Budget 2024 News | अर्थसंकल्प 2024 | पुणे शहरातून संमिश्र प्रतिक्रिया 

Categories
Breaking News Commerce Political social पुणे

Budget 2024 News | अर्थसंकल्प 2024 | पुणे शहरातून संमिश्र प्रतिक्रिया

 

Budget 2024 News | अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अंतरिम अर्थसंकल्प 2024 (Budget 2024) सादर केला. याबाबत पुणे शहरातून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. जाणून घेऊया कोण काय म्हणाले. (Budget 2024 News)


विकसित भारताकडे जाणारा अर्थसंकल्प…

आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, ही पगारदार वर्गासाठी दिलासादायक बाब आहे. गरीब कल्याणाचा अजेंडा पुढे नेत महिला, शेतकरी, गरीब आणि युवा या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून केलेला आहे.

दहा वर्षांत करसंकलन तीन पटीने वाढले आहे असून २५ कोटी गरीब लोकांना दारिद्र्याबाहेर काढण्यात मोदी सरकारला यश आले, ही निश्चित समाधानाची बाब आहे.

१ कोटी कुटुंबियांना सोलर यंत्रणा देऊन ३०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा संकल्पही महत्त्वाचा ठरणारा आहे. शिवाय स्वतःचं घर साकारण्याची योजना, युवकांसाठी स्टार्टअप, लखपती दिदी योजना, महिला बचत गटांचे सक्षमीकरण, पायाभूत सुविधांसाठी उपलब्ध करुन दिलेला निधी या सर्व बाबी विकसित भारताची दिशा ठरवणाऱ्या आहेत. विकसित भारताच्या दिशेने जाणारा अर्थसंकल्प दिल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन !

मुरलीधर मोहोळ,
प्रदेश सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र


फसवे निराशाजनक बजेट – मोहन जोशी !

मोदी सरकारचे या टर्मचे अखेरचे अंतरिम अंदाजपत्रक भांडवलदारांना पूरक आणि गरीब व मध्यमवर्गीय जनतेला मारक असणार अपेक्षितच होते. त्या मुळेच या बजेटचे कोणीच स्वागत करताना दिसत नाही. बढ्या उद्योगपतींना पूरक धोरणे राबवून त्याच्यावरील कर कमी करून त्यांच्या नफेखोरीला या बजेट मध्ये प्रोत्साहन दिले आहे. मात्र गरीब व मध्यमवर्गीयांसाठी कररचनेत काहीही बदल न करता कोट्यावधी जनतेच्या तोंडाला मोदी सरकारने पाने पुसली आहेत. मध्यमवर्गीयांप्रमाणेच शहरी गरीब ग्रामीण भारत आणि शेतकरी या कुणालाच या फसव्या बजेटमुळे दिलासा मिळालेला नाही. त्यामुळेच मोदी राजवटीला पुन्हा बजेट मांडण्याची संधी मिळू नये. असेच नागरिकांना वाटत आहे.

मोहन जोशी.
– उपाध्यक्ष – महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी.


भारतीय जनता पार्टीची पराभूत मानसिकता उघड करणारा अर्थसंकल्प !

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प कोणतीही दिशा नसलेला स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिलाच अर्थसंकल्प असेल. टॅक्स स्लॅब मध्ये कोणतीही सूट न देणे ही बाब देशाची अर्थव्यवस्था किती दोलायमान स्थितीत आहे हे स्पष्ट करते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे आहे हे स्वतःच दिलेले वचन भारतीय जनता पक्षाने या अर्थसंकल्पातून पुसले आहे. युवकांच्या रोजगाराबाबत एक अक्षरही या अर्थसंकल्पातून मांडण्यात आलेले नाही.
देशातील जनतेच्या डोक्यावर महागाईचा डोंगर असताना जनतेला दिलासा देण्याचा कोणताही प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आलेला नाही. महिला, युवक, मध्यमवर्गीय व गरिबांसाठी हा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ शब्दफेक आहे. श्री. नरेंद्र मोदींच अपयश झाकण्यासाठी पोकळ आकड्यांची टाकलेली चादर एवढेच विश्लेषण या अर्थसंकल्पाचे करता येईल.

