PMC Pune Female Employees | पुणे महापालिकेतील महिला कर्मचारी शिकणार मार्शल आर्ट! 

Categories
Breaking News Education PMC social पुणे

PMC Pune Female Employees | पुणे महापालिकेतील महिला कर्मचारी शिकणार मार्शल आर्ट!

| स्वसंरक्षणार्थ मोफत Taichi Kung- Fu प्रशिक्षण

PMC Pune Female Employees | पुणे महानगरपालिकेकडील (Pune Municipal Corporation) महिला कर्मचाऱ्यांना (Female Employees) मार्शल आर्ट (Martial Art) चे धडे दिले जाणार आहेत. स्वसंरक्षण (Self Défense) म्हणून त्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महापालिका प्रशासनाने (Pune civic body) यात पुढाकार घेतला असून महिला कर्मचाऱ्यांच्या स्वसंरक्षणार्थ मोफत Taichi Kung- Fu प्रशिक्षण दिले जाणार आहे. महापालिका कामगार कल्याण विभागाकडून (PMC Labour Welfare Department) ही माहिती देण्यात आली. (PMC Pune Female Employees)
पुणे महानगरपालिकेकडे (PMC Pune) काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची संख्या बरीच आहे. मात्र महिला अत्याचाराच्या (Women Atrocity) वाढत्या घटना पाहता त्यांना स्व संरक्षणाचे (Self Défense) धडे देणे आवश्यक आहे. याबाबत पुणे महापालिकेच्या कामगार विभागाने पुढाकार घेतला आहे. महिला कर्मचाऱ्यांना मार्शल आर्टचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्व रक्षणासाठी त्यांना तयार केले जाणार आहे. स्वसंरक्षणार्थ मोफत Taichi Kung – Fu प्रशिक्षण देणेकामी अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज.) यांची मान्यता प्राप्त झाली आहे. (PMC Pune Marathi News)
हे  प्रशिक्षण प्रथमतः परिमंडळ क्र. १ ते ५ व त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयामध्ये प्रायोगिक तत्वावर आठवड्यातून एक वेळ दुपारी ३.१५ ते ६.१५ या वेळेत राबविणेत येणार असून संबंधित खातेप्रमुख यांनी त्यांचे अधिनस्त कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना याबाबत अवगत करून इच्छुक महिला सेविकांना हे  प्रशिक्षण घेणेसाठी सदर वेळेमध्ये सवलत देणेची दक्षता घ्यायची आहे. (PMC Pune female employees self defense)

असा असेल कालावधी

परिमंडळ 1 : ५/६/२०२३ ते ९/६/२०२३
परिमंडळ 2: १२/६/२०२३ ते १६/६/२०२३
परिमंडळ 3: १९/६/२०२३ ते २३/६/२०२३
परिमंडळ 4: २६/६/२०२३ ते ३०/६/२०२३
परिमंडळ 5: ३/७/२०२३ ते ७/७/२०२३
हे प्रशिक्षण देणेकामी संबंधित खातेप्रमुख यांनी  नविन बलराम वाघिले, मो.नं. ९५२७३८५०६२ व  प्रतिभा नविन वाघिले, मो.नं. ९०६७८२७३३४ यांचेशी संपर्क साधावा. सदर प्रशिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी (उदा. स्थळ, इत्यादी) उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत. प्रशिक्षण हे ऐच्छिक असून पुर्णपणे विनामुल्य आहे. असे कामगार विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
—-
News Title | PMC Pune Female Employees | Female employees of Pune Municipal Corporation will learn martial arts!