PMC Engineering Cadre Promotion | महापालिकेच्या JE ना आता 25% ऐवजी फक्त 15% पदोन्नती; त्यासाठीही परीक्षा द्यावी लागणार | 85% सरळसेवा भरती

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Engineering Cadre Promotion | महापालिकेच्या JE ना आता 25% ऐवजी फक्त 15% पदोन्नती; त्यासाठीही परीक्षा द्यावी लागणार | 85% सरळसेवा भरती

| अभियांत्रिकी सेवा क्लास 1 आणि 2 साठी 100% पदोन्नती

PMC Engineering Cadre Promotion | पुणे | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता (Executive Engineer) , उप अभियंता (Deputy Engineer) तसेच कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) या पदांच्या नेमणुकीची पद्धत, टक्केवारी आणि अर्हता बदलण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. याला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता कनिष्ठ अभियंता यांना 25% च्या ऐवजी 15% पदोन्नती ठेवण्यात आली आहे. त्या पदोन्नती साठी आता कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. तर 75% च्या ऐवजी 85% सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. तर अभियांत्रिकी सेवा क्लास 1 आणि 2 साठी 100% पदोन्नती ठेवण्यात आली आहे. यामध्ये 25% भरती रद्द करण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये अभियांत्रिकी वर्गाला पूर्णपणे न्याय देण्यात आला असून लेखनिकी संवर्गाच्या संधी मात्र एक प्रकारे हिरावून घेतल्या जात आहेत. (PMC Employees Promotion)
पुणे महापालिका आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता वर्ग 1 (वाहतूक नियोजन/ स्थापत्य/ विद्युत यांत्रिकी), उप अभियंता वर्ग 2 (वाहतूक नियोजन/ स्थापत्य/ विद्युत यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता वर्ग 3 (वाहतूक नियोजन/ स्थापत्य/ विद्युत यांत्रिकी) या पदांच्या नेमणुकीत बदल करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्ताकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. याला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी -छापवाले यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (PMC Pune News)
यानुसार कनिष्ठ अभियंता यांना 25% च्या ऐवजी 15% पदोन्नती ठेवण्यात आली आहे. तर 75% च्या ऐवजी 85% सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. वास्तविक सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिली जाते. मात्र पदोन्नती साठी JE ना परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठी 5 वर्षाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या सेवकांवर यामुळे अन्याय होणार आहे. कारण 5 वर्ष अनुभव असलेला नवीन सेवक देखील पदोन्नती घेऊ शकणार आहे. मात्र पदोन्नती घेण्यासाठी ऐन वेळेला पदव्या घेणाऱ्या लोकांवर यामुळे चाप बसणार आहे. (Pune PMC)
अभियांत्रिकी सेवा वर्ग 1 आणि 2 मधील अधिकाऱ्यासाठी 100% पदोन्नती ठेवण्यात आली आहे. यातील 25% भरती अर्थात नामनिर्देशन रद्द करण्यात आले आहे. यातील 75% पदोन्नती ही पदवी धारण करणाऱ्यासाठी असेल तर 25% पदोन्नती पदविका धारण करणाऱ्यासाठी असेल. यासाठी 3 वर्षाची नियमित सेवा आवश्यक असणार आहे. (PMC Pune Marathi News)
दरम्यान या दुरुस्त्या केल्याने अभियांत्रिकी संवर्गचा चांगलाच फायदा होणार आहे. तसेच नवीन भरती देखील होऊ शकणार आहे. मात्र यामुळे लेखनिकी संवर्गाचे नुकसान होणार आहे, असे बोलले जात आहे. कारण अभियांत्रिकी संवर्गातील लोक लेखनिकी संवर्गात येऊ शकतील. ते क्षेत्रीय अधिकारी होऊ शकतील. मात्र लेखनिकी संवर्गातील लोकांना मात्र त्यामानाने कमी संधी मिळणार आहे. याबाबत प्रशासनाकडून कुठली काळजी घेण्यात आलेली नाही.

