Maharashtra Women Policy | राज्याचं चौथं महिला धोरण ही जागतिक महिला दिनाची भेट

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

Maharashtra Women Policy | राज्याचं चौथं महिला धोरण ही जागतिक महिला दिनाची भेट

| उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

 

Maharashtra Women Policy – (The Karbhari News Service) – यंदाच्या जागतिक महिला दिनी राज्याचं चौथं महिला धोरण अंमलात आणून महाराष्ट्रानं राज्यातील महिलाशक्तीला नवी ऊर्जा, नवी उमेद, नवं बळ दिलं आहे. स्त्री-पुरुष समानतेचा विचार दृढ केला आहे. महिलांचे आरोग्य, महिलांना पोषक आहार, महिलांचे शिक्षण व कौशल्यवृद्धी, महिलांची सुरक्षा, महिलांसाठी रोजगारनिर्मिती, निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग, महिला खेळाडूंना आर्थिक सहाय्य, सांस्कृतिक क्षेत्रात सहभाग वाढविण्यासारख्या निर्णयांच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विकासाची मजबूत पायाभरणी केली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या चौथ्या महिला धोरणाचे स्वागत केले असून जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. (International Womens Day 2024)

राज्याचे नवीन महिला धोरण जाहीर केल्याबद्दल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष अभिनंदन केले आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती, त्यानंतर महिला व बाल विकासमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वेगळी समिती, जिल्हास्तरीय अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार आहे. या समित्यांच्या संपर्क, संवाद, समन्वयातून महिला धोरणाची राज्यात अंमलबजावणी प्रभावी होईल, महिलांच्या सक्षमीकरणाला गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

राज्याच्या चौथ्या महिला धोरणामुळे महिलांना सर्वक्षेत्रात समान संधी, शासन-प्रशासनात योग्य स्थान, अर्थसंकल्पात योग्य तरतूद, रोजगार-स्वयंरोजगारात समान संधी, कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण, संपत्तीत समान वाटा, उद्यमी महिलांसाठी मार्गदर्शन व बाजारपेठ, आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळणार आहेत. यापुढे अधिकृत कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक होणार आहे. निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांनीही मातृत्व आणि पितृत्व रजा द्यावी, असा प्रस्ताव आहे. सरकारी व खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गर्भवती महिलांसाठी घरून कामाला प्रोत्साहन देण्याची शिफारस धोरणात करण्यात आली आहे. राज्याचे चौथे महिला धोरण राज्यातील महिलाशक्तीसाठी यंदाच्या जागतिक महिला दिनाची आगळीवेगळी भेट असून ही भेट कायम स्मरणात राहिल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

International Women’s Day | पी. एम. सी. एम्प्लॉईज युनियन आणि पुणे मनपा कडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन! | लकी ड्रॉ मध्ये पाच महिलांना मिळाली भेट 

Categories
cultural PMC social पुणे

International Women’s Day | पी. एम. सी. एम्प्लॉईज युनियन आणि पुणे मनपा कडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!

| लकी ड्रॉ मध्ये पाच महिलांना मिळाली भेट

 

International Women’s Day  – (The Karbhari News Service) – जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे कामगार कल्याण विभाग, पुणे मनपा (Pune Municipal Corporation (PMC) तसेच पी. एम. सी. एम्प्लॉईज युनियन, पुणे मनपा (PMC Employees Union) यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरीता पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यामध्ये अनेक महिलांनी सहभागी होऊन उत्कृष्टरीत्या विविध कलागुणांचे सादरीकरण केले. आपले दैनंदिन कार्यालयीन कामकाज सांभाळून महिलांनी सादरीकरण करीता विशेष अशी मेहनत घेतली. कार्यक्रमा मध्ये दिव्यांग विशेष मुलींच्या डान्स ने संगळ्यांच मन जिंकली होती काही महिलांनातर अक्षरशा आश्रु अनावर झालं होत, अतिशय सुंदर असा डान्स या मुलींनी सादर केला शिक्षिका वर्षा काळे मॅडम यांनी या साठी खुप परिश्रम घेतले , उपस्थित महिलांसाठी विशेष कौतुक करणेकरीता पी.एम.सी. एम्पलॉइज युनियन कडुन प्रत्येक सहभागी कलाकारास बक्षीस देण्यात आले.

