Traitor Day | Pune News | पुण्यात राष्ट्रवादी कडून ’50 खोके एकदम ओके’ आंदोलन | गद्दार दिवस देखील साजरा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Traitor Day | Pune News | पुण्यात राष्ट्रवादी कडून ’50 खोके एकदम ओके’ आंदोलन

| गद्दार दिवस देखील साजरा

Traitor Day | Pune News | ठाकरे गटाच्या (Thackeray Group) आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (Nationalist congress party) राज्यभरात गद्दार दिवस (Traitor Day) म्हणून साजरा केला जात आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (City President Prashant Jagtap) यांच्या नेतृत्त्वाखाली यानिमित्ताने गद्दार दिवस (Traitor Day) साजरा करत ’50 खोके एकदम ओके’ आंदोलन (50 Khoke ekdam ok Agitation) करण्यात आले. ५0 खोके माजलेत बोके, चले जाव चले जाव गद्दार गुवाहाटी चले जाव, महाराष्ट्र त्रस्त खोके खाऊन गद्दार मस्त अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. (Traitor Day | Pune News)

“देशातील जनतेने आज पर्यंतच्या ७५ वर्षाच्या काळात अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या आहेत.पण एक वर्षापूर्वी ठाकरे गटातून एकनाथ शिंदे  यांनी ५० आमदारसह बाहेर पडत बंड पुकारले. त्यानंतर सूरत,गुवाहाटी आणि गोवामार्गे पुन्हा महाराष्ट्रामध्ये येत भाजपसोबत नव्याने सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होता आले आहे.हे बंड देशातील जनता कधीच विसरू शकणार नसून या बंडखोर आमदारांना ५० खोके दिल्याची चर्चा आहे. त्या घटनेचा आणि कृतीचा आम्ही अनोख्या प्रकारे निषेध नोंदवित आहे. तो म्हणजे गद्दार दिवस साजरा करित आहोत ” असं राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी सांगितले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे गटातील खासदार,आमदारांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याची प्रतिक्रियाही यावेळी जगताप यांनी दिली. (NCP pune)

—-

News Title | Traitor Day |  Pune News |  ’50 boxes are ok’ movement by NCP in Pune |  Traitor’s Day is also celebrated

PMC Teachers Agitation Update | रजा मुदतीतील शिक्षण सेवकांच्या आमरण उपोषणाला सुप्रिया सुळेंचे समर्थन

Categories
Breaking News Education PMC Political पुणे

PMC Teachers Agitation Update | रजा मुदतीतील शिक्षण सेवकांच्या आमरण उपोषणाला सुप्रिया सुळेंचे समर्थन 

| आंदोलनकर्त्यांची भेट घेत दिला दिलासा 

PMC Teachers Agitation Update  | पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागात (PMC Education Department) काम करणाऱ्या रजा मुदतीतील ९3 शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणी २०१७ (एप्रिल) पासून लागू करावी. या मागणीसाठी सर्व शिक्षण सेवक गेल्या तीन दिवसापासून महापालिका भवनासमोर आमरण उपोषणास (Agitation) बसले आहेत.  त्यांच्या आंदोलनाला काँग्रेस आणि भाजपने पाठिंबा दिला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने देखील समर्थन दिले आहे. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे आणि माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी रविवारी रात्री या आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. (PMC Teachers Agitation update)

खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाकर्त्याची भेट घेत त्यांचा प्रश्न समजून घेतला. तसेच आंदोलनकर्त्यांना साखळी पद्धतीने आंदोलन करण्याची सूचना केली. तसेच महापालिका प्रशासनाने सवेंदनशील पणे प्रश्न हाताळण्याची मागणी केली. याआधी देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी हा प्रश्न सोडवण्याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा केली होती. त्यानंतर आज देखील चर्चा केली. त्यामुळे हा प्रश्न लवकर सुटेल, असे मानले जात आहे. (PMC Education Department)

दरम्यान या आंदोलनाला उर्दू शिक्षक संघटनेने देखील पाठिंबा दिला आहे.

