MPSC Time Table | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

MPSC Time Table | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

 

MPSC Time Table | मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सन २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या http://www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. (Maharashtra Public Service Commission)

वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना किंवा दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो, असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था आदींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन निश्चित करण्यात येते. त्यानुसार सर्व संबंधित संस्थांना प्रस्तावित वेळापत्रक पाठवून दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संबंधित परीक्षेची परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पद्धत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून ज्या परीक्षेबाबतचा सदर तपशील प्रसिद्ध करण्यात आला नसेल त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात किंवा अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे

MPSC | माहिती विभागाच्या पदभरतीत पदव्युत्तर पदवी, पदविकाधारकांना संधी मिळणार

Categories
Breaking News Education social महाराष्ट्र

माहिती विभागाच्या पदभरतीत पदव्युत्तर पदवी, पदविकाधारकांना संधी मिळणार

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या पदभरतीत पत्रकारिता पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविकाधारकांना संधी मिळणार आहे. नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शुद्धीपत्रक जारी करुन शैक्षणिक अर्हतेत पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका समाविष्ठ केल्या आहेत.

महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील उपसंचालक (माहिती), वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)/जिल्हा माहिती अधिकारी/वरिष्ठ उपसंपादक/जनसंपर्क अधिकारी आणि सहायक संचालक (माहिती)/अधिपरिक्षक पुस्तके व प्रकाशने/माहिती अधिकारी या संवर्गातील पदभरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीला अनुसरुन शैक्षणिक अर्हतेच्या अनुषंगाने माहिती विभागाकडून पत्रकारिता पदविका आणि पदवीसह आता पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविकाही समतूल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येणार आहे. अर्हता प्राप्त उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत असून अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याप्रमाणे अर्ज सादर करण्याचा आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ८ मे २०२३ रोजी रात्रीपर्यंत आहे. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची तारीख १० मे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ११ मे रोजीपर्यंत आहे.

या जाहिरातीस अनुसरुन विहित पद्धतीने यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. या पदभरतीसंदर्भातील मूळ जाहिरात व शुद्धीपत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

MPSC Exam | MPSC च्या विद्यार्थ्यांचे पुण्यासह राज्यभरात आंदोलन

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

MPSC च्या विद्यार्थ्यांचे पुण्यासह राज्यभरात आंदोलन

पुणे – लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) होणाऱ्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत 2023 ऐवजी 2025 पासून लागू करावी, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी पुण्यासह राज्यभरात आंदोलन केले. पुण्यात विद्यार्थ्यांनी टिळक चौकात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनामुळे वर्दळीच्या टिळक रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवेसाठी वर्णनात्मक परीक्षेचे स्वरूप स्वीकारले आहे. एमपीएससीच्या या निर्णयाचे उमेदवारांकडून स्वागत होत आहे. मात्र ही पद्धत 2025 पासून लागू करावी. म्हणजे आम्हाला अभ्यासाला पुरेसा वेळ मिळेल, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. मात्र राज्य शासनाकडून ही पद्धत याच वर्षीपासून लागू केली जाणार आहे. त्यास उमेदवारांनी विरोध दर्शविला आहे. या परीक्षा पद्धतीची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून करीत आहेत. मात्र याकडे शासन लक्ष देत नसल्याचे आंदोलनकर्त्या उमेदवारांचे म्हणणे आहे.

दरम्यान, उत्तरतालिकेतील चुकांपासून परीक्षांच्या तारखांबद्दल एमपीएससीकडून अनेक चुका होत आहेत. करोनामुळे मागील दोन वर्षे वाया गेली आहे. त्यामुळे निदान एवढ्या मागणीचा तरी विचार करावा, असे उमेदवारांची मागणी आहे. पुण्यासह औरंगाबाद, नागपूर आदी ठिकाणी उमेदवारांनी आंदोलन केले. पुण्यातील आंदोलन रात्री उशीरपर्यंत सुरू होते. या आंदोलनास महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे.

वर्णनात्मक पद्धत म्हणजे काय
एमपीएससीतर्फे आतापर्यंत राज्यसेवेची मुख्य परीक्षा बहुपर्यायी प्रश्‍नांच्या माध्यमातून घेण्यात येत होती. आता ती वर्णनात्मक पद्धतीने घेण्यात येणार आहे. ज्यात निबंधासारख्या उत्तरांचाही समावेश आहे. तसेच अभ्यासक्रमही यूपीएससीचा कॉपी केल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

राज्यात कधीतरी यूपीएससी दर्जाचा अभ्यासक्रम लागू करावाच लागेल. हा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करा, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. मात्र ही मागणी मान्य केली तर 2025 मधील उमेदवार 2027 मध्ये लागू करा अशी मागणी करतील. त्यामुळे या संदर्भात सर्वांना विश्‍वासात घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल.

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

MPSC Exam Result | राज्य सेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर ; | मुख्य परीक्षा २१,२२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी

Categories
Breaking News Education social महाराष्ट्र

राज्य सेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर ;

| मुख्य परीक्षा २१,२२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-२०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.मुख्य परीक्षा २१, २२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात येणार असल्याचे आयोगाचे उपसचिव (परीक्षोत्तर – राजपत्रित परीक्षा)यांनी कळविले आहे.

पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे ६२३ पदांसाठी १० हजार २०० उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरिता पात्र ठरले आहेत . पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येणार आहे. आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल. मुख्य परीक्षा २१, २२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.

या पूर्व परीक्षेच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) कळविण्यात आले आहे. तसेच लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पध्दतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पध्दतीने सादर करणे आवश्यक राहील त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरिता स्वीकारार्ह ठरतील असेही लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

MPSC and BEd CET exams | एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅच बदलण्याचा पर्याय देणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Categories
Breaking News Education Political महाराष्ट्र

एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅच बदलण्याचा पर्याय देणार

– उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

मुंबई| एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी बॅच बदलण्याचा पर्याय देणार येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्ववारे विधानपरिषदेत व विधानसभेत केले.

सीईटी कक्षामार्फत बीएड (B.Ed.) व बीएचमसीटी या दोन विषयाची परीक्षा दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून, जे उमेदवार या परीक्षांबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस बसलेले असतील त्यांनी याबाबत त्वरीत सीईटी कक्षास ई-मेलद्वारे कळवावे, जेणेकरून त्यांना सीईटी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी बॅच बदलून देण्याची कार्यवाही करता येईल. या उमेदवारांनी maharashtra.cetcell@gmail.com या ई-मेलवर तात्काळ पत्रव्यवहार करावा, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

MPSC Exam pattern | MPSC चा मोठा निर्णय | मुख्य परीक्षा पद्धतीत बदल 

Categories
Breaking News Education महाराष्ट्र

MPSC चा मोठा निर्णय | मुख्य परीक्षा पद्धतीत बदल

राज्यसेवा मुख्य परीक्षा (State Service Main Examination) वर्णनात्मक लेखी करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission-MPSC) घेण्यात आला आहे. ही परीक्षा योजना 2023 मधील परीक्षांच्या मुख्य परीक्षेकरिता लागू असणार आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक 2 (CSAT) अर्हताकारी केला होता. सदर निर्णयाची अंमलबजावणी दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून करण्यात येत आहे. तसेच, राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धत 2023 पासून लागू असणार आहे.

आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने (MPSC) घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे. आगामी काही दिवसांमध्ये राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध केला जाईल असं सांगण्यात येत आहे.

MPSC Exam : राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर : १६१ जागांसाठी भरती

Categories
Breaking News Education महाराष्ट्र

राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर

: १६१ जागांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट अ तसेच गट ब संवर्गातील एकूण 161 पदांच्या भरतीकरिता राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात (क्रमांक 045/2022) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, ही जाहिरात आयोगाच्या वेबसाईटवर आज प्रसिद्ध झाली असल्याची माहिती आयोगाने ट्विट करुन दिली. या जाहिरातीमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून परीक्षेसाठी तयारी करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

जाहिरातील गट ‘अ’ ५९, तर गट ‘ब’ साठी १४ पदांसाठी आणि इतर ८८ पदांसाठी ही भरती होणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षेची तारीख २१, २२, २३ जानेवारी २०२३, रोजी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे. या जाहिरातीमध्ये सांगितलेल्या अटी व शर्तींची पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, काही वेळापूर्वी अयोगाच्या वेबसाईटला तांत्रिक अडचण आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही जाहिरात दिसत नसल्याने गोंधल उडाला होता. मात्र तांत्रिक अडचण बाजूला झाल्याने आता ही जाहिरात दिसत असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. त्यामुळे आता राज्यसेवीची तयार करणाऱ्या अनेकांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

MPSC: वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी!

Categories
Breaking News Education महाराष्ट्र

MPSC: वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाचे!

: अर्ज करण्याची वेबलिंक सुरु

मुंबई : कोरोनामुळे (Corona) गेल्या दोन वर्षांपासून देशभरातील अनेक गोष्टीत अनियमितता आली होती. खासकरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नियोजनावर याचा परिणाम झाला होता. या काळात अनेक परीक्षांच वेळापत्रक कोलमडले. तसेच नियोजित अनेक परीक्षा (Exam)अर्ज सुटले नाहीत. यामुळे वयोमर्यादेमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षांना मुकावे लागले असते. अशा विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय (Decision) घेतला आहे. दिनांक १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याकरीता वेबलिंक सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ फेब्रुवारी, २०२२ आहे.

शासनाकडून प्रस्तूत १७ डिसेंबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने विविध संवर्गांकरीता १ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल, अशा उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ही संधी उपलब्ध झाली आहे.

MPSC परिक्षेकरीता उमेदवारांना एक वाढीव संधी

MPSC परिक्षेकरीता उमेदवारांना एक वाढीव संधी
कोवीड-१९ मुळे गेल्या दोन वर्षापासून MPSC आणि सरळसेवेच्या भरती प्रक्रीया होवू शकल्या नव्हत्या. सबब नोकरभरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षा देता येत नसल्याने उमेदवारांचे हित लक्षात घेऊन सर्व उमेदवारांना MPSC परिक्षेकरीता एक वाढीव संधी देण्यासंदर्भातील निर्णय शासनाने घेतला आहे.