युनियन कडुन महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवला होता

लकी ड्रॉ मध्ये नावे निघालेल्या पुढील पाच भाग्यवंत महिलांना भेट स्वरूपात चांदीची नाणी देण्यात आली.

१)अपर्णा दिपक भुजबळ, २) कुंदा विजय ओव्हाळ, ३) संगीता जगताप, ४) मयुरी परसराम अत्राम, ५) रसिका प्रमोद निघुट

The Karbhari - International womens day

याप्रसंगी मुख्य कामगार कल्याण अधिकारी नितीन केंजळे , युनियन अद्यक्ष – बजरंग पोखरकर,  उल्का कळसकर मुख्य लेखा व वित्त अधिकारी,  निशा चव्हाण मुख्य विधी अधिकारी, डॉ. चेतना केरुरे उप आयुक्त सांस्कृतिक व क्रीडा विभाग, ती किशोरी शिंदे उप आयुक्त परिमंडळ १ विभाग,  प्रतिभा पाटील , आशा राऊत उप आयुक्त परिमंडळ ३ विभाग,  अस्मिता तांबे- धुमाळ इंद्रायणी कर्चे सहायक महापालिका आयुक्त ,तसेच पीएमसी एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष श्रीमती. पुजा देशमुख, महिला कार्याध्यक्ष श्रीमती.वंदना साळवे, उपाध्यक्ष रोहिणी पवार कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन श्रीमती योगिता जायभाय, शशी कलमारने, युनियनचे उपाध्यक्ष श्री. विशाल ठोंबरे, श्री राजेंद्र जाधव ,खजिनदार श्री.दिपक घोडके, सह- सेक्रेटरी श्री.राजू ढाकणे, सह-खजिनदार चेतन गरुड, सुनील मधे , अजित गारळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

PMPML | पीएमपीएमएल बसेस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 300 ऐवजी 500 रुपयाचा दंड | १० मार्च पासून होणार कार्यवाही.

Categories
Uncategorized

पीएमपीएमएल बसेस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 300 ऐवजी 500 रुपयाचा दंड 

१० मार्च  पासून होणार कार्यवाही.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम क्रमांक १७८ अन्वये दंडात्मक कारवाई करण्याच्या तरतुदीस अनुसरून रक्कम रु. ३००/- दंड वसूल करण्यात येतो. तसेच प्रवाशांनी कोणत्याह
ी प्रकारच्या सवलतीच्या प्रवासी पासमध्ये खाडाखोड, दुरुपयोग अशा प्रकारे गैरप्रकारे जे प्रवासी पासचा गैरवापर करून प्रवास करताना आढळल्यास त्या प्रवाशांकडून रक्कम रु. ५००/- दंड वसूल करण्यात येतो.

 

दिनांक १०/०३/२०२३ पासून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आळा व महामंडळाचे आर्थिक नुकसान होऊ नये याकरिता मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम क्रमांक १७८ अन्वये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रक्कम रु. ३००/- ऐवजी रक्कम रु.५००/- इतका दंड आकारणी करण्यास संचालक मंडळाने दिनांक १६/०२/२०२३ रोजी मान्यता दिली असून विनातिकीट प्रवासी रक्कम रु.५००/-  दंड आकारणी दिनांक १०/०३/२०२३ पासून करण्यात येणार आहे.

| प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेस पीएमपीएमएलच्या ‘तेजस्विनी’ बसमधून महिलांना मोफत बस प्रवास.

 

 

​जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांना मोफत प्रवास देण्याच्या मागणीच्या अनुषंगाने दि. ०६/०३/२०१९ रोजी मा. संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दर महिन्याच्या ८ तारखेस महिलांना तेजस्विनी बसमध्ये मोफत बस प्रवास करू देण्यास मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने परिवहन महामंडळामार्फत खास महिलांसाठी २३ मार्गावर २८ तेजस्विनी बसेस सुरू करण्यात आल्या होत्या तथापि, कोविड – १९ मुळे महिला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याने सदरच्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या.

