Brahmin Samaj Pune | ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा

Categories
Breaking News Political social पुणे

Brahmin Samaj Pune | ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा

 

Brahmin Samaj Pune – (The Karbhari News Service) –  देशात सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे त्या निमित्ताने पुण्यातील ब्राह्मण समाजाच्या संस्थांसोबत भाजप नेते राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. (Pune Loksabha Election Mahayuti)

यावेळी राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी (MP Medha Kulkarni), भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधवराव भांडारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष  दीपक मानकर, पुणे लोकसभेचे उमेदवार  मुरलीधर  मोहोळ, भाजपचे प्रदेश प्रवक्ते व महायुती समन्वयक संदीप खर्डेकर, भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष  विश्वजीत देशपांडे, व्यावसायिक किशोर सरपोतदार इ मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

ब्राह्मण समाज हा नेहमीच भाजपसोबत राहिलेला आहे व या निवडणुकीत देखील देशाचे भाग्यविधाते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी ब्राह्मण समाजातील सर्व संस्थांनी एकमुखाने महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला.

यावेळी प्रामुख्याने शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण मंडळाचे विश्राम कुलकर्णी, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचे राजेंद्र कुलकर्णी, सुनील पारखी,अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था नाशिक चे पुणे केंद्राचे श्री. विश्वनाथ भालेराव, ब्राह्मण महासंघाचे श्री. चैतन्य जोशी,ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या ऍड. ईशानी जोशी, रिपाई ब्राह्मण आघाडीचे ऍड. मंदार जोशी, सर्व शाखीय ब्राह्मण महासंघाचे श्री. अशोक जोशी,श्री प्रमोद जोशी,परशुराम सेवा संघाचे सर्वश्री उपेंद्र जपे, ऋषिकेश सुमंत, स्वप्निल कुलकर्णी, धीरज जोशी, शैलेश खोपटीकर, डॉ. संजीवनी पांडे, श्रुती कुलकर्णी,अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे श्री.विजय शेकदार,वृषाली शेकदार, केतकी कुलकर्णी, पल्लवी गाडगीळ, आदींसह सर्वच संस्थांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत दादा पाटील म्हणाले ब्राह्मण समाज हा नेहमीच देशाच्या प्रगतीत वाटा उचलणारा समाज आहे, ब्राह्मण समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी शासनाने अमृत नावाची संस्था देखील सुरू केली आहे व वेळोवेळी ब्राह्मण समाजाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार व स्वतः वैयक्तिक पातळीवर देखील आपण प्रयत्न करतच असतो या सर्व संस्था अतिशय उत्तम काम करीत आहेत व त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहू.

पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले गेली 25 वर्ष ज्या भागातून मी राजकारण करत आहे तो संपूर्ण भाग ब्राह्मण बहुल असून ब्राह्मण समाजाने नेहमीच मला पुत्रवत प्रेम दिले आहे माझ्यासाठी नेहमीच खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या या समाजाला मी देखील कोणतीही तक्रारीची संधी देणार नाही देशाची यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन पंतप्रधान मोदींचे हात बळकट केले पाहिजे.
ह्या बैठकीत विधानसभा निहाय मेळावे घेऊन महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे ठरविण्यात आले.

Ravindra Dhangekar Vs BJP | काँग्रेस उमेदवाराचा काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास उरला नाही का?  भाजपच्या नेत्यांचे फोटो वापरायची वेळ का आली? |गौरव बापट यांचा सवाल 

Categories
Uncategorized

Ravindra Dhangekar Vs BJP | काँग्रेस उमेदवाराचा काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास उरला नाही का?  भाजपच्या नेत्यांचे फोटो वापरायची वेळ का आली? |गौरव बापट यांचा सवाल

 

Ravindra Dhangekar Vs BJP – (The Karbhari News Service) –  पुणे लोकसभा निवडणुकीसाठी (Pune Loksabha Election) महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) तर महाविकास आघाडी कडून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे मैदानात उतरलेले आहेत. निवडणुकीचा प्रचार जोर धरताच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर आज दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो वापरून त्यावर जो आमदार कसब्याचा तोच खासदार पुण्याचा अशा आशयाचा मजकूर टाकून तो प्रसारित केला. याला दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे पुत्र गौरव बापट यांनी तीव्र आक्षेप घेतला.

