International Night Marathon | ४ डिसेंबरला रंगणार यंदाची ३६वी पुणे आंतरराष्ट्रीय नाईट मॅरेथॉन

Categories
Breaking News cultural Sport पुणे महाराष्ट्र

४ डिसेंबरला रंगणार यंदाची ३६वी पुणे आंतरराष्ट्रीय नाईट मॅरेथॉन

पुणे: पुणे शहराचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर नेणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे यंदाचे ३६ वे वर्ष असून,यंदा रविवार दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी ही मॅरेथॉन या वर्षी देखील ‘नाईट मॅरेथॉन’  म्हणून संपन्न होईल. या स्पर्धेचा प्रारंभ ३ डिसेंबर रोजी रात्री १२ नंतर व (४ डिसेंबर ००:०१ वाजता) होईल.या नाईट मॅरेथॉनमध्ये महिला– पुरुषांचे प्रत्येकी ६ गट आहेत. पुरुष व महिला ४२.१९५ कि.मी.ची पूर्ण मॅरॅथॉन, पुरुष व महिलांच्या साठी अर्ध मॅरॅथॉन (२१.०९७५ किमी) या शिवाय या दोन्ही विभागांसाठी १० कि.मी.,५ कि.मी. , व्हीलचेअर (३ किमी) आणि फॅमिली रन (३ किमी) असे अन्य गट आहेत.

यंदाच्या मॅरेथॉनचे वैशिष्ठ म्हणजे यावर्षी (सप्टेंबर २०२२) लडाख मध्ये झालेल्या ‘सरहद कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २०२२’ मधील पूर्ण मॅरेथॉनचे पुरुष गटातील विजेते जीग्मेट नामग्याल (Jigmet Namgial) आणि पूर्ण मॅरेथॉन महिला गटातील विजेती डीक्सेट डोल्मा (Dikset Dolma) हे पुण्याच्या ‘नाईट मॅरेथॉन’ मध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत.

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची नावनोंदणी ऑनलाईन पद्धतीने www.marathonpune.com येथे सुरु झालेली आहे. या स्पर्धेत भाग घेतलेल्या धावपटूंनी नोंदविलेल्या वेळेनुसार त्यांना  विशिष्ट गुण (पॉइंटस) देण्यात येतील आणि पुढील वर्षी अमेरिकेतील शिकागो येथे होणाऱ्या WANDA WORLD CHAMPIONSHIPS MARATHON मध्ये प्रवेशासाठी या गुणांचा विचार केला जाईल आणि त्याप्रमाणे वरील शिकागो  स्पर्धेत सहभागी होणे साठी त्यांना सुलभता प्राप्त होईल.तसा आंतरराष्ट्रीय करार उभयातांमध्ये ( पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आणि वांडा  वर्ल्ड चॅम्पियनशिपस मॅरेथॉन, शिकागो ) करण्यात आला आहे.कॉर्पोरेट अथवा ग्रूप बुकिंगसाठी ऑनलाईन पद्धतीने office.pimt@gmail.com येथे संपर्क करावा.

दि.३.डिसेंबर रोजी रात्री १२ नंतर( ४ डिसेंबर ००:०१वाजता) सणस मैदान येथून पुरुष आणि महिला ४२.१९५ कि.मी.ची पूर्ण मॅरॅथॉन सुरु होऊन सारसबाग–सिंहगड मार्ग – नांदेड सिटी-नांदेड सिटीमधील आतील सर्कलला वळसा घालून पुन्हा सिंहगड मार्गावरून-सारसबाग –सणस मैदान ही पहिली फेरी व पुन्हा त्याच मार्गाने जाऊन त्याच मार्गाने परत सणस मैदान येथे पूर्ण मॅरॅथॉन ( ४२.१९५ किमी) संपेल.

 

दि. ३ डिसेंबर रोजी रात्री १२:३० नंतर व (४ डिसेंबरच्या ००:३०वाजता) पुरुष व महिलांची अर्ध मॅरॅथॉन सणस मैदानातून सुरु होऊन वरील मार्गानेच नांदेड सिटीतील आतील सर्कलला वळसा मारून त्याच मार्गे सणस मैदान येथे समाप्त होईल.

याच दिवशी सकाळी ६:०० वाजता पुरुष व महिलांची १० किमी स्पर्धा सणस मैदान –सारसबाग – सिंहगड मार्ग – ब्रह्मा गार्डन व तेथून त्याच मार्गाने सणस मैदान येथे संपन्न होईल.

सकाळी ६:३० वाजता पुरुष व महिलांची ५ कि.मी. स्पर्धा सणस मैदान –सारसबाग – सिंहगड मार्ग – गणेश मळा व तेथून त्याच मार्गाने सणस मैदान येथे संपन्न होईल.

सकाळी ६:४५ वाजता पुरुष व महिलांची व्हीलचेअर स्पर्धा सणस मैदान –सारसबाग – सिंहगड मार्ग –दांडेकर पूल व तेथून त्याच मार्गाने सणस मैदान येथे संपन्न होईल. शेवटची रेस  सकाळी ७:०० वा. फॅमिली रन (३ किमी) याच मार्गावर होईल आणि सणस मैदान येथे संपन्न होईल.

पूर्ण मॅरॅथॉनच्या मार्गाची पाहणी ‘एम्स रूट मेजरर’ यांच्याकडून होणार असून मार्गावरील टेकनिकल ऑफशियलस, पंच, मोटार सायकल पायलटस, सायकलिंग पायलटस,वॉलंटियर्स, खेळाडूंसाठी स्पंजिंग आणि  रिफ्रेश मेंट्स पॉईंट्स,  पिण्याचे पाणी ,वैद्यकीय पथके आणि अँब्युलन्स, फिनिश पॉइंट येथे तात्पुरते इस्पितळ, इत्यादी सुविधा, मार्गावरील प्रकाश योजना,पोलीस बंदोबस्त,  पत्रकारांसाठी सुविधा आदींची पूर्वतयारी सुरु झाली असून मागीलवर्षी पहिल्यांदाच पुण्यात ‘नाईट मॅरॅथॉन’  आयोजित करण्यात आली होती, याचा मोठा अनुभव सर्वांना आहे.

या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरॅथॉन मध्ये १५००० हून अधिक स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा असून दरवर्षी प्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय दर्जाचे परदेशी पुरुष व महिला धावपटू यात सहभागी होतील, १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय धावपटूंनी पुण्याचा ‘नाईट मॅरॅथॉन’ मध्ये सहभागी होण्यासाठी संपर्कही साधला आहे अशी माहिती पुणे आंतरराष्ट्रीय मरेथॉन ट्रस्टचे ट्रस्टी ॲड. अभय छाजेड आणि जॉइंट रेस डायरेक्टर व ट्रस्टी रोहन मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या स्पर्धेचे रेस डायरेक्टर म्हणून सुमंत वाईकर तर टेक्निकल रेस डायरेक्टर म्हणून बाप्टिस डिसुझा, आणि  जॉइंट टेक्निकल रेस डायरेक्टर  म्हणून वसंत गोखले हे काम बघतील व गुरुबंनस कौर ,या जॉईंट रेस डायरेक्टर म्हणून काम बघतील.तर डॉ.राजेंद्र जगताप स्पर्धेची सम्पूर्ण वेद्कीय काम बघतील विजय बेंगळे आणि चंद्रकांत पाटील हे स्पर्धेच्या मार्ग समितीचे प्रभारी  म्हणून काम बघतील .