Tag: Nana Bhangire
7 ते 10 वर्ष एकाच ठिकाणी काम करणाऱ्या SI, DI च्या बदल्या तात्काळ करा
| शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांची पुन्हा आक्रमक भूमिका
याबाबत नाना भानगिरे यांनी सांगितले कि, 2012 नंतर बदल्या झाल्या. परंतु ज्या कर्मचाऱ्यांचा वशिला नाही अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. कर आकारणी कर संकलन विभागात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचा आढावा घेतल्यास सन 2010 पासून तेच तेच अधिकारी त्याच त्याच परिसरात काम करीत आहेत. परिणामी अशा अधिकाऱ्यांची त्या त्या परिसरात मक्तेदारी झालेली आहे. तसेच हाच प्रकार बदल्या करणारे खाते म्हणजेच घनकचरा विभाग, सामान्य प्रशासन विभाग, मालमत्ता व्यवस्थापन, मुख्य लेखापाल, दक्षता विभाग, आरोग्य विभाग, समाज विकास, कामगार कल्याण विभाग अशी अत्यंत महत्वाचे विभाग याठिकाणी काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या 7 ते 10 वर्षांहून अधिक काळ झाला तरी झालेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आता केलेल्या बदल्यात देखील या लोकांच्या बदल्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे टॅक्स विभागातील SI, DI तसेच घनकचरा विभागात वर्षानुवर्षे करणाऱ्या SI यांच्या तात्काळ बदल्या कराव्यात. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भानगिरे यांनी दिला आहे.
महापालिकेत तब्बल 6 वर्षांनी होणार बदल्या!
| मात्र राजकीय नेते पूर्ण समाधानी नाहीत
गेल्या काही दिवसापासून मनपा वर्तुळात तसेच शहरभरात चर्चेचा असलेला मुद्दा म्हणजे पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या हा आहे. पुणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बादल्या दर तीन वर्षांनी करणे, असे धोरण असून या धोरणास हरताळ फासला जात आहे. तसेच बदल्यांमध्ये लाखोंची उलाढाल होत आहे. असा आरोप राजकीय नेत्यांकडून केला जात होता. लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लिपिक, उप अधीक्षक, अधिक्षक, प्रशासन अधिकारी या पदांवर काम करणारे अधिकारी यांच्या खूप वर्षांपासून पासून दर तीन वर्षांनी होणाऱ्या बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे बदल्या करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास 132 कनिष्ठ अभियंत्यांचा यात समावेश आहे. त्यामध्ये स्थापत्य पदावरील 109, विद्युत पदावरील 17 आणि यांत्रिकी पदावरील 6 कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. (Pune Municipal Corporation)
| मनपा प्रशासनाचे परिपत्रक जारी
महापालिका प्रशासनाच्या परिपत्रकानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील ज्या सेवकांची एकाच खात्यात तीन वर्षे अगर त्यापेक्षा जास्त सेवा झाली आहे, अशा सेवकांच्या अन्य खात्यात बदल्या कराव्या लागतात. खात्याच्या एकूण पदांपैकी दरवर्षी जास्तीत जास्त २०% अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या कराव्यात, अशा बदल्या करणेविषयीचे धोरण आहे. या मंजूर बदली धोरणातील तरतुदी विचारात घेऊन ३१/०३/२०२३ अखेर एकाच खात्यात तीन वर्षे अगर त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) या पदावरील सेवकांची नियतकालिक बदल्या करण्याची कार्यवाही अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांचे अध्यक्षतेखाली प्रस्तावित केलेली आहे.
या नियतकालिक बदल्यांची कार्यवाही बुधवार, दिनांक १२/०४/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता, जुना जी.बी. हॉल, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, तिसरा मजला, येथे होईल.
