Shivsena MLA Disqualification | शिवसैनिकांनी निकालाचे आतषबाजी करीत पुण्यात केले जल्लोषात स्वागत

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Shivsena MLA Disqualification | शिवसैनिकांनी निकालाचे आतषबाजी करीत पुण्यात केले जल्लोषात स्वागत

 

Shivsena MLA Disqualification | अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेला शिवसेनेतील (Shivsena Eknath Shinde)  आमदार अपात्रतेचा निकाल आज लागला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेसोबत आलेल्या तमाम शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय (Pune Shivsena office)  येथे फटाक्यांची आतशबाजी करीत व महालक्ष्मी मंदिरात महाआरती करून मोठ्या जल्लोषात आनंद साजरा केला. (Maharashtra Politics)

पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire Pune Shivsena) म्हणाले की, “हा ऐतिहासिक निकाल असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्थापित केलेले सरकार हे कायद्याद्वारे व संविधानिक तत्वाने स्थापन झालेले सरकार आहे. न्यायदेवतेने दिलेला निकाल आम्हाला मान्य असून, इथून पुढे सरकार अजून नव्या ऊर्जेने काम करेल.”

बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिकृतपणे काल संध्याकाळी 6 वाजता वाजता जाहीर केला. यामध्ये शिवसेनेतील सर्व आमदार पात्र असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तयार केलेलं सरकार हे पूर्णपणे संविधानिक व कायद्याने बनलेले सरकार आहे असे जाहीर झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या या ऐतिहासिक क्षणाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे, पक्षातील विविध पदाधिकारी व शिवसैनिकांच्या उपस्थितीत विजयाचा भव्य जल्लोष करीत एकमेकांना पेढे भरविले गेले. तसेच, शिवसेनेच्यावतीने मोठ्या उत्साहात आतिषबाजी करत, मध्यवर्ती कार्यालय ते बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कलादालन इथपर्यंत भव्य मिरवणूक काढत, आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळत आनंदोत्सवात सहभागी झाल्या

यावेळी संपर्क प्रमुख संजय मशिलकर, शिरूर लोकसभा निरीक्षक विकास रेपाळे, सहसंपर्क प्रमुख अजय बाप्पू भोसले, शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, जिल्हाप्रमुख रमेश बाप्पू कोंडे, बाळासाहेब पोखरकर,सुरेंद्र जेवरे, युवासेना शहरप्रमुख निलेश गिरमे, युवासेना सहसंपर्क प्रमुख अविनाश खेडेकर,शर्मिला येवले, महिला आघाडी शहर प्रमुख पुजाताई रावेतकर, माथाडी कामगार सेना जिल्हाप्रमुख निलेश माझीरे, शहर संघटक श्रीकांत पुजारी, नवनाथ निवंगुणे, धनंजय जाधव, प्रमोद प्रभुणे, उपशहर प्रमुख सूरज परदेशी, गौरव साईनकर,सचिन थोरात, सुहास कांबळे, श्रुती नाझीरकर,श्रद्धाताई शिंदे, कांचन दोडे,मयूर पानसरे, आकाश शिंदे व शिवसेना, युवासेना सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, अंगिकृत संघटना व शिवसैनिक उपस्थित होते

Maharashtra Politics | विरोधी पक्षांनाच सत्ताधाऱ्यांबरोबर बसण्याची हाव असेल तर लोकशाहीचा गाडा टिकेल कसा? आणि मग युवकांचा राजकारणातला रोल मॉडेल कोण असणार?

Categories
Breaking News Political social देश/विदेश महाराष्ट्र संपादकीय

Maharashtra Politics | विरोधी पक्षांनाच सत्ताधाऱ्यांबरोबर बसण्याची हाव असेल तर लोकशाहीचा गाडा टिकेल कसा? आणि मग युवकांचा राजकारणातला रोल मॉडेल कोण असणार?

