MNS Supports BJP | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हेमंत रासने यांना पाठिंबा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हेमंत रासने यांना पाठिंबा

हिंदुत्व आणि विकास हे दोन्ही मुद्दे प्रभावशाली पद्धतीने पुढे नेणारा एकच घटक सध्या आहे, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. म्हणूनच पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला पूर्ण सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय मी घेत आहे, अशा  शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा  राज ठाकरे यांनी आज आपली भूमिका व्यक्त केली.

पुण्यातील मनसे नेत्यांनी आज राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी राज यांनी ही स्पष्टोक्ती केल्याचे समजते. त्यावेळी पुण्यातील कसबा विधानसभा पोट निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बाबू वागस्कर, अजय मोरे, किशोर शिंदे आदी मनसेचे पुण्यातील स्थानिक नेते उपस्थित होते.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक यांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना आणि मित्र पक्षाच्या युतीतर्फे हेमंत रासने हे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. या संदर्भात मनसेची भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर पुण्यातील स्थानिक नेत्यांनी राज यांची आज भेट घेतली. हिंदुत्व आणि विकास याच्या बाजूनेच आपला कल असल्याचे राज यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे कसबा विधानसभा निवडणुकीत भाजप युतीचे उमेदवार हेमंत रासने यांना आता मोठे बळ मिळाले आहे.

निवडणूक प्रमुख आमदार माधुरी मिसाळ आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी आज मनसेचे प्रवक्ते आणि नेते अनिल शिदोरे प्रदेश, नेते बाबू वागस्कर, उपाध्यक्ष बाळा शेंडगे, प्रदेश सरचिटणीस किशोर शिंदे, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आणि कसबा विभागाचे अध्यक्ष गणेश भोकरे यांची भेट घेतली.
यावेळी वागस्कर यांनी पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.

Raj Thackeray | Property Tax | 40% करसवलती बाबत पुणेकरांना कोण दिलासा देणार? राज ठाकरे कि चंद्रकांत पाटील! 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

40% करसवलती बाबत पुणेकरांना कोण दिलासा देणार? राज ठाकरे कि चंद्रकांत पाटील!

पुणेकरांच्या 40% करसवलत बाबत पुणेकरांना दिलासा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढे आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत ठाकरे यांनी बाबत पुणेकरांना दिलासा देणारा निर्णय राज्यशासनाने घ्यावा अशी मागणी केली. दरम्यान पुण्याचे पालकमंत्री यांनी देखील नुकतीच याबाबत मंत्रालयात भेट घेतली होती. गणेश बिडकर यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. यावरून पुणेकरांना याबाबत नेमका कोण दिलासा देणार? राज ठाकरे कि चंदक्रांत पाटील, अशी चर्चा आता केली जाऊ लागली आहे.

राज्यशासनाच्या आदेशानुसार शहरातील नवीन निवासी मिळकतींना कर आकारणी करताना 1970 पासून दिली जाणारी 40 टक्के करसवलत महापालिकेने रद्द केली आहे. तसेच, 2019 पासून पूर्वलक्षी प्रभावाने हा 40 टक्के सवलतीचा फरक भरण्यासाठी तब्बल 95 हजार पुणेकरांना नोटीसा बजाविण्यात आली आहे.

शासनाने महापालिकेस 2011 मध्ये पत्र पाठवित हा निर्णय घेण्याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र,वेळोवेळी राजकीय दबावापोटी प्रशासनाकडून हा निर्णय टाऴण्यात आला, तसेच शासनाच्या आदेशाबाबत संभ्रम निर्माण करत या निर्णयाची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली, तसेच हा निर्णय पुणेकरांवर अन्यायकारक ठरणार असतानाही राजकीय पक्षांकडून तो शासनाकडून रद्दही करून न घेता तो तसाच प्रलंबित ठेवण्यात आला, मात्र, महापालिकेची मुदत संपून पालिकेत प्रशासकराज सुरू होताच, पालिका प्रशासनाकडून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. तर 95 हजार नागरिकांना फरकाच्या नोटीसा देण्यात आल्या.

