Pune Hoardings News | अनधिकृत होर्डिंग वरून खासदार सुप्रिया सुळे आक्रमक

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Hoardings News | होर्डिंग कोसळण्याच्या घटनांवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता

अहवाल मागवून सुरक्षा ऑडिट करण्याबरोबरच अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याची मागणी

 

Pune Hoardings News| पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका (Pune and pimpari chinchwad municipal corporation) हद्दीसह जिल्ह्यात अन्य ठिकाणी होत असलेल्या होर्डिंग (Hoardings) कोसळण्याच्या घटनांबाबत खासदार सुप्रिया सुळे (MP Supirya Sule) यांनी चिंता व्यक्त केली असून पालकमंत्र्यांनी याबाबत अहवाल मागवून संबंधीत यंत्रणांना अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. (Pune Hoardings news)

हिंजवडी येथे झालेल्या वादळी पावसात होर्डिंग्ज कोसळले. सुदैवाने येथे काही जिवितहानी झाली नाही. हे होर्डिंग्ज अधिकृत की अनधिकृत याबाबत महापालिकेकडे माहिती उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्द आणि जिल्ह्यातही काही ठिकाणी यापूर्वी होर्डिंग कोसळले आहेत. पुणे आणि परिसरात यापुर्वी होर्डिंग्ज कोसळून काही नागरीकांचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. हे लक्षात घेता पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी ट्विटद्वारे केली आहे. (PMC pune hoardings news)

पुणे महापालिका (PMC pune) आणि परिसरात अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आली आहेत. माध्यमांत याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याचे दाखले त्यांनी दिले आहेत. अनेक होर्डिंग्ज धोकादायक पद्धतीने उभारण्यात आले असून भविष्यात एखादी दुर्घटना येथे घडू शकते, अशी भीतीही खासदार सुळे यांनी व्यक्त केली आहे. (PMC Pune News)

या होर्डिंग्ज संदर्भात दोन्ही महापालिकांचे आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त (PMRDA Commissioner) आणि जिल्हाधिकारी (Pune Collector) यांच्याकडून अहवाल मागवून घेऊन अनधिकृत होर्डिंग्ज काढण्यासंदर्भात सकारात्मक विचार करावा. तसेच होर्डिंग्ज अधिकृत असतील तर त्यांचे सुरक्षा ऑडीट करण्याबाबत संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे.


News Title | Pune Hoardings News | MP Supriya Sule aggressive over unauthorized hoarding

Hoarding | अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांच्या उपस्थितीत होर्डिंग वर कारवाई

Categories
Breaking News PMC पुणे

अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांच्या उपस्थितीत होर्डिंग वर कारवाई

महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने महापालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याबाबत गंभीर पाऊल उचलले आहे. 31 मे पर्यंत शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्यात येणार आहेत. त्यानुसार गेल्या दोन दिवसापासून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. काल अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.

पुणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंग विना परवाना बोर्ड, बँनर, फ्लेक्स, झेंडे, पोस्टर, किआँक्स यांचेवर गेल्या दोन दिवसांत परवाना व आकाशचिन्ह विभागामार्फत १५ क्षेत्रीय कार्यालय हद्दीमध्ये विविध ठिकाणी निष्कासन कारवाई करणेत आली. सदर कारवाई मध्ये ५ क्रेन, ४० बिगारी सेवक, ०६ गँस कटर, ५ वेल्डर, या यंत्रसामुग्री व मनुष्यबळाचा वापर करण्यात आला तसेच ज्यांनी विना परवाना जाहिरात होर्डिंग आणि बोर्ड लावले आहेत त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच यापुढे अनधिकृत होर्डिंग, विना परवाना बोर्ड, बँनर, फ्लेक्स, झेंडे, पोस्टर, किऑक्स इ. यावर परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून निष्कासन कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

 | दोन दिवसाच्या कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे
होर्डिंग  – 35
फ्लेक्स, बोर्ड, बॅनर – 274
झेंडे – 18
पोस्टर – 46
किऑक्स – 32

एकूण – 405

Illegal Hoardings | 31 मे पर्यंत शहर अनधिकृत होर्डिंग मुक्त करण्याचा महापालिकेचा मानस | उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