Maharashtra Politics | (Author: Ganesh Mule) | लोकशाहीचे (Democracy) जसे चार महत्वाचे स्तंभ आहेत, अगदी त्याचप्रमाणे आणि किंबहुना त्याहूनही महत्वाचा लोकशाहीचा आधार हा विरोधी पक्ष (Opposition Party) असतो. मात्र विकासाचे कारण देत तोच विरोधी पक्ष जर सत्ताधाऱ्या (Ruling Party) सोबत हातमिळवणी करून सत्तेत बसू लागला तर हा लोकशाहीचा गाडा टिकेल कसा? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने अशाच गोष्टी घडत चालल्या आहेत. त्यामुळे युवकांचा (Youth) राजकारणावरील विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे आम्ही राजकारणात रोल मॉडेल (Roll Model) म्हणून कुणाकडे पाहायचे, असा संभ्रम राजकारणात येऊ पाहणाऱ्या आणि सर्वसामान्य युवकांना पडला आहे. (Maharashtra Politics)
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. ज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. जे काही घडतं त्यामुळे लोक फक्त सुन्न होतात. सुरुवातीला भाजप (BJP) हा मोठा पक्ष असून देखील भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. मुख्यमंत्री कुणाचा असणार, या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपचा हात सोडला. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेवर आली. यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा सगळ्यात मोठा हात होता. काँग्रेस (INC), शिवसेना (Shivsena)आणि राष्ट्रवादीने (NCP) सत्ता स्थापन केली. मात्र हे सहन न झाल्याने आणि विरोधी पक्षात बसण्याची वेळ आलेल्या भाजपने कुरघोड्या करायला सुरुवात केली. यात सगळ्यात आघाडीवर होते ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis). फडणवीस हे पवारांना शह देतात म्हणून त्यांची लोकप्रियता वाढू लागली होतीच. शिवाय त्यांना केंद्राकडून देखील साथ मिळत असल्याने त्यांचे महाराष्ट्रात वर्चस्व वाढत चालले होते. (Maharashtra Political Crisis)
मग फडणवीस यांनी आपले बुद्धिचातुर्य चालवत आणि गनिमी कावे करत शिवसेनेत उभी फूट पाडली. उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सेना एकाकी पडली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडाने शिवसेना तर फुटलीच मात्र महाविकास आघाडीला देखील आपली सत्ता राखता आली नाही. मग भाजप आणि शिंदे यांनी ठाकरेंचं उरलं सुरलं देखील सगळं हिरावून घेतलं. बंडखोरी केलेली सगळी लोकं ही ED आणि तत्सम यंत्रणांना घाबरलेली होती. फक्त हेच लोक नाही तर काँग्रेस, उद्धव यांची सेना आणि राष्ट्रवादीतील लोकांच्या मागे देखील यंत्रणा लावल्या जात होत्या. कुठल्याही पद्धतीने दबाव आणून विरोधी पक्ष कमकुवत करायचा हा चंग बांधून भाजपने कुरघोड्या सुरु ठेवल्या.
याचाच परिणाम म्हणून राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी (Ajit Pawar) नुकतेच बंड केले. विरोधी पक्षात असणारा राष्ट्रवादी मग  लगेच सत्ताधारी झाला. शरद पवारांना हे माहित होते कि नाही, हे पुढे उघड होईलच. मात्र या सगळ्या घटनांमुळे मात्र सर्वसामान्य लोक, युवक यांचा मात्र राजकारणावरील विश्वास उडत चालला आहे. शिवाय सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणारा विरोधी पक्ष जर सत्तेच्या दावणीला बांधला जात असेल तर लोकशाहीचा गाडा कसा टिकणार? लोकांच्या आशेचा किरण कोण असेल? असे प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडू लागले आहेत.
जे चाललंय ते सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचं आहे, हे याचमुळे. कारण काँग्रेस ला कंटाळून लोकांनी भाजपला मोठा पक्ष बनवलं. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना आपल्या आशेचा किरण मानलं. मात्र भाजपने लोकांच्या हिताची भूमिका घेतली असं दिसून येत नाही. भ्रष्टाचारी लोकांच्या मागे यंत्रणा लावल्या म्हणून लोकांना भाजपविषयी आदर वाटू लागला. पण कालांतराने भाजपने त्याच लोकांना आपल्या पक्षाचा आश्रय देत त्यांना मंत्री केलं. त्यामुळे लोकांना यातला नेमका बोध कळेना. तसेच शरद पवार यांचं महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील मक्तेदारी मोडून काढणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. मात्र त्यांच्या कुरघोड्या पाहता ते लोकांसाठी कमी आणि सत्तेसाठी चिटकून राहण्यासाठी सर्व गोष्टी करतात, हे लक्षात येऊ लागलं. शरद पवारांच्या नेहमीच्या बदलत्या भूमिकेमुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास उरला नाही. कालच्या प्रकरणात आपला हात नाही, असं शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी लोकं आता त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.
सत्ताधाऱ्यांनी लोकांचं, लोक काय बोलतात यावर फार लक्ष द्यायचं नसतं आणि आपला अजेन्डा चालवायचा असतो, अशी एक रीत पडून गेली आहे. मात्र  विरोधी पक्षानं लोकांची बाजू घेऊन लोकांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून द्यायचा असतो, हे देखील सोयीस्कर रित्या विसरले जात आहे. अशा परिस्थितीत उत्साहाने राजकारणात येऊ पाहणाऱ्या नवख्या युवकांनी नेमकं कुणाला आदर्श मानायचं? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
यात लोकांनाच अग्रणी भूमिका घ्यायला हवीय. राजकारणातून आपला फार विकास होत नसतो, हे आता तरी लोकांनी लक्षात घ्यायला हवंय. आपला विकास आपल्यालाच करावा लागतो. आपल्याशिवाय आपल्याला कुणी वाचवू शकत नाही, हे सूत्र लक्षात घेऊन आणि राजकारणाकडे दुर्लक्ष करून लोकांनी स्वविकास करून घ्यायला हवाय.