शिक्षण सेवकांना कायम करण्याबाबतचा आदेश २४ फेब्रुवारीस महापालिका प्रशासनास प्राप्त झाला. मात्र आज  ४ महिने होऊनही उच्चन्यायालयाच्या आदेशास केराची टोपली दाखवून प्रशासन आम्हास झुलवत आहे. असा आरोप आंदोलनकर्त्या शिक्षण सेवकांनी केला असून ते गेल्या तीन दिवसापासून आंदोलास बसले आहेत.  सन 2009 पासून ९3 रजा मुदत शिक्षक इमाने इतबारे केवळ ६०००/- रू च्या एकवट मानधनावर काम करीत आहेत. विदयेच्या माहेरघरात आज शिक्षकांची अतिशय दयनीय अवस्था आहे. प्रशासनासला केव्हा  जाग येणार? असा प्रश्न देखील या आंदोलनकर्त्यांनी विचारला आहे. (Pune Municipal Corporation)

कमी पगारातही आमच्या सर्व शिक्षकांनी कामात कोणतीही दिरंगाई केली नाही. शिष्यवृत्ती परिक्षा, मंथन, NMMS परिक्षेत आमची मुले घवघवीत यश प्राप्त करीत आहेत. ज्ञानदान करणा-या शिक्षकास अशा प्रकारची वागणूक देणा-या आमच्याच प्रशासनास आम्ही काय म्हणावे? एका रात्रीतून २१९ एकतर्फी शिक्षक भरले जातात. तर दुसरीकडे आपले शिक्षक वाऱ्यावर सोडून द्यायचे आणि दुसऱ्यांना आत घ्यायचे.  हा कोणता प्रशासनाचा न्याय? असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी केला आहे. (PMC Pune Education Department)

 उच्च न्यायालयाने 24फेब्रुवारी,2023 दिलेल्या आदेशानुसार तात्काळ कार्यवाही करावी.अशीआमची मागणी आहे. जोपर्यंत कार्यवाही करण्यात येत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण असंच चालू राहील. असं आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे. (PMC Pune News)

——-

News Title |  PMC Teachers Agitation Update |  Supriya Sule’s support for the hunger strike of education workers during the leave period |  Met the agitators and gave relief

Sharad Pawar News | राणेपुत्रांचा पुणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Sharad Pawar News | राणेपुत्रांचा पुणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

Sharad Pawar News |  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे नेते  शरद पवार (NCP Supremo Sharad pawar) यांच्याबाबत अनुदार उद्गार काढणारे माजी खासदार निलेश राणे (MP Nilesh Rane) आणि आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane)  यांच्याविरोधात पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Pune) वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. (Sharad Pawar News)

यावेळी प्रवक्ते प्रदिप देशमुख, संतोष नांगरे , नितीन कदम , किशोर कांबळे , अमोल ननावरे , अजिंक्य पालकर , मूणालिणी वाणी , शशिकला कुंभार , सुशांत ढमढेरे , मंगेश जाघव ,संकेत शिंदे , प्रतिक कांबळे , बाळासाहेब अटल समिर पवार व पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (NCP Pune Agitation)

राणे बंधू हे सातत्याने आदरणीय पवार साहेबांवर अतिशय खालच्या भाषेत वक्तव्ये करीत आहेत. लोकशाहीत विरोधकांना टिकेचा अधिकार दिला आहे. तो त्यांनी अवश्य वापरावा परंतु आपले वडील देखील ज्यांच्या पायावर नतमस्तक होतात त्यांच्यावर खालच्या भाषेत टिका करताना राणे बंधू यांनी किमान लाज बाळगावी अशी टिका यावेळी करण्यात आली
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.राणे बंधू यांनी यापुर्वी अनेक वेळा मर्यादा सोडून वक्तव्ये केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता केवळ संसदीय लोकशाहीतील संस्कारामुळे शांत आहे परंतु जर तो भडकला तर राणे बंधूंना पळता भुइ थोडी होइल असा इशारा पक्षाचे प्रवक्ते प्रदिप देशमुख यांनी दिला आहे.