प्रशांत सुदामराव जगताप
पुणे शहराध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी


सबका साथ सबका विकास करणारे अंतरिम बजेट-प्रवीण चोरबेले

केंद्राचा अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर करत असताना सबका साथ सबका विकास करणारा हे बजेट सादर केले यामध्ये टॅक्स मध्ये कुठलाही बदल केला गेला नाही नवीन कर प्रणालीनुसार ७ लाख पर्यंत कुठलीही उत्पादन कर नाही व जुने परतावे २५ हजार पर्यंत आहे ते विड्रॉल केले जाणार असल्यामुळे एक दिलासा मिळणार आहे

सर्वसामान्यसाठी ५ वर्षात २ कोटी घर बांधणार व त्याचप्रमाणे स्वतःचे घर घेण्यासाठी आर्थिक मदत करणार त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे तेल बियाणेसाठी आत्मनिर्भर करणे व तसेच शेतमालाच्या साठवणुकीला प्राधान्य देणार व इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्राधान्य देणार,पर्यटन स्थळ विकसित करणार, असे चांगले निर्णय घेतल्यामुळे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा हा बजेट अत्यंत दिलासादायक आहे असे मत.दि पूना मर्चंट चेंबर मा.अध्यक्ष- प्रवीण चोरबेले यांनी व्यक्त केले


शेतकऱ्यांना गृहीत धरण्याच्या केंद्र सरकारच्या वृत्तीचा निषेध.
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं स्वप्नं दाखवून सलग दोन वेळा सत्तेत आलेल्या भाजपप्रणित सरकारने आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पातही शेतकऱ्यांना केवळ आश्वासनं देण्याचं काम केलं. खते, बी बियाणे, कीटक नाशक आणि शेती औजारांच्या वाढत्या किंमतीबद्दल अर्थ संकल्पात ब्र शब्द काढण्यात आला नाही. राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या खिशातून खाजगी कपंनीच्या नफेखोरीला उत्तेजन देणाऱ्या पंतप्रधान पिक विमा योजनेला पुन्हा प्रोत्साहन देण्याचेचं काम अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलें. इथेनॉल आणि कांदा निर्यात बंदीमुळे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हजारो कोटीं रुपयांचे नुकसान झालेले असताना त्यांच्या तोंडावर शेतकरी सन्मान निधीचे सहा हजार फेकून पुन्हा स्वतःची टिमकी वाजवण्याचे काम या अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. लाखों टन दूध पावडर आणि इतर दुग्धजण्य पदार्थ धूळ खातं पडून असल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना या क्षेत्राला पुन्हा दुर्लक्षित करण्यात आलं आहे. शेतमालाला दीडपट हमी भाव देणं आणि कृषी क्षेत्रातील स्टार्टप उद्योगाला बळ देण्याच्या आपल्याच संकल्पाचा या सरकारला जणू विसरच पडला असल्याचे चित्र आहे. तूरडाळ आणि खाद्य तेलाच्या आयतीला प्रोत्साहन पण आपल्याच शेतकऱ्यांच्या तूर, सोयाबीनला कवडीमोल भाव या दुटप्पी धोरणावर ही सरकार या अर्थ संकल्पात ठाम राहिलं आहे. खतांच्या अनुदानाला कात्री लावतं पुन्हा शेतकऱ्यांना फसवलं आहे. शेतकऱ्यांना गृहीत धरण्याच्या केंद्र सरकारच्या वृत्तीचा मीं काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो.
हनुमंत पवार, प्रवक्ता.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस.
———

उच्च शिक्षण क्षेत्रात संशोधन, नाविन्यता, उद्योजकता आणि पायाभूत सुविधा निर्मितीवर अर्थसंकल्पात भर | राजेश पांडे

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2024 चे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय सेवा योजना समितीचे सल्लागार सदस्य राजेश पांडे यांनी स्वागत केले आहे.