सर्वच राजकीय पक्ष म्हणतात, तरुणांनी राजकारणात आले पाहिजे पण युवा वर्गाने कोणाचा आदर्श घ्यावा हाच मोठा प्रश्न आज निर्माण झाला आहे. ज्यांचा आदर्श घ्यावा अशी व्यक्तिमत्वे कधी एका पक्षात तर कधी दुसऱ्या पक्षात हे वास्तव सद्यस्थितीत आहे आणि  पक्षाची ध्येयधोरणे काय ? या मुद्द्याला तिलांजली दिली जात असल्याचे वास्तवही आहे.त्यामुळे युवा वर्गाने राजकारणात यावे ही साद एकीकडे घातली जात आहे आणि दुसरीकडे जनहितासाठी आवश्यक असणारा विरोधी पक्ष कायमचा हद्दपार करण्याचे डावपेच सुरू आहेत त्यासाठी राजकारणात फोडाफोडीचे राजकारण तर खुलेआम होत आहे मात्र विकासाच्या नावाखाली स्वार्थ साधला जात असेल तर लोकहिताचा विचार कुणीच करत नाही असेच म्हणावे लागेल.

– हेमंत बागुल, काँग्रेस कार्यकर्ता.
——
Article Title | Maharashtra Politics |  If only the opposition parties want to sit with the rulers, how can the car of democracy survive?  And then who will be the role model of the youth in politics?