News Title |Sharad Pawar News | Raneputra protested by Pune Nationalist Congress

Pune Lok Sabha By-election | पुणे लोकसभा पोटनिवडणूक | आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता तरीही अजित पवारांना का हवीय पुण्याची जागा? 

Categories
Breaking News Political पुणे

Pune Lok Sabha By-election | पुणे लोकसभा पोटनिवडणूक | आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता तरीही अजित पवारांना का हवीय पुण्याची जागा?

Pune Lok Sabha By-election | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha  constituency) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ताकदीचा हवाला देत दावा केला आहे कि पुणे लोकसभेची जागा आम्ही लढवणार.  पुण्याची लोकसभेची जागा परंपरेनुसार काँग्रेसनेच (INC)  लढवली आहे. त्यामुळे अजित पवारांचे हे वक्तव्य राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) साथीदाराला फारसे पटण्याची शक्यता नाही. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता मानली जात आहे. (Pune Lok Sabha By-election)
 पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार  गिरीश बापट (MP Girish Bapat) यांच्या निधनाने ही जागा रिक्त झालेली आहे. मात्र राष्ट्रवादीने यावर दावा केला आहे. याआधी देखील पुणे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (NCP pune City President Prashant Jagtap) यांनी पुण्याच्या जागेवर दावा केला होता.   महाविकास आघाडीत  – राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (UBT) हे पक्ष आहेत.  काँग्रेस परंपरेने पुणे लोकसभेची जागा लढवत आहे आणि पवारांच्या विधानामुळे युतीमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. (Pune Lok Sabha bypoll)
अजित पवार म्हणाले कि, “माझे मत आहे की, निवडणुका जाहीर झाल्या की ज्या पक्षाची मतदारसंघात ताकद जास्त असेल त्याला तिकीट मिळाले पाहिजे.  आता कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे हे कसे ठरवायचे?  तुम्ही महापालिका निवडणुका, विधानसभा निवडणुकांमधील निवडणूक निकाल पहा आणि विश्लेषण केल्यास पक्षांची तुलनात्मक ताकद दिसून येईल.  पुणे लोकसभा मतदारसंघात आमचे अनेक आमदार आहेत आणि रवींद्र धंगेकर यांना तुम्ही खाजगीत विचाराल तर ते सांगतील की कसबा जिंकण्यासाठी राष्ट्रवादीने त्यांना खूप मदत केली,” (Pune Lok Sabha by-election)
 पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) मागील निवडणुकीत भाजपनंतर राष्ट्रवादी हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता, तर काँग्रेसची फारशी कामगिरी झाली नाही.  पुणे शहरातून काँग्रेसकडे फक्त एकच आमदार आहे, तर राष्ट्रवादीने मागील निवडणुकीत दोन विधानसभा जागा जिंकल्या होत्या.
 पवार म्हणाले की, सार्वत्रिक निवडणुकीला कमी अवधी असल्याने पोटनिवडणूक होऊ शकत नाही, असे आयोगाने यापूर्वी सांगितले होते, परंतु अलीकडच्या घडामोडींमुळे त्यांचे मत बदलले आहे.  “माझ्या मते सार्वत्रिक निवडणुकांना फक्त एक वर्ष उरले आहे, त्यामुळे पुणे लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक होणार नाही.  पण आता मला अंतर्गत वर्तुळातून असे कळले आहे की निवडणुका जाहीर होण्याची तयारी सुरू आहे,” (NCP Leader Ajit Pawar)
 पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर पक्षाचे ज्येष्ठ नेते दीपक मानकरही नशीब आजमावण्यास इच्छुक आहेत.  दुसरीकडे काँग्रेसने ही जागा लढवावी, असा आग्रह धरला आहे.  या जागेसाठी काँग्रेस नेते अरविंद शिंदे (Arvind Shinde) , मोहन जोशी (Mohan Joshi) आणि रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) हे मोजकेच दावेदार आहेत.
 “निवडणुकीबाबत कोणताही निर्णय उच्च पातळीवर घेतला जातो.  आम्ही राज्यातील नेत्यांना आधीच कळवले आहे की काँग्रेस पुणे लोकसभेची जागा लढवणार आहे. कारण पुणे जिल्ह्यातील उर्वरित लोकसभेच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आहे,” असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले. (Ajit Pawar)
 पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरच जाहीर होऊ शकते, या संकेतावर जिल्हा निवडणूक कार्यालयाने नुकतेच मॉक पोलिंग केले.  पुणे महानगरपालिकेने निवडणूक ड्युटीवर असलेल्या 120 नागरी अधिकार्‍यांना देखील मॉक पोलमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते.  गैरहजर असलेल्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. असाही इशारा महापालिकेने दिला होता. (Pune Lok Sabha bypoll mock polling)
 बापट यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपायला एक वर्ष बाकी असताना या वर्षी २९ मार्च रोजी निधन झाले.  काँग्रेसचे मोहन जोशी यांचा पराभव करून मे 2019 मध्ये ते लोकसभेवर निवडून आले होते.  कायद्यानुसार लोकसभेची जागा सहा महिन्यांपेक्षा जास्त रिक्त राहू शकत नाही. (MP Girish Bapat)
 संभाव्य पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची बरीच उत्सुकता आहे. कारण सार्वत्रिक निवडणुकांना फक्त एक वर्ष बाकी आहे आणि पोटनिवडणुकीचा निकाल 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीचा कल निश्चित करेल.  नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या धंगेकरांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात भाजपचे हेमंत रासने  यांचा पराभव केला होता.  भाजपने मागील सहा निवडणुकांमध्ये जागा जिंकून पुण्याच्या राजकारणावर आपली पकड सिद्ध करण्यासाठी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती.  भाजपच्या विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणूक झाली होती. (Pune Lok Sabha constituency)
—-
News Title | Pune Lok Sabha By-election | Pune Lok Sabha By-Election | Why does Ajit Pawar want the seat of Pune despite the possibility of failure in the alliance?