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा त्यांच्याच पक्षावर व नेतृत्वावर विश्वास नसल्याने त्यांना भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो वापरण्याची वेळ आलेली आहे. यावरून त्यांच्या पराभवाची मानसिकता दिसून येते जर स्वतःच्या पक्षावर आणि स्वतःच्या पदाधिकाऱ्यांवर व नेत्यांवर विश्वास असता तर अशा पद्धतीचे बालिश चाळे  कार्यकर्त्यांनी व धंगेकरांनी केलेच नसते असा आरोप  गौरव बापट यांनी केला.

पुढे ते म्हणाले देशामध्ये पंतप्रधान  नरेंद्र  मोदी यांच्यावर जनतेने दाखवलेले प्रेम आणि विश्वास या जोरावरच भारतीय जनता पार्टीचे चारशेहून अधिक खासदार 100% निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे. पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ हे देखील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे. आमचे संपूर्ण कुटुंब हे भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात आगामी काळात हिरीरीने सहभाग घेऊन  मोहोळ यांना खासदार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. असे प्रतिपादन गौरव बापट यांनी केले

Lahuji Vastad Salve Smarak | आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Lahuji Vastad Salve Smarak | आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

| आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जा देणारे ठरेल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

पुणे – (The Karbhari News Service) –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे (Lahuji Vastad Salve Smarak) यांच्या स्मारकाचे आणि उरळी देवाची येथील नगर रचना परियोजनेअंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जा देणारे ठरेल, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले.

संगमवाडी परिसरात आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आदी उपस्थित होते.

The karbhari - Lahuji smarak sangamwadi pune

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा पुढे नेणाऱ्या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक उभारले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांच्या आदर्शानुसार चालणारे सरकार असल्याने सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आज करण्यात आले आहे. मातंग समाज प्रामाणिक आणि कष्टाळू आहे, दिलेला शब्द पाळणारा आहे. बार्टीच्या धर्तीवर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना करून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे मातंग समाजातील मुलांना आता उच्च शिक्षण घेता येईल. स्पर्धेच्या युगात या समाजाला इतर समाजाच्या बरोबर विकासात सहभागी करून घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात गड किल्ले, महापुरुषांच्या स्मारकासाठी तरतूद ठेवली आहे. नव्या पिढीला महापुरुषांच्या कार्य, बलिदानापासून प्रेरणा मिळावी यासाठी स्मारके उभारण्यात येत आहेत. भिडेवाडा येथे देखील सावित्रीबाई फुले यांचे स्मारक होत आहे. लहुजी वस्ताद यांच्या हातातील दांडपट्ट्याला शासनाने राज्य शस्त्राचा दर्जा दिला आहे. आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या माध्यमातून मातंग समाजातील नव्या पिढीला प्रेरणा मिळण्यासोबत उच्च पदावर जाता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी क्रांतीची ज्योत हजारो मनात पेटवली असे सांगून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, आज छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य वाढविणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या भूमीपूजनानंतर छत्रपतींच्या मावळ्याच्या स्मारकाचे भूमिपूजन होत आहे याचा आनंद आहे. क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांनी शस्त्राने पारंगत वीर तयार करण्यासाठी देशातील शस्त्राचे प्रशिक्षण देणारी पहिली शाळा काढली म्हणून त्यांना आद्य क्रांतीगुरू म्हटले जाते. आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांनी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रशिक्षण दिले.