Categories
Breaking News PMC पुणे

31 मे पर्यंत शहर अनधिकृत होर्डिंग मुक्त करण्याचा महापालिकेचा मानस

| उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

पुणे | महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने महापालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याबाबत गंभीर पाऊल उचलले आहे. 31 मे पर्यंत शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्यात येणार आहेत. त्यानुसार आजपासून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
शहरात 2629 अनधिकृत होर्डिंग आहेत. तर 2485 अधिकृत आहेत. तर 508 गुन्हे दाखल केले आहेत. तर जवळपास 75 लाखाची वसुली केली आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंग विना परवाना बोर्ड, बँनर, फ्लेक्स, झेंडे, पोस्टर, किआँक्स यांचेवर आज परवाना व आकाशचिन्ह विभागामार्फत १५ क्षेत्रीय कार्यालय हद्दीमध्ये विविध ठिकाणी निष्कासन कारवाई करणेत आली. सदर कारवाई मध्ये ५ क्रेन, ४० बिगारी सेवक, ०६ गँस कटर, ५ वेल्डर, या यंत्रसामुग्री व मनुष्यबळाचा वापर करण्यात आला तसेच ज्यांनी विना परवाना जाहिरात होर्डिंग आणि बोर्ड लावले आहेत त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच यापुढे अनधिकृत होर्डिंग, विना परवाना बोर्ड, बँनर, फ्लेक्स, झेंडे, पोस्टर, किऑक्स इ.
यावर परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून निष्कासन कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

 | कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे
होर्डिंग  – 21
फ्लेक्स, बोर्ड, बॅनर 173
झेंडे – 13
पोस्टर – 21
किऑक्स – 15

एकूण – 239

Illegal Hoardings | आरक्षित जागेवर अनधिकृत होर्डिंग्स | प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात जनआंदोलन

Categories
Breaking News PMC Political social पुणे

आरक्षित जागेवर अनधिकृत होर्डिंग्स

| प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात जनआंदोलन

पुणे |  वानवडी स.नं.६४ येथील अनधिकृत होर्डिंग व बेकायदेशीर राडारोडयाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वात नागरी जनआंदोलन करण्यात आले. तसेच होर्डिंग नाही काढल्यास न्यायालयात खेचण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला.
प्रशांत जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार वानवडी सर्वे नंबर ६४ या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे प्ले ग्राउंड, पार्किंग, HCMTR  – रिंग रोड अशा विविध बाबींकरिता आरक्षण आहे. या आरक्षणाच्या जागेमध्ये मागील २०दिवसात तब्बल १५ होर्डिंग्स अनाधिकृतपणे उभी केलेली आहेत. क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव आणून,धमक्या देऊन अशाप्रकारे हे होर्डिंग उभे केलेले आहेत, असा आमचा थेट आरोप आहे. याबाबत प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही, ही कारवाई करावी याकरिता तसेच मार्केट यार्ड परिसरातील विविध बिल्डरचा राडारोडा या ठिकाणी टाकून पुराची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या विरोधामध्ये आज जनआंदोलन करण्यात आले. हे जनआंदोलन करण्यात येत असताना पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुढच्या काही दिवसांमध्ये कारवाई केली नाही, तर त्यांना थेट न्यायालयात खेचण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनासंदर्भात निवेदन स्वीकारण्याकरिता वानवडी रामटेकडी, क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्याम तारू हे उपस्थित होते.
 प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनामध्ये मा.नगरसेविका रत्नप्रभाताई जगताप, मा. नगरसेविका नंदाताई लोणकर, मा. नगरसेवक  अशोकभाऊ कांबळे,  प्रफुल्ल जांभुळकर,  केविन मॅन्युअल, प्रीती चड्डा, मृणालिनीताई वाणी, संदीप जगताप ,  स्वाती चिटणीस,   गणेश नायडू व वानवडी परिसरातील तसेच सोसायटीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Hoarding Action | होर्डिंग वर कारवाई होत नाही म्हणून एका क्षेत्रीय अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली! 