Municipal Elections | Chandrashekhar Bawankule | NCP | राष्ट्रवादी न्यायालयात गेल्याने महापालिका निवडणुकांना होतोय उशीर 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

Municipal Elections | Chandrashekhar Bawankule | NCP | राष्ट्रवादी न्यायालयात गेल्याने महापालिका निवडणुकांना होतोय उशीर 

 

: चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका 

Municipal Elections | Chandrashekhar Bawankule  | NCP | महापालिका निवडणुका घेण्यास भाजप-शिवसेना (BJP-Shivsena) आजही तयार आहे. ‘महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) प्रभागरचनेसंदर्भात (Ward Structure) घेतलेला चुकीचा निर्णय आम्ही रद्द केला. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) न्यायालयात गेली आहे. म्हणून निवडणुकांना उशीर होत आहे,’’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule) यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. (Municipal Elections | Chandrashekhar Bawankule | NCP)

: पुणे लोकसभेबाबत कुठलाही निर्णय नाही

 
पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीसंदर्भात (Pune Loksabha By election) बावनकुळे यांना विचारले असता यावर निर्णय झालेला नाही, त्यामुळे आता त्यावर बोलण्यावर काही अर्थ नाही, असे सांगून बावनकुळे यांनी प्रश्नाला बगल दिली. 

