Pune Municipal Corporation issues WhatsApp number for complaints of abandoned vehicles

Categories
Breaking News PMC social पुणे

   Pune Municipal Corporation issues WhatsApp number for complaints of abandoned vehicles

 PMC Pune Encroachment Department |  On behalf of the Pune Municipal Corporation (PMC) Encroachment Department, a drive against abandoned vehicles has been undertaken.  If such a vehicle is found on the road or footpath, the vehicle will be impounded.  The owner of the car can be fined from 5 thousand to 25 thousand for getting rid of that car.  The encroachment department has also started sending notices to such people.  Accordingly, 139 vehicles have also been confiscated.  Also, if citizens want to report an abandoned vehicle, the department has issued a WhatsApp number 9689931900.  This information was given by Deputy Commissioner Madhav Jagtap.  (Pune Municipal Corporation)
 Abandoned/abandoned vehicles, abandoned damaged vehicles are being found on roads, footpaths etc. within Pune Municipal Corporation limits.  As such vehicles stop on the road, the traffic is obstructed and it is observed that due to the non-moving of the said vehicles from the place, garbage is generated and foul smell is created.  In the past, action has been taken to pick up the off/abandoned vehicles on the road.  Complaints of citizens are also being received continuously regarding blocked/abandoned vehicles on the road.  Therefore, such vehicles are going to be confiscated through the regional office of Pune Municipal Corporation.  (PMC Pune News)
 – Removal charges for impounded vehicles are as follows-
 1. For Heavy Vehicle (Passenger Bus, Truck etc.) = 25,000/-
 2. Light vehicles (up to 10 tonnes) = 20,000/-
 3. Four Wheeler Vehicles (Car, Jeep etc.) = 15,000/-
 4. Three Wheelers (Rickshaw, Tempo) = 10,000/-
 5. Two Wheeler (Automatic) Rs= 5000/-
 According to the information of the encroachment department, the concerned vehicle owner can resolve the encroachment within a period of 1 month.  A notice will be placed on the said vehicles through the regional office and a period of 7 days will be given for this.  If the concerned vehicle owners do not remove the vehicle within 7 days, confiscation action is being taken against the said vehicle by the Pune Municipal Corporation, according to which 139 vehicles have been seized in the city and some vehicles have been issued notices.  This was said by the department.
 —–

PMC Encroachment Department | आपली बेवारस वाहने रस्त्यावरून हटवा | बेवारस वाहनांच्या तक्रारीसाठी महापालिकेकडून व्हाट्सअप नंबर जारी

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Encroachment Department | आपली बेवारस वाहने रस्त्यावरून हटवा | बेवारस वाहनांच्या तक्रारीसाठी महापालिकेकडून व्हाट्सअप नंबर जारी

PMC Pune Encroachment Department | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) अतिक्रमण विभागाच्या (PMC Encroachment Department) वतीने बेवारस वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. असे वाहन रस्त्यावर किंवा फुटपाथवर आढळल्यास गाडी जप्त केली जाईल. ती गाडी सोडवण्यासाठी गाडी मालकाला 5 हजार पासून ते 25 हजार पर्यंत दंड होऊ शकेल. अतिक्रमण विभागाकडून अशा लोकांना नोटीस देखील पाठवणे सुरु केले आहे. त्यानुसार 139 वाहने जप्त देखील करण्यात आली आहेत. तसेच नागरिकांना बेवारस वाहनाची तक्रार करायची असल्यास विभागाकडून 9689931900 हा व्हाट्सअप नंबर जारी करण्यात आला आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap) यांनी दिली. (Pune Municipal Corporation)

पुणे महानगरपालिका हद्दीत रस्ता, पदपथावर इत्यादी ठिकाणी बंद / बेवारस वाहने, पडीक नादुरुस्त वाहने आढळ होत आहेत. अशी वाहने रस्त्यावर थांबल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे तसेच सदर वाहने जागेवरून न हलविल्यामुळे कचरा तयार होऊन दुर्गंधी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वी रस्त्यावरील बंद / बेवारस वाहने उचलणेची कारवाई करणेत आली आहे. रस्त्यावरील  बंद / बेवारस वाहनांबाबत नागरिकांच्या देखील तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत.  त्यामुळे अशी वाहने पुणे महानगरपालिकेकडील क्षेत्रिय कार्यालयामार्फत कारवाई करून जप्त करणेत येणार आहेत.  (PMC Pune News)