त्यावरून राजकीय पक्ष तसेच शहरातील नागरिक आक्रमक झाल्याने महापालिका आयुक्तांनी तांत्रिक चुकीमुळे हे मेसेज गेल्याचे सांगत पुढील निर्णय होई पर्यंत नागरिकांनी ही फरकाची रक्कम भरू नये असे आदेश काढले. आता मनसे अध्यक्षांनी या विषयात लक्ष घालत थेट मुख्यमंत्र्यांकडे साकडे घातले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आता राज ठाकरे यांचे ऐकणार कि चंद्रकांत पाटील यांचे याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

MNS Vs PFI | हर हर महादेव च्या घोषणांनी मनसे ने पीएफआयला दिला इशारा

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

हर हर महादेव च्या घोषणांनी मनसे ने पीएफआयला दिला इशारा

इस्लामिक मूलतत्ववादी “पाकिस्तान जिंदाबाद ” च्या घोषणा देत असतील तर राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार देश रक्षणार्थ “हर हर महादेव “म्हणत महाराष्ट्र सैनिक उद्या रस्त्यावर उतरून इशारा देईल असे मनसे ने सागितले होते.  त्या नुसार  मोठया संख्येने हिंदूस्थान जिंदाबाद हर हर महादेव च्या घोषणा देत मनसे रस्त्यावर उतरली होती.  हिंदुस्तान जिंदाबाद चे मोठं पोस्टर मनसेने अलका चौकात लावले होते . जोरदार घोषणा नी अलका चौक दणाणून सोडत मनसे सैनिकानी पाकिस्तानचा झेंडा जाळला.

याबाबत मनसे नेते अजय शिंदे यांनी सांगितले कि, काल परवा च पुण्यात एटीएस आणि एनआयएच्या पथकाने कारवाई करत कोंढवा येथून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली होती.  या विरोधात पुण्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इस्लामिक संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्यांना पोलिसांनी अटक केले असता काही आंदोलनकर्त्यानी यावेळी “पाकिस्तान जिंदाबाद” अशा घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडिओ मोठया प्रमाणावर व्हायरल झाला व बातम्या ही विविध न्युज पोर्टल व वाहिन्यांवरून झाल्या.

पुणे इस्लामिक दहशदवादी हालचालींचे ठिकाण होत आहे तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी आणि बांगलादेशी इस्लामिक घुसखोर रहातात पुणे पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी इस्लामिक मूलतत्ववादी आश्रयाला असतात हे सांगत आहे. आशा पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर देशातून हाकलून दया या साठी सातत्याने आंदोलने करीत आहे परंतू सरकार कडून कारवाई होत नाही . ती कारवाई करीत घोषणा बाजी करणाऱ्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व कालच्या घोषणा मुळे पुणे इस्लामिक दहशवाद्यांकडून गढ बनवला गेला आहे असे एकूण चित्र निर्माण होऊ लागले आहे त्याला उत्तर देण्यासाठी मनसेने आंदोलन केले.

यावेळी मनसे चे महाराष्ट्र राज्याचे नेते,सरचिटणीस,उपाध्यक्ष,शहर पातळी वरील सर्व पदाधिकारी ,सलग्न संघटनाचे पदाधिकारी, महिला सेनेच्या पदाधिकारी lव मोठया संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Birthday Of Raj Thackeray | वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांना कळकळीचे आवाहन 

Categories
Breaking News cultural Political महाराष्ट्र

वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांना कळकळीचे आवाहन 

राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज मनसे कार्यकर्त्यांना एका ऑडिओ क्लिपच्या माध्यामातून एक कळकळीचे आवाहन केले आहे. राज ठाकरे यांनी ट्वीटरवर याबाबत एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांना १४ तारखेला वाढदिवसानिमीत्त मनसे कार्यकर्त्यांना भेटायला घरी येऊ नका, अशी विनंती केली आहे.