महापालिका सभेने मंजूरी दिलेल्या बदली धोरणाप्रमाणे नियतकालिक बदलीस पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी संबंधित सेवकांचे माहितीसाठी पुणे महानगरपालिका संकेत स्थळावरील कार्यालय
परिपत्रक प्रणालीवर (https://pmc.gov.in/en/
| लेखनिकी संवर्गासाठी हाच न्याय अपेक्षित
महापालिका प्रशासनाने 132 JE च्या बदल्या करण्याबाबत निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र बदली केल्यानंतर संबंधित सेवक कामाला एका ठिकाणी आणि पगाराला दुसऱ्या ठिकाणी, असे प्रशासनाने होऊ देऊ नये. तसेच आम्ही एकच खाते किंवा ठराविक सेवकांच्या बदल्या करण्याची मागणी केली नव्हती. नियमानुसार ज्यांनी 3 वर्ष एका खात्यात काम केले आहे आणि बदलीस पात्र असणाऱ्या अशा सर्वांच्या बदल्या आम्हाला अपेक्षित आहेत. टप्प्या टप्प्याने बदल्या आम्हाला मंजूर नाहीत.
आमच्या मागणीनुसार महापालिका प्रशासनाने बदल्या करण्याचा निर्णय घेतला, याबद्दल आम्हाला आनंद आहे. मात्र मलईदार खात्यात गेल्या कित्येक वर्षांपासून जे सेवक काम करताहेत, त्यांच्या तात्काळ बदल्या होणे अपेक्षित आहे. जेणेकरून सर्वांना सर्व खात्यात काम करण्यास प्राधान्य मिळेल.
महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्त यांच्या ऐवजी आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणा
| शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांची मागणी
| बदल्या न झाल्यास आंदोलनाचा इशारा
भानगिरे यांनी पुढे म्हटले आहे कि, 2012 नंतर बदल्या झाल्या. परंतु ज्या कर्मचाऱ्यांचा वशिला नाही अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. कर आकारणी कर संकलन विभागात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचा आढावा घेतल्यास सन 2010 पासून तेच तेच अधिकारी त्याच त्याच परिसरात काम करीत आहेत. परिणामी अशा अधिकाऱ्यांची त्या त्या परिसरात मक्तेदारी झालेली आहे. तसेच हाच प्रकार बदल्या करणारे खाते म्हणजेच सामान्य प्रशासन विभाग, मालमत्ता व्यवस्थापन, मुख्य लेखापाल, दक्षता विभाग अशी अत्यंत महत्वाचे विभाग याठिकाणी काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या 10 वर्षांहून अधिक काळ झाला तरी झालेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
या बाबी निदर्शनास आणून देण्याचे महत्वाचे कारण म्हणजे या पदांवर काम करणारे अधिकारी देखील आमच्या शिवाय मनपाला पर्याय नाही. अशा वल्गना खाते प्रमुखांसमोर करतात व खाते प्रमुख देखील वेळ मारून नेण्यासाठी गप्प बसतात. मनपाच्या कडे प्रतिनियुक्ती वर आलेल्या अधिकारी यांनी स्वतःचे महत्त्व वाढवण्याच्या उद्देशाने व काही गूढ हेतूने अकारण नैसर्गिकरित्या पात्र बदल्याही अडवून ठेवल्या आहेत सेवकवर्ग विभाग संपुर्ण आयुक्त यांच्या अख्यतारीत घेण्यात यावा जेणेकरून कोणताही भ्रष्टाचार न होता पारदर्शक विना वशिलेबाजी ने बदल्या होतील. इंजिनियर, कर विभाग, क्लार्क यांच्या नियमानुसार तातडीने बदल्या कराव्यात अन्यथा शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल. असे भानगिरे यांनी म्हटले आहे.
हडपसर मधील भाजी मंडई पूर्ववत होणार!