पांडे म्हणाले, पुणे हे शैक्षणिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे केंद्र बनत आहे. अर्थसंकल्पातील उच्च शिक्षणासाठी केलेल्या तरतुदींमुळे गुणवत्तापूर्ण आणि किफायतशीर दरात दर्जेदार शैक्षणिक सुविधा देणारे शहर अशी पुण्याची ओळख जगाच्या पाठीवर होऊ शकेल असा विश्वास वाटतो. तसेच शिक्षण क्षेत्रातील प्रगतीमुळे पुण्याच्या अर्थकारणाला मोठी गती मिळेल.

पांडे म्हणाले, उच्च शिक्षण क्षेत्रात संशोधन, नाविन्यता, उद्योजकता आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करताना ज्ञानसंपन्न विद्यार्थी हा मोठा आधार असणार आहे. त्यासाठी या अर्थसंकल्पाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

पांडे पुढे म्हणाले, अर्थमंत्र्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी 112 लाख कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी वेगाने आणि प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे. या अर्थसंकल्पामुळे खाजगी क्षेत्राचा शिक्षणातील सहभाग वाढणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी होणार असून, विद्यार्थ्यांना हायब्रीड मॉडेलच्या अंतर्गत अध्ययन सुविधा उपलब्ध होतील. पेपर फुटी आणि कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कायदा करण्याची घोषणा स्वागतार्ह असून, त्यामुळे पारदर्शकता येणार आहे. नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि नर्सिंग कॉलेजच्या उभारणीमुळे वैद्यकीय क्षेत्रातील भारतीय विद्यार्थ्यांच्या टॅलेंटला अधिक संधी मिळणार असून, भारतातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे.

Will tax slab change in 2024 | अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा : 1 कोटी करदात्यांना होणार फायदा

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश लाइफस्टाइल

Will tax slab change in 2024 | अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा : 1 कोटी करदात्यांना होणार फायदा