समाजातील विषमता दूर करण्याचे कार्य करणाऱ्या महात्मा फुले यांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले. १८५७ च्या स्वातंत्र्य समरात लहुजी वस्ताद साळवे यांनी प्रशिक्षित केलेले क्रांतिकारक लढत होते. देह ठेवण्यापर्यंत त्यांनी देशाची सेवा केली. अशा थोर क्रांतिकारकाचे स्मारक रूपाने स्मरण करणे आवश्यक आहे. ही प्रेरणा सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्मारक उभारण्यात येत आहे. आता आर्टीची स्थापना करण्यासोबत आरक्षणात होणारा अन्याय दूर करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. येत्या काळात चिरागनगर मध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी अनेकांनी प्रयत्न केले. बहुजन समाजातून आलेल्या आणि आपल्या कर्तृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्यांमध्ये लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य मोठे आहे. लहुजी वस्ताद साळवे यांचे घराणे पराक्रमी घराणे म्हणून प्रसिद्ध होते. लहुजी वस्ताद साळवे यांनी ही परंपरा राखत इंग्रजी सत्तेला आव्हान देण्याचे कार्य केले आणि तरुणांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले. इंग्रजी सत्तेला उलथवून टाकण्यासाठी तरुणांच्या मनात विद्रोहाची ज्योत पेटवली. अशा थोर पुरुषाचे त्यांच्या कार्याला साजेसे स्मारक उभे राहणार आहे. पुढच्या पिढीला अभिमान वाटेल असे स्मारक उभारण्यात येईल.

लहुजी वस्तादांच्या कार्याची आठवण ठेवत तरुणांनी त्यांचा विचार स्विकारावा, स्मारक विचाराचे केंद्र असतात. तरुणांनी महापुरुषांपासून चांगला विचार घ्यायला हवा. व्यायाम, शिस्त, सचोटी आणि शिक्षणाने मेंदू बळकट करीत अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी ठेवावी. क्रांतीवीर लहुजी वस्तादांसारख्यांच्या कार्यातून महाराष्ट्र उभा राहीला आहे. स्मारकाच्या रूपाने त्यांच्या कार्याचा ठेवा जपला जाईल, येणाऱ्या पिढ्यांना त्यातून प्रेरणा मिळत राहील. मातंग समाजाच्या कल्याणासाठी आर्टीसाठी तातडीने पाऊले उचलले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. उरुळी देवाची नगर रचना परियोजनेद्वारे ५-६ एकरात गरिबांसाठी घरे मिळतील,असेही ते म्हणाले.

मंत्री श्री.पाटील म्हणाले,आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाची २० वर्षाची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. येत्या दोन वर्षात निधीची कोणतीही कमतरता पडू न देता स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल. स्मारक पूर्ण झाल्यावर लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य लक्षात घेऊन उपक्रम राबवावेत. नुकतेच अंदाजपत्रकात आर्टीची घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे मातंग समाजाच्या प्रगतीला गती मिळेल. समाजातील सुशिक्षित व्यक्तींनी शासनाच्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार सुनील कांबळे आणि स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

प्रास्ताविक पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी केले. स्मारकासाठी साडेपाच एकर जागा आरक्षित करण्यात आली असून या कामावर ११५ कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यात संग्रहालय, आर्ट गॅलरी, वसतिगृह, वाचनालय, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण हॉल आदी सुविधा असतील. परिसरात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा ३५ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. याशिवाय नगर नियोजन योजनेअंतर्गत उरुळी देवाची येथे विकासकामे करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

Lahuji Salve Smarak | लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचे भूमिपूजन शनिवारी | पुण्यात महायुती कडून जल्लोष साजरा 

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Lahuji Salve Smarak | लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचे भूमिपूजन शनिवारी | पुण्यात महायुती कडून जल्लोष साजरा