-जप्त केलेली वाहनासाठी  रिमुव्हल चार्जेस खालील प्रमाणे –
1. अवजड वाहनासाठी (प्रवासी बस, ट्रक इ.) = २५,०००/-
2. हलकी वाहने (१० टना पर्यंत) = २०,०००/-
3. चार चाकी वाहने (कार, जीप इ.) = १५,०००/-
4. तीन चाकी (रिक्षा, टेम्पो) = १०,०००/-
5. दुचाकी (स्वयंचलित) र= ५०००/-
अतिक्रमण विभागाच्या माहितीनुसार  संबंधित वाहनमालक १ महिन्याचे कालावधीमध्ये सोडवून घेऊ शकेल. सदर वाहनांवर क्षेत्रिय कार्यालयामार्फत नोटीस लावण्यात येणार असून याकरिता ७ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. संबंधित वाहनधारकांनी ७ दिवसांच्या मुदतीत वाहन काढून न घेतल्यास सदर वाहनावर पुणे महानगरपालिकेकडून जप्तीची कारवाई करण्यात येत आहे, त्यानुसार शहरात 139 वाहने जप्त करण्यात आली असून काही वाहनाना नोटीस लावण्यात आल्या आहेत. असे ही खात्याकडून सांगण्यात आले.
—–

Pune Air Pollution | नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 6 बिल्डरांना महापालिकेकडून नोटीस

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Air Pollution | नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 6 बिल्डरांना महापालिकेकडून नोटीस

 Pune Air Pollution | आदेश देऊनही नियमांचं उल्लंघन करणार्‍या ६ बांधकाम व्यावसायिकांना (Builders) महापालिका प्रशासनाकडून Pune Municipal Corporation (PMC) नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान यापुढे राडा रोडा वाहतुक करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap) यांनी दिली.  (Pune Air Pollution)

सर्वोच्च न्यायालयाने शहरातील वायु प्रदुषणाविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर खळबळून जागे झालेल्या राज्य सरकार आणि महापालिकांनी नियमावली जाहीर केली. शहरात सूक्ष्म धुलिकणांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने उपाययोजना जाहीर केल्या. यात बांधकामे तसेच प्रकल्पांच्या ठिकाणी धूळ उडणार नाही, यासाठी नियमावली लागू केली. मात्र, या नियमावलीचे पालन संबंधित बांधकाम व्यावसायिकांकडून होत नसल्याचे आढळून आले आहे.

यामुळे आता प्रशासनाकडून कठोर भुमिका घेण्यास सुरुवात केली आहे. सहा बांधकाम व्यावसायिकांना नोटीस दिली आहे. बांधकामाच्या ठिकाणी बाजुने पत्रे न उभारणे, धुळीचा प्रवास रोखण्यासाठी हिरवे कापड न लावणे आदी उपाय योजना न केल्यामुळे या नोटीस दिल्या गेल्या आहेत. तसेच बांधकामाच्या ठिकाणाहून राडारोडा, खोदकाम केल्यानंतरचा मुरुम, माती आदीची वाहतुक करणार्‍यांनी तो झाकून नेला नाही तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. बांधकाम व्यावसायिकांना नोटीस पाठविल्यानंतर त्यांनी उपाययोजना केली नाही तर कठोर कारवाई त्यांच्यावर केली जाणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली. (Pune Air Pollution)

Pune Hoarding Renewal | 7 दिवसांत नवीनीकरण प्रस्ताव दाखल करण्याचे अधिकृत होर्डिंग धारकांना आदेश | उपायुक्त माधव जगताप यांचे आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Hoarding Renewal | 7 दिवसांत नवीनीकरण प्रस्ताव दाखल करण्याचे अधिकृत होर्डिंग धारकांना आदेश

| उपायुक्त माधव जगताप यांचे आदेश

Pune Hoarding Renewal | शहरातील अधिकृत होर्डिंग धारकांकडून नवीनीकरण करून घेण्यात उदासीनता दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षात 1826 पैकी फक्त 245 लोकांनी नवीनीकरण केले आहे. त्यामुळे येत्या 7 दिवसांत सर्वांनी नवीनीकरण करून घेण्याचे प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap) यांनी दिले आहेत. अन्यथा होर्डिंग, फ्लेक्सवर कारवाई करण्याचा इशारा जगताप यांनी दिला आहे. (PMC Sky Sign Department)

