PMC Election | BJP | भाजपकडून पुणे महापालिका निवडणुकीची तयारी सुरु 

Categories
Breaking News PMC Political पुणे

PMC Election | BJP | भाजपकडून पुणे महापालिका निवडणुकीची तयारी सुरु

| महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून राजेश पांडे यांची नियुक्ती

PMC Election | BJP | पुणे महापालिका निवडणूक (Pune Municipal Corporation Election) कधी होणार याची उत्सुकता सर्वानाच आहे. मात्र निवडणूक कधी होणार, हे खात्रीशीरपणे कुणीच सांगू शकत नाही. पण दुसरीकडे भाजपने (BJP) मात्र निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पुणे महापालिका निवडणूक प्रमुख (PMC Pune election) म्हणून राजेश पांडे (Rajesh Pande) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (PMC Election | BJP)
पांडे यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State president Chandrashekhar Bawankule) यांनी नुकतेच तसे पत्र दिले आहे. पत्रात बावनकुळे यांनी म्हटले आहे कि पुणे महापालिकेत पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणण्यासाठी आपण प्रयत्न कराल.
प्रदेश भाजपने पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शिफारशीनुसार ही निवड झाली आहे. पक्ष नेतृत्वाने टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवीन. अशा भावना पांडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. (PMC election news)
महापालिकेच्या माध्यमातून भाजपने शहरात मोठी विकासकामे केली आहेत. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत आम्ही मागील यशाची पुनरावृत्ती करू. त्यासाठी मी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करीन. बूथ रचनेचे सक्षमीकरण, नियोजनबद्ध निवडणूक व्यवस्थापन आणि विकासकामे व योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू.
राजेश पांडे, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप, महाराष्ट्र
पुणे महापालिका निवडणूक प्रमुख, भाजपा
—–
News Title |PMC Election | BJP | Preparations for Pune Municipal Elections have started from BJP | Appointment of Rajesh Pandey as Chief Municipal Election Officer

PMC Pune Employees | सेवानिवृत्त सेवक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मे अखेरपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम अदा करा

Categories
Breaking News PMC Political पुणे

PMC Pune Retired Employees | सेवानिवृत्त सेवक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मे अखेरपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम अदा करा

| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे महानगरपालिकेला निर्देश

PMC Pune Retired Employees| पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) १ जानेवारी २०१६ नंतर सेवानिवृत्त (Retired Employees of PMC pune) झालेल्या सेवक, प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) कार्यवाही करुन फरकाची रक्कम मे अखेर अदा करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant patil) यांनी दिले. (PMC Pune Retired Employees)

शासकीय विश्रामगृह येथे पुणे मनपा सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोग (7th Pay Commission) लागू करण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पुणे मनपा प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मिनाक्षी राऊत, तसेच महानगरपालिका सेवानिवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष संभाजी भोसले यांच्यासह निवृत्त सेवक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. (PMC Pune News)

पुणे महापालिकेअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागातील एकूण २ हजार ५५३ सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असून तर सन २०१६ पूर्वी शिक्षक व शिक्षकेतर सेवानिवृत्त झालेले कर्मचारी १ हजार ९४३ आहेत. १ जानेवारी २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या पुणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याबाबत एकूण ३५० सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विवरणपत्रे तयार केलेली आहेत. त्याअनुषंगाने तांत्रिक अडचणी, वेतन निश्चितीतील त्रुटी पूर्तता करण्याचे काम सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यावर सर्व अडचणी मेअखेरपर्यंत दूर करुन निवृत्तीवेतन योजना लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी दिल्या. (PMC Pune Education Department)

महापालिकेअंतर्गत सेवकांची एकूण १०७ निवृत्तीवेतन प्रकरणे असून त्यातील त्रुटीची पूर्तता करून निवृत्तीवेतन धारकांना लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. आतापर्यंत २०१६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना १० महिन्याचा फरक व वेतन आयोगाचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. त्याप्रमाणे २०१६ पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सर्व लाभ देण्यात आले आहेत, अशीही माहिती मनपाच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली. सदरचे कामदेखील तातडीने पूर्ण करुन हे अखेरपर्यंत ७ वा वेतन आयोगानुसार वाढीव निवृत्तीवेतन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावी. तसेच दोन महिन्यांनंतर सेवा उपदानाची रक्कम देखील अदा करावी, अशा सुचना पालकमंत्री पाटील यांनी यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या. (Pune Municipal Corporation)

पालकमंत्र्यांच्या या निर्णयाचे सर्व प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाकडील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. (Pune Civic Body)

Scheme for Farmers | शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ राबविण्यास मान्यता

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र शेती

संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ राबविण्यास मान्यता

पुणे|  शेती व्यवसाय करत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्ते, वाहन अपघात आदी कारणामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबियास आर्थिक लाभ देण्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी राबविण्यात येत असलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचे विमा दावे वेळेत मंजूर न करणे, अनावश्यक त्रुटी काढून विमा प्रकरणे नाकारण्याचे प्रकार विमा कंपन्यांकडून होत असल्याने शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने हा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे.

घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक सहाय्य करुन संकटातून बाहेर काढत त्यांना मानसिक बळ देणारी योजना म्हणून ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ ओळखली जाणार आहे.

योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदास पात्र बाबी

राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पत्नी/पती, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वर्ष वयोगटातील एकूण २ सदस्याचा समावेश करण्यात आला आहे.

रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीजपडून झालेला मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलाईटकडून झालेली हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावण्यामुळे जखमी अथवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघात या अपघातांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करुन घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीरांतर्गत रक्तस्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबी या योजनेंतर्गत अपात्र असतील.

ही योजना संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच योजनेच्या विहित कालावधीतील प्रत्येक दिवसांच्या २४ तासांसाठी लागू आहे. तथापि या योजनेंतर्गत लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्याने किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतल्यास या योजेनेअंतर्गत लाभ मिळण्यास अपात्र असेल.

योजनेअंतर्गत देण्यात येणारे सानुग्रह अनुदान

अपघाती मृत्यू, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास अशावेळी 2 लाख रुपये आणि अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

विहीत नमुन्यातील अर्ज, सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्याचे वारस म्हणून तलाठ्याकडील गांव नमुना क्र.6 नुसार वारसाची नोंद, शेतकऱ्याच्या वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र अथवा ओळख किंवा वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे, प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, पोलीस पाटील यांचा माहिती अहवाल तसेच अपघाताच्या स्वरुपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील. संबंधित अपघातग्रस्त शेतकरी/ शेतकऱ्यांचे वारसदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे अपघाताचे प्रकरण निदर्शनास आल्यापासून तीस दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक राहील. प्रस्तावासाठी कृषि विभागाचे संबंधित गावातील कृषि सहाय्यक, पर्यवेक्षक आदी क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी मार्गदर्शन करतील.

प्रस्तावावर कार्यवाही करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समित्या

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदानास प्राप्त प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय जिल्हा अपिलीय समिती आणि योजनेच्या राज्यस्तरीय संनियत्रंणासाठी अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव (कृषि) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आलेल्या आहेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयुक्त (कृषि) यांना पर्यवेक्षक व संनियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
0000

Shri Sadguru Junglee Maharaj Utsav | ३३ वर्षांची अखंड परंपरा लाभलेला उत्सव

Categories
cultural social पुणे

३३ वर्षांची अखंड परंपरा लाभलेला उत्सव | श्री सद्गुरू जंगली महाराज उत्सव

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट आणि श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळ आयोजित जंगली महाराज यांच्या १३३व्या पुण्यतिथी उत्सवाला२२ मार्च ला सुरुवात झाली. पुण्यतिथी उत्सव हा २२ मार्च, बुधवार,चैत्र शुद्ध प्रतिपदा ( गुडीपाडवा ) ते ५ एप्रिल, गुरुवार,चैत्र शुद्ध चतुर्दशी पर्यंत होणार आहे.

श्री सद्गुरू जंगली महाराजांच्या समाधीला चैत्र शुद्ध प्रतिपदेला सकाळी सात वाजता अभ्यंगस्नान घालून पूजा करण्यात आली. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सनईच्या मंगलमय सुरावटीने देवस्थानचा परिसर भक्तिमय झाला होता व श्री सद्गुरु जंगली महाराज भजनी मंडळ यांच्या भजनाने पुण्यतिथी उत्सवास सुरुवात झाली या वेळी समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत. ५ एप्रिल,चैत्र शुद्ध चतुर्दशी रोजी महाराजांची मिरवणूक श्री सद्गुरू जंगलीमहाराज भजनी मंडळासह महाराजानचे मूळ गादी स्थान असलेल्या ग्रामदैवत रोकडोबा मंदिर येथून ग्राम प्रदीक्षिणा होऊन श्री सद्गुरु जंगली महाराज मंदिरात येईल व महाराजांच्या समाधीची पूजा होऊन परत मुळ गादी स्थान येथे मार्गस्त होईल.

सदर पंधरा दिवसांच्या सपत्या मध्ये धार्मिक कार्यक्रम, महिला भजने, व्याख्याने आणि संगीत सभांचे नियोजन करण्यात येते.
सदर उत्सवाची सर्व रूपरेषा श्री सद्गुरू जंगली महाराज यांच्या पट्टशिष्या रखुमाबाई गाडगीळ उर्फ आईसाहेब यांनी ठरवून दिलेली असून उत्सवाला १३३ वर्षाची परंपारा लाभली आहे. अशी माहिती देवस्थान चे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर,भजनी मंडळाचे अध्यक्ष तेजस तापकीर,प्रमुख विणेकरी महेश दुर्गे यांनी दिली.