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP National presidetn J P Nadda) यांच्या मुंबई दौऱ्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता, ते म्हणाले, ‘‘किंचित सेनेतील नेतेमंडळी सोडून जातील या भीतीनेच मुंबईत कोणी भाजपचे नेते आले की राऊत टीका करतात.’’ ‘‘मुंबईत महापौर (Mumbai Mayor) आमचाच होणार,’’ असेही त्यांनी सांगितले. तसेच जेव्हा केव्हा निवडणुका होतील, तेव्हा नड्डा यांचा प्रवास किती महत्त्वाचा होता हे संजय राऊत यांना कळेलच.’’
कुरुलकर यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) संबंधाबाबत बावनकुळे म्हणाले, ‘‘पक्षाने त्यावर भूमिका का मांडावी? त्यांची चौकशी सरकारमार्फत केली जात आहे. कोणत्या एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला, तर त्यामुळे संस्थेला अथवा संघटनेला दोष देता येणार नाही. जर त्या व्यक्तीने गुन्हा केला असेल, तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे, ही पक्षाची भूमिका आहे. तो कोणत्या धर्माचा आहे किंवा जातीचा आहे, हे बघून भाजप कोणालाही टार्गेट करत नाही.’’
—–
News Title | Municipal Elections | Chandrashekhar Bawankule | NCP | Municipal elections are delayed due to NCP going to court: Criticism of Chandrasekhar Bawankule

NCP president Sharad Pawar | शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणात एवढे महत्व का आहे? 

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

NCP president Sharad Pawar | शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणात एवढे महत्व का आहे?

| शरद पवार किती वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते? (How many times Sharad pawar was CM of Maharashtra?)