Pune Mahanagarpalika Bharti 2023 | पुणे महापालिकेत आणखी 110 पदांसाठी भरती | कनिष्ठ अभियंता, उपकामगार अधिकारी यांचा समावेश

Categories
Breaking News Education PMC social पुणे

Pune Mahanagarpalika Bharti 2023  | पुणे महापालिकेत आणखी 110 पदांसाठी भरती | कनिष्ठ अभियंता, उपकामगार अधिकारी यांचा समावेश

| लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार

Pune Mahanagarpalika Bharti 2023 | पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) तिसऱ्या टप्प्यातील भरती (PMC Recruitment 2023) प्रक्रिया सुरु केली आहे. आता 110 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. याआधी पहिल्या टप्प्यात 448 तर दुसऱ्या टप्प्यात 320 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया अजून सुरु आहे. सोबतच आता महापालिकेने तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरु केली आहे. 110 पदांमध्ये 100 कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) (स्थापत्य), 7 उपकामगार अधिकारी (Deputy Labour Officer) आणि 3 पदे अग्निशमन विभागातील (Fire Brigade) आहेत. मात्रJE साठी 3 वर्ष अनुभवाची (Experience Condition) अट कमी करण्यात आलेली नाही. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिली. (Pune Mahanagarpalika Bharti 2023)

– कुठल्या पदांसाठी भरती?

इथापे यांनी दिलेल्या माहितीनुसार 110 पदांची भरती करण्याबाबत महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांनी आदेश दिले आहेत. या पदांमध्ये 100 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) चा समावेश आहे. 7 पदे ही उपकामगार अधिकारी यांची आहेत. तर 3 पदे ही अग्निशमन विभागातील आहेत. यामध्ये 1 उपमुख्य अग्निशमन अधिकारी, 1 विभागीय अग्निशमन अधिकारी आणि 1 उपविभागीय अग्निशमन अधिकारी यांचा समावेश आहे. (PMC Pune Bharti 2023)

– कधी होणार भरती?

उपायुक्त इथापे यांनी सांगितले कि, दुसऱ्या टप्प्याच्या भरतीची आमची प्रक्रिया सुरु आहे. नुकताच फायरमन पदाचा निकाल घोषित करण्यात आला आहे. बाकी पदांचेही निकाल लवकर घोषित करण्यात येतील. यासोबत आता तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया आम्ही सुरु केली आहे. 110 पदासाठी भरती प्रक्रियेची प्रणाली आम्ही IBPS संस्थेकडून घेणार आहोत. त्यानंतर डेमो घेऊन एक टेस्ट घेतली जाईल. त्यानंतर संस्थेकडून भरतीची तारीख दिली जाईल. तारीख आल्यानंतर आम्ही लगेच भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणार आहोत. असेही इथापे यांनी सांगितले. (PMC Pune Recruitment 2023)

– JE ची अनुभवाची अट मात्र कमी झालेली नाही

दरम्यान कनिष्ठ अभियंता (JE) साठी 3 वर्षाची अनुभवाची अट ठेवण्यात आली आहे. मात्र याबाबत बऱ्याच दिवसापासून ही अट रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने अट रद्द करण्याबाबतचा  प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. मात्र अजून सरकारने त्याला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे या भरती प्रक्रियेत अनुभवाची अट कमी झालेली नाही. असा खुलासा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला. (Pune Municipal Corporation Bharti 2023)
—–
News Title | Pune Mahanagarpalika Bharti 2023 |  Recruitment for 110 more posts in Pune Municipal Corporation  Including Junior Engineers, Deputy Labor Officers

Recruitment | जलसंपदा विभागात लवकरच कनिष्ठ  अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती | पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती 

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

जलसंपदा विभागात लवकरच कनिष्ठ  अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती

| पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

लवकरच जलसंपदा विभागात कनिष्ट अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती लवकरच होणार असून त्यातून क्षेत्रीय स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येईल. मनुष्यबळाची कमतरता दूर होण्यासाठी वर्ग ३ व ४ मधील कर्मचारी बाह्यस्रोताद्वारे उपलब्ध करुन घ्यावेत. असे निर्देश पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Pune Guardian minister Chandrakant patil) यांनी दिले. तसेच पाणी वापर संस्थांची ५० टक्के परताव्याची रक्कम प्राधान्याने वितरीत करावी, कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी आदी सूचना श्री. पाटील यांनी केल्या.(Recruitment of 500 posts of Junior Engineers in Water Resources Department)

| नीरा उजव्या कालव्याची १९ जूनपर्यंत सलग दोन आवर्तने

 

नीरा प्रणालीतील भाटघर, वीर, नीरा देवघर, गुंजवणी धरणातील पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असून त्यानुसार १० मार्चपासून १२ मेपर्यंत पहिले उन्हाळी आवर्तन सुरू असून दुसरे सलग आवर्तन १३ मे ते १९ जूनपर्यंत देण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार समिती बैठकीत ठरले. (Canal advisory committee)

जिल्ह्यातील प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती बैठका शासकीय विश्रामगृह येथे झाल्या. नीरा उजवा कालवा सल्लागार समिती बैठकीस माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, दीपक चव्हाण, समाधान आवताडे, भिमराव तापकीर, संजय जगताप, रवींद्र धंगेकर, अशोक पवार, माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.

