Pune Metro | Chandrakant Patil | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहन

Categories
Breaking News Political social पुणे

Pune Metro | Chandrakant Patil | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहन

| मेट्रो स्थानकांची केली पाहणी

Pune Metro | Chandrakant Patil |प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते मंगळवारी पुणे मेट्रोच्या (Pune Metro) फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट (Fugewadi to civil Court Metro Route) आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मार्गिकेचे (Garvare college to Ruby hall Metro Route) लोकार्पण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी रुबी हॉल, सिव्हिल कोर्ट आणि शिवाजी नगर मेट्रो स्थानकांची पाहणी केली आणि रुबी हॉल स्थानक ते शिवाजी नगर मेट्रो स्थानकादरम्यान प्रवासदेखील केला. (Pune Metro | Chandrakant Patil)

यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांच्यासह मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, या दोन मार्गांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर जोडले जाणार असून पुणे शहरातील महत्वाच्या ठिकाणी प्रवासदेखील सुलभ होणार आहे. नवीन मार्ग शिवाजी नगर, सिव्हिल कोर्ट, आरटीओ, पुणे रेल्वेस्टेशन, पीएमसी, संभाजी उद्यान, डेक्कन इत्यादी महत्वाच्या भागांना जोडत असल्याने पुणेकर नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

मेट्रो मार्गामुळे पुणेकरांना प्रवासाचा चांगला पर्याय उपलब्ध होणार असून शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल. नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत प्रवास करण्यासाठी इलेक्ट्रिक बस आणि पार्किंगची सुविधादेखील असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मेट्रोद्वारे प्रवास करावा, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. पाटील यांनी मेट्रो चालविणाऱ्या महिला चालकाशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले.

असा आहे मेट्रो मार्ग
पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट या ६.९ किलोमीटरच्या मार्गिकेवर ४ स्थानके आहेत, तर गरवारे कॉलेज ते रुबी हॉल या ४.७ किलोमीटरच्या मार्गिकेवर ७ स्थानके आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण २१ स्थानकांसह २३.६६ किमी लांबीचा मेट्रो मार्ग पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी होणार आहे. डेक्कन, शिवाजीनगर आणि पुणे महानगरपालिका येथे पीएमपीएमएल सेवेबरोबर समन्वय साधण्यात येणार आहे.


News Title | Pune Metro | Chandrakant Patil | Appeal from guardian minister Chandrakantada Patil to travel by metro | Metro stations inspected

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या ड्रेनेजच्या कामाबद्दल भाजपकडून भांडारकर रोडवर धरणे आंदोलन

Categories
Breaking News PMC Political पुणे

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या ड्रेनेजच्या कामाबद्दल भाजपकडून भांडारकर रोडवर धरणे आंदोलन

| आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडून दखल घेत प्रशासनाला आदेश

Pune Municipal Corporation | भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वतीने पुणे  महानगरपालिकेने (PMC Pune) केलेल्या निकृष्ट ड्रेनेजच्या (Drainage) कामाबद्दल आपला असंतोष आणि संताप व्यक्त करण्यासाठी भांडारकर रोडवर धरणे आंदोलन (Agitation) केले. याची दखल घेत आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole) यांनी महापालिका प्रशासनाला मॅनहोल कव्हर्स बदलण्याचे आदेश दिले. (Pune Municipal Corporation)
याबाबत शिरोळे यांनी सांगितले कि याठिकाणी नव्याने बसवण्यात आलेले ड्रेनेजवरील मॅनहोल कव्हर्स अगोदरच खराब झाले आहेत, त्यामुळे प्रवाशांना धोका निर्माण झाला होता. या धरणे आंदोलनाची माहिती मिळाल्यावर, मी ताबडतोब त्याठिकाणी पोहोचलो आणि निकृष्ट कामाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी पुणे मनपा पथ विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधला व  खराब झालेले मॅनहोल कव्हर्स बदलून घेतले. (PMC Pune News)
यावेळी आमच्या कार्यकर्त्यांना धरणे आंदोलनाची सांगता करण्याचे आवाहन  केले. तसेच संबंधित अधिकार्‍यांना रहिवाशांच्या सुरक्षिततेला आणि सुविधेला प्राधान्य देऊन, रस्त्यावर नव्याने बसवलेले सर्व ड्रेनेज चेंबर्सवरील मॅनहोल कव्हर्स त्वरीत बदलण्याचे निर्देश यावेळी दिले. (PMC Drainage Cleaning)
यावेळी सुनील पांडे, गणेश बगाडे, अपूर्व खाडे, अपूर्व सोनटक्के, अभिजीत मोडक,  शाम आप्पा सातपुते, अपर्णाताई कुऱ्हाडे, निलेश घोडके,  सुजित गोटेकर,  राजेश नायडू, योगेश जोगळेकर, हार्डीकर तसेच भाजपा छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (BJP Agitation)
—-
News Title | Pune Municipal Corporation |  Protest by BJP on Bhandarkar Road regarding drainage work of Pune Municipal Corporation