NCP president Sharad Pawar | शरद पवार हे एक प्रमुख भारतीय राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) चे संस्थापक आहेत.  ते पाच दशकांहून अधिक काळ भारतीय राजकारणातील प्रमुख व्यक्ती आहेत आणि त्यांनी भारत सरकारमध्ये चार वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
शरद पवार यांचा जन्म कधी झाला? (How old is Sharad pawar) 
 12 डिसेंबर 1940 रोजी महाराष्ट्रातील बारामती या छोट्याशा शहरात जन्मलेल्या पवार यांनी 1960 च्या उत्तरार्धात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली.  1967 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आणि त्यांनी काँग्रेस पक्षात विविध पदे भूषवली.
 शरद पवार यांनी NCP ची स्थापना का केली? (Why Sharad pawar formed NCP?) 
 1999 मध्ये शरद पवार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून फुटून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.  NCP हा एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे जो प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहे, परंतु भारतातील इतर राज्यांमध्येही त्याने प्रवेश केला आहे.
शरद पवार यांनी कोण कोणत्या क्षेत्रात काम केले? 
 शरद पवार हे महाराष्ट्राच्या विकासात विशेषत: कृषी आणि उद्योगक्षेत्रातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे.  2005 ते 2008 या कालावधीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष म्हणूनही त्यांनी भारतातील क्रिकेटच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
 गेल्या काही वर्षांत पवार अनेक प्रमुख राजकीय आघाड्यांचा भाग राहिले आहेत आणि त्यांनी भारताच्या राजकीय परिदृश्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  त्यांनी भारत सरकारमध्ये संरक्षण मंत्री, कृषी मंत्री आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री म्हणून काम केले आहे.  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.
महाविकास आघाडीत शरद पवार यांचे योगदान काय? 
 शरद पवार हे भारतीय राजकारणाची सखोल जाण असलेले एक चतुर आणि चतुर राजकारणी म्हणून ओळखले जातात.  त्यांचे अनेकदा सहमती निर्माण करणारे म्हणून वर्णन केले गेले आहे आणि यशस्वी युती तयार करण्यासाठी विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांना एकत्र आणण्यात ते सक्षम आहेत.
 अलिकडच्या वर्षांत, भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विरोधात एकसंघ विरोध निर्माण करण्याच्या प्रयत्नांमध्ये पवार सक्रियपणे सहभागी झाले आहेत.  विविध विरोधी पक्षांना एकत्र आणून भाजपच्या विरोधात संयुक्त आघाडी स्थापन करण्याच्या उद्देशाने अनेक बैठका आणि चर्चेत ते आघाडीवर राहिले आहेत.
 शरद पवार हे भारतातील राजकीय हेवीवेट नेते आहेत आणि त्यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या पलीकडे पसरलेला आहे.  त्यांची राजकीय कुशाग्रता आणि भारताच्या विकासाप्रती त्यांची बांधिलकी यासाठी त्यांचा सर्वत्र आदर केला जातो.  ऐंशीच्या दशकात असूनही पवार हे भारतीय राजकारणातील सक्रिय आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहेत आणि भारतीय राजकारणातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
—-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केंव्हा झाली? (When was national congress party formed?) 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे, जो प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहे.  या पक्षाची स्थापना 1999 मध्ये प्रख्यात भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी केली होती. (Sharad pawar)
| राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा स्थापन झाला? (How was NCP formed?) 
 राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये (Indian national congress) फूट पडल्याचा परिणाम होता, पवार अनेक वर्षांपासून ज्या राजकीय पक्षाचा भाग होते.  1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात, पती राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वशैलीबद्दल महाराष्ट्रातील काही काँग्रेस नेत्यांमध्ये असंतोष वाढत होता.
शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष का सोडला? 
 पवारांसह काही काँग्रेस नेते पक्षांतर्गत सत्तेच्या केंद्रीकरणावर नाराज होते आणि प्रादेशिक नेत्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांना वाटले.  पक्षांतर्गत तरुण नेत्यांना संधी न मिळाल्याने नाराजीचेही वातावरण होते.
Ncp कुणी स्थापन केला? (Who formed ncp in 1999?) 
 1999 मध्ये, पवार आणि तारिक अन्वर आणि पी. ए. संगमा यांच्यासह इतर अनेक कॉंग्रेस नेत्यांनी कॉंग्रेसपासून फारकत घेण्याचा आणि महाराष्ट्रातील लोकांच्या गरजांना अधिक प्रतिसाद देणारा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
 25 मे 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृतपणे सुरुवात झाली, त्याचे संस्थापक आणि अध्यक्ष पवार होते.  पक्षाच्या संस्थापक सदस्यांमध्ये छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक प्रमुख राजकारण्यांचा समावेश होता.
 NCP ची स्थापना महत्त्वपूर्ण होती कारण विद्यमान राजकीय चौकटीच्या बाहेर भारतात प्रथमच मोठा राजकीय पक्ष स्थापन झाला होता.  काँग्रेस, भारतीय जनता पार्टी (भाजप), किंवा भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) यासारख्या कोणत्याही प्रमुख राष्ट्रीय राजकीय पक्षांशी हा पक्ष संलग्न नव्हता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संकल्पना आणि धोरणे काय आहेत? (What is the concept of ncp and ideology of ncp?) 
 सुरुवातीच्या काळात, राष्ट्रवादीने एक मजबूत संघटनात्मक रचना तयार करण्यावर आणि महाराष्ट्रात आपला राजकीय पाया विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले.  पक्षाने आपला राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी इतर प्रादेशिक पक्षांसोबत युती करण्याचे काम केले.
 गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तो महत्त्वाचा खेळाडू बनला आहे.  हा पक्ष राज्यातील अनेक सत्ताधारी युतींचा एक भाग आहे आणि भारतीय संसदेतही त्याचे प्रतिनिधित्व केले आहे.
 आज, राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक आहे आणि इतर राज्यातही त्याचे लक्षणीय अस्तित्व आहे.  या पक्षाचे नेतृत्व शरद पवार करत आहेत, ज्यांना भारतातील सर्वात प्रभावशाली राजकारणी म्हणून ओळखले जाते.
 —