Budget 2024 Income tax Rates | अर्थसंकल्प 2024 प्राप्तिकर दर: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात कर दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.  आयात शुल्कासह सर्व प्रकारचे कर दर पूर्वीप्रमाणेच प्रभावी राहतील. (Budget 2024 News)
Budget 2024 Income Tax Rates |  अर्थसंकल्प 2024 प्राप्तिकर दर: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अंतरिम अर्थसंकल्प 2024 (Budget 2024) मध्ये मोठी घोषणा केली.  अर्थसंकल्प सादर करताना ते म्हणाले की, काही खूप जुनी कर प्रकरणे मागे घेतली जातील.  अशी प्रकरणे मागे घेतल्याने 1 कोटी करदात्यांना फायदा होईल.  त्याचबरोबर करविषयक वादही सोडवले जातील.  अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात कर दरांमध्ये (Tax slab in 2024) कोणताही बदल केलेला नाही.  आयात शुल्कासह सर्व प्रकारचे कर दर पूर्वीप्रमाणेच प्रभावी राहतील. (Will tax slab change in 2024?)
 अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, जुनी थकबाकी असलेली थेट कर मागणी मागे घेतली जाईल असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.  यामध्ये आर्थिक वर्ष 2010 पर्यंत 25,000 रुपयांपर्यंतची प्रकरणे आणि आर्थिक वर्ष 2011-2015 साठी 10,000 रुपयांपर्यंतची प्रकरणे समाविष्ट आहेत.  गेल्या ५ वर्षांत करदात्यांच्या सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे.  जीएसटीमुळे उद्योगांवरील अनुपालनाचा बोजा कमी झाला आहे.  जीएसटीचे सरासरी संकलन दुप्पट झाले आहे.  अर्थमंत्र्यांनी सांगितले की, कर सुधारणेमुळे करदात्यांची व्याप्ती वाढली आहे.
 आयकर स्लॅब्सवरील बजेट 2024: नवीन कर प्रणालीमध्ये कर स्लॅब?
 नवीन कर प्रणालीमध्ये, तुम्हाला 50,000 रुपयांची मानक वजावट मिळते आणि कॉर्पोरेट NPS मध्ये जमा केलेल्या पैशांवर कर सूट मिळते.  याशिवाय तुम्हाला कोणतीही सूट मिळत नाही.  नवीन कर प्रणालीमध्ये एकूण 6 स्लॅब आहेत.  आता टॅक्स स्लॅबचे दर काय आहेत ते जाणून घेऊया.
 नवीन कर प्रणालीमध्ये तुम्हाला 3 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही.
 3-6 लाख रुपयांपर्यंतच्या पगारावर 5% कर आकारला जातो, परंतु एकूण करपात्र उत्पन्न 7 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास, तुम्हाला कलम 87A अंतर्गत सूट मिळेल.
 6-9 लाख रुपयांपर्यंतच्या पगारावर 10% कर लागेल, परंतु करपात्र उत्पन्न 7 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास, तुम्हाला नफा होईल.
 9 ते 12 लाख रुपयांवर 15 टक्के कर आकारला जात आहे.
 12-15 लाख रुपयांच्या पगारावर तुम्हाला 20 टक्के कर भरावा लागेल.
 15 लाखांपेक्षा जास्त पगारावर तुम्हाला 30 टक्के कर भरावा लागेल.
 आयकर स्लॅबवरील बजेट 2024: जुन्या कर प्रणालीमध्ये 5 स्लॅब
 1- रु. 0 ते रु. 2.5 लाख
 पहिला स्लॅब 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या पगाराचा आहे, ज्यावर प्रत्येक करदात्याला कर सूट मिळते.  म्हणजेच तुमचे एकूण उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला एक रुपयाही कर भरण्याची गरज नाही.  तुम्हाला आयटीआर भरण्याचीही गरज नाही.
 2- 2.5 ते 3 लाख रुपये
 या अंतर्गत ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांवरील) आणि अति ज्येष्ठ नागरिक (८० वर्षांपेक्षा जास्त) यांना ५० हजार रुपयांची विशेष सवलत मिळते.  त्यांना 2.5 ते 3 लाख रुपयांच्या करपात्र उत्पन्नावरही कर भरण्याची गरज नाही.  म्हणजे त्यांना ३ लाख रुपयांपर्यंतच्या पगारावर कर सूट मिळते.
 3- 2.5 लाख ते 5 लाख रुपये
 तुमचे करपात्र उत्पन्न 2.5 लाख ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान असेल, तर तुम्हाला त्या उत्पन्नावर 5 टक्के दराने कर भरावा लागेल.  तथापि, तुमचे एकूण करपात्र उत्पन्न केवळ 5 लाख रुपयांपर्यंतच राहिल्यास, तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 87A अंतर्गत 12,500 रुपयांपर्यंत सूट मिळेल.  अशा प्रकारे तुमच्यावरील प्रभावी कर शून्य होईल.  मात्र, हा फायदा तुम्हाला आयटीआर फाइल केल्यावरच मिळेल.
 4- 5 लाख ते 10 लाख रुपये
 तुमचे करपात्र उत्पन्न 5 ते 10 लाख रुपयांच्या दरम्यान असेल तर तुम्हाला थेट 20 टक्के कर भरावा लागेल.  तथापि, आपण HRA, 80C अंतर्गत बचत, मुलांच्या शिक्षणावरील खर्च इत्यादींसह विविध खर्च आणि गुंतवणूकीद्वारे भरपूर कर वाचवू शकता.  समजा तुमचा पगार 10 लाख रुपये आहे आणि तुम्ही गुंतवणूक करून आणि खर्च दाखवून 5 लाख रुपये वाचवले, तर तुमचे कर दायित्व शून्य होईल, कारण तुमचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपये होईल.  जर तुम्ही फक्त 3 लाख रुपयांची वजावट घेऊ शकत असाल तर तुमचे करपात्र उत्पन्न 7 लाख रुपये असेल.  अशा प्रकारे, तुम्हाला २.५ लाख ते ५ लाख रुपयांच्या उत्पन्नावर ५ टक्के आणि त्यानंतर ५ ते ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के दराने कर भरावा लागेल.
 5- 10 लाखांपेक्षा जास्त
 तुमचे करपात्र उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला 30 टक्के कर भरावा लागेल.  लक्षात ठेवा की येथे करपात्र उत्पन्न म्हणजे सर्व प्रकारच्या कपाती आणि सूट मिळाल्यानंतर शिल्लक राहिलेले उत्पन्न.  त्यावर कर आकारला जातो.