Sharad Pawar | Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यासाठी आता माझा एककलमी कार्यक्रम | शरद पवार

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Sharad Pawar | Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यासाठी आता माझा एककलमी कार्यक्रम | शरद पवार

Sharad Pawar | Maharashtra Political Crisis | अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपण कुठल्याही प्रकारे व्यथित झाले नसल्याचे सांगत पुन्हा काम करण्याचा हुरूप आला आहे, असं स्पष्ट केलं. तसेच पक्षाचा आश्वासक चेहरा देखील शरद पवार असतील, असं पवार यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे आगामी काळात पक्षबांधणीसाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यासाठी आता माझा एककलमी कार्यक्रम असेल, असे पवार यांनी सांगितले आहे. (Sharad Pawar | Maharashtra Political Crisis)
 पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, पक्षाच्या भवितव्याचा प्रश्न राहीला तर आजचा प्रकार इतरांना नवीन असेल मात्र मला नवीन नाही. १९८० साली निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचे नेतृत्व करत होतो त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते त्यापैकी महिन्याभराने सहा आमदारांच्या व्यतिरीक्त सगळे आमदार सोडून गेले. माझ्यासहीत पाच आमदारांना सोबत घेऊन मी पुन्हा पक्षाची बांधणी केली. पुढच्या निवडणूकीत जे आम्हाला सोडून गेले त्यापैकी दोन-तीन जण सोडल्यास सगळे पराभूत झाले. १९८० साली जे चित्र दिसले ते चित्र पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यावर कसे उभे करता येईल हा माझा एककलमी कार्यक्रम राहील. माझा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेवर आणि विशेषत: तरूण पिढीवर प्रचंड विश्वास आहे. (Maharashtra News)
देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी केलेलं वक्तव्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी होतं. त्या वक्तव्यात त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. हे सांगताना त्यांनी राज्य सहकारी बँक आणि सिंचन विभागात जी तक्रार होती त्याचा उल्लेख केला. यामध्ये प्रधानमंत्र्यांनी जो आरोप केला, त्यानंतर आज राज्याच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली. याचा अर्थ प्रधानमंत्र्यांनी केलेले आरोप वास्तव नव्हते. त्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल आरोप केले त्यांना मुक्त करण्यात आले त्यासाठी मी प्रधानमंत्र्यांचा आभारी आहे. असा टोला शरद पवार यांनी लगावला. (Maharashtra Politics)
पवार पुढे म्हणाले, आमच्या काही सहकाऱ्यांनी जी पक्षाची भूमिका आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. पक्षाच्या संघटनात्मक बदलाचा विचार करण्यासाठी ६ जुलै रोजी पक्ष कार्यालात मी बैठक आयोजित केली होती. त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली आहे. तसेच आम्हीच पक्ष आहोत अशी भूमिका मांडली. विधीमंडळातील काही सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. याचे कारण यापैकी काही सदस्यांनी आम्ही सही केली असली तरी आमची वेगळी भूमिका कायम आहे असे मला सांगितले. याबाबत माझ्याशी संपर्क केलेल्या सहकाऱ्यांनी जनतेपुढे हे चित्र मांडले तर त्यांच्याबद्दल माझा विश्वास बसेल जर त्यांनी मांडले नाही तर त्यांची वेगळी भूमिका आहे, असा निष्कर्ष मी काढेल.
चार वर्षांपूर्वी राज्यातील विधानसभेतदेखील हेच चित्र होते. पण राज्यात जिथे जाता येईल तिथे जाणे, आपली भूमिका मांडणे हे केले त्याचा परिणाम आमची संख्या वाढली आणि आम्ही संयुक्त सरकार स्थापन केले. आज पुन्हा ती स्थिती आहे. या सर्व स्थितीत अनेकजण संपर्क करून आपण सर्व एक आहोत, आमची तुम्हाला साथ आहे, अशी मत मांडत आहेत.
आजचा दिवस संपल्यावर उद्या सकाळी कऱ्हाडला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन साताऱ्यात दलित समाजातील घटकांचा पहिला मेळावा घेणार. त्यानंतर राज्यात आणि देशात जावून लोकांशी जास्तीत जास्त संपर्क वाढविण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल, ही माझी नीती राहील. असे शरद पवारांनी स्पष्ट केले.
News Title | Sharad Pawar Maharashtra Political Crisis | Now for the support of the people of Maharashtra, my Ekkalami program | Sharad Pawar