Categories
Breaking News PMC पुणे

होर्डिंग वर कारवाई होत नाही म्हणून एका क्षेत्रीय अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली!

| महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून कारवाईचा बडगा

पुणे | शहरातील अनधिकृत होर्डिंग वर कारवाई करण्याची बाब महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गंभीरपणे घेतली आहे. मात्र काही क्षेत्रीय कार्यालयाकडून ही कारवाई तीव्र होत नाही. नगर रोड – वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय परिसरात गेल्या काही दिवसापासून व्यवस्थित कारवाई होत नाही. यामुळे महापालिका आयुक्तांनी आकाशचिन्ह विभाग आणि संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच क्षेत्रीय अधिकारी तथा सहायक आयुक्त सोमनाथ अधिकारी सोमनाथ बनकर यांच्याकडून क्षेत्रीय अधिकारी पदाचा अधिकार काढून घेतला आणि ती जबाबदारी उपअभियंता नामदेव बजबळकर यांच्यावर सोपवली आहे. यामुळे सर्व क्षेत्रिय कार्यालये चांगलीच हादरून गेली आहेत.
आगामी काळात शहरात होर्डिंग, फ्लेक्स, बोर्ड लावायचे (Hoarding) असतील, तर आणखी ज्यादा दर मोजावे लागणार आहेत.  शहरात 222 रुपये प्रति चौरस फुट दर लागू होता. मात्र आता हे दर वाढवले  आहेत. महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून (PMC sky sign dept) याबाबतचा प्रस्ताव तयार करून  तो स्थायी समिती च्या (Standing Committee) माध्यमातून मुख्य सभेसमोर (General body) ठेवला होता. त्यानुसार २०१३-१४ ते २०२२-२३ पर्यंत दरवर्षी १०% दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार हे दर 580 प्रती चौरस फुट होणार आहेत. तसेच नवीन महापालिका हद्दी साठी देखील नवीन दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. मुख्य सभेने नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने यावर कार्यवाही करणे सुरु केले आहे. त्यानुसार प्रस्ताव देखील घेणे सुरु झाले आहे.
दरम्यान महापालिका आयुक्त यांच्याकडून अनधिकृत होर्डिंगच्या कारवाई वर गंभीरपणे लक्ष दिले आहे. त्यानुसार प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला उद्दिष्टे देखील देण्यात आली आहेत. आकाशचिन्ह विभागाकडून क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना त्यासाठी शनिवारी आणि रविवारी देखील कामावर हजर राहण्यास सांगितले जात आहे. होर्डिंग वर कारवाई करताना समाविष्ट गावात काही कर्मचाऱ्यांना मारहाण देखील झाली आहे. कारवाईच्या वेळी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे काही क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई करताना हयगय केली जात आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान नगर रोड – वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाकडून होर्डिंग कारवाई करण्यात हलगर्जीपणा केला म्हणून महापालिका आयुक्तांनी क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ बनकर यांची तडकाफडकी बदली देखील केली. त्यांच्या जागी क्षेत्रीय कार्यालयाचे उपअभियंता नामदेव बजबळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बनकर यांच्याकडे स्थानिक संस्था कर या पदाचा पदभार तसाच ठेवण्यात आला आहे. तसेच आयुक्तांनी नवीन अधिकाऱ्यांना कारवाई कडक करण्यास सांगितले आहे. आयुक्तांच्या या भूमिकेने मात्र आकाशचिन्ह विभागाकडे काम करणारे कर्मचारी मात्र हादरून गेले आहेत.

Illegal Hoardings | PMC | शहरातील अनधिकृत होर्डिंग वरील कारवाईला मिळणार ‘बळ’ | ठेकेदाराच्या माध्यमातून महापालिका करणार कारवाई 

Categories
Breaking News PMC पुणे

शहरातील अनधिकृत होर्डिंग वरील कारवाईला मिळणार ‘बळ’