| नागरिक आणि गाळेधारकांना दिलासा
– 84 लाखाचा खर्च
पीएमपी कर्मचाऱ्यांना 100% सातवा वेतन आयोग लागू करा
| पीएमटी इंटक संघटनेची मुख्यमंत्र्याकडे मागणी
संघटनेच्या निवेदनानुसार आम्ही मागील २४ महिण्यापासून याबाबत पाठपुरावा करीत आहोत. तरीही २४ महिने उलटून जावून सुध्दा १०० टक्के सातवा वेतन आयोग पीएमपीएमएल कर्मचा-यांना लागू करण्यात आलेला नाही. दोन्ही महानगर पालीकेच्या स्वामित्वाची रक्कम मार्च २०२२–२३ च्या अर्थसंकल्पात सुध्दा लागू करण्यासाठी लागणारी रक्कम व फरकाची रक्कम याची तरतुद करण्यात आलेली आहे. परंतु दोन्ही महानगर पालीकेचे आयुक्त यांनी व सध्याचे प्रशासक यांनी सदरची रक्कम परिवहन महामंडळाला दिलेली नसल्याने सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी न झाल्याने सर्व कामगारामध्ये मोठया प्रमाणात जनक्षोभ वाढलेला आहे. त्यामुळे प्रशासनावर कामगारांची विश्वासार्हता राहिलेली नाही. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांना मागील दोन वर्षापुर्वीच सतवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला असून फरक सुध्दा देण्यात आलेला आहे. तसेच पुणे महानगर पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०२१ पेड इन जानेवारी २०२२ च्या वेतनात सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला असून माहे मार्च २०२२ पेड इन एप्रिल २०२२ मध्ये फरकाची रक्कम अदा करण्यात आलेली आहे.
पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना 50% सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. उर्वरित आयोग लागू होण्याची कर्मचारी वाट पाहत आहेत. दोन्ही मनपानी आपल्या हिस्याचा निधी द्यावा आणि 100% वेतन लागू करावा. अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
प्रशासक विक्रम कुमारांनी सादर केलेल्या बजेटबाबत शिवसेना आणि काँग्रेस शहर अध्यक्षांना काय वाटते?
रखडलेल्या प्रकल्पांना चालना देणारे संतुलित बजेट | नाना भानगिरे
भाजपच्या नेत्यांना सोबत घेऊन केलेले नियोजनशून्य बजेट – अरविंद शिंदे
पुणे शहर शिवसेना सदैव नागरिकांच्या सेवेत
|शहर संपर्क प्रमुख अजय बापू भोसले आणि शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिला विश्वास
पुणे शहराला गतिमान करणारा अर्थसंकल्प | शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे
| शिवसेना भवन येथे पेढे वाटून आनंद केला साजरा
पुणे | राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा पुणे शहराला गतिमान करणारा आहे. यातून सर्वच घटकाला न्याय मिळणार आहे. अशा भावना शिवसेनना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी व्यक्त केल्या. दरम्यान बजेट मधून दिलेल्या योजनेमधून लोकांचे हित पाहिले गेले आहे. त्यामुळे शिवसेना भवन येथे जल्लोष करण्यात आला. तसेच नागरिकांना पेढे देखील वाटण्यात आले.
नाना भानगिरे म्हणाले, मेट्रोच्या कामाला वेग देण्याबरोबर स्वारगेट-कात्रज आणि पिंपरी-निगडी मेट्रो या मार्गिकांवर मेट्रो विस्तारणार आहे. मेट्रोअंतर्गत ८ हजार ३१३ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. पुणे रिंगरोड, पुणे-मुंबई मिसिंग लिंकसाठी भरीव निधी देण्यात आला आहे. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे, पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुण्यात सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारण्यात येणार आहे. पुण्यातील भिडेवाडा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे.
भानगिरे पुढे म्हणाले, पुणे मेट्रोचा विस्तार, पुणे रिंगरोड, पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, नाशिक-पुणे रेल्वे या प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला गती मिळेल, तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास वाटतो. समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. भानगिरे म्हणाले यातील बऱ्याच गोष्टी साठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करत होतो. आमच्या मागण्याची दखल घेतल्याबद्दल आम्ही अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो.
पुणेकरांच्या 40% कर सवलतीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार | शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे
पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम ठेवावी अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी आज केली आहे. लवकरच ते मुख्यमंत्र्यांची व नगर विकास सचिवांची भेट घेऊन तसे पत्र देणार आहेत
याबाबत भानगिरे यांनी सांगितले कि, मिळकत करातील ४० टक्के सवलत १/८/२०१९ पासून स्व:वापर करीत असलेल्या निवासी मिळकतीची काढण्यात येऊ नये आणि देखभाल दुरुस्ती खर्च १/४/२०१० पासून १५ टक्क्यांहून १० टक्के फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशा प्रमुख मागण्या यावेळी केल्या जातील. या दोन्ही मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येणार आहे. या दोन्ही मागण्या मान्य झाल्या तर पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. असे ही भानगिरे म्हणाले.