Mahatma Phule Jan Arogya Yojana | महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश करणार

Categories
Breaking News Political social आरोग्य महाराष्ट्र

Mahatma Phule Jan Arogya Yojana | महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश करणार

| सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत

 Mahatma Phule Jan Arogya Yojana | महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या (Mahatma Phule Jan Arogya Yojana)अंतर्गत सर्पदंश (Snake Bite) आणि अपेंडिक्स (Appendix) या आजारांचा समावेश करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी विधानसभेत दिली. (Mahatma Phule Jan Arogya Yojana)
            सदस्य दीपक चव्हाण यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत आजारांची संख्या वाढविण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
            मंत्री श्री. सावंत म्हणाले, राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सार्वत्रिक केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रात 5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या योजनेअंतर्गत सध्या ९९६ आजारांचा समावेश असून त्याची संख्या १ हजार ३५६ केली जाणार आहे. तसेच या योजनेत समावेश करावयाच्या आजारांच्या निवडीसाठी एक विशेष समिती गठीत करण्यात येईल असेही मंत्री श्री.सावंत यांनी सांगितले. (Maharashtra News)
*****
News Title | Mahatma Phule Jan Arogya Yojana | Under the Mahatma Phule Jan Arogya Yojana, diseases like snakebite and appendicitis will be covered

Health Minister Dr. Tanaji Sawant | आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी पुणे महापालिका आयुक्तांना दिले हे आदेश

Categories
Breaking News PMC Political पुणे

Health Minister Dr. Tanaji Sawant | आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी पुणे महापालिका आयुक्तांना दिले हे आदेश

Health Minister Dr. Tanaji Sawant | कात्रज परिसरातील (Katraj Area) नागरिकांच्या मागणीनुसार रस्त्यांचे सुशोभीकरण आणि लाईट व्यवस्था करण्यासाठी 3 कोटी 63 लाखाचा निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत (Health Minister Dr. Tanaji Sawant)यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांना दिले आहेत. (Health Minister Dr. Tanaji Sawant)
मंत्र्यांच्या पत्रानुसार कात्रज मोरे बाग परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार १. सरहद चौक ते कात्रज पार्लर – ३ ते वंडरसिटी बाह्यवळण मार्ग या रस्त्यांचे डांबरीकरण व सुशोभिकरण करणे, २. कात्रज पार्लर ३ ते सावंत विहार या रत्यांचे रुंदीकरण, डांबरीकरण व सुशोभिकरण करणे ३. सावंत विहार फेज-३ ते अहिल्यादेवी होळकर उद्याण या रस्त्याचे कॉक्रिटीकरण, सुशोभिकरण व लाईट व्यवस्था करणे ही विकास कामे सन २०२३-२०२४ या अर्थसंकल्पीय वर्षात समाविष्ट  करणेबाबत संदर्भीय पत्रान्वये कळविणेत आलेले होते. तसेच या  कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत महापालिका आयुक्तांना कळविणेत आलेले होते. (PMC Road Department)

त्यानुसार महापालिकेच्या पथ विभागाने प्रत्यक्ष पाहणी करुन रक्कम रु.२,८२, ८२, ७५३ /- इतक्या रकमेचा आराखडा तयार केलेला आहे तसेच विद्युत विभाग यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन रक्कम रु.८०,६७,३९४/- इतक्या रकमेचा आराखडा तयार केलेला आहे. (Pune Municipal Corporation)
तरी, विभागाने तयार केलेल्या आराखड्याप्रमाणे उपरोक्त विकास कामास रक्कम रु.३,६३,५०,१४७/- इतका निधी उपलब्ध करुन देण्याचे आदेश आरोग्य मंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. (PMC Pune)
News Title | Health Minister Dr. Tanaji Sawant Health Minister Dr Tanaji Sawant gave this order to Pune Municipal Commissioner

Monsoon Health Preparation | पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासून पाणी पिण्यायोग्य असल्याची खात्री करा

Categories
Breaking News Political social आरोग्य महाराष्ट्र

Monsoon Health Preparation | पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासून पाणी पिण्यायोग्य असल्याची खात्री करा

| पावसाळ्यातील आरोग्यविषयक तयारीचा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून आढावा