​सध्या कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी झाल्याने व सर्व मार्गावर पूर्ण क्षमतेने बस संचलन सुरू करण्यात आल्याने महिला तेजस्विनी बसेस पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेल्या आहेत. सध्या प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेस ‘तेजस्विनी’ बस मधून मोफत प्रवास सेवा हि दि. ८ मार्च २०२३ पासून पूर्ववत करण्यात येत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त तेजस्विनी बसेस मधून महिलांनी मोफत प्रवास करण्याचे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

 

Women’s Day | PMC | महिला दिनानिमित्त मनपा महिला कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी

Categories
Breaking News PMC social पुणे

महिला दिनानिमित्त मनपा महिला कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी

पुणे | जागतिक महिला दिनानिमित्त महिला सेविकांना अर्ध्या दिवसाची सवलत अर्थात सुट्टी दिली जाणार आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी जारी केले आहेत.
जागतिक महिला दिनानिमित्त  ८ मार्च २०२३ रोजी आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी पुणे महानगरपालिकेतील कार्यालयीन वर्ग १ ते ३ मधील अधिकारी/सेविकांना दुपारी ३ वा. नंतर व वर्ग ४ मधील सेविकांना सकाळी १०.३० वा. नंतर अर्ध्या दिवसाची सवलत देण्यात येत आहे. तरी, सर्व खातेप्रमुख/विभागप्रमुख यांनी त्यांचे नियंत्रणाखालील महिला अधिकारी / सेविकांना याबाबत सूचित करावे. असे आदेशात म्हटले आहे.

Prasann Jagtap : International Women’s Day : हिंगणे खुर्द परिसरातील विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान  : नगरसेवक प्रसन्न जगताप यांचा उपक्रम 

Categories
cultural social पुणे

हिंगणे खुर्द परिसरातील विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

: नगरसेवक प्रसन्न जगताप यांचा उपक्रम

पुणे : सिंहगड रोड हिंगणे खुर्द परिसरामध्ये नगरसेवक  ॲड.प्रसन्नदादा जगताप आणि त्यांच्या पत्नी वृंदा प्रसन्न जगताप यांच्या वतीने आज ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सिंहगड रोड परिसरातील विविध क्षेत्रातील म्हणजेच कला, फिल्म्स, डॉक्टर्स, इंजिनिअर, वकील, आयटीमध्ये कार्यरत असलेल्या महिला भगिनींचे पुष्पगुच्छ, पुस्तके व ट्रॉफी देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आले. तसेच उभयतांनी उपस्थित महिला भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध खेळ व कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यात देखील या महिलांनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन त्याचा आनंद घेतला. तसेच याप्रसंगी उपस्थित महिला भगिनींनी आपापले विचार अगदी मनमोकळेपणाने व्यक्त केले. मागील दोन वर्षात कोरोना काळामुळे त्यांना कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होता आले नव्हते. परंतु आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वृंदा प्रसन्न जगताप यांनी सिंहगड रोड परिसरातील सर्व महिला भगिनींसाठी एक अतिशय चांगला उपक्रम राबविल्यामुळे सर्व महिलांनी त्यात सहभागी होऊन त्याचा आनंद घेतला. यावेळी त्यांच्यासाठी चहापानाची देखील चोख व्यवस्था करण्यात आली होती.

International Women’s Day : धनकवडीतील महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान  : आशिष नरेंद्र व्यवहारे यांचा उपक्रम 

Categories
cultural social पुणे

धनकवडीतील महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान

: आशिष नरेंद्र व्यवहारे यांचा उपक्रम

पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त आशिष नरेंद्र व्यवहारे (उपाध्यक्ष-पुणे शहर युवक काँग्रेस) यांच्या वतीने चव्हाणनगर, धनकवडी येथील महिला सफाई कर्मचाऱ्यांचा भारतीय संस्कृतीत पारंपरिक पेहराव म्हणजे साडी देऊन सन्मानीत करण्यात आले.