| ठेकेदाराच्या माध्यमातून महापालिका करणार कारवाई

पुणे : शहरातील अनधिकृत होर्डिंग आणि फ्लेक्स वरील कारवाईला आता बळ मिळणार आहे. महापालिकेकडे कर्मचारी कमी आहेत म्हणून कारवाई करता येत नाही, असे कारण महापालिका प्रशासन देत होते. मात्र आता असे कारण देता येणार नाही. कारण महापालिका ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून अनधिकृत होर्डिंग वर कारवाई करणार आहे. यासाठी प्रशासनाने टेंडर प्रक्रिया राबवली होती. यासाठी महापालिकेला 74 लाखाचा खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. यावर उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे.
शहरात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट झाल्याने महापालिका प्रशासनाने यावर कारवाई करण्यासाठी एक अभियान सुरु केले होते. शिवाय महापालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून दंडाची रक्कम वाढवून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांनी आदेश दिल्याने थोडे दिवस कारवाई केली गेली. मात्र मनुष्यबळाचे कारण देत ही कारवाई थांबवली गेली. शहरात ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना विद्युत पोलवर बॅनर, फ्लेक्स लावले जाताहेत. यावर ना गुन्हे दाखल होताहेत ना दंड वसूल केला जातो. यावरून महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी अतिरिक्त आयुक्त आणि विभाग प्रमुख यांचा चांगलाच क्लास घेतला होता. शिवाय कारवाई करून शहर साफ ठेवण्याचे देखील निर्देश दिले. दरम्यान आयुक्तांच्या या आदेशानंतर आकाशचिन्ह विभागाने तात्काळ कारवाई करण्यास सुरवात केली होती. विशेष म्हणजे अभय दिले गेलेल्या विद्युत पोलवरील फ्लेक्स काढण्यास सुरुवात केली होती.
शहरात ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना विद्युत पोलवर(light pole)  बॅनर, फ्लेक्स(Banner, felx) लावले जाताहेत. यावर ना गुन्हे दाखल होताहेत ना दंड वसूल केला जातो. याबाबत ‘कारभारी’ वृत्तसंस्थने आवाज उठवला होता. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने(pmc civic body) एक जाहीर प्रकटन दिले होते. ज्यात इशारा दिला होता की हे फलक काढून टाका शिवाय यापुढे लावल्यास त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला जाईल. महापालिकेच्या या इशाऱ्यानंतर आता शहराचे विद्रुपीकरण थांबेल, असा विश्वास व्यक्त केला जात होता. तरीही जाहिरात फलकाचे मालक हे फलक काढून घेत नाहीत.

: स्थायी समिती समोर प्रस्ताव

शहरातील अनधिकृत होर्डिंग आणि फ्लेक्स वरील कारवाईला आता बळ मिळणार आहे. महापालिकेकडे कर्मचारी कमी आहेत म्हणून कारवाई करता येत नाही, असे कारण महापालिका प्रशासन देत होते. मात्र आता असे कारण देता येणार नाही. कारण महापालिका ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून अनधिकृत होर्डिंग वर कारवाई करणार आहे. यासाठी प्रशासनाने टेंडर प्रक्रिया राबवली होती. यासाठी महापालिकेला 74 लाखाचा खर्च येणार आहे. ठेकेदार अविष्कार घोलप याना हे काम देण्यात येणार आहे. विशेष हे आहे कि 16% कमी दराने हे टेंडर ठेकेदाराने घेतले आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. यावर उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

Illegal Flex : PMC : अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स वर महापालिकेची जोरदार कारवाई!

Categories
Breaking News PMC पुणे

अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स वर महापालिकेची जोरदार कारवाई

पुणे : महापालिकेतर्फे मागील १० दिवसांमध्ये ४ जाहिरात फलक, ३७४८ बोर्ड, ३५२० बॅनर, १५७७ फ्लेक्स, १०६९ झेंडे, ४६४८ पोस्टर, १५०६ किआॅक्स, १९५३ इतर असे एकूण १८ हजार २३ अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अद्यापपर्यंत जाहिरात फलक निष्कासन कारवाईतून दीड लाख रुपयांचा दंड वसूल भरण्यात आला आहे. तसेच, बोर्ड, बॅनर, पोस्टर इत्यादी अनधिकृतपणे लावलेल्या संबंधितांकडून ७ लाख १२ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले आहेत.

अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई केल्यानंतर ५० हजार रुपयांचा दंड जाहिरात फलकधारकाकडून वसूल करण्यात येतो. संबंधिताने मुदतीत दंड न भरल्यास संबंधित जागामालकाच्या मिळकतीवर दंडाच्या रकमेचा बोजा चढवण्यात आला आहे. त्यानुसार, संबंधित २९ जागा मालकांच्या मिळकतीवर १४ लाख ५० हजार रुपये रक्कम वसूल करण्यात आली आहे. कारवाई नियमितपणे सुरु ठेवण्यात येणार असून सर्व क्षेत्रीय कार्यालयांना अतिरिक्त सेवक पुरवण्यात आले आहेत.