  Monsoon Health Preparation | पावसाळ्यात उद्भवणारे आजार व पूर परिस्थितीत तातडीने  आरोग्य सुविधा उपलब्ध करून  देण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा पातळी व गाव पातळीपर्यंत केलेल्या आरोग्यसेवा तयारीचा  आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत (Health Minister Dr Tanaji Sawant) यांनी आढावा घेतला. (Monsoon Health Preparation)
दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीस आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आदी उपस्थित होते.
आरोग्यमंत्री डॉ.सावंत म्हणाले, जोखीमग्रस्त गावे ओळखून तिथे शीघ्र प्रतिसाद पथके सज्ज ठेवावीत. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण  देण्यात यावे व उद्रेक झाल्यास त्वरित उपाययोजना करण्यात यावी. पूर्वतयारीसाठी जिल्हा स्तरावरील अहवाल रोजच्या रोज तयार करण्यात यावा व त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासून पाहावेत  आणि  पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही याची खात्री करावी.
जिल्ह्यातील समनव्यक अधिकाऱ्यांच्या दूरध्वनी क्रमांकाची यादी तयार करून ती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अद्ययावत ठेवावी व राज्यस्तरावरही पाठवावी. साथरोग नियंत्रणासाठीच्या किट वाटप करण्यात याव्यात व त्याचा अहवाल तयार ठेवावा. आशाताई व आरोग्य कर्मचारी यांच्या याद्यासुद्धा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे ठेवण्यात याव्यात.
 डास उत्पत्ती ठिकाणे यावरही लक्ष द्यावे व पाणीसाठे चांगले राहतील यावरही लोकसहभागाद्वारे  नियंत्रण ठेवावे. शीघ्रकृती पथकाद्वारे करावयाचे कामे  तसेच इतर सूचनांसाठी एक पुस्तिका तयार करण्यात यावी व  कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात. पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात यावा. ग्रामपंचायत, नगरपंचायत येथे साथ रोगाबाबतची माहिती देण्यासाठी फलक लावण्यात यावेत, अशा सूचना यावेळी  त्यांनी केल्या.
अतिरिक्त मुख्य सचिव श्री.म्हैसकर यांनी साथ रोगाबाबतची माहिती लोकांपर्यंत जाण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. कठीण परिस्थितीत आरोग्य विभाग चांगली जबाबदारी पार पाडत असून पावसाळ्यातील आरोग्य परिस्थितीही व्यवस्थितपणे हाताळण्यास सर्वांनी सक्रिय रहावे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
बैठकीस आरोग्य विभागातील विभागीय आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यातील डेंगू,मलेरिया, जापानी मेंदूजवर, लेप्टोस्पायरोसिस या आजारांना प्रतिबंधासाठी जोखीमग्रस्त गावांची यादी तयार करण्यात आली आहे.  गृहभेटी व आरोग्य कर्मचाऱ्या मार्फत सर्वेक्षण व रुग्णशोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. आश्रम शाळा यांना वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या मार्फत नियमित भेटी देण्यात येत आहेत.  पाणी गुणवत्ता नियंत्रण ७६ हजार पाणी नमुने तपासण्यात आले आहेत. पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण करून प्रत्येक गावांना हिरवे, पिवळे, लाल कार्ड देण्यात आले आहेत.
 परिसर स्वच्छता, डासांपासून वैयक्तिक संरक्षणसाठी मच्छरदाणी, डास प्रतिबंधक क्रीम, खिडक्यांना जाळ्या बसविण्याबाबत समुपदेशन करण्यात आले आहे. प्रयोगशाळा सिद्धता, पुरेसा औषध साठा,शीघ्र प्रतिसाद पथके यांची स्थापना आणि गाव पातळीवर साथ रोग सर्वेक्षण तसेच अंतर विभागीय समन्वय व आरोग्य शिक्षण यावरही भर देण्यात येत आहे, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.
—-
News Title | Health Minister Tanaji Sawant’s review of monsoon health preparations