शरद पवार यांच्या परिवाराविषयी 

शरद पवार, प्रमुख भारतीय राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक, सार्वजनिक सेवा आणि राजकीय सक्रियतेचा दीर्घ इतिहास असलेल्या कुटुंबातून येतात.  पवारांनी राजकारणी म्हणून आपला ठसा उमटवलेल्या महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक विकासात त्यांच्या कुटुंबाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
बारामती आणि शरद पवार यांचे नाते काय? (How are Baramati and Sharad pawar related?)
 पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी महाराष्ट्रातील बारामती शहरात झाला.  त्यांचे वडील गोविंदराव पवार हे शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते होते ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता.  गोविंदराव पवार (Govindrao pawar) हे देखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते आणि त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले होते.
 शरद पवार यांचे भाऊ अप्पासाहेब पवार (Aapasaheb pawar) हे देखील महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय व्यक्तिमत्व होते.  भाऊसाहेब पवार हे मुंबई विधानसभेचे सदस्य होते आणि 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.
 शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha pawar) याही राजकारण आणि सामाजिक कार्यात सक्रिय असतात.  त्यांनी  महिला सक्षमीकरण आणि आरोग्यसेवा यासह अनेक सामाजिक उपक्रमांवर त्यांनी काम केले आहे.
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे नाते काय आहे? (How are Supriya Sule and Sharad pawar related?)
 शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे याही एक प्रमुख राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्या आहेत.  तिने भारतीय संसदेच्या सदस्या म्हणून काम केले आहे आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांचे नाते काय आहे? (How are Ajit Pawar and Sharad pawar Related?) 
 पवारांचे पुतणे, अजित पवार हे देखील एक प्रमुख राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत.  त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले असून राज्याच्या विकासात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
 पवार कुटुंबाला लोकसेवा आणि राजकीय कार्याचा मोठा इतिहास आहे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.  खुद्द शरद पवार हे भारतीय राजकारणातील पाच दशकांहून अधिक काळ महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व राहिले आहेत आणि भारतीय राजकारणातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
 —

Ajit Pawar Maharashtra Tour | विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून शरद पवारांच्या निर्णयाचे स्वागत

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Ajit Pawar Maharashtra Tour | विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून शरद पवारांच्या निर्णयाचे स्वागत

| विरोधी पक्षनेते अजित पवार उद्यापासून आठ दिवस पुणे, सातारा, उस्मानाबाद, लातूर, नाशिक दौऱ्यावर 

Ajit Pawar Maharashtra Tour | शरद पवार (Sharad pawar) साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे हा राज्यातील, देशातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन पदावर कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे. साहेबांनींच राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे, असा आग्रह धरत, अध्यक्ष निवड समितीने साहेबांच्या निवृत्तीचा निर्णय फेटाळून लावला आणि साहेबांनीच अध्यक्षपदी कायम रहावे, (NCP president) हा निर्णय एकमताने घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असून साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात आणि देशात उज्जवल यश संपादन करेल,” असा विश्वास व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. (NCP president News)
 साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर घेतला असून त्यांचे वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी, एकजुटीने आणि अधिक जोमाने काम करावे, साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करावा, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे. (Ajit pawar news)
साहेबांच्या सकारात्मक निर्णयानंतर आम्ही सर्वजण आता पुन्हा नव्या जोमाने पक्षाच्या कामाला लागलो आहोत. आज उशीरापर्यंत मुंबईत थांबल्यानंतर उद्या 6 तारखेला मी दौंड, कर्जत दौऱ्यावर जात आहे. 7 तारखेला बारामती, 8 तारखेला कोरेगाव, सातारा, 9 तारखेला सातारा, फलटण. 10 तारखेला उस्मानाबाद, लातूर, 11 तारखेला नाशिक आणि 12 तारखेला पुणे असा माझा दौरा कार्यक्रम असणार आहे, अशी माहितीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. (Ajit pawar Maharashtra tour)
००००००

NCP New Chief Hindi News|  समिति ने शरद पवार का इस्तीफा नामंजूर कर दिया | नया प्रमुख कौन होगा?

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र हिंदी खबरे

NCP New Chief Hindi News|  समिति ने शरद पवार का इस्तीफा नामंजूर कर दिया  नया प्रमुख कौन होगा?

