधकामे स्वखर्चाने काढून पुन्हा अशी अतिक्रमणे केली जाणार नाहीत.
वरिल बाबींची कायदेशीर पूर्तता आजपासून १५ दिवसांचे आत मी स्वतः जबाबदारीने पूर्ण करून घेईन. याबाबत मी मनपास कोणतीही तोशिष लागू देणार नाही. याबाबतचे हे स्वयंघोषित हमीपत्र लिहून देत आहे.

शहरातील सर्व नोंदणीकृत व्यावसायिकांसाठी असे असेल हमीपत्र

मी खाली सही करणार या हमीपत्राद्वारेवर लिहून देते/देतो की, दि. / / २०२२ रोजी माझे वरील व्यवसाय जागेवर संबंधित अतिक्रमण निरीक्षक / इतर मनपा अधिकारी / सेवक यांचेमार्फत अचानक तपासणी
करण्यात आली असून त्यावेळी माझ्याकडून झालेल्या परवाना अटी/शर्तीचा भंग झालेबाबत त्यांचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने त्यांनी माझे व्यवसाय साधन बंद करून त्यास कार्यालयीन सील लावण्यात आले होते
व सदर बाब मला मान्य आहे. नेमून दिलेल्या जागेवर मान्य व्यवसाय करताना भविष्यात माझेकडून परवान्यामधील/प्रमाणपत्रामधील नमूद कोणत्याही अटी/शर्तीचा भंग होणार नाही, याची मी कायम दक्षता घेईन. मनपाने नेमून दिलेल्या मान्य मापाच्या जागेवर मान्य साधनामध्ये स्वतः मान्य व्यवसाय करीन. माझा परवाना इतर कोणासही भाड्याने अथवा अनाधिकृतपणे चालविणेस देणार नाही. मनपाकडील मान्य परवानाशुल्काची माहे जून २०२२ अखेरपर्यंत असलेली थकबाकी माहे जुलै २०२२ अखेर पर्यंत ३ हत्यांमध्ये
अथवा एकवट रकमेद्वारे मी भरून घेईन. दिलेल्या मुदतीनंतर थकबाकी राहिल्यास मनपाकडून माझेवर जी कारवाई केली जाईल ती मला मान्य राहील. तसेच यापुढील परवाना शुल्क नियमानुसार मुदतीमध्ये भरले
जाईल याची या हमीपत्राद्वारे मी हमी देतो. वरील नमूद सर्व बाबींची पूर्तता करणेची संपूर्ण जबाबदारी माझी असून ती मी सातत्याने पाळणार असलेबाबत हे स्वयंघोषित हमीपत्र मी लिहून देत आहे व ते माझ्यावर संपूर्णपणे बंधनकारक राहील.