Aashadhi Yatra Palkhi Sohala | पालखी सोहळ्यासाठीच्या आरोग्यसेवांचा आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी घेतला आढावा

Categories
Breaking News cultural social आरोग्य पुणे महाराष्ट्र

Aashadhi Yatra Palkhi Sohala | पालखी सोहळ्यासाठीच्या आरोग्यसेवांचा आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी घेतला आढावा

Aadhadhi Yatra Palkhi Sohala | आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi) निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखीसोबत (Sant Tukaram Maharaj Palkhi) इतर पालखी सोहळ्यासाठीच्या (Palkhi Sohala) आरोग्यसेवांचा आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत (Health minister Dr Tanaji sawant) यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत आढावा घेतला. (Aashadhi Yatra Palkhi Sohala)
यावेळी अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार व राज्यातील आरोग्य विभागातील सर्व प्रमुख अधिकारी, विभागनिहाय व जिल्हानिहाय आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (Aashadhi Ekadashi)
यावर्षी पालखी प्रस्थान लवकर होणार असल्याने उन्हाळ्याचा त्रास होऊ शकतो. यासाठी पुरेसा ओआरएसचा साठा, औषधे, पिण्याच्या पाण्याचे अधिकाधिक टँकर, पाण्याच्या स्रोतांची, पाण्याची वेळोवेळी तपासणी करावी, रुग्णवाहिकांची संख्या वाढविणे, याचबरोबर आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व आरोग्य पथके, यंत्रणा सज्ज ठेवाव्यात याबाबतीत सूचना डॉ. सावंत यांनी दिल्या. (Palkhi Sohala Health facilities)
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात औषधांची सुविधा करण्यात आली असल्याची  खात्री करावी. आपत्कालीन १०८ सेवेच्या आणि १०२ सेवेच्या अधिक रुग्णवाहिका नियुक्त करण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले. (Aashadhi wari Palkhi Sohala)
 दुचाकीवरुन सेवा देण्यासाठी आरोग्यदूत सुसज्ज ठेवण्यात येणार आहेत. बाह्यरुग्ण रुग्णवाहिका पथके, ग्रामीण रुग्णालयाची आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची पालखी मुक्काम औषधोपचार केंद्रे, फिरते वैद्यकीय वैद्यकीय पथके अशी सर्व पथके आरोग्य सुविधांसाठी सज्ज करण्यात आली आहेत. अशी माहिती यावेळी उपस्थित  अधिकाऱ्यांनी दिली. (Pandharpur Aashadhi wari)
मंत्री  डॉ. सावंत यांनी दिलेल्या सुचना :
• आषाढी वारीनिमीत्त कृती आराखडा तयार करताना महाराष्ट्रातील सर्व दिंडीमार्ग विचारात घेण्यात यावेत.
• प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांची अंदाजे संख्या नियोजन करताना विचारात घ्यावी.
• दिंडी मार्गावर ठराविक अंतरावर पाच-दहा खाटांचे तात्पुरते दवाखाने कार्यान्वित करावे.
• दिंडी मार्गातील सर्व आरोग्य संस्था मनुष्यबळ व औषधीसह सुसज्ज ठेवण्यात यावी.
• दिंडीमध्ये वाढत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या  संख्येनुसार आरोग्य सुविधा वाढविल्या जाव्यात.
• आरोग्य व्यवस्थेतील सर्व जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांची नावे ठळकपणे प्रर्दशित केली जावी.
• सर्व रुग्णवाहिकांची तपासणी करुन औषधी व इतर उपकरणे असल्याची खात्री करावी.
• उष्माघात व इतर आजारांच्या बाबतीत आवश्यक दक्षता घेण्यात यावी.
• नियोजन करतांना दिंडीमार्गाचे लहान गटांमध्ये विभाजन करुन जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणुक करावी. प्रत्येक गटात संपर्क यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यात यावी.
• आवश्यक मनुष्यबळ राज्यातील इतर जिल्ह्यातून मागविण्यात यावे.
• आरोग्य विषयक सर्व कार्यक्रमांची माहिती दिंडी मार्गावरील प्रमुख गावामध्ये द्यावी.
• आषाढी पूर्वी दर आठवड्याला पूर्व तयारीचा आढावा घेण्यात यावा.
• दिंडी मार्गातील सर्व रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र पातळीवर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कामाचे वेळापत्रक तयार करावे.
• सर्व दिंडी मार्गावर कलापथक/समुपदेशक यांचा माध्यमातून आरोग्य विषयक प्रबोधन करण्यात यावे.
• दिंडी मार्गावरील सर्व जिल्ह्यात व आरोग्य संस्थात औषध व आवश्यक साहित्य सामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावी.
0000
News Title | Aashadhi Yatra Palkhi Sohala | Health Minister Dr. Tanaji Sawant reviewed the health services for Palkhi celebration