पुणे महानगरपालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागामार्फत (PMC Pune Sky Sign Department) पुणे शहर हद्दीमध्ये जाहिरात फलक उभारणेस परवानगी दिली जाते. महाराष्ट्र महानगरपालिका आकाशचिन्हे (स्काय साईन ) व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण नियम, २०२२ चे तरतुदीनुसार दरवर्षी अधिकृत जाहिरात फलकांचे नूतनीकरण केले जाते. त्यानुसार प्रचलित दरानुसार जाहिरात शुल्क भरून घेण्यात येते. सद्यस्थितीत सन २०२३ २४ मध्ये एकुण १८२६ अधिकृत जाहिरात फलक असून त्यापैकी केवळ २४५ जाहिरात फलक धारकांनी नूतनीकरण करून घेतलेले आहे. उर्वरित १५८१ अधिकृत जाहिरात फलक धारकांनी नूतनीकरण करून घेणे बाकी आहे. (Pune Municipal Corporation)

दरम्यान परवाना व आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख श्री. माधव जगताप, उप आयुक्त यांनी शुक्रवार रोजी सर्व महापालिका सहायक आयुक्त यांचेसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये सर्व महापालिका सहायक आयुक्त यांना सर्व अधिकृत जाहिरात फलकधारकांचे नूतनीकरण ७ दिवसांचे आत पुर्ण करणेबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच जे अधिकृत जाहिरातदार ७ दिवसांचे आत नूतनीकरणास प्रस्ताव दाखल करणार नाहीत अशा जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई करण्याचे आदेशीत केलेले आहे. (PMC Pune News)

– ज्यादा दरामुळे उदासीनता

दरम्यान महापालिका प्रशासनाने चालू आर्थिक वर्षात नवीनीकरणासाठी आणि नवीन प्रस्तावासाठी शहरात होर्डिंग, फ्लेक्स, बोर्ड लावायचे (Hoarding) असतील, तर होर्डिंग धारकांना आणखी ज्यादा दर म्हणजे 580 प्रति चौरस फूट दर करण्यात आला आहे. पूर्वी हा दर 111 होता. तर काही लोकांसाठी 222 होता. दरम्यान आता 580 दर झाल्याने होर्डिंग धारकांची उदासीनता दिसून येत आहे. जे होर्डिंग धारक कोर्टात गेले आहेत त्यांना 111 रु दराने मान्यता देण्यात येत आहे. असेच लोक नवीनीकरणासाठी पुढे येत आहेत. बाकी लोकांना 580 दर आहे. हा दर परवडत नसल्याने नवीनीकरणाबाबत उदासीनता दिसून येत आहे.
—-

PMC Encroachment Department | खराडी, विमाननगर परिसरात जोरदार अतिक्रमण कारवाई | अतिक्रमण विभागाची माहिती

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Encroachment Department | खराडी, विमाननगर परिसरात जोरदार अतिक्रमण कारवाई

| अतिक्रमण विभागाची माहिती

PMC Encroachment Department | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) येरवडा-कळस – धानोरी क्षेत्रिय कार्यालय (Yerwada-kalas-Dhanori Ward Office) हद्दीमधील सार्वजनिक रस्ते पदपथावरील अनधिकृत अतिक्रमणांवर काल जोरदार कारवाई करण्यात आली. तसेच फ्रंट मार्जिन, अनधिकृत फ्लेक्स वर देखील कारवाई करण्यात आली. अशी माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap) यांनी दिली. (PMC Pune)

