Ganesh Visarjan Holiday Cancel | पुणे महापालिका कमर्चाऱ्यांना उद्या कामावर यावे लागणार | अतिरिक्त आयुक्तांचे आदेश जारी

Categories
Breaking News cultural PMC social पुणे महाराष्ट्र

Ganesh Visarjan Holiday Cancel | पुणे महापालिका कमर्चाऱ्यांना उद्या कामावर यावे लागणार | अतिरिक्त आयुक्तांचे आदेश जारी

Ganesh Visarjan Holiday Cancel | अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) निमित्त गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) आणि ईद ए मिलादचा (Eid-a-Milan 2023) सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवार(२८ ता)होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) देखील उद्या कामावर यावे लागणार आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) कर्मचाऱ्यांना दरवर्षी अनंत चतुर्दशीची सुट्टी दिली जाते. कारण पुण्यात विसर्जन मिरवणूक खूप जल्लोषात साजरी केली जात असते. मात्र ही सुट्टी विभागीय आयुक्त घोषित करत असतात. मात्र यंदा गौरी पूजन ला सुट्टी देण्यात आली होती. जी दरवर्षी दिली जात नसते. तसेच आळंदी यात्रेसाठी देखील स्थानिक सुट्टी दिली गेली होती. त्यामुळे अनंत चतुर्दशीची सुट्टी दिली गेली नाही. यामुळे आता महापालिका कर्मचाऱ्यांची गुरुवारची सुट्टी सरकारच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली असून ही सुट्टी शुक्रवारी असणार आहे.

ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती.राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावे म्हणून २९ तारखेस सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान, आदींचा समावेश होता.
अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन २९ सप्टेंबरची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

| गणेश विसर्जन मिरवणुका शिस्तबद्धपणे, शांततेत पार पाडाव्यात

अनंत चतुर्दशीनिमित्त गणरायाला आपण मनोभावे निरोप देऊ. विसर्जन मिरवणुकीतही नेहमीप्रमाणे शिस्त पाळावी आणि  शांतता, सद्भावनेच्या वातावरणात गणेश विसर्जन पार पाडावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी  राज्यातील गणेशभक्तांना केले आहे.
गेले दहा दिवस श्री गणेशाच्या आगमनाने मांगल्याचे वातावरण निर्माण झाले. येणाऱ्या काळातही ईद तसेच नवरात्री, दसरा –दिवाळीसारखे सण आहेत. सर्वांनी एकोप्याने आणि भक्तिभावाने हे सण पार पाडावे आणि राज्याची परंपरा अधिक उज्वल करावी असेही मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.
गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांनी संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील याची काळजी घेतली तसेच एकूणच गणेश मंडळांनी देखील नियमांचे पालन करून सर्वांचा हा आवडता उत्सव आनंदाने पार पाडला त्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
उत्सव साजरा करतांना आपल्याला स्वच्छतेचे महत्व डोळ्याआड करता येणार नाही. स्वच्छ महाराष्ट्राची मोहीम आपण हाती घेतली आहे. १ ऑक्टोबरला आपण आपली गावे, वॉर्ड कचरामुक्त करणार आहोत. गणेश मंडळांनी देखील विसर्जन आणि त्यानंतर आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यास प्रशासनाला मदत करावी आणि चांगला संदेश द्यावा असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.

| मुख्यमंत्र्यांकडून ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा

‘ईद-ए-मिलादचे उत्सव पर्व सौहार्द-सलोखा घेऊन येईल. यातून परस्परांतील आदर-प्रेमभाव आणि स्नेह वाढीस लागावा,अशी मनोकामना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी  ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
‘प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला त्याग आणि प्रेमाचा संदेश दिला. त्यांचे जीवन हाच एक मोठा संदेश आहे. त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्पर आदर-प्रेमभाव वाढीस लावण्याचा प्रयत्न करूया,’ असेही आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