Reaction | Union Budget | केंद्रीय बजेट बाबत राजकीय पक्षांच्या काय आहेत प्रतिक्रिया? | वाचा सविस्तर

Categories
Breaking News Commerce Political पुणे

केंद्रीय बजेट बाबत राजकीय पक्षांच्या काय आहेत प्रतिक्रिया? | वाचा सविस्तर

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज केंद्रीय बजेट सादर केले. याबाबत शहरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपकडून याचे स्वागत करण्यात आले आहे. तर विरोधी पक्षाकडून मात्र याला निवडणूक बजेट असे संबोधण्यात आले आहे.

 

1. मध्यम वर्गीय लोकांना अपेक्षित असलेली आयकरात सवलत मिळालेली नाही. आयकरा मध्ये जी काहो थोडी सवलत मिळाली आहे ती नवीन आयकर प्रणाली प्रमाणे ( sec. 115BAC) जे लोक आयकर पत्रक भारतात त्यांना देण्यात आली आहे. जुन्या आयकर प्रणाली प्रमाणे जे लोक आयकर पत्रक भरतात त्यांना सवलत नाही.
नवीन आयकर प्रणाली चे तोटे हे आहेत की भारतातील मध्यम वर्गाची बचतीची सवय संपुष्टात येईल कारण जुन्या करप्रणाली प्रमाणे नवीन करप्रणाली बचतीसाठी प्रोत्साहन देत नाही म्हणजे बचती वर कर सवलत देत नाही. आणि त्याचे दूरगामी परिणाम काही वर्षानी मध्यम वर्गीय लोकाना भोगावे लागतील.
2. मध्यम वर्गीय लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुधा अंदाज पत्रकात कोणतीही भरीव अशी वाढ केलेली नाही. आरोग्य क्षेत्राची काय परिस्थिती आहे हे आपण मागील दोन वर्षांत अनुभवले आहे.
सरकारने कमीत कमी आरोग्य विमा वरील GST तरी कमी करावा.
3. अंदाज पत्रक हे ज्या राज्यामध्ये निवडणुका होणार आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून सादर केले आहे. उदा. अंदाजपत्रकात कर्नाटक चा केलेला उल्लेख.

गजानन थरकुडे
शिवसेना शहर प्रमुख पुणे


“मोदी सरकारचा अर्थसंकल्प २०२४च्या निवडणुका डोळ्यांसमोर केवळ लॉलीपॉप देणारा अर्थसंकल्प” – शहराध्यक्ष प्रशांत जगताप.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२३-२४ वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. एकूणच हा अर्थसंकल्प आहे की २०२४ च्या निवडणुकांसाठीचा जाहीरनामा असा प्रश्न यातून पडतो. सर्वच वर्गांना चुचकारण्याचा प्रयत्न करताना अर्थमंत्र्यांनी गेल्या ९ वर्षातील अपयशच समोर उघड केले. सप्तर्षी अर्थसंकल्पात अनेक जुन्याच योजनांसाठी निधीची तरतूद वा त्यांना नवे आवरण चढवून अर्थमंत्र्यांनी सादर केले. याचाच अर्थ अनेक वर्षे या योजनांवर काम सुरू असूनही प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नसल्याचे दिसते.

देशाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक १५% जी.डी.पी चा वाटा देणाऱ्या
महाराष्ट्राला अर्थसंकल्पात वेळोवेळी डावलले जात आहे. आजच्या अर्थसंकल्पातही अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी विशेष घोषणा केल्या नाहीत. केंद्राकडून जीएसटीचे १३ हजार कोटी २१५ थकीत आहेत. महाराष्ट्राला दोन वर्षांचा परतावा मिळालेला नाही. सर्वाधिक जीएसटी संकलन देशाला देणाऱ्या महाराष्ट्राला प्रत्येक वेळी अर्थसंकल्पात डावलणे योग्य नाही. कर्नाटकच्या दुष्काळासाठी ५ हजार ३०० कोटी मंजूर करण्यात आले, पण महाराष्ट्रातील ओला दुष्काळ अर्थमंत्र्यांना दिसलेला नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंकडे अर्थमंत्र्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे.

