National Sports Day | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा

Categories
Breaking News Education Sport पुणे

अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर या ठिकाणी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 29 ऑगस्ट हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त “खेल के तो देखो यार” उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सकाळ सत्रामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी जिमखाना विभागातर्फे विविध क्रीडा स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमध्ये रस्सीखेच स्पर्धा, कबड्डी स्पर्धान बरोबरच बॅडमिंटन, टेबल टेनिस, बास्केटबॉल, हँडबॉल, व्हॉलीबॉल फूटबॉल खेळांचे साहित्य ठेवण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांना ते खेळ खेळण्याची संधी देण्यात आली.

रस्सी खेच मुलांच्या स्पर्धेमध्ये वाणिज्य विभागाचा संघ विजयी ठरला व कला विभागाचा संघ उपविजयी झाला तसेच मुलींच्या रस्सीखेच स्पर्धेमध्ये वाणिज्य विभागाचा संघ विजयी ठरला व कला विभागाचा संघ हा उपविजयी ठरला.

मुलींच्या कबड्डी स्पर्धेमध्ये कला विभागाचा संघ विजय ठरला तर वाणिज्य विभागाचा संघ हा उपविजे ठरला. मुलांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये वाणिज्य विभागाचा संघ विजयी ठरला व कला विभागाचा संघ हा उपविजेयी ठरला.

सदरच्या स्पर्धेपूर्वी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. नंदकिशोर उगले यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले व प्रोत्साहन दिले.
या स्पर्धेत पंच म्हणून श्री.प्रतीक पानसरे श्री.धनंजय खिलारे, श्री.गणेश गाढवे, कु. अशा बागाड यांनी काम केले.

दुसऱ्या सत्रामध्ये स्टाफ वेल्फेअर कमिटी अंतर्गत “बदलती जीवनशैली आणि आयुर्वेद, क्रीडा व योगासने यांचे महत्त्व” या विषयावर ओतूर येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदतज्ञ डॉ. अमित काशीद यांनी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना सुयोग्य मार्गदर्शन केले.

डॉ. अमित काशीद यांनी आपल्या भाषणामध्ये सर्व तरुणांनी सातत्याने व्यायाम केला पाहिजे व आपल्या रूढी परंपरा जपत आयुर्वेदाचे अनुकरण करून होणारे सर्व व्याधी दूर कराव्यात व महाविद्यालयीन जीवनामध्ये जास्तीत जास्त खेळावे असे आवाहन केले.
सदरच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. डी. सोनावणे होते. सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस.एफ. ढाकणे त्यांनी केले. तर पाहुण्यांची ओळख क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. उमेशराज पनेरू, सूत्रसंचालन डॉ. निलेश काळे व आभार प्रा. बाळासाहेब हाडवळे यांनी मानले.

सदरच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदरचे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. उमेशराज पनेरू, प्रा. बाळासाहेब हाडवळे स्टाफ वेल्फेअर समितीचे चेअरमन डॉ. अमोल बिबे व सदस्य डॉ. निलेश काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.