Covid | कोविड च्या पार्श्वभूमीवर मुंबई पुण्यासह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष

Categories
Breaking News social आरोग्य पुणे महाराष्ट्र

कोविड च्या पार्श्वभूमीवर मुंबई पुण्यासह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष

| आरोग्य मंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांच्या सूचना

| पुनर्रचित कोविड टास्क फोर्सची बैठक

पुणे | मुंबई, पुणे आणि ठाणेसह दहा अति जोखमीच्या जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत.
कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी उपाययोजनांबाबत आयोजित केलेल्या विशेष कार्यदलाच्या बैठकीत ते बोलत होते.
 पुनर्रचित टास्क  फोर्स सदस्यांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.  पुणे येथील आरोग्य सेवा संचालनालय कार्यालयातून डॉ. सावंत यांनी सदस्यांशी संवाद साधला. यावेळी संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, अतिरिक्त संचालक तथा टास्क फोर्सचे सदस्य सचिव डॉ. रघुनाथ भोये उपस्थित होते. टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, सदस्य लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. हर्षद ठाकूर, आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
डॉ. सावंत म्हणाले, कोविड-१९ चाचण्यांची संख्या वाढवावी. आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या मॉकड्रीलमध्ये आढळलेल्या त्रुटींचे तत्काळ निराकरण करावे. मास्कचा वापर करण्याबाबत जनतेला आवाहन करण्यात यावे. जत्रा, मॉल, थिएटर, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरण्याबाबत आवाहन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
कोविड बाधितांना मेटाफॉर्मिन गोळीचा फायदा दिसून येतो. पण या गोळीचा प्रोटोकॉलमध्ये समावेश नाही, असे यावेळी डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले. यावर या गोळीचा रुग्ण बरे होण्यासाठी मदत होत असल्यास त्याबाबतचे संशोधन टास्क फोर्सच्या सदस्यांना उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून त्याबाबत पुढील कार्यवाही करता येईल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
कोविडच्या सध्याच्या व्हेरियंटची लागण झाल्यावर रुग्णांना ऑक्सिजनची विशेष गरज भासत नाही. पण संसर्ग पाहता कोविडची लागण झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना मास्क वापरणे बंधनकारक करावे, असे डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.
कोविड चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत का याची खात्री करावी, नियमित पर्यवेक्षण करावे, प्रयोगशाळांची क्षमता वाढवावी, अशा सूचना डॉ. सावंत यांनी दिल्या.
कोविडच्या सध्याच्या व्हेरियंटची लागण जास्त जोखमीची नाही. लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत. हा संसर्ग पंधरा मेपासून कमी होऊ लागेल, असे सर्व सदस्यांनी बैठकीत सांगितले.

Ruby Hall Clinic | रुबी हॉल क्लिनिक मध्ये किडनी रॅकेट चौकशीसाठी समिती स्थापन

Categories
Breaking News Political social आरोग्य पुणे महाराष्ट्र

रुबी हॉल क्लिनिक मध्ये किडनी रॅकेट चौकशीसाठी समिती स्थापन

| अनियमतात आढळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार | आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

रुबी हॉल क्लिनिक मध्ये किडनी रॅकेटची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली शासकीय आणि अशासकीय सदस्यांची समिती नेमून तीन महिन्यात याबाबत अहवाल सादर करणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली.

