Mahabhumi Portal | महाभूमी पोर्टल | एका दिवसात 2 लाख लोकांनी घेतला लाभ!

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Mahabhumi Portal | महाभूमी पोर्टल | एका दिवसात 2 लाख लोकांनी घेतला लाभ!

Mahabhumi Portal | महाभूमी पोर्टल (Mahabhumi Portal) ने उच्चांक गाठला आहे. काल ६ जुलै रोजी एका दिवसात आत्ता पर्यंतची सर्वोच्च म्हणजेच २ लाख १५ हजार  डिजीटल ७/१२ (Digital 7/12) व इतर अभिलेख डाऊनलोड करण्यात आले आहेत. अशी माहिती उपजिल्हाधिकारी रामदास जगताप (Deputy Collector Ramdas Jagtap) यांनी दिली. (Mahabhumi Portal)
जगताप यांनी सांगितले कि, महसूल विभागाच्या महाभूमी पोर्टल वरून ज्यात काल म्हणजे ६/७/२०२३ रोजी एका दिवसात १,४८,७२६ डिजिटल स्वाक्षरीत सातबारा, ५५,७३२ डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारे, ४४८८ डिजिटल स्वाक्षरीत फेरफार आणि ६४८२ डिजिटल स्वाक्षरीत मिळकत पत्रिका (property card) डाऊनलोड करण्यात आले. एका दिवसात दोन लक्ष नागरिकांनी लाभ घेतला असून ३६ लक्ष ६१ हजार रुपयांचा महसूल नक्कल फी मधून शासनाला मिळाला. हा आज पर्यंतचा उच्चांक आहे. (Digital 7/12)
महाभूमी पोर्टल सुरु झाल्या पासून या पोर्टल वरून ४कोटी ३७ लक्ष  डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ , १ कोटी ३७ लक्ष डिजिटल स्वाक्षरीत ८अ , १३ लक्ष ५८ हजार डिजिटल स्वाक्षरीत फेरफार व ८ लक्ष १६ हजार डिजिटल स्वाक्षरीत मिळकत पत्रिका (property card) डाऊनलोड करण्यात आले आहेत व त्यातून शासनाला ११२ कोटी ६१ लक्ष रुपये महासूल मिळाला आहे. सध्या महसूल विभागाच्या या डिजिटल सुविधेचा वापर वाढत असून शेतकरी वर्ग देखील याचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याने नकला मिळण्यासाठी तलाठी किंवा अन्य अधिकारी यांचेवरील अवलंबित्व कमी झाले आहे.  असेही रामदास जगताप यांनी सांगितले. (Bhuabhilekh News)
—-
News Title | Mahabhumi Portal |  Mahabhumi Portal |  2 lakh people benefited in one day!

Municipal Election of Maharashtra | राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

Municipal Election of Maharashtra | राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही

Municipal Election of Maharashtra | राज्य निवडणूक आयोगातर्फे (State Election Commission) 5 जुलै 2023 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील (Local Body Élections) मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची (Election Programme) घोषणा करण्यात आलेली नाही. शिवाय ग्रामपंचायत निवडणूक (Gram panchayat Election) वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ‘जैसे थे चे’ आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याचा प्रश्न उद्‌भवत नाही, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान (State Election Officer U P S Madan) यांनी आज येथे केले.
श्री. मदान यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करण्यात येत नाहीत. त्यासाठी विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या जशाच्या तशा घेवून केवळ प्रभागनिहाय विभाजित केल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी संभाव्य सर्वच सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाच्या याद्या वापरण्याकरिता एक विशिष्ट तारीख (कट ऑफ डेट) निश्चित केली जाते. त्याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी संभाव्य सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी 1 जुलै 2023 ही कट ऑफ डेट निश्चित करण्याबाबतची अधिसूचना 5 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Local body election of Maharashtra)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाच्या अद्ययावत मतदार याद्या वापरण्यासाठीच वेळोवेळी कट ऑफ डेट निश्चित केली जाते आणि त्यासंदर्भातील अधिसूचनाही प्रसिद्ध केली जाते. यापूर्वीदेखील या स्वरूपाच्या अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या अधिसूचना म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम नसतो. अधिसूचनेत नमूद केलेल्या कालावधीत सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुका न झाल्यास, पुन्हा नव्याने कट ऑफ डेट निश्चित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली जाते, असेही श्री. मदान यांनी सांगितले. (Municipal Election)
०-०-०
News Title | Municipal Election of Maharashtra | There is no declaration of election program by the State Election Commission