निनावी जाहिरात फलकधारकांच्या होर्डिंगवर कारवाई केल्यानंतर जाहिरात फलकाचे संपूर्ण साहित्य जप्त करण्यात येते. अद्यापपर्यंत १४५० किलो लोखंड जप्त करण्यात आले आहे. आजपर्यंत अनधिकृत होर्डिंग, बॅनर, फ्लेक्स, पोस्टर, झेंडे लावणा-या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी ५३ ठिकाणी पोलीस स्टेशनना फिर्याद देण्यात आली आहे. फिर्याद दिल्यानंतर ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विनापरवाना जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, पोस्टर, झेंडे, साईड आणि फ्रंट  मार्जिनमध्ये नामफलक, साइनेजेस उभारु नयेत आणि शहर विदु्रपीकरण थांबवावे, असे आवाहन परवाना आणि आकाशचिन्ह विभागाकडून करण्यात आले आहे. विद्रुपीकरण करणा-या संबंधितांवर दंडात्मक आणि फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. नामफलकधारकांनी त्यांच्या फलकांचे नियमितीकरण करण्यासाठी कागदपत्रांसह आपले प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Illegal Hoardings : अनधिकृत होर्डिंग वरून अतिरिक्त आयुक्त, विभाग प्रमुख धारेवर  : महापालिका आयुक्तांनी शहर साफ करण्याचे दिले आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

अनधिकृत होर्डिंग वरून अतिरिक्त आयुक्त, विभाग प्रमुख धारेवर

: महापालिका आयुक्तांनी शहर साफ करण्याचे दिले आदेश

पुणे : शहरात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट झाल्याने महापालिका प्रशासनाने यावर कारवाई करण्यासाठी एक अभियान सुरु केले होते. शिवाय महापालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून दंडाची रक्कम वाढवून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांनी आदेश दिल्याने थोडे दिवस कारवाई केली गेली. मात्र मनुष्यबळाचे कारण देत ही कारवाई थांबवली गेली. शहरात ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना विद्युत पोलवर बॅनर, फ्लेक्स लावले जाताहेत. यावर ना गुन्हे दाखल होताहेत ना दंड वसूल केला जातो. यावरून आता महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी अतिरिक्त आयुक्त आणि विभाग प्रमुख यांचा चांगलाच क्लास घेतला. शिवाय कारवाई करून शहर साफ ठेवण्याचे देखील निर्देश दिले. दरम्यान आयुक्तांच्या या आदेशानंतर आकाशचिन्ह विभागाने तात्काळ कारवाई करण्यास सुरवात केली आहे. विशेष म्हणजे अभय दिले गेलेल्या विद्युत पोलवरील फ्लेक्स काढण्यास सुरुवात झाली आहे.
शहरात ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना विद्युत पोलवर(light pole)  बॅनर, फ्लेक्स(Banner, felx) लावले जाताहेत. यावर ना गुन्हे दाखल होताहेत ना दंड वसूल केला जातो. याबाबत ‘कारभारी’ वृत्तसंस्थने आवाज उठवला होता. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने(pmc civic body) एक जाहीर प्रकटन दिले होते. ज्यात इशारा दिला होता की हे फलक काढून टाका शिवाय यापुढे लावल्यास त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला जाईल. महापालिकेच्या या इशाऱ्यानंतर आता शहराचे विद्रुपीकरण थांबेल, असा विश्वास व्यक्त केला जात होता. तरीही जाहिरात फलकाचे मालक हे फलक काढून घेत नाहीत.

: मुख्य रस्त्यावरील विद्युत पोल वर फलक

शहरात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट झाल्याने महापालिका प्रशासनाने यावर कारवाई करण्यासाठी एक अभियान सुरु केले होते. शिवाय महापालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून दंडाची रक्कम वाढवून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांनी आदेश दिल्याने थोडे दिवस कारवाई केली गेली. मात्र मनुष्यबळाचे कारण देत ही कारवाई थांबवली गेली. शहरात ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना विद्युत पोलवर बॅनर, फ्लेक्स लावले जाताहेत. यावर ना गुन्हे दाखल होताहेत ना दंड वसूल केला जातो. उल्लेखनीय बाब म्हणजे नगरसेवकांनी याबाबत तक्रारी करून देखील प्रशासन ढिम्मच होते. प्रशासनाच्या या भूमिकेवरून कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. त्यानंतर प्रशासनाने जाहीर प्रकटन दिले होते. तरीही कारवाई करण्यात आली नव्हती. यावरून आता महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी अतिरिक्त आयुक्त आणि आकाशचिन्ह विभागाचे विभाग प्रमुख यांचा चांगलाच क्लास घेतला. शिवाय कारवाई करून शहर साफ ठेवण्याचे देखील निर्देश दिले. दरम्यान आयुक्तांच्या या आदेशानंतर आकाशचिन्ह विभागाने तात्काळ कारवाई करण्यास सुरवात केली आहे. विशेष म्हणजे अभय दिले गेलेल्या विद्युत पोलवरील फ्लेक्स काढण्यास सुरुवात झाली आहे.