आज ८ मार्च,जागतिक महिला दिन.जगभरात महिला दिन साजरा केला जातो.आजवर संघर्ष करत आलेली स्त्री (महिला) आजही दैनंदिन जीवनासाठी संघर्ष करत आहे.या ८ मार्च महिला दिनानिमित्त किमान मायेची थाप देऊन सन्मान समाजाने करावा हीच अपेक्षा या महिलांची असते.

रमेशदादा बागवे, मोहनदादा जोशी, अभयज छाजेड, संजय बालगुडे, सोनाली मारणे, पूजा आनंद, नरेंद्र व्यवहारे, जयश्री कांबळे, आशिष व्यवहारे, संतोष गेळे, गणेश कुडले, सुजित लाजुरकर, द. स. पोळेकर, अनिल हंडे, दिलीप पवार, अक्षय सागर यांच्या हस्ते या सफाई कर्मचाऱ्यांचा साडी देऊन सन्मानीत करण्यात आले. सर्व नेते मंडळींना सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजन आशिष नरेंद्र व्यवहारे यांनी केले.

International Women’s Day : महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत; तोच खरा महिला दिन : डॉ प्राची सुतार  : ओतूरच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात जागतिक महिला दिना साजरा

Categories
cultural social पुणे

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत; तोच खरा महिला दिन : डॉ प्राची सुतार

: ओतूरच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात जागतिक महिला दिना साजरा

पुणे : “प्रत्येक घरातील महिला ही लक्ष्मी, विद्या व अन्नपूर्णा आहे. स्त्री ही भावनिक असते, ती आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. स्त्रियांनी आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवे, रूढी परंपरांचे बंधन तोडून आधुनिक जीवनाची कास महिलांनी धरावी, महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत तोच खरा महिला दिन ठरेल”. असे प्रतिपादन डॉ प्राची सुतार यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयामध्ये ८ मार्च ला राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून ऍड.पूनम डेरे, डॉ. प्राची सुतार, पी.एस.आय. रागिणी कराळे तसेच महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.एफ. ढाकणे, डॉ. के. डी. सोनावणे, ज्येष्ठ प्रा डॉ बी एम शिंदे डॉ व्ही वाय गावडे डॉ एन एन उगले डॉ आर टी काशीद उपस्थित होते अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही एम शिंदे व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ अमोल बिबे यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.अमोल बिबे यांनी केले. आपल्या प्रस्ताविकातून त्यांनी महिला दिनाचे महत्व विशद करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.

महिला दिनाचे औचित्य राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये दोन वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थीनीचा सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवीका मीरा नायकोडी, पृथ्वी भोर, शुभदा गायकर, अंकिता शिरसाठ, सृष्टी महाकाळ, मनोज गायकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

ऍड. पूनम डेरे आपल्या मनोगतात म्हणाल्या की, “स्त्री ही सक्षमतेचे व मांगल्याचे प्रतीक आहे. तसेच महिला कल्याणासाठी असलेल्या प्रमुख १८ कायदे प्रत्येक महिलेला माहिती असणे गरजेचे आहे असे नमूद केले व कोविड १९ च्या काळात स्त्रियांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरी चाही त्यांनी उल्लेख केला.

याच बरोबर जुन्नर तालुका निर्भया पथकाचा प्रमुख पीएसआय रागिणी कराळे यांनी सुद्धा आपल्या मनोगतातून महिला सक्षमीकरण व महाविद्यालय युवतींनी शिक्षणाबरोबरच स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण घ्यावे तसेच कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी घाबरून न जाता तिचा धैर्याने सामना करावा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिले.

उपप्राचार्य डॉ. के. डी. सोनावणे म्हणाले “केवळ महिला दिनीच नव्हे महिलांना कायमच सन्मानाने जगण्याचे वातावरण निर्माण करून देणे ही समस्त पुरुष वर्गाची जबाबदारी आहे असे मत व्यक्त केले.