Maharashtra Politics | अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

Maharashtra Politics | अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Politics | विधानसभेचे सदस्य अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ (Oath For Minister) घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी राजभवनातील (Raj Bhavan) दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. (Maharashtra Politics)
            आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ (Minister Chagan Bhujbal), श्री. दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील (Minister Dilip walse Patil), श्री. हसन मियालाल मुश्रीफ (Minister Hasan Mushrif), श्री. धनंजय पंडितराव मुंडे (Minister Dhananjay Munde), श्री. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम (Dharmravbaba Aatram), आदिती सुनील तटकरे (Minister Aditi Tatkare), श्री. संजय बाबूराव बनसोडे (Sanjay Bansode), श्री. अनिल भाईदास पाटील (Anil Patil) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
            यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.
०००००

Maharashtra Politics | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची पत्रकार परिषद महत्वाचे मुद्दे

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

Maharashtra Politics | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची पत्रकार परिषद महत्वाचे मुद्दे

 देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीनंतर म्हणजे 1994 सालानंतर एका नेत्याच्या नेतृत्वाखाली देशात सरकार आले आहे.
 पंतप्रधान मोदी साहेबांचं नेतृत्व खंबीर, त्यामुळे परदेशात सुध्दा मोदी साहेबांना मोठा काम.
 देशात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु आहेत. त्यामुळे मा. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
 आम्ही सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेऊन सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय.
 अनेक दिवस चर्चा सुरु होती. देशपातळीवरील आणि राज्याच्या परिस्थितीचा विचार करुन विकासासाठी आम्ही सरकार मध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला.
 मोदीसाहेब देशाला मजबुतीने पुढे नेत आहेत.
 देशाला पुढे नेण्याचे काम पंतप्रधान मोदी साहेब करत आहेत, म्हणूनचं त्यांना पाठींबा देण्याचा निर्णय.
 विकासाला महत्व देण्यासाठी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय.
 शुक्रवारी विरोधी पक्षपदाचा राजीनामा दिला.
 इथून पुढच्या काळात तरुणांना संधी देण्याची गरज आहे. तरुणांना संधी देणार. त्यामुळे आदिती तटकरे, संजय बनसोडे या तरुणांना संधी.
 महिला, आदिवासी, ओबीसींना मोठ्या प्रमाणात सत्तेत संधी.
 आम्ही आमच्या अडीच वर्षाच्या काळात कोरोना असून सुध्दा विकासाकामे केली.
 आपण विकासाला महत्व देऊनच काम करतो, टीका टिपणीला महत्व देत नाही.
 पक्षातल्या बहुतेकांना आमचा निर्णय मान्य. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही सरकार बरोबर.
 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आणि पक्षाच्या चिन्हावर या पुढच्या निवडणुका लढविणार.
 घड्याळ या चिन्हावरच पुढच्या निवडणुका लढविणार.
 आम्ही शिवेसेनेबरोबर जाऊ शकतो तर भाजप बरोबर सुध्दा जाऊ शकतो. नागालँण्डमध्ये पक्ष यापूर्वीच भाजप बरोबर आहे.
 पक्ष वाढीसुध्दा आम्ही सर्वस्व पणाला लावणार.
 काही आमदार बाहेर आहेत, संध्याकाळपर्यंत ते मुंबईत पोहोचतील.
 पक्षाचे आमदारांसह कार्यकर्ते सुध्दा आमच्यासोबत आहेत.
 लोकशाहीत बहुमताला महत्व, त्यामुळे बहुमतानं आम्ही हा निर्णय घेतला आहे. पक्ष आमच्या सोबत आहे, नेते आमच्या सोबत आहेत. वरिष्ठांशी चर्चा करुनच निर्णय घेतला आहे.
 महाराष्ट्रातल्या तरुणांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेत.
 राज्यात एका पक्षाचे सरकार येण्याचे दिवस संपले त्यामुळे सहकारी पक्षांना सोबत घेऊनच राज्यातील सत्ता चालवावी लागले.
 राज्याचं आणि देशाचं हित बघुनचं सत्तेत येण्याचा निर्णय सगळ्यांनी मिळून घेतला.
******