याबाबत आमदार माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता. या रॅकेट मधील मुख्य आरोपी फरारी आहे. ही संघटित गुन्हेगारी असून, या रॅकेटचे लोन महाराष्ट्रात पसरल्याचे मिसाळ यांनी निदर्शनास आणले.

धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत रुग्णालयांमध्ये मोफत किंवा पन्नास टक्के सवलतीच्या दरात गरीब आणि अल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची अनियमितता तपासण्यासाठी लेखा परीक्षकांच्या मार्फत परीक्षण करून अनियमितता आढळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केली

याबाबत आमदार माधुरी मिसाळ यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला सावंत उत्तर देत होते.

मिसाळ म्हणाल्या, या कल्याणकारी योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळत नाही. त्यांना वैद्यकीय सेवा पासून वंचित राहावे लागते. काही गरजू नागरिकांना लाभ मिळतो. पण याची अंमलबजावणी काटेकोर व पारदर्शक पद्धतीने होत नाही. अशा रुग्णालयांवर कारवाई करावी.

मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या अंतर्गत कलम 41 अनुसार धर्मादाय कायद्याखाली नोंदणीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत किंवा पन्नास टक्के सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया सह सर्व उपचार करण्याचे बंधन आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक रुग्णालयाच्या एकूण उत्पन्नाच्या दोन टक्के रकमेचा इंडन पेशंट फंड निर्माण केलेला असतो. या फंडामधून रुग्णांना मोफत उपचार मिळतात.

Health Minister Dr Tanaji Sawant | पुण्यातील वाढत्या गोवर रुग्णाबाबत आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता | शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा डॉ. तानाजी सावंत यांनी घेतला आढावा

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे महाराष्ट्र

पुण्यातील वाढत्या गोवर रुग्णाबाबत आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

|शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा डॉ. तानाजी सावंत यांनी घेतला आढावा

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. तानाजी सावंत,  (Health Minister Dr Tanaji Sawant) यांनी रविवारी पुणे महानगरपालिका (PMC Pune) येथे भेट दिली. यावेळी त्यांनी शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा (Review of health system) घेतला. यात प्रामुख्याने सद्यस्थितीत नव्याने उद्भवलेल्या साथी बाबत सखोल आढावा घेण्यात आला. त्यांनी पुणे शहरामध्ये वाढत असलेल्या गोवर रुग्णांबद्दल (Measles patients)  चिंता व्यक्त केली व गोवर आजारावर त्वरीत आटोक्यात आणण्यासाठी च्या उपाय योजना सुचविल्या. (Pune Municipal corporation)

मंत्र्यांनी शहरातील दाट वस्ती मध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून गोवर संशयित रुग्ण शोधून त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविणे, विशेष करून खाजगी रुग्णालयांना जास्तीत जास्त भेटी देवून रुग्ण शोध मोहीम तीव्र करणे, नवीन समावेश झालेल्या गावांमध्ये विशेष लक्ष देणे, इत्यादी मा. डॉ. तानाजी सावंत यांनी गोवर सोबतच इतर आजार उदा. जापानी मेंदू ज्वर, झीका विषाणू (Zika virus) इत्यादीचा देखील सखोल आढावा घेतला. या सोबतच संपूर्ण आरोग्य विभागाला तत्परतेने कामे करण्याच्या सूचना दिल्या.  तसेच राज्य शासना कडून संपूर्ण तांत्रिक मदतीची ग्वाही दिली.

डॉ. सावंत यांनी यावेळी संपूर्ण जनतेला ताप व पुरळ असलेल्या प्रत्येक रुग्णाने शासकीय दवाखान्यामध्ये येवून उपचार घेण्याबाबत आव्हान केले. या भेटीच्या वेळी आमदार  भीमराव आण्णा तापकीर, विक्रम कुमार, महापालिका आयुक्त पुणे, रविंद्र बिनवडे, अति. महापलिका आयुक्त पुणे,  वृषालीताई चौधरी व आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (PMC commissioner Vikram Kumar)