तसेच या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. एस. एफ. ढाकणे, कनिष्ठ विभागातील आंद्रे मॅडम व वरिष्ठ विभागातील प्रा. रोहिणी मदने मॅडम यांनीही आपले विचार व्यक्त केले.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. व्ही. एम. शिंदे म्हणाले “इतिहास काळात महिलांना अत्यंत वाईट वागणूक दिली जात होती, जिजाऊंनी शिवराय घडविले व शिवरायांनी जीवनभर महिलांचा सन्मान केला, तसेच सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. तसेच आज महिला नोकरी करून आपले घर चालवीत आहे, प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कार्यक्षेमतेने प्रभाव टाकत आहे. पुरुषी अहंकार बाजूला ठेऊन महिलांना सन्मानाची वागणूक प्रत्येक पुरुषाने दिली पाहिले असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ अमोल बिबे,डॉ निलेश काळे, डॉ भुषण वायकर, प्रा अजय कवडे व शिक्षकेतर कर्मचारी श्री मिलिंद ढगे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निलेश काळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ भूषण वायकर यांनी व्यक्त केले.

International Women’s Day : नवीन मराठी शाळेत महिला दिन साजरा

Categories
cultural social पुणे

नवीन मराठी शाळेत महिला दिन साजरा

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत महिला दिनानिमित्त कोरोना काळात शाळा बंद असल्याने अभ्यासात मागे पडणार्या विद्यार्थ्यांना स्वयंसेवी वृत्तीने शिकविणार्या माजी शिक्षिका आणि विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला.

शाळेतील विद्यार्थिनींनी राष्ट्रमाता आणि सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांल प्रेरणादायी कामगिरी करणार्या महिलांच्या वेशभूषा करून त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला. आनंदी बोराटे या विद्यार्थिनीने महाराणी ताराबाईचे स्वगत सादर केले. तिसरीच्या विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेली भेटकार्ड आणि गजरे दिले.

शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे, डीईएसच्या प्रबंधक डॉ. सविता केळकर, माजी नगरसेविका ज्योत्स्ना सरदेशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली रुपाली सावंत, सोनाली मुंढे, अर्चना देव, योगिता भावकर, अंतीर शेठ, तनुजा तिकोने, श्रीपाद जोशी, धनंजय तळपे यांनी संयोजन केले.

International Women’s Day : PMP Free Bus : महिला दिनानिमित्त महिलांना पीएमपीचा  मोफत प्रवास करता येणार नाही? 

Categories
Breaking News PMC पुणे

महिला दिनानिमित्त महिलांना पीएमपीचा  मोफत प्रवास करता येणार नाही?

: प्रशासकीय मान्यतेविना प्रस्ताव रखडणार!

पुणे : 8 मार्च हा जागतिक महिला दिन (International Women’s day)  म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त आणि या वर्षांपासून 8 मार्च दिवशी पीएमपीच्या (PMPML)  सर्व बसचा प्रवास शहरातील सर्व महिलांसाठी मोफत (free)  असेल. याबाबतचा प्रस्ताव महिला बाल कल्याण समितीच्या (Women and child welfare committee)  बैठकीत मान्य करण्यात आला आहे. त्यानंतर आज मुख्य सभेत देखील या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. मात्र महापालिका प्रशासनाकडून हा प्रस्ताव पीएमपी कडे गेलाच नाही. त्यामुळे महिलांना उद्या मोफत प्रवास करता येणार नाही, असे चित्र दिसते आहे. महापालिका प्रशासन आणि पीएमपी प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