Shinde-Fadnavis Government | बेकायदेशीर शिंदे सरकारने राजीनामा द्यावा | मोहन जोशी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Shinde-Fadnavis Government | बेकायदेशीर शिंदे सरकारने राजीनामा द्यावा | मोहन जोशी

Shinde-Fadnavis Government | महाराष्ट्रातील सत्तापालटातून (Maharashtra Political Crisis) निर्माण झालेल्या प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme courth results) दिलेला निकाल हा ऐतिहासिक आहे. शिंदे गटाने प्रतोद नेमण्याचा निर्णय, राज्यपालांचा फ्लोअर टेस्ट बाबतचा निर्णय, बेकायदेशीर ठरून सर्वोच्च न्यायालयाने सत्तेसाठी अधीर बनलेल्या शिंदे – फडणवीस सरकारला मोठी चापराक दिली आहे. आता तरी या बेकायदेशीर सरकारने नैतिक जबाबदारी म्हणून त्वरित राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी महारष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी केली. (Maharashtra Political crisis News)

मोहन जोशी म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिंदे – फडणवीस सरकार आणण्यासाठी करण्यात आलेली कुटील कारस्थाने सर्वोच्च न्यायाल्यापुढे टिकू शकली नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे – फडणवीस सरकार आणि तत्कालीन राज्यपाल यांच्यावर कडक ताशेरे ओढले आहेत . अशावेळी हवालदिल झालेले शिंदे – फडवणीस सरकार या निर्णयाचे लंगडे समर्थन करीत सत्तेला चिकटून बसत आहेत ही लाजीरवाणी बाब आहे. जनता उघड्या डोळ्यांनी त्यांचा हा तमाशा बघत आहे. या बेकायदेशीर शिंदे – फडणवीस सरकारने जनाची नाही तर मनाची लाज बाळगून त्वरित राजीनामा द्यावा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिंदे – फडणवीस सरकारच्या बेकादेशीर कृत्यांवर शिक्का मोर्तब झाले आहे. त्यामुळेच आता ,या सरकारने त्वरित राजीनामा दिलाच पाहिजे असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

—-

Shinde-Fadnavis Government | The illegitimate Shinde government should resign Mohan Joshi

CM Uddhav Thackeray | Sharad pawar | याआधी देखील शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यापासून दोनदा रोखले होते | इंडिया टुडे 

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

याआधी देखील शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यापासून दोनदा रोखले होते | इंडिया टुडे 

राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोशल मीडियावर येऊन पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर करणार होते. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ठाकरेंना असा टोकाचा निर्णय घेण्यापासून रोखल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवारांनी याआधी उद्धव ठाकरेंना एकदा नाही तर दोनदा राजीनामा देण्यापासून रोखलं आहे. याबाबत इंडिया टुडेने वृत्त प्रकाशित केले आहे.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची इच्छा असेल तर, मी मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. याशिवाय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी असा देखील दावा केला होता की, आपण शिवसेना पक्षप्रमुखपद सोडण्यासदेखील तयार आहोत. मात्र, माझ्या शिवसैनिकांनी मला हे समोरासमोर येऊन सांगावे असे ठाकरे म्हणाले होते. सर्वोच्च न्यायलयाकडून बंडखोरांना दिलासादरम्यान, आज एकनाथ शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयाने केंद्र सरकार, राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना कोर्टाने नोटीस बजावली आहे. तर बंडखोर आमदारांना 12 जुलैपर्यंत आपली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला आहे. तसेच 12 तारखेपर्यंत अपात्रतेची कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय बंडखोर आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याचे आदेशही न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. याशिवाय पुढील सुनावणीपर्यंत स्थिती कायम ठेवण्यास सांगितले आहे.
सर्वोच्च  न्यायालयातील सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत न्यायालयाचा आजचा निकाल हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय असल्याचं म्हटलं आहे.शिंदेगट लवकरच आणणार अविश्वास ठरावन्यायालयाच्या आजच्या आदेशानंतर, शिंदे गट लवकरच महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे पत्र पाठवणार असून, सध्याच्या ठाकरे सरकार विरोधात अविश्वास ठराव आणण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Eknath Shinde Vs Shivsena | एकनाथ शिंदे यांचा सवाल  | दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना शिवसेना समर्थन कशी करू शकते…? 