Pune – (The Karbhari Online) – मातंग समाजाच्या समस्या दूर करण्यासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्थेची स्थापन करण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचे भूमी पूजन देखील शनिवारी करण्याची घोषणा सरकारने केली. त्याबाबत सरकारचे अभिनंदन करत पुण्यात महायुती कडून जल्लोष साजरा करण्यात आला.
 मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हे निर्णय घेतले आहेत. त्यानिमित्त महायुती कडून जल्लोष साजरा केला गेला. यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, राष्ट्रवादीचे माजी सभागृह नेते सुभाष जगताप तसेच स्मारक समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
The karbhari - Matang samaj
महायुती कडून अशा पद्धतीने जल्लोष साजरा करण्यात आला
मातंग समाज हा महाराष्ट्रासह संपुर्ण देशात वास्तव्यास आहे. या समाजातील बहुतांशी नागरिक भूमीहीन असून, मोलमजुरी करून आपले जीवन जगत आहे. उच्च शिक्षणापासून हा समाज वंचित आहे. तसेच शासकीय सेवेत देखील या समाजातील युवकांची संख्या अत्यंत कमी आहे. शासनाने मातंग समाजाच्या मागण्या व प्रश्न सोडवून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने तातडीची उपाययोजना केली पाहिजे. याबाबत सातत्याने मागणी केली जात होती. भारतीय राज्यघटनेच्या 341 या कलमांतर्गत राष्ट्रपतीच्या मान्यतेने राज्यांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट असलेल्या जातीची यादी निश्चित करण्यात आलेली आहेझ त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात 59 जातीचा’ समावेश आहे. त्यापैकी काही जाती त्या सुशिक्षित आहेत.  तर काही जाती या अत्यंत मागासलेल्या आहे. त्यामुळे मागास जातीच्या उन्नतीसाठी या जातीचे वर्गीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. अशी मागणी केली जात होती. तसेच आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी (जि. पुणे) येथे भव्य स्मारक उभारण्यासाठी शासनाकडून आज पर्यंत विलंब होत आहे. त्याबाबत देखील निर्णय घेण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार सरकारने दखल घेत या मागण्या मान्य केल्या आहेत.

Mahayuti | Sandeep Khardekar | महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Mahayuti | Sandeep Khardekar | महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती

 

Mahayuti | Sandeep Khardekar | आगामी काळात महायुतीतील सर्व घटक पक्षांशी योग्य समन्वय राखण्यासाठी भाजप चे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांची पुणे शहर महायुतीच्या समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली.

आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, यांच्या हस्ते श्री. खर्डेकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी आ. माधुरी मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ. सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे,पुणे शहर प्रभारी अमर साबळे,माजी अध्यक्ष जगदीश मुळीक,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महायुती चे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष,लोकजनशक्ती पार्टी, शिवसंग्राम संघटना, पतीत पावन संघटना यासह विविध समविचारी पक्ष,संघटना, स्वयंसेवी संस्था, यांच्याशी योग्य समन्वय साधून, सर्वांच्या सहकार्याने आगामी लोकसभा,विधानसभा व महापालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवू असा विश्वास संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला.

By election | प्रचाराच्या तोफा थंडावल्या | रविवारी मतदान | जनता कुणासोबत महाविकास आघाडी कि महायुती?

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

प्रचाराच्या तोफा थंडावल्या | रविवारी मतदान

| जनता कुणासोबत महाविकास आघाडी कि महायुती?

Kasba-Chinchwad ByEelction : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार अखेर आज संध्याकाळी ५ वाजता संपला. यानंतर रविवारी, २६ फेब्रुवारी रोजी दोन्ही मतदारसंघात मतदान पार पडेल. या दोन्ही मतदारसंघात जोरदार प्रचार पार पडला. भाजप-शिवसेनेसह महाविकास आघाडीचे सर्व दिग्गज नेत्यांनी इथं प्रचार सभा घेतल्या. त्यामुळं मतदान किती होईल आणि कोण निवडून येईल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच जनतेचा कल महाविकास आघाडीकडे आहे कि महायुती कडे याबाबतही तर्क वितर्क लढवले जात आहेत. (Kasba Chinchwad ByEelction Campaign ends vote on Sunday)

दरम्यान, चिंचवडमध्ये भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आश्विनी जगताप तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्यासह काही अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. तर कसब्यात युतीचे उमेदवार हेमंत रासने आणि मविआचा रविंद्र धंगेकर तसेच आनंद दवे, अभिजीत बिचुकले आणि इतर अपक्ष उमेदवार यांच्यात लढत होणार आहे. पण दोन्ही मतदारसंघात युती आणि आघाडीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार पार पडला.