नीरा प्रकल्पात उपयुक्त साठ्याच्या ४७.५० टक्के म्हणजेच २२.९६ टीएमसी पाणी उपलब्ध असून उन्हाळी हंगामात नीरा उजव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी १३.९३ टीएमसी पाणी व बिगर सिंचनासाठी १४.७८ टीएमसी पाणी वापराचे नियोजन आहे. त्यानुसार १९ जूनपर्यंत सलग दोन उन्हाळी आवर्तने देण्यात येणार आहेत. माळशीरस, सांगोला, पंढरपूरपर्यंत कालव्याच्या टेलपर्यंत पुरशा दाबाने पाणी जावे यासाठी पाटबंधारे विभागाने यांत्रिकी विभागाच्या सहाय्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिले. (Neera canal)

 

नीरा डाव्या कालव्याची दोन आवर्तने

नीरा डाव्या कालव्याला १ मार्चपासून ३० एप्रिलपर्यंत पहिले उन्हाळी आवर्तन सुरू असून लगेच १ मेपासून ३० जूनपर्यंत दुसरे आवर्तन देण्यात देण्यात येणार आहे. नीरा डावा कालवा एका ठिकाणी फुटल्याचा प्रकार घडला होता. ती दुरुस्ती पूर्ण झाली असून तेथील उर्वरित चाऱ्यांना प्राधान्याने सोडण्यात यावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. (Neera left canal)

भामा आसखेड प्रकल्पातून पुणे महानगरपालिकेला पाणी पुरवण्यात येते. त्याशिवाय भामा व भीमा नदीत १५ ते २७ मे पर्यंत सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. पवना धरणात ३.२३ टीएमसी पाणीसाठा असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन केले असल्यामुळे १५ जुलैपर्यंत पाणीवापर निश्चित करण्यात आला असला तरी तो पुढील कालावधीतही पुरणार आहे.

चासकमान प्रकल्पाची तीन आवर्तने

चासकमान प्रकल्पातंर्गत चासकमान आणि कलमोडी धरणात मिळून एकूण ३.७५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. योग्य नियोजनामुळे उन्हाळी तीन आवर्तने देण्यात येणार आहेत. १ मार्च ते २९ एप्रिलपर्यंत पहिले आवर्तन सुरू आहे. दुसरे आवर्तन ५ मे ते ३ जूनपर्यंत आणि तिसरे आवर्तन ८ मे ते १७ जूनपर्यंत देण्याचे चासकमान कालवा सल्लागार समिती बैठकीत ठरले. (Chaskaman dam)

प्रारंभी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी मोसमी पावसाच्या अंदाजाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. एल निनो सक्रिय होण्याची शक्यता, आयओडी, युरेशियावरील बर्फाचे आवरण यांचा पावसावर होऊ शकणार परिणाम याविषयी माहिती देण्यात आली.

यावेळी बैठकीस विविध साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रविण कोल्हे, नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बोडके नीरा देवघर डावा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, चासकमान प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण गुंजाळ, नीरा देवघरचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, भामा आसखेडचे कार्यकारी अभियंता नामदेव करे आदी उपस्थित होते.

PMC pune | Transfers | महापालिकेत तब्बल 6 वर्षांनी होणार बदल्या! |  मात्र राजकीय नेते पूर्ण समाधानी नाहीत 

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिकेत तब्बल 6 वर्षांनी होणार बदल्या!

|  मात्र राजकीय नेते पूर्ण समाधानी नाहीत

पुणे | पुणे महापालिकेतील सेवकांच्या बदल्या हा महत्वाचा विषय झाला आहे. याबाबत आरोप होऊ लागल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने तडकाफडकी बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. आता तब्बल 6 वर्षानंतर या नियतकालिक बदल्या होणार आहेत. सुमारे 132 कनिष्ठ अभियंता (JE) च्या पारदर्शक पद्धतीने बदल्या करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अभियंता प्रमाणेच लेखनिकी संवर्गातील बदल्या करताना हाच निकष वापरला जावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.  दरम्यान असे असले तरी राजकीय नेते मात्र अजून पूर्ण समाधानी नाहीत. सर्वच विभागातील बदल्या तात्काळ कराव्यात अशी मागणी नेत्यांनी केली आहे. (PMC Pune)