जगताप यांच्या माहितीनुसार  सादलबाबा चौक ते खराडी बायपास, विमाननगर परिसरातील रस्तारुंदीत येणारी अतिक्रमणे तसेच रस्ता / पदपथांवर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या पथारी व्यावसायीकांवर तसेच पुणे महानगरपालिकेने अतिक्रमण विभागामार्फत दिलेले परवाने व फेरीवाला
प्रमाणपत्रामधील अटी / शर्तीचा भंग करणारे व्यावसायिक यामध्ये स्वतः व्यवसाय न करणे, पोटभाडेकरू ठेवणे, मान्य जागेवर व्यवसाय न करणे, मान्य व्यवसाय न करणे, सिलेंडरचा वापर करणे इत्यादी प्रकारे अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. तसेच फ्रंट मार्जिन कारवाई, बोर्ड बॅनर कारवाई, सिमेंट ओटे, कारवाई करण्यात आली. (PMC Encroachment Action)
कारवाईसाठी २ क्षेत्रिय अतिक्रमण निरीक्षक, ५ अतिक्रमण निरिक्षक, २४ सहाय्यक अतिक्रमण निरिक्षक, ६ जेसीबी, ६ गॅस कटर, १२ ट्रक व १०० बिगारी सेवक, २० पोलीस कर्मचारी, ३२ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस बंदोबस्त उपलब्ध असल्यामुळे कारवाई सुरळीतपणे पार पडली.
अतिक्रमण विभागामार्फत  विकास ढाकणे
मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. माधव जगताप, (उप आयुक्त, अतिक्रमण / अनाधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग) श्रीमती किशोरी शिंदे (उप आयुक्त, परिमंडळ क्र. १) यांचे नियंत्रणाखाली व यांचे उपस्थितीमध्ये श्री. बनकर (महा. सहा. आयुक्त), श्री. पवार (विद्युत विभाग ), श्री. वाडेकर (पथ विभाग) व श्री. कुंभार संजय व श्री. नारायण साबळे (क्षेत्रिय अतिक्रमण निरिक्षक) यांनी ही कारवाई केली.
–  कारवाई करण्यात आलेला तपशील खालीलप्रमाणे

स्टॉल – ६
हातगाडी – ५
पथारी/काउंटर – १५
शेड/झोपड्या – ५०
बोर्ड/बॅनर – १२५
फ्रंट मार्जिन – ३०००० स्क्वे. फुट

Punit Balan Group | Oxyrich | ऑक्सिरिच च्या पुनीत बालन यांना 3 कोटी 20 लाखांचा दंड भरण्याचे पुणे महापालिकेचे आदेश

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

Punit Balan Group | Oxyrich | ऑक्सिरिच च्या पुनीत बालन यांना 3 कोटी 20 लाखांचा दंड भरण्याचे पुणे महापालिकेचे आदेश

| ऑक्सिरिच कंपनीचे अंदाजे २५०० अनधिकृत जाहिरात फलक

Puneet Balan Group | Oxyrich | ऑक्सिरिच कंपनीच्या पुनीत बालन (Oxyrich Ounit Balan) यांना दहिहंडी उत्सवाचे दरम्यानचे कालावधीत अनधिकृत फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स इ. लावून सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण केल्याने 3 कोटी 20 लाखांचा दंड भरणेबाबतचे आदेश पुणे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी दिले आहेत. यासाठी 2 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. (punit Balan Group Oxyrich)

माधव जगताप यांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४२४५ व त्यानुसार अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका आकाशचिन्हे (स्काय साईन) व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण नियम, २०२२ चे तरतुदीनुसार जाहिरात फलक उभारण्यासाठी पुणे महानगरपालिकेची रितसर पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरीता अधिनियम, १९९५ चे तरतुदीनुसार आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केलेला आहे.
 ७/९/२०२३ ते दि. १७/९/२०२३ दरम्यान दहिहंडी उत्सवामध्ये पुणे महानगरपालिकेच्या महापालिका सहायक आयुक्त कार्यालया अंतर्गत येणाऱ्या हद्दीत परवाना निरीक्षक यांचेमार्फत समक्ष पाहणी केली असता सार्वजनिक ठिकाणी ८ X४ चौ. फुटाचे ऑक्सिरिच कंपनीचे अंदाजे २५०० अनधिकृत जाहिरात फलक कोणतीही पुर्वपरवानगी न घेता उभारून आपण विद्रुपीकरण केल्याचे निदर्शनास आले आहे. सण उत्सव काळामध्ये गणेश उत्सव वगळता सर्व जाहिरातींना शुल्क देय आहे. त्यानुसार सदर अनधिकृत जाहिरात फलकांचे एकुण ८०,००० चौ. फुटाचे र.रु.४०/- प्रति दिन प्रति चौ. फुटाप्रमाणे दहा दिवसांचे ३,२०,००,०००/- वसुलपात्र दंडात्मक रक्कम देय होत आहे.  तरी, विना परवाना जाहिरातीपोटी एकूण रक्कम रूपये  तीन कोटी वीस लाख फक्त) दंड (विद्रुपीकरण शुल्क) ही नोटीस प्राप्त होताच २ दिवसाचे आत पुणे महानगरपालिकेच्या कोषागारात त्वरीत भरण्यात यावी. सदर रक्कमेचा भरणा विहीत मुदतीत न केल्यास आपले विरूध्द नियमानुसार कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल व वसुलपात्र रक्कम आपले मिळकतकरातून वसुल केली जाईल याची नोंद घ्यावी. असा इशारा माधव जगताप यांनी दिला आहे.