Illegal Hoardings on Light pole : Wireman : विद्युत पोल वरील अनधिकृत जाहिरात फलक : वायरमन वर जबाबदारी निश्चित करणार 

Categories
Breaking News PMC पुणे

विद्युत पोल वरील अनधिकृत जाहिरात फलक : वायरमन वर जबाबदारी निश्चित करणार 

:  महापालिका प्रशासनाची आक्रमक भूमिका 

पुणे : शहरात ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना विद्युत पोलवर(light pole)  बॅनर, फ्लेक्स(Banner, felx) लावले जाताहेत. यावर ना गुन्हे दाखल होताहेत ना दंड वसूल केला जातो. याबाबत ‘कारभारी’ वृत्तसंस्थने आवाज उठवला होता. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने(pmc civic body) एक जाहीर प्रकटन दिले होते. ज्यात इशारा दिला होता की हे फलक काढून टाका शिवाय यापुढे लावल्यास त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला जाईल. महापालिकेच्या या इशाऱ्यानंतर आता शहराचे विद्रुपीकरण थांबेल, असा विश्वास व्यक्त केला जात होता. तरीही जाहिरात फलकाचे मालक हे फलक काढून घेत नाहीत. त्यामुळे याची जबाबदारी आता महापालिका स्थानिक वायरमन(wireman) वर निश्चित करणार आहे. फलक काढणे, त्यावर दंड वसूल करून गुन्हे दाखल करणे, नवीन फलक लागू न देणे, अशी कामे वायरमन ला करावी लागतील. अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
: मुख्य रस्त्यावरील विद्युत पोल वर फलक

शहरात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट झाल्याने महापालिका प्रशासनाने यावर कारवाई करण्यासाठी एक अभियान सुरु केले होते. शिवाय महापालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून दंडाची रक्कम वाढवून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांनी आदेश दिल्याने थोडे दिवस कारवाई केली गेली. मात्र मनुष्यबळाचे कारण देत ही कारवाई थांबवली गेली. शहरात ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना विद्युत पोलवर बॅनर, फ्लेक्स लावले जाताहेत. यावर ना गुन्हे दाखल होताहेत ना दंड वसूल केला जातो. उल्लेखनीय बाब म्हणजे नगरसेवकांनी याबाबत तक्रारी करून देखील प्रशासन ढिम्मच होते. प्रशासनाच्या या भूमिकेवरून कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. त्यानंतर प्रशासनाने जाहीर प्रकटन दिले होते.

: जबाबदारी निश्चित होत नव्हती
विद्युत विभाग पुणे महानगरपालिका तर्फे जाहीर प्रकटन करण्यात आले होते की पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील पथदिव्यांचा खांबावरून केबल टाकून अनधिकृतपणे व्यवसाय केला जात आहे. तसेच अनधिकृतपणे पथदिव्यांच्या खांबावर जाहिरात फलक व इतर फलक लावले जात असल्याने पुणे शहरातील नागरिकांच्या जीवितास घातक धोका निर्माण झाला आहे.तसेच या उपरी केबलच्या कामामुळे पुणे मनपाचे पोल /बॅकेट/फिटिंग पडण्याची शक्यता असून पुणे मनपाच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे. या सर्व कामांमुळे पुणे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने अशाप्रकारे अनाधिकृत जाहिरात, इतर फलक तसेच उपरी केबल पुणे मनपाच्या पथदिव्यांच्या खांबावर यापुढे कोणीही लावू नये. अन्यथा त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका कायदा १९४९ कलम ३७६(२) आणि महाराष्ट्र मालमत्तेचा विरुपाणास प्रतिबंध करण्याकरता अधिनियम १९९५ कलम २ (बी) मधील तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीवर दिवाणी अथवा फौजदारी खटला दाखल करण्यात येईल. महापालिकेच्या या इशाऱ्यानंतर आता शहराचे विद्रुपीकरण थांबेल, असा विश्वास व्यक्त केला जात होता. तरीही जाहिरात फलकाचे मालक हे फलक काढून घेत नाहीत. शिवाय याची जबाबदारी कुणावर निश्चित करावी, याचाही महापालिका प्रशासनाकडून निर्णय होत नव्हता. त्यामुळे याची जबाबदारी आता महापालिका प्रशासन स्थानिक वायरमन वर निश्चित करणार आहे. फलक काढणे, त्यावर दंड वसूल करून गुन्हे दाखल करणे, नवीन फलक लागू न देणे, अशी कामे वायरमन ला करावी लागतील.