Cabinet meeting Decisions | मंगळवार 4 जुलै ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

Cabinet Meeting Decisions | मंगळवार ०४ जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

(Cabinet Meeting Decisions)  मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये काही महत्वाचे निर्णय झाले आहेत. (Cabinet Meeting Decisions)
 राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन
( ऊर्जा विभाग)
*  मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती योजना. ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती
(नियोजन विभाग)
• दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मान्यता
 (जलसंपदा विभाग)
• नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेणार
 (उद्योग विभाग)
• सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ
 (विधि व न्याय विभाग)
• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय.
(महसूल विभाग)
• नागपूर कृषि महाविद्यालय येथे  आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र
 (कृषि विभाग)
• मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता २५ वर्षे
(पदुम विभाग)
News Title | Cabinet meeting Decisions |  The decision in the Cabinet meeting held on Tuesday 4th July

Maharashtra Politics | अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

Maharashtra Politics | अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Politics | विधानसभेचे सदस्य अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ (Oath For Minister) घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी राजभवनातील (Raj Bhavan) दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. (Maharashtra Politics)
            आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ (Minister Chagan Bhujbal), श्री. दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील (Minister Dilip walse Patil), श्री. हसन मियालाल मुश्रीफ (Minister Hasan Mushrif), श्री. धनंजय पंडितराव मुंडे (Minister Dhananjay Munde), श्री. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम (Dharmravbaba Aatram), आदिती सुनील तटकरे (Minister Aditi Tatkare), श्री. संजय बाबूराव बनसोडे (Sanjay Bansode), श्री. अनिल भाईदास पाटील (Anil Patil) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
            यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.
०००००

Memorial of Hutatma Rajguru | हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्मारक देशातील नागरिकांसाठी ऊर्जा केंद्र व्हावे

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

Memorial of Hutatma Rajguru | हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्मारक देशातील नागरिकांसाठी ऊर्जा केंद्र व्हावे |  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