PMC Employees and Officers Agitation | महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे काळ्या फिती लावून आंदोलन!

Categories
Breaking News PMC Political social पुणे

PMC Employees and Officers Agitation | महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे  काळ्या फिती लावून आंदोलन!

PMC Employees and Officers Agitation |  पुण्येश्वर या शिवमंदिरावरुन (Punyeshwar Temple) पुण्यात राजकारण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्येश्वर मंदिराबाहेरील आतिक्रमणे हटवण्यात यावे म्हणून पुण्येश्वर पुनर्निर्माण समितीच्या (Punyeshwar Reconstruction Committee) वतीने पुणे महानगरपालिकेबाहेर (Pune PMC News) आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) आणि आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी दोन्ही आमदारांनी पालिका आयुक्त, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र यावेळी पालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar), नगर अभियंता प्रशांत वाघमारे (Prashant Waghmare) यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला. या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे महानगर पालिकाच्या आवारामध्ये पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून आंदोलन केले.

या आंदोलनामध्ये पालिकेतील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच पुणे महापालिका नगर अभियंता प्रशांत वाघमारे, अतिक्रमण अधिकारी माधव जगताप (Madhav Jagtap), पथ विभाग मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी (V G Kulkarni) देखील उपस्थित होते. तसेच सर्व कर्मचारी संघटनांचे कर्मचारी आणि पदाधिकारी देखील सहभागी  झाले होते. (Pune Municipal Corporation)

आयुक्त यांचा  एकेरी उल्लेख केल्याबद्दल आंदोलनावेळी प्रशांत वाघमारे यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “पुण्येश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी काही संघटनांनी आंदोलने केली.  हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. पण काल आंदोलनावेळी अधिकाऱ्यांबद्दल जी भाषा वापरण्यात आली ती योग्य नसून. मागील गेली अनेक वर्षे आम्ही अधिकारी म्हणून शहरामध्ये काम करत आहोत. एका रात्रीमध्ये शहराचा विकास झाला नाही तर अनेक वर्षे काम केल्यानंतर शहर प्रगती पथावर आले आहे. त्यामुळे अधिकारी असो वा अन्य कर्मचारी या कोणत्याही व्यक्तींबद्दल योग्य भाषा वापरली पाहिजे.” अशी मागणी प्रशांत वाघमारे यांनी केली. (PMC Pune)

शहराच्या मध्यवर्ती (Pune PMC News) भागामध्ये असणाऱ्या या पुण्येश्वर मंदिरावरुन काही संघटना राजकारण करत आहेत. मात्र हे प्रकारण न्यायालयामध्ये असून त्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी आंदोलन करण्यात आले.  आता पुण्येश्वर मंदिराबाबत पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांच्यासह अधिकारी वर्गासोबत  बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे प्रशांत वाघमारे म्हणाले. (Pune Municipal Corporation News)

रुपेश सोनावणे ( अध्यक्ष ), पुणे महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना यांनी देखील काल पुणे महानगरपालिका कर्मचारी याना करण्यात आलेल्या आरे रावी विरोधात जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

——

News Title | PMC Employees and Officers Agitation | Municipal officers and employees protest by wearing black ribbons!

PMC Pune Encroachment Action |पुणे महापालिका कर्मचारी उद्या करणार काम बंद आंदोलन!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Encroachment Action |पुणे महापालिका कर्मचारी उद्या करणार काम बंद आंदोलन!

| अतिक्रमण कारवाई वेळी मनपा कर्मचारी व व्यावसायिक यांच्यात हाणामारी

PMC pune Encroachment Action | दुपारी 1 ते1.30 चे दरम्यान ढोल पाटील क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील कैलास स्मशाभूमीत ते आरटीओ कार्यालय परिसरात G-20 निमित्त अतिक्रण निर्मूलनाची (PMC Pune Encroachment Action) कारवाई करत असताना तेथील व्यावसायिक व अतिक्रमण पथकातील सेवकांमध्ये हाणामारी झाली. याचा निषेध म्हणून महापालिका कर्मचारी काम बंद आंदोलन (PMC pune employees Agitation) करणार आहेत. PMC Pune Encroachment Action

 

या भ्याड घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी उप आउक्त , अतिक्रमण व म न पा सेवक युनियन यांचे नियंत्रणात सर्व क्षेत्रिय कार्यालयामधील सर्व अतिक्रण निरीक्षक,सेवक,बिगारी ,सुरक्षा रक्षकांनी व अधिकारी उद्या सकाळी 10 वाजता म न पा मुख्य कार्यालयासमोरील हिरवळीवर काम आंदोलन करणार आहेत. अशी माहिती महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation)

News Title | PMC Pune Encroachment Action Pune municipal employees will stop work tomorrow!