गेल्या काही दिवसापासून मनपा वर्तुळात तसेच शहरभरात चर्चेचा असलेला मुद्दा म्हणजे पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या हा आहे.  पुणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बादल्या दर तीन वर्षांनी करणे, असे धोरण असून या धोरणास हरताळ फासला जात आहे. तसेच  बदल्यांमध्ये लाखोंची उलाढाल होत आहे. असा आरोप राजकीय नेत्यांकडून केला जात होता.  लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लिपिक, उप अधीक्षक, अधिक्षक, प्रशासन अधिकारी या पदांवर काम करणारे अधिकारी यांच्या खूप वर्षांपासून पासून दर तीन वर्षांनी होणाऱ्या बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे बदल्या करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास 132 कनिष्ठ अभियंत्यांचा यात समावेश आहे. त्यामध्ये स्थापत्य पदावरील 109, विद्युत पदावरील 17 आणि यांत्रिकी पदावरील 6 कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. (Pune Municipal Corporation)

| मनपा प्रशासनाचे परिपत्रक जारी

 

महापालिका प्रशासनाच्या परिपत्रकानुसार  पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील ज्या सेवकांची एकाच खात्यात तीन वर्षे अगर त्यापेक्षा जास्त सेवा झाली आहे, अशा सेवकांच्या अन्य खात्यात बदल्या कराव्या लागतात. खात्याच्या एकूण पदांपैकी दरवर्षी जास्तीत जास्त २०% अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या कराव्यात, अशा बदल्या करणेविषयीचे  धोरण आहे. या मंजूर बदली धोरणातील तरतुदी विचारात घेऊन ३१/०३/२०२३ अखेर एकाच खात्यात तीन वर्षे अगर त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) या पदावरील सेवकांची नियतकालिक बदल्या करण्याची कार्यवाही अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांचे अध्यक्षतेखाली प्रस्तावित केलेली आहे.
या नियतकालिक बदल्यांची कार्यवाही बुधवार, दिनांक १२/०४/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता, जुना जी.बी. हॉल, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, तिसरा मजला, येथे होईल.
महापालिका सभेने मंजूरी दिलेल्या बदली धोरणाप्रमाणे नियतकालिक बदलीस पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी संबंधित सेवकांचे माहितीसाठी पुणे महानगरपालिका संकेत स्थळावरील कार्यालय
परिपत्रक प्रणालीवर (https://pmc.gov.in/en/circulars) उपलब्ध केलेली आहे. नियतकालिक बदलीस पात्र ठरणाऱ्या सेवकांनी वरील नियोजित ठिकाणी व वेळेत समक्ष उपस्थित रहावयाचे आहे.

तरी खातेप्रमुख, प्रशासन अधिकारी यांनी प्रस्तुतचे कार्यालय परिपत्रक आपले अखत्यारीत कार्यरत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) या संवर्गातील संबधित सेवकांच्या त्वरीत निदर्शनास आणावे व नोंद घेतल्याबाबत स्वाक्षरी घ्यावी. असे आदेशात म्हटले आहे.
| लेखनिकी संवर्गासाठी हाच न्याय अपेक्षित
कनिष्ठ अभियंता याच्या या नियतकालिक बदल्या पारदर्शक पद्धतीने केल्या जाणार आहेत. ज्यांची सेवा अधिक आहे, अशा सेवकांना बदलीचे खाते विचारले जाणार आहे. त्यानुसार यादी प्रसिद्ध केली असून त्यानुसारच बदली केली जाणार आहे. अभियंता प्रमाणेच लेखनिकी संवर्गातील सेवकांच्या देखील बदल्या प्रलंबित आहेत. त्याही बदल्या लवकरच होणे अपेक्षित आहे. त्यांच्या बदल्या करताना देखील अशाच पारदर्शक पद्धतीने केल्या जाव्यात. अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
—-
महापालिका प्रशासनाने 132 JE च्या बदल्या करण्याबाबत निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र बदली केल्यानंतर संबंधित सेवक कामाला एका ठिकाणी आणि पगाराला दुसऱ्या ठिकाणी, असे प्रशासनाने होऊ देऊ नये. तसेच आम्ही एकच खाते किंवा ठराविक सेवकांच्या बदल्या करण्याची मागणी केली नव्हती. नियमानुसार ज्यांनी 3 वर्ष एका खात्यात काम केले आहे आणि बदलीस पात्र असणाऱ्या अशा सर्वांच्या बदल्या आम्हाला अपेक्षित आहेत. टप्प्या टप्प्याने बदल्या आम्हाला मंजूर नाहीत.
अरविंद शिंदे, शहर अध्यक्ष, काँग्रेस.
आमच्या मागणीनुसार महापालिका प्रशासनाने बदल्या करण्याचा निर्णय घेतला, याबद्दल आम्हाला आनंद आहे. मात्र मलईदार खात्यात गेल्या कित्येक वर्षांपासून जे सेवक काम करताहेत, त्यांच्या तात्काळ बदल्या होणे अपेक्षित आहे. जेणेकरून सर्वांना सर्व खात्यात काम करण्यास प्राधान्य मिळेल. 
नाना भानगिरे, शहर अध्यक्ष, शिवसेना 
हे आहेत सेवक 