Memorial of Hutatma Rajguru | हुतात्मा शिवराम हरी राजगुरु (Hutatma Shivram Hari Rajguru) यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान विचारात घेता राजगुरूनगर (Rajgurunagar) येथे निर्माण होणारे स्मारक देशातील नागरिकांसाठी ऊर्जा केंद्र व्हावे; या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Minister Sudhir Mungantiwar) यांनी केले. (Memorial of Hutatma Rajguru)
 राजगुरुनगर येथे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाच्या कामाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार दिलीप मोहिते-पाटील (MLA Dilip Mohite-Patil), विभागीय आयुक्त सौरभ राव (Divisional Commissioner Saurabh Rao), जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr Rajesh Deshmukh), पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, पुणे पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.
श्री. मुनगंटीवार म्हणाले, हुतात्मा राजगुरू यांच्या अंगी प्रचंड राष्ट्रभक्ती होती, त्यांनी देशासाठी प्रचंड त्रास सहन केले. असा महान पुरुष आपल्या मातीत जन्माला आला याचा आपल्याला अभिमान आहे. हुतात्मा  राजगुरू यांच्या जन्मस्थळाचा विकास करताना तिथल्या प्रत्येक खांबातून, विटेमधून आणि भिंतीतून स्वातंत्र्य लढ्यातील इतिहासाची अनुभूती देणारे स्मारक उभारणे गरजेचे आहे. स्मारक करताना सुयोग्य नियोजन करुन  गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, शास्त्रशुद्ध काम व्हावे, तसेच तांत्रिकदृष्ट्या सर्व बाबी तपासून वेळेत काम पूर्ण झाले पाहिजे. येथे डिजिटल ग्रंथालय तयार करुन त्याला विषयानुसार क्यूआर कोड देण्याची व्यवस्था करावी.
 समारकाला भेट देणाऱ्या नागरिकांच्या अंगी राष्ट्रभक्तीचा भाव निर्माण झाला पाहिजे. शहिदाचे गाव असल्याची जाणीव झाली पाहिजे, यासाठी स्थानिक सार्वजनिक इमारतीच्या भिंतीवर देशभक्तीपर घोषवाक्ये प्रदर्शित करणे, बसस्थानकाचे संकल्पचित्र जे. जे. आर्ट स्कूलकडून तयार करणे, शहरातील रस्त्याचे सुशोभीकरण करणे, पर्यटकांचे निवासस्थान, गर्दीचा विचार करता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आदी कामांचे नियोजनात समावेश करण्याबाबत विचार करावा. यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, नागरिकाची मदत घ्यावी. नागरिकांची मते, कल्पनाचा यामध्ये समावेश करण्यासाठी एक संकेतस्थळ तयार करावे. प्रशासन, सामाजिक संघटना, येथील नागरिकांनी मिळून हुतात्मा राजगुरु यांच्या जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी काम करण्याचे आवाहन श्री.मुनगंटीवार यांनी केले.
आमदार श्री. मोहिते पाटील म्हणाले, हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाचे काम प्राधान्याने वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याची गरज आहे. स्थानिक नागरिकांना प्रशासनाने विश्वासात घेऊन काम करावे, असेही ते म्हणाले.
विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले, हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी आतापर्यंत एकूण सहा बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकीत केलेल्या सर्वंकष सूचनांचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि जुन्या अभिलेखांचा संगम साधून हुतात्मा राजगुरू यांच्या विषयीची माहिती भावी पिढीपर्यंत सोप्या भाषेत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही श्री. राव म्हणाले.
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख यांच्या समवेत नागरिकांनी सूचना केल्या. या सूचनांचा स्मारक आराखड्यात समावेश करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असेही, मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.
हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाबाबत समग्र विकास आराखडा पुरातत्व विभागाच्यावतीने तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने परिसर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.
बैठकीपूर्वी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाची आणि थोरलेवाड्याची पाहणी केली.
यावेळी राजगुरूंचे वंशज सत्यशील राजगुरू, हर्षवर्धन राजगुरू, प्रशांत राजगुरू, उप विभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार वैशाली वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, न.प. चे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे आदी उपस्थित होते.
0000
News Title | Memorial of Hutatma Rajguru  The memorial of Martyr Shivram Hari Rajguru should become an energy center for the citizens of the country  Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar

Buldhana Bus Accident | Samruddhi Mahamarg | पाच लाख देऊन प्रश्न सुटणार नाही | शरद पवार

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Buldhana Bus Accident | Samruddhi Mahamarg | पाच लाख देऊन प्रश्न सुटणार नाही | शरद पवार