Women’s Day | PMC | महिला दिनानिमित्त मनपा महिला कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी

Categories
Breaking News PMC social पुणे

महिला दिनानिमित्त मनपा महिला कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी

पुणे | जागतिक महिला दिनानिमित्त महिला सेविकांना अर्ध्या दिवसाची सवलत अर्थात सुट्टी दिली जाणार आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी जारी केले आहेत.
जागतिक महिला दिनानिमित्त  ८ मार्च २०२३ रोजी आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी पुणे महानगरपालिकेतील कार्यालयीन वर्ग १ ते ३ मधील अधिकारी/सेविकांना दुपारी ३ वा. नंतर व वर्ग ४ मधील सेविकांना सकाळी १०.३० वा. नंतर अर्ध्या दिवसाची सवलत देण्यात येत आहे. तरी, सर्व खातेप्रमुख/विभागप्रमुख यांनी त्यांचे नियंत्रणाखालील महिला अधिकारी / सेविकांना याबाबत सूचित करावे. असे आदेशात म्हटले आहे.

Holidays in New Year | PMC Pune | आगामी वर्षासाठी (2023) महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुट्ट्या जाहीर

Categories
Breaking News PMC पुणे

आगामी वर्षासाठी महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुट्ट्या जाहीर

| एकूण २३ सुट्ट्या

पुणे | आगामी वर्ष म्हणजेच २०२३ साल (New year 2023) काही दिवसावर येऊन ठेपले आहे. महापालिका प्रशासनाकडून (Pune municipal corporation) दर वर्षी सुट्ट्या (holiday) जाहीर करण्यात येतात. त्यानुसार महापालिका कमर्चारी आणि अधिकाऱ्यासाठी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. एकूण २३ सुट्ट्या असणार आहेत. तर ५ सुट्ट्या या शनिवार आणि रविवारी येत आहेत. (PMC Pune)

महापालिका अतिरिक्त आयुक्त (PMC Additional commissioner) कार्यालयाकडून या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विविध उत्सव, सण (festival) यासाठी सुट्ट्या देण्यात येत असतात. प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन, दिवाळी असे सगळे सणवार धरून वर्षभरात एकूण २३ सुट्ट्या महापालिका कर्मचार्यांना मिळतील. तर ५ सुट्ट्या या शनिवार आणि रविवारी येत आहेत. यामध्ये महाशिवरात्री -शनिवार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती रविवार, रमझान ईद शनिवार, मोहरम शनिवार, आणि दिवाळी (लक्ष्मिपुजन) रविवार यांचा समावेश आहे. तर १२ जून या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यात आगमन होणार आहे. त्यादिवशी अर्धा दिवस सुट्टी राहिल. (Pune Municipal Corporation)

Holiday for all schools in Pune | पुण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी | शिक्षक व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहावे लागणार 

Categories
Breaking News Education PMC पुणे

पुण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी | शिक्षक व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहावे लागणार

| महापालिका शिक्षण विभागाचा निर्णय

पुणे | पुणे शहर आणि परिसरात गेल्या 10 दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. खडकवासला धरण भरले असल्याने  पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अशातच आगामी काळातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शहरातील सर्व शाळांना उद्या (14 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत महापालिका शिक्षण विभागाने निर्देश जारी केले आहेत.

| असे आहेत आदेश

पुणे महानगरपालिका हद्दीतील क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तविण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिका क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सर्व मनपा खाजगी शाळांना अनुदानित, विना अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित इ.शाळांना दिनांक १४/०७/२०२२ रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
तथापि पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजाच्या अनुषगांने शाळेत उपस्थित राहतील.

PMC : उद्या पुणे महापालिकेला सुट्टी

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

उद्या पुणे महापालिकेला सुट्टी

पुणे : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्याच धर्तीवर पुणे महापालिकेला देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर पुणे महापालिकेने देखील सुट्टी जाहीर केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालयांना सुट्टी राहील, असे आदेशात म्हटले आहे.