Illegal Hoardings : Electric Poles : विद्युत पोल वरील जाहिरात फलक काढा अन्यथा फौजदारी खटला!  : ‘कारभारी’ च्या बातमीनंतर महापालिका प्रशासनाची आक्रमक भूमिका 

Categories
Breaking News PMC पुणे

विद्युत पोल वरील जाहिरात फलक काढा अन्यथा फौजदारी खटला! 

 

: ‘कारभारी’ च्या बातमीनंतर महापालिका प्रशासनाची आक्रमक भूमिका 

पुणे : शहरात ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना विद्युत पोलवर बॅनर, फ्लेक्स लावले जाताहेत. यावर ना गुन्हे दाखल होताहेत ना दंड वसूल केला जातो. याबाबत ‘कारभारी’ वृत्तसंस्थने आवाज उठवला होता. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने एक जाहीर प्रकटन दिले आहे. ज्यात इशारा दिला आहे की हे फलक काढून टाका शिवाय यापुढे लावल्यास त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला जाईल. महापालिकेच्या या इशाऱ्यानंतर आता शहराचे विद्रुपीकरण थांबेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

: मुख्य रस्त्यावरील विद्युत पोल वर फलक

शहरात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट झाल्याने महापालिका प्रशासनाने यावर कारवाई करण्यासाठी एक अभियान सुरु केले होते. शिवाय महापालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून दंडाची रक्कम वाढवून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांनी आदेश दिल्याने थोडे दिवस कारवाई केली गेली. मात्र मनुष्यबळाचे कारण देत ही कारवाई थांबवली गेली. शहरात ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना विद्युत पोलवर बॅनर, फ्लेक्स लावले जाताहेत. यावर ना गुन्हे दाखल होताहेत ना दंड वसूल केला जातो. उल्लेखनीय बाब म्हणजे नगरसेवकांनी याबाबत तक्रारी करून देखील प्रशासन ढिम्मच होते. प्रशासनाच्या या भूमिकेवरून कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. यावर ‘कारभारी’ ने आवाज उठवला होता. त्यानंतर आता महापालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

: काय आहे जाहीर प्रकटन

विद्युत विभाग पुणे महानगरपालिका तर्फे जाहीर प्रकटन करण्यात येत आहे की पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील पथदिव्यांचा खांबावरून केबल टाकून अनधिकृतपणे व्यवसाय केला जात आहे. तसेच अनधिकृतपणे पथदिव्यांच्या खांबावर जाहिरात फलक व इतर फलक लावले जात असल्याने पुणे शहरातील नागरिकांच्या जीवितास घातक । धोका निर्माण झाला आहे.तसेच या उपरी केबलच्या कामामुळे पुणे मनपाचे पोल /बॅकेट/फिटिंग पडण्याची शक्यता असून पुणे मनपाच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे.
या सर्व कामांमुळे पुणे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने अशाप्रकारे अनाधिकृत जाहिरात, इतर फलक तसेच उपरी केबल पुणे मनपाच्या पथदिव्यांच्या खांबावर यापुढे कोणीही लावू नये. अन्यथा त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका कायदा १९४९ कलम ३७६(२) आणि महाराष्ट्र मालमत्तेचा विरुपाणास प्रतिबंध करण्याकरता अधिनियम १९९५ कलम २ (बी) मधील तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीवर दिवाणी अथवा फौजदारी खटला दाखल करण्यात येईल.
पुणे शहरातील नागरिकांनी विद्युत पोल व फिटिंग संबंधित कोणते असुरक्षितता सदृश्य परिस्थिती आढळल्यास अथवा दिवा बंद असल्यास खालील संपर्क दूरध्वनी वर तक्रार नोंदवावी.
संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक(P.M.C. Care)- १८०० १०३० २२२ (वॉट्स अॅप नं.) – ९६८९९००००२