Buldhana Bus Accident | Samruddhi Mahamarg | समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) अपघात झाला की राज्यसरकार पाच लाख रुपये जाहीर करते. या पाच – सहा लाखातून हे प्रश्न सुटणार नाहीत. जे झाले ते वाईट झाले असून यासंदर्भात या देशामध्ये रस्ते व त्याचे नियोजन या सगळ्या संबंधीचे ज्ञान असणारे आणि जे कर्तबगार लोक आहेत त्यांची एक टीम तयार करावी…संपूर्ण रस्त्याची पुन्हा पाहणी करावी… कुठे चूक झालेली आहे… कशामुळे चूक झाली आहे…ती शोधून काढावी आणि याप्रकारे लोक जात आहेत ती स्थिती आणि याप्रकारचे वाढते अपघात आहेत ती स्थिती थांबवण्यास हातभार लावावा. पाच लाख रुपये जाहीर करुन प्रश्न सुटणार नाहीत. जी कमतरता आहे ती शोधून काढली पाहिजे. अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे.
आज पुणे येथील एका कार्यक्रमानंतर समृद्धी महामार्गावर (Samruddhi Expressway) झालेल्या भीषण अपघाताबाबत पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पवार म्हणाले, समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले ही गोष्ट खरी आहे परंतु दुर्दैवाने या महामार्गावर सातत्याने कुठे ना कुठे अपघात होत आहेत. हे गेले काही महिने बघायला मिळते आहे. मध्यंतरी या महामार्गावरुन जात असताना काही लोकांनी याबाबत त्यांचा अनुभव सांगितला. त्यावेळी त्या लोकांनी या महामार्गाची महाराष्ट्रात फार मोठी चर्चा झाली, फार उदोउदो झाला. पण आम्हाला सातत्याने एखाद दुसरा अपघात पहायला मिळत आहेत. त्याचे कारण कदाचित याचे सायंटिफिक  नियोजन केले नसावे त्याचा दुष्परिणाम लोक मृत्युमुखी पडत आहेत. (Buldhana Bus Accident)
हा महामार्ग तयार करण्याच्या कालावधीत, निर्णय घेण्यात, त्याचे नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती त्या लोकांना ते कळत – नकळत दोषी ठरवतात. काय झाले असेल ते झाले असेल पण जी दुर्घटना घडली ती दु:खद आहे. (Samruddhi Highway)
पवार पुढे म्हणाले, माझं वैयक्तिक मत आहे. आपण प्रवास करताना डोक्यात काही खुणा असतात, काही वळणे दिसतात, झाडे दिसतात परंतु या प्रवासात रस्त्याची सलगता आहे आणि आजुबाजुला कुठे काही नाही. अनेक ठिकाणी या गोष्टीचा परिणाम वाहन चालवतो त्यांच्यावर होतो का अशी शंका काही लोकांनी बोलून दाखवली आहे. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही पण यातील जे काही तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेतला पाहिजे आणि कुठे दुरुस्ती करायची शक्यता असेल तर ती केली पाहिजे. (Buldhana Bus Accident Update)
एमएसआरडीसीने त्यांच्या ज्या काही कमतरता आहेत त्या दुसर्‍यावर ढकलायचा प्रयत्न केला आहे. माझे मते या देशातील इंडियन रोड काँग्रेसने यांची पाहणी केली असे तुम्ही म्हणत असाल आणि जर हे खरे असेल तर जगातील जे चांगले तज्ज्ञ आहेत त्यांना बोलवावे. त्यांची एक कमिटी करावी. त्यामार्फत चौकशी करावी, त्यांचे रिकमेंडेशन घ्यावे आणि करेक्शन मेजर द्यावीत असा सल्ला दिला तर त्याची अंमलबजावणी करावी कारण लोकांचे प्राण हे महत्वाचे आहेत. असे ही पवार यांनी सांगितले.
 News Title | Buldhana Bus Accident |  Samruddhi Mahamarg |  Paying five lakhs will not solve the problem  Sharad Pawar

DA Hike Update | 7th Pay Commission | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ

Categories
Breaking News Commerce social महाराष्ट्र

DA Hike Update | 7th Pay Commission | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ

DA Hike Update |  7th Pay Commission | राज्य शासनाच्या सेवेतील (State Government Employees) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ४ टक्के महागाई भत्ता वाढ (DA Hike) देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ती १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात आली असून, पाच महिन्यांच्या थकबाकीसह जूनच्या वेतनापासून देण्यात येणार आहे.राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सध्या ३८ टक्के महागाई भत्ता मिळतो. त्यात ४ टक्क्यांनी वाढ करून तो आता ४२ टक्के करण्यात आला. (DA Hike Update | 7th pay Commission)

१ जानेवारी २०२३ पासून ही वाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गेल्या पाच महिन्यांची थकबाकीही रोखीने देण्यात येणार आहे. वित्त विभागाने त्यासंबंधीचा शासन आदेश शुक्रवारी प्रसृत केला. राज्यातील १७ लाख शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. (Dearness Allowance)

——

News Title | DA Hike Update | 7th Pay Commission | Four percent increase in dearness allowance of state government employees

Aashadhi Ekadashi 2023 | नगरचे काळे दांपत्य आषाढी एकादशी निमित्त पूजेचे मानाचे वारकरी | कसे निवडले जातात मानाचे वारकरी?