Appointment and promotion of Junior Engineers | आता महापालिका कनिष्ठ अभियंत्यांच्या नेमणुकीच्या व पदोन्नतीच्या पद्धतीत बदल

Categories
Breaking News PMC पुणे

आता महापालिका कनिष्ठ अभियंत्यांच्या नेमणुकीच्या व पदोन्नतीच्या पद्धतीत बदल

| नामनिर्देशन ८५% तर पदोन्नती १५%

|महापालिका प्रशासनाचा विधी समिती समोर प्रस्ताव

पुणे | पुणे महापालिका कनिष्ठ अभियंत्यांच्या नेमणुकीच्या व पदोन्नतीच्या पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/वाहतुक नियोजन/विद्युत/यांत्रिक) यांबाबत नामनिर्देशन- ८५% व पदोन्नती- १५% अशी दुरुस्ती महापालिका आयुक्त यांनी सुचविली आहे. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून विधी समिती समोर ठेवण्यात आला आहे. यामुळे नवीन उमेदवारांना महापालिकेत काम करण्याची संधी मिळणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता (वाहतूक नियोजन)/(स्थापत्य) /
(विद्युत)/(यांत्रिकी), वर्ग-१, उप अभियंता (वाहतूक नियोजन) / (स्थापत्य)/(विद्युत)/(यांत्रिकी), वर्ग-२ व कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन)/(स्थापत्य)/(विद्युत)/(यांत्रिकी), वर्ग-३ या पदाच्या नेमणुकीची पद्धत व टक्केवारी मध्ये बदल करण्याबाबत दि.०३/११/२०२२ रोजीच्या मा. विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीमध्ये कार्यकारी अभियंता (वाहतूक नियोजन)/(स्थापत्य)/(विद्युत)/(यांत्रिकी), वर्ग-१, उप अभियंता ( वाहतूक नियोजन) / (स्थापत्य) / (विद्युत) / (यांत्रिकी), वर्ग-२ व कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन)/(स्थापत्य)/(विद्युत)/(यांत्रिकी), वर्ग-३ या पदाच्या नेमणुकीची पद्धत व टक्केवारी नामनिर्देशन-२५% व पदोन्नती- ७५% रद्द करून पदोन्नती – १००% व कनिष्ठ अभियंता
(स्थापत्य/विद्युत्) या पदाच्या नेमणूकीची पद्धत व टक्केवारी नामनिर्देशन- ७५% व पदोन्नती-२५% रद्द करून पदोन्नती- १००% करण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शहर अभियंता यांनी कार्यकारी अभियंता (स्थापत्य) -२५% सरळसेवेने, उप अभियंता (स्थापत्य), पदोन्नती- १००% व कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), नामनिर्देशन- १००% करण्याबाबत कळविले आहे. त्यानुषंगाने निवेदन सादर केले होते. त्यानुसार कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/वाहतुक नियोजन/विद्युत/यांत्रिक) यांबाबत नामनिर्देशन- ८५% व पदोन्नती- १५% अशी दुरुस्ती महापालिका आयुक्त यांनी सुचविली आहे. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून विधी समिती समोर ठेवण्यात आला आहे. यामुळे नवीन उमेदवारांना महापालिकेत काम करण्याची संधी मिळणार आहे. विधी समितीत हा प्रस्ताव मान्य झाल्यानतर तो मुख्य सभेसमोर ठवला जाईल.