BJP Delegation | पुणेकरांची मिळकत करातील ४०% सवलत कायम ठेवावी’ | भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट

Categories
Breaking News Commerce PMC Political social पुणे महाराष्ट्र

‘पुणेकरांची मिळकत करातील ४०% सवलत कायम ठेवावी’

| भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट

| निर्णयासाठी पुढील आठवड्यात बैठक : मुरलीधर मोहोळ

 

पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम ठेवावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. शिवाय देखभाल दुरुस्ती खर्च १ एप्रिल २०१० पासून १५ टक्क्यांहून १० टक्के फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या दोन्ही मागण्यांसदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बैठक घेणार असल्याची माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी महापौर मोहोळ यांच्यासमवेत यावेळी आ. माधुरीताई मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ. सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते.

मिळकत करातील ४०% सवलत दि. १/८/२०१९ पासून स्व: वापर करीत असलेल्या निवासी मिळकतीची काढण्यात येऊ नये आणि देखभाल दुरुस्ती खर्च दि. १/४/२०१० पासून १५% हून १०% फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशा दोन मागण्या या निवदेनातून करण्यात आल्या आहेत.

या संदर्भात माहिती देताना माजी महापौर मोहोळ म्हणाले, ‘निवासी मिळकतींना देण्यात येणारी ४०% सवलत आणि १५% हून १०% देखभाल दुरुस्ती खर्च नवीन आकारणी होत असलेल्या मिळकतीना दिनांक १/४/२०१९ पासून बंद करण्यात आली आहे. यासंदर्भात २०१९ आणि २०२२ ला महापालिकेच्या मुख्य सभेचा पुन्हा ठराव केला होता. त्याद्वारे हीसवलत रद्द न करता सुरू रहावी, असा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्याला होता. मात्र तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने कोणाताही निर्णय घेतला नाही’.

महारापालिकेच्या २०१९ आणि २०२२ च्या ठरावाच्या आधारावर राज्य सरकारकडे या मागण्या केल्या असून याबाबत तातडीने पुढील आठवड्यातच बैठक घेऊन याबाबत पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल, हा विश्वास आहे, असेही मोहोळ म्हणाले.

| महाविकास आघाडीच्या आमदारांचे आंदोलन केवळ नौटंकी : मोहोळ

आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर पुण्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांना जाग आली आणि त्यांनी घाईघाईने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनाची नौटंकी केली. स्वतःची निष्क्रियता छाकण्यासाठी केलेल्या आंदोलनाच्या नौटंकीला पुणेकर भुलणार नाहीत, अशा शब्दात मोहोळ यांनी उत्तर दिले.