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

Aashadhi Ekadashi 2023 | नगरचे काळे दांपत्य आषाढी एकादशी निमित्त पूजेचे मानाचे वारकरी | कसे निवडले जातात मानाचे वारकरी?

| मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली पूजा

Aashadhi Ekadashi 2023 | यंदाच्या आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi) निमित्त विठ्ठलाच्या पुजेचा मान नगर जिल्ह्यातील (Ahmadnagar) वाकडी ता, नेवासाचे भाविक भाऊसाहेब काळे  आणि मंगल काळे या दाम्पत्याला मिळाला. मुख्यमंत्रांसोबत (CM) पूजा करण्याचा मान त्यांना मिळाला आहे. (Aashadhi Ekadashi 2023)
मानाचे वारकरी यांची माहिती 
भाउसाहेब मोहनीराज काळे (वय 56)
मंगल भाऊसाहेब काळे(वय 52)
मु पो. वाकडी , ता. नेवासा , जिल्हा  – अहमदनगर
25 वर्षापासून भास्कर गिरी महाराज यांच्या सोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी
व्यवसाय – शेतकरी

 हे मानाचे वारकरी ठरवतं कोण ? आणि कस ?

मानाचे वारकरी ठरवण्याचा अधिकार पुर्णपणे मंदिर समितीला आहे. शासकिय पुजेचा प्रकार हा समिती अस्तित्वात आल्यानंतर आला. १९७३ पासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुजा केली जाते तर त्यांच्यासोबत मानाचे वारकरी पुजेस उपस्थित असतात. आणि ते निवडण्याचा अधिकार मंदिर समितीकडे देण्यात आला आहे. (Pandharpur Vitthal puja) 

मानाचे वारकरी कसे निवडले जातात ? 

विठ्ठलाची पुजा हि पहाटे पार पडते. मुख्यमंत्री मंदिरात उपस्थित राहिले की मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. त्यानंतर पुजेची तयारी चालू होते. अशा वेळी दर्शनरांगेत पुढे उपस्थित असणाऱ्या दांपत्याला हा मान दिला जातो. जे दांपत्य दर्शनरांगेत समोर असेल त्यांना मुख्यमंत्र्यांबरोबर पुजा करण्यासाठी बोलावलं जातं. त्यानंतर त्या दांपत्याचा मंदिर समितीमार्फत सत्कार देखील केला जातो. (Manache Warkari) 

——-

News Title | Aashadhi Ekadashi 2023 |  Ashadhi Ekadashi, the Kale couple of the Ahmadnagar district, is honored to worship  How are Honorable Mentions selected?

NCP Pune Agitation | राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

NCP Pune Agitation | राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंदोलन

| गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची केली मागणी

NCP Pune Agitation | राज्यात होणाऱ्या अत्याचाराच्या व गंभीर गुन्ह्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून राज्यातील महिला, तरुणी व विद्यार्थी हे असुरक्षित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवसाढवळ्या खून, दरोडे व प्राणघातक हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात एकाच आठवड्यात एमपीएससी (MPSC) करणाऱ्या दोन मुलींसोबत (Pune Girl Attack) असे प्रकार घडले. यात दर्शना पवार नावाच्या मुलीला आपला जीव गमावावा लागला, तर काल झालेल्या दुसऱ्या हल्ल्यातील ती तरुणी थोडक्यात बचावली. राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळण्यास असमर्थ ठरणाऱ्या गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनांची जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुडलक चौक येथील आंदोलनात करण्यात आली. (NCP Pune Agitation)
यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, ” शहराला राज्याची सांस्कृतिक राजधानी व विद्येचे माहेरघर म्हणून नावलौकिक आहे. परंतु गेल्या काही दिवसात विद्यार्थिनींवर होणारे हल्ले आणि कोयता गॅंगचा उच्छाद यासाठी पुणे शहर कूप्रसिद्ध होत आहे, याला सर्वस्वी जबाबदार स्वतःला आधुनिक पुण्याचे शिल्पकार म्हणून घेणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. आदरणीय अजितदादा या शहराचे पालकमंत्री असताना दर आठवड्याला प्रशासकीय बैठका घेऊन कायदा सुव्यस्थतेचा आढावा घेत असत, फडणवीस सरकार आल्यापासून अवघ्या बोटावर मोजण्या इतक्या बैठका पालकमंत्र्यांनी घेतल्या आहेत. दररोज पुणे शहरात ठिक- ठिकाणी खून,लुटमार, प्राणघातक हल्ले, दहशत माजविणाऱ्या टोळ्या अशा विविध बातम्या पाहायला मिळतात. परंतु भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधील गृहमंत्री अथवा पालकमंत्री या घटनांकडे गांभीर्याने पाहत नाहीत. मुळात या सरकारचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, याबाबत आम्हाला शंका आहे. ज्यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही, महिला बालकल्याण मंत्री देखील पुरुषच आहे अशा लोकांकडून महिलांच्या सुरक्षेची अपेक्षा ठेवणे गैर आहे. गृहमंत्र्यांनी तातडीने झालेल्या घटनांची जबाबदारी स्वीकारत आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे आवाहन आम्ही या निमित्ताने करत आहोत, अन्यथा या पुढील काळात पुन्हा अशा घटना घडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल.
या आंदोलन प्रसंगी  प्रशांत जगताप, सुषमा सातपुते, किशोर कांबले, महेश हांडे, गणेश नलावडे, करीम शैख, शिवानी मालवदकर, दीपक कामठे, सानिया झुंझारराव, संदीप बालवडकर आदि कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
——
News Title | NCP Pune Agitation |  As the question of law and order in the state came to the fore, the Nationalist Congress Party protested in Pune