: मुख्य सभेत एकमताने दिली मंजुरी

८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून दि.०८ मार्च २०२२ या सालापासून दरवर्षी पुणे शहरातंर्गत पी.एम.पी.एम.एल.च्या सर्व मार्गावरील बस फेऱ्या संपूर्ण दिवस सर्व महिलांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात याव्यात. यामध्ये तेजस्विनी बसचा देखील समावेश आहे.   सदरचा उपक्रम यावर्षी प्रमाणे दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राबविण्यात यावा. असा प्रस्ताव महिला बाल कल्याण समितीने मान्य करून तो अंतिम मंजुरीसाठी मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला होता. सोमवारी सकाळी झालेल्या मुख्य सभेत तत्काळ या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. सर्व पक्षांनी एकमताने हा प्रस्ताव मान्य केला. त्यानंतर लगेच नगरसचिव विभागाने प्रस्ताव तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी आयुक्त कार्यालयात पाठवला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत आयुक्तांनी यावर निर्णय घेतला नव्हता. आता उद्या ८ मार्च म्हणजे महिला दिन आहे. त्यामुळे महिलांना उद्या मोफत प्रवास करता येणार नाही, असे चित्र दिसते आहे.  महापालिका प्रशासनाकडून हा प्रस्ताव पीएमपी कडे गेलाच नाही.  महापालिका प्रशासन आणि पीएमपी प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Health Checkup Camp : Rupali Dhadve : PMC : आता 8 मार्च ला दरवर्षी महिलांसाठी महापालिकेकडून आरोग्य तपासणी शिबीर 

Categories
Breaking News PMC Political social आरोग्य पुणे

आता 8 मार्च ला दरवर्षी महिलांसाठी महापालिकेकडून आरोग्य तपासणी शिबीर

: महिला बाल कल्याण समितीने मान्य केला प्रस्ताव

पुणे : पुणे शहरातील सर्व महिलांसाठी ( All women in Pune city)  पुणे महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यात व रूग्णालयांमध्ये (All PMC hospitals) महिलांसाठी आरोग्य विभागामार्फत मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी शिबीर (Health check up camp) आयोजित करण्यात येणार आहे. त्यातूनच त्यांना अॅनिमिया, ब्रेस्ट कॅन्सर इ. प्रकारच्या आजारांबद्दलची जनजागृती करून द्यावी, जेणेकरून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. जागतिक महिलादिनानिमित्त ( International women’s day) हे आरोग्य शिबीर यावर्षी प्रमाणे दरवर्षी ८ मार्च रोजी राबविण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी महिला बाल कल्याण समितीच्याबैठकीत मान्यता देण्यात आली. अशी माहिती समितीच्या अध्यक्षा रुपाली धाडवे  Chairman Rupali Dhadve)  यांनी दिली.

: असा आहे प्रस्ताव

पुणे शहर मध्ये आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा मोठ्या प्रमाणात जलद गतीने पुणे शहरामध्ये उपलब्ध असतात. सध्याच्या २१ व्या शतकात व्यवसाय, नोकरी इ. ठिकाणी पुरूषांच्या बरोबरीने महिलाही काम करतात. सध्याच्या धकाधकीच्या काळात महिलांना कौटुंबिक जवाबदारी बरोबरच त्यांना कार्यालयीन अथवा व्यावसायिक जवाबदारीही पार पाडावी लागते. सहाजिकच या धावपळीचा महिलांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. परंतु, महिलांमध्ये पूर्वप्राथमिक तपासण्या करून घेवून आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकडे कमी कल दिसून येतो. यातूनच असाध्य रोगाचे निदान महिलांमध्ये जास्त प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते. महिला, किशोरवयीन मुलींना रोगपूर्व निदान तपासणी व कौन्सलिंग करून महिला व किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्याचे महत्व अधोरेखित केले पाहिजे. त्या योगे पुणे शहरातील झोपडपट्टी भाग व पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करणे अधिक आवश्यक असल्याचे दिसून येते. ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील इयत्ता ७ वी ते इयत्ता १० वी पर्यंतच्या किशोरवयीन मुलींसाठी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करावे. तसेच पुणे शहरातील सर्व महिलांसाठी पुणे महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यात व रूग्णालयांमध्ये महिलांसाठी आरोग्य विभागामार्फत मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात यावे. त्यातूनच त्यांना अॅनिमिया, ब्रेस्ट कॅन्सर इ. प्रकारच्या आजारांबद्दलची जनजागृती करून द्यावी, जेणेकरून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. जागतिक महिलादिनानिमित्त सदरचे आरोग्य शिबीर यावर्षी प्रमाणे दरवर्षी ८ मार्च रोजी राबविण्यात यावे. या प्रस्तावाला महिला बाल कल्याण समितीने मान्यता दिली आहे.