NCP New Chief Hindi News| शरद  पवार (Sharad pawar) ने एनसीपी प्रमुख (ncp chief) के पद से हटने का फैसला किया है, लेकिन उनके इस्तीफे को चयन समिति ने खारिज कर दिया है।  समिति ने प्रस्ताव दिया है कि शरद पवार को पद पर बने रहना चाहिए।  प्रफुल्ल पटेल ने यह प्रस्ताव दिया है।  (NCP new chief Hindi news)
 मुंबई में एनसीपी के क्षेत्रीय कार्यालय में इस समय बैठक चल रही है।  सोलह सदस्यीय समिति ने पवार का इस्तीफा नामंजूर कर दिया है.  एनसीपी के कार्यालय के सामने कार्यकर्ताओं का हंगामा है।  कार्यकर्ता शरद पवार के नाम से ऐलान कर रहे हैं।  एक कार्यकर्ता ने अपने शरीर पर मिट्टी का तेल डालकर आत्मदाह करने का प्रयास किया।  उसे पुलिस ने हिरासत में लिया है।  (Sharad pawar News)
 शरद पवार ने मंगलवार को पद से हटने का फैसला किया है.  इससे पार्टी नेताओं, पदाधिकारियों व कार्यकर्ताओं में हड़कंप मच गया है।  नेता और कार्यकर्ता पवार से अध्यक्ष पद नहीं छोड़ने की गुहार लगा रहे हैं.  (Sharad pawar News)

NCP New Chief News | शरद पवार यांचा राजीनामा समितीने फेटाळला | कोण होणार नवीन अध्यक्ष? 

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

NCP New Chief News | शरद पवार यांचा राजीनामा समितीने फेटाळला | कोण होणार नवीन अध्यक्ष?

NCP New chief news : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन (NCP Chief) पायउतार होण्याचा निर्णय शरद पवार (Sharad pawar) यांनी घेतला आहे, पण त्यांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला आहे. शरद पवारांनीच पदावर कायम राहावं, असा प्रस्ताव समितीने मांडला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी या प्रस्ताव मांडला आहे. (NCP New Chief News)

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात सध्या बैठक सुरु आहे. सोळा सदस्यांच्या समितीने पवारांचा राजीनामा फेटाळला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरु आहे. कार्यकर्ते हे शरद पवार यांच्या नावानं घोषणा देत आहे. एका कार्यकर्त्याचा यावेळी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Sharad pawar news)

शरद पवार यांनी मंगळवारी पदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. पवारांनी अध्यक्षपद सोडू नये, यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांकडून त्यांची मनधरणी सुरू आहे. (NCP Sharad pawar)

NCP Pune Resigns news |  Finally all office bearers of NCP in Pune resigned

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

NCP Pune Resigns news |  Finally all office bearers of NCP in Pune resigned

NCP Pune Resigns  news |  NCP President Sharad Pawar has announced his resignation from the post of President.  The news was heard and all office bearers of NCP Pune in Pune resigned.  Activists gathered at NCP Bhavan to protest Sharad Pawar’s resignation.  All the activists present led by spokesperson Pradeep Deshmukh were present outside the party office.  (NCP Pune Resigns news)
 Speaking on the occasion, Deshmukh said, NCP is a family.  Pawarsaheb is the patriarch of the house.  A family elder can never retire.  Therefore, we are all adamant on resignation till the time sir does not change the decision.  (Sharad Pawar Latest News)
 All the workers were overwhelmed with emotions at this time. Tears were not stopping.  Announcements were being made to withdraw the resignation.  (NCP Pune Resigns news)
 Spokesperson Pradeep Deshmukh, Ravindra Malwadkar, Sadanand Shetty, Munalini Vani, Nilesh Nikam, Kaka Chavan Ajinkya Palkar, Vikram Jadhav, Faim Sheikh, Gurumit Singh Gill and other prominent activists were present in large numbers.  (Pune Rashtravadi news)