Dharur Ratna Award | वृक्षमित्र अरुण पवार यांचा ‘धारूररत्न पुरस्कारा’ने गौरव

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Dharur Ratna Award | वृक्षमित्र अरुण पवार यांचा ‘धारूररत्न पुरस्कारा’ने गौरव

Dharur Ratna Award | सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल व महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल वृक्षमित्र अरुण पवार (Tree Friend Arun Pawar) यांचा धारूर ग्रामस्थ आणि ज्ञानलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था नांदेड यांच्या वतीने ‘धारूररत्न पुरस्कार’ (Dharur Ratna Award) देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. (Dharur Ratna Award)
           यावेळी प्रा. रत्नाकर खांडेकर, डॉ. श्रीराम नरवडे, सरपंच बालाजी पवार, समाजसेवक गणेश गुरव, प्रा. अण्णा गरड, मधुकर कदम, जयसिंग कदम पाटील, वृक्षमित्र सोमनाथ कोरे, श्री श्री रविशंकर यांचे शिष्य प्रशांत संगपाळ, जगदीश पाटील, तुषार पवार, श्रीराम कदम, तानाजी खांडेकर, विशाल पवार, महेश गुरव, बालाजी गुरव, कुलदीप पवार, बालाजी पाटील, अभिजित कामटे, बाळासाहेब कोरे, प्रमोद पवार, महेश गडदे आदी उपस्थित होते.
          वैभव कदम यानी एमबीबीएस पदवी प्राप्त केल्याबद्दल, धारूर गावात प्रथम महिला डॉक्टर होण्याचा मान डॉ. श्वेता शिंदे यांनी प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच दहावीमध्ये प्रथम, द्वितीय, त्रितीय क्रमांक प्राप्त केलेल्या अमृता गुरव, आर्या शिंदे, सई सुर्यवंशी, पायल कोरे या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन वृक्षमित्र अरूण पवार व डॉ. श्रीराम नरवडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
           यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. श्रीराम नरवडे यांनी वृक्षमित्र अरुण पवार यांच्या कार्याचा गौरव केला. पवार यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत दहावीनंतर पिंपरी चिंचवड शहरात मिळेल ते काम करून बांधकाम व्यवसायात नाव कमावले. व्यवसाय करताना समाजातील उपेक्षित घटकांना नेहमीच मदतीचा हात पुढे केला. तसेच त्यांनी धारूर गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराचे बांधकाम केले, गावात स्वागत कमान बांधली, तसेच दुष्काळी परिस्थितीत गावात पाण्याची सोय, जनावरांना चारा, विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा पुरविली. तसेच हजारो वृक्ष लागवड करून ती जोपासली आहेत, असेही ते म्हणाले.
         प्रास्ताविक दयानंद शिंदे यांनी, सूत्रसंचालन डॉ. ऋषिकेश कामटे यांनी, तर आभार गणेश गुरव यांनी मानले.
——
News Title | Tree friend Arun Pawar honored with ‘Dharur Ratna Award’