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

एकनाथ शिंदे यांचा सवाल

| दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना शिवसेना समर्थन कशी करू शकते…?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेकडून बंडखोर आमदारांच्या निलंंबंनासाठी प्रयत्न केले जात आहेत, या दरम्यान सरकारच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे, यादरम्यान एकनाथ शिंदेंचा गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आता वाढताना दिसत आहे. संजय राऊतांनी बंडखोर आमदारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत राऊतांवर निशाणा साधला आहे, त्यांनी निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते? असा थेट सवाल विचारला आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत गंभीर प्रश्न केले आहेत, त्यांनी म्हटले की, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर…. तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू…

“मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..”

Shivsena | Kothrud | एकनाथ शिंदेच्या फोटोला जोडे मारत कोथरूड मध्ये शिवसेनेचे जोरदार आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

एकनाथ शिंदेच्या फोटोला जोडे मारत कोथरूड मध्ये शिवसेनेचे जोरदार आंदोलन

कोथरूड येथे  शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है, ज्याला भगवा कळेल त्याचेच संकट टळेल, गद्दारांना माफी नाही, उद्धव साहेब आम्हास आपला सार्थ अभिमान आहे.अशी जोरदार घोषणाबाजी करत पुण्यातील कोथरूड येथे एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी बंडखोर आमदारांच्या फोटोला जोडे मारत कोथरूड येथील कर्वे पुतळा चौकात रस्त्यावर उतरत बंडखोर आमदारांचा निषेध करत आंदोलन केले.

आम्ही उध्दव ठाकरे बरोबरच असल्याचे आंदोलकांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी असंख्य आमदारांना घेऊन शिवसेनेसोबत बंड केल्याने शिवसैनिकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. निम्म्यापेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार हे मंत्री शिंदे यांच्यासोबत आहेत. याच्‍या विरोधात आज कोथरुड येथे शिवसेना व युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.

शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, युवतीसेना, अंगिकृत संघटनेतील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संखेने सहभागी होते. यावेळी अनेक शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी शहरप्रमूख गजानन थरकुडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले त्याप्रसंगी माजी गटनेता पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे,नितिन शिंदे भारत सुतार, श्रीपाद चिकणे,
किशोर सोनार ,राजेश पळसकर, राम थरकुडे,नितिन पवार, अनिल घोलप,उमेश भेलके वैभव दिघे,नंदकुमार घाटे,दिलिप गायकवाड,कांताआप्पा बराटे,दिनेश बराटे,बाप्पू चव्हाण,अमित आल्हाट
बाळासाहेब धनवडे, अनिल भगत ,योगेश मारणे
राजू कुलकर्णी,गौरव झेंडे, शिवाजी गाढवे,शुभम कांबळे,लखन तोंडे,कूणाल कांदे सविताताई मते,छायाताई भोसले प्रज्ञा लोणकर,भारती भोपळे शर्मिला शिंदे,जोती चांदिरे पल्लवी नागपुरे,अनिल माझीरे जगदीश दिघे,अनिल भगत मंदार धुमाळ,पुरुषोत्तम विटेकर, सागर तनपुरे,दिनेश नाथ,महेश शिंदे
ऋषिकेश कुलकर्णी,आदि उपस्थित होते.