याआधी पुण्यात झालेल्या सभेत, राज ठाकरे यांनी त्यांच्या पायावरील शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली होती, मात्र कोरोना संसर्गामुळे त्यांची ती शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती, त्यानंकर राज ठाकरे यांनी हे आवाहन केले आहे. ते म्हणाले आहेत की, माझी एक शस्त्रक्रिया करायची आहे, त्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तपासणीत कोविडचे डेड सेल आढळल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ते काय असतं हे मलाही आणि कोणालाच नाही माहिती नाही. त्यामुळे ती शस्त्रक्रिया रद्द झाली. त्यानंतर मी १०-१२ दिवस कोविडच्या नियमांप्रमाणे घरातच क्वॉरंटाईन आहे. त्या सगळ्या दरम्यान १४ तारखेला माझा वाढदिवस आहे. आपण सर्वजण दरवर्षी मा‍झ्या वाढदिवसाला प्रेमाने, उत्साहाने माझ्याकडे भेटायला येता. मीही आपल्या सर्वांची आतुरतेने वाट पाहातो. सर्वांना भेटल्यावर बरंही वाटतं, असे राज ठाकरे म्हणालेत
तसेच त्यांनी यापुढे बोलताना, पण, या वर्षी मला १४ तारखेला वाढदिवसाला कोणालाही भेटता येणार नाही. याचं कारण म्हणजे, त्या गाठी भेटीत परत जर संसर्ग झाला तर त्यातून मला परत जर शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली, तर मी ती किती पुढे ढकलायची यालाही मर्यादा असते. त्यामुळे पुढल्या आठवड्यात माझी शस्त्रक्रिया ठरलेली आहे, त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. 

याबरोबरच त्यांनी या कारणामुळे मी १४ तारखेला कुणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे , असे सांगितले आहे. ते म्हणाले की, आपण जिथे आहात तिथेच राहा. माझी शस्त्रक्रिया पूर्ण होईल, जेव्हा मला बरं वाटेल तेव्हा मी आपल्या सर्वांना निश्चित भेटेन. पण, १४ तारखेला कृपया आपण कुणीही घरी येऊ नये, ही विनंती, असे ते म्हणालेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांना भेटता येणार नाहीदरम्यान यावर्षी राज ठाकरे हे १४ जून रोजी आपला ५४ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांना अनेक कार्यकर्ते भेटून शुभेच्छा देत असतात. मात्र यंदा राज ठाकरे यांच्या आरोग्याच्या कारणास्तव कार्यकर्त्यांना त्यांना भेटता येणार नाहीये.

MNS chief Raj Thackeray : जशास तसे उत्तर देऊ ..! राज ठाकरेंच्या दोन मोठ्या घोषणा 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

जशास तसे उत्तर देऊ ..! राज ठाकरेंच्या दोन मोठ्या घोषणा

पुणे – भोंगे हटाव ही मोहीम धार्मिक नाही तर सामाजिक आहे. देशातील न्यायव्यवस्थेपेक्षा धर्म मोठा वाटत असेल तर ३ तारखेपर्यंत भोंगे हटवले नाहीत तर जशास तसं उत्तर देऊ. महाराष्ट्रात आणि देशात कुठल्याही प्रकारची दंगल नको. शांतता भंग करण्याची गरज नाही. प्रार्थनेला कुणाचाही विरोध नाही. भोंगे हटणार नसतील तर आमच्याही आरत्या तुम्हाला ऐकायला लागतील असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा बुलंद केला आहे.

राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत २ महत्त्वाच्या घोषणा केल्या. येत्या १ मे रोजी संभाजीनगर येथे जाहीर सभा होणार आहे. तर ५ जून रोजी मनसे सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार आहे अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. मुस्लीम बांधवांनी हा विषय धर्मावर नेऊ नये. सामाजिक विषय आहे. भोंग्याच्या आवाजामुळे लहान मुले, विद्यार्थी यांनाही त्रास होतो. आमच्या मिरवणुकीवर तुम्ही दगडफेक करणार असाल तर आमचेही हात बांधले नाहीत असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. केवळ हिंदूनाच नव्हे तर मुस्लीमांनाही आवाजाचा त्रास होत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले आहे.