Aditi Tatkare : समाजमाध्यमांचा वापर सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठी करावा : राज्यमंत्री आदिती तटकरे

Categories
Breaking News cultural Political पुणे

समाजमाध्यमांचा वापर सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठी करावा

: राज्यमंत्री आदिती तटकरे

पुणे : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात समाज माध्यमांचा वापर हा अपरिहार्य असला तरी सामाजिक शांततेला धक्का लागणार नाही आणि सामाजिक सलोखा जपला जाईल याची दक्षता घ्यावी, असे मत राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.

‘डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी’तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मिरॅकल इव्हेंट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनामध्ये ‘राजकारणातला सोशल मीडिया’ या विषयावर त्या बोलत होत्या. आमदार रोहित पवार, देवेंद्र भुयार, सिद्धार्थ शिरोळे, योगेश कदम परिसंवादामध्ये सहभागी झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र आणि संज्ञापन विभागाच्या प्रमुख उज्ज्वला बर्वे यांनी निवेदन केले.

राज्यमंत्री  तटकरे म्हणाल्या, समाजमाध्यमांचा वापर व्यक्तिमत्वाला साजेसा असावा. समाज माध्यमाद्वारे वेगाने संदेश पोहोचत असले तरी प्रत्यक्ष आणि थेट संवादाला पर्याय नाही.

यावेळी आमदार देवेंद्र भुयार, रोहित पवार, सिद्धार्थ शिरोळे, योगेश कदम यांनी ते कशा प्रकारे समाज माध्यमांचा वापर करतात तसेच समाज माध्यमांचा वापर करत असताना त्यांना आलेले अनुभव मनोगतात सांगितले.

Mula, Mutha and Indrayani rivers : Water hyacinth : मुळा, मुठा आणि इंद्रायणी नद्यांमधील जलपर्णी जैविक पद्धतीने हटविणार

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

मुळा, मुठा आणि इंद्रायणी नद्यांमधील जलपर्णी जैविक पद्धतीने हटविणार

: नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आश्वासन

पुणे – नद्यांमधील जलपर्णी हटविण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जैविक पद्धतीचाच वापर केला जाईल, असे आश्वासन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील चर्चेत आज (मंगळवारी) दिले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये नद्यांमधील जलपर्णीच्या त्रासासंबंधिची लक्षवेधी सूचना मी विधानसभेत मांडली. यावर सभागृहात ५०मिनिटे गांभिर्याने चर्चा झाली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मुळा, मुठा आणि इंद्रायणी नद्यांचे ५३ किलोमीटर पैकी ३० किलोमीटर क्षेत्र जलपर्णीने व्यापून टाकले आहे. यामुळे डासांचा फैलाव वाढून नदीकाठच्या रहिवाशांमध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांचा प्रादुर्भाव आढळतो. नदीपात्रात मासेमारीही अशक्य झाली आहे. वॉटर स्पोर्ट्स, पर्यटन सुविधाही तिथे करता येत नाहीत. नदीच्या पाण्याची ऑक्सिजन पातळी खालावते, त्यामुळे पाण्याची गुणवत्ता कमी होते आणि पर्यावरणाचीही हानी होते.

नदीपात्रातील जलपर्णी हटविण्यासाठी महापालिकांनी यांत्रिक पद्धतीचा वापर केलेला आहे. त्यात कोट्यवधी रुपये खर्च होऊनही जलपर्णी हटलेली नाही. उल्हास नदीतील जलपर्णी हटविण्यासाठी जैविक पद्धतीचा वापर करण्यात आला आणि जलपर्णी हटविली गेली. रासायनिक औषधींपेक्षा जैविक पद्धतीचा वापर हानीकारक ठरत नाही असेही सिद्ध झाले आहे, असे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

उल्हास नदीतील जैविक पद्धतीचा वापर आणि त्याचा झालेला फायदा मी स्वतः पाहिलेला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नद्यांमधील जलपर्णी हटविण्यासाठी जैविक पद्धतीचा वापर करण्याची सूचना आमदार शिरोळे यांनी केली, ती योग्य आहे. शासन त्याप्रमाणेच कार्यवाही करण्याच्या सूचना देईल, असे आश्वासन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.