Illegal Hoardings | 31 मे पर्यंत शहर अनधिकृत होर्डिंग मुक्त करण्याचा महापालिकेचा मानस | उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

Categories
Breaking News PMC पुणे

31 मे पर्यंत शहर अनधिकृत होर्डिंग मुक्त करण्याचा महापालिकेचा मानस

| उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

पुणे | महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने महापालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याबाबत गंभीर पाऊल उचलले आहे. 31 मे पर्यंत शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्यात येणार आहेत. त्यानुसार आजपासून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
शहरात 2629 अनधिकृत होर्डिंग आहेत. तर 2485 अधिकृत आहेत. तर 508 गुन्हे दाखल केले आहेत. तर जवळपास 75 लाखाची वसुली केली आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंग विना परवाना बोर्ड, बँनर, फ्लेक्स, झेंडे, पोस्टर, किआँक्स यांचेवर आज परवाना व आकाशचिन्ह विभागामार्फत १५ क्षेत्रीय कार्यालय हद्दीमध्ये विविध ठिकाणी निष्कासन कारवाई करणेत आली. सदर कारवाई मध्ये ५ क्रेन, ४० बिगारी सेवक, ०६ गँस कटर, ५ वेल्डर, या यंत्रसामुग्री व मनुष्यबळाचा वापर करण्यात आला तसेच ज्यांनी विना परवाना जाहिरात होर्डिंग आणि बोर्ड लावले आहेत त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच यापुढे अनधिकृत होर्डिंग, विना परवाना बोर्ड, बँनर, फ्लेक्स, झेंडे, पोस्टर, किऑक्स इ.
यावर परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून निष्कासन कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

 | कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे
होर्डिंग  – 21
फ्लेक्स, बोर्ड, बॅनर 173
झेंडे – 13
पोस्टर – 21
किऑक्स – 15

एकूण – 239

Open Market | PMC | सदाभाऊ खोत यांच्या आंदोलनानंतर महापालिकेने घेतला हा निर्णय

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र शेती

सदाभाऊ खोत यांच्या आंदोलनानंतर महापालिकेने घेतला हा निर्णय

पुणे | वाहतुकीला अडथळा होतो म्हणून रस्त्यावर कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्याला त्रास देणे महापालिका अतिक्रमण विभागाला चांगलेच महागात पडले आहे. कारण या विरोधात शेतकरी आणि सदाभाऊ खोत यांचा रोष ओढवून घ्यावा लागला. खोत यांच्या आंदोलनांतर महापालिकेने शहरात 50 ओपन मार्केट सुरु करण्याचे नियोजन केले आहे. या जागेवर बसून शेतकरी आपला माल विकू शकतात. त्यासाठी प्रति दिन 100 रुपये भाडे आकारले जाणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

शहराच्या विविध भागात हे मार्केट असतील.  शेतकऱ्यांसाठी गाळे उपलब्ध करून दिले जातील. मात्र जुन्या मार्केट शेजारी हे गाळे नसतील. याठिकाणी शेतकरी सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत आपला माल विकू शकतील. लवकरच महापालिका यावर अंमलबजावणी करणार आहे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

| सदाभाऊ खोत यांनी महापालिकेसमोर विकले कांदे!

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रस्त्यावर कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा टेम्पो जप्त करून त्याला तब्बल 40 हजार रूपयांचा दंड लावू असे सांगितले होते. तसेच गेल्या आठ दिवसापासून महापालिका या टेम्पो चालकाला गाडी सोडविण्यासाठी पळवित होती. त्याच्या निषेधार्थ  माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सोमवारी महापालिकेच्या दारातच कांदा विक्री केली.

शेतकरी आधीच होरपळला असताना महापालिकेची ही कारवाई त्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहत आहे. त्यामुळे, महापालिका प्रशासनाने तातडीनं ही कारवाई करणाऱ्या तसेच गाडी सोडण्यासाठी शेतकऱ्याची अडवणूक करणाऱ्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली. या वेळी खोत यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी कांदे विकले.