देशात बेरोजगारी ही अत्यंत गंभीर समस्या आहे. अर्थमंत्र्यांनी पीएम कौशल्य विकास योजना पुढील तीन वर्षांसाठी राबवली जाणार असल्याचे तसेच ४७ लाख युवकांना ३ वर्षांसाठी भत्ता देणार असल्याची घोषणा केली. आयटी क्षेत्र तसेच स्टार्ट अप मधील सुमारे २० हजार नोकऱ्या पुढील सहा महिन्यात जाणार असल्याची भीती आहे. असे असताना नवीन प्रशिक्षीत बेरोजगार निर्माण होण्याची भीती आहे. आहेत तेच रोजगार जात असताना बेरोजगारीला आळा कसा घालणार, रोजगारनिर्मितीसाठी काय करणार याकडे अर्थमंत्र्यांनी लक्ष देणे अपेक्षित आहे.

स्मार्ट सिटीसारख्या योजनेऐवजी आता सस्टेनेबल सिटीजची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.पुण्यासह देशात सर्व स्मार्ट सिटी बनवण्यात केंद्र सरकारला आलेले अपयश आपण पाहिले आहे. त्यामुळे आता केंद्राने यातून हात झटकून घेतले असून योजनेला नव्या आवरणात गुंडाळून त्याची जबाबदारी आता राज्यांवर ढकलली असल्याचे दिसते.


मुंगेरीलाल के हसिन सपने

केंद्र सरकारचा हा अर्थसंकल्प सन २०२४ ची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केला गेला आहे. प्रत्यक्षात कोणाच्याही पदरी काहीच पडलेले नाही. पुण्यासारख्या एका वेगाने वाढणाऱ्या शहराकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. वास्तविक पुणे शहराने भारतीय जनता पक्षाला सत्तेचे भरभरून दान दिले, मात्र पुण्याला त्यांच्याकडून कधीही काहीच मिळालेले नाही. फक्त घोषणा करण्यात येत आहेत. स्थनिक स्वराज्य संस्थांना कर्जरोखे जाहीर करण्याची परवानगी त्यांनी देण्याआधीच पुणे महापालिकेने २०० कोटी रूपयांचे कर्ज काढून पुणेकरांच्या माथी त्याचा बोजा टाकला आहे. ठोस असे काहीच या अर्थसंकल्पात दिसत नाही. प्रत्येकाला खूश करणाऱ्या घोषणा मात्र भरमसाठ आहेत. ही सगळी मुंगेरीलालची गोडगोड स्वप्न आहेत, त्याने बेरोजगारी, महागाई दूर होणारी नाही. सगळीच निराशा आहे.

मोहन जोशी- प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस.


प्रगती आणि विकासाच्या मार्गावर नेणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प | भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाला प्रगती आणि विकासाच्या मार्गावर नेणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल असा विश्वास भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला.

मुळीक म्हणाले, आयकरात मोठी सवलत दिल्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक केली जाणार असल्यामुळे पुण्यासारख्या शहरात मूलभूत सुविधांसाठी मोठा निधी उपलब्ध होईल. त्यामुळे उद्योग निर्मितीला चालना मिळेलउद्योग निर्मितीला चालना मिळेल.

मुळीक म्हणाले, युवकांसाठी स्टार्टअपच्या विविध योजना मांडण्यात आल्या आहेत. त्याबरोबर लघु उद्योगातून रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.

मुळीक पुढे म्हणाले, महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे. एससी, एसटी आणि ओबीसी समाजाच्या योजनांना भरपूर निधी दिला आहे. त्यामुळे सर्व समाज घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प आहे. मी त्याचे मनापासून स्वागत करतो.


सहकारातून समृद्धीकडे जाणारा हा अर्थसंकल्पीय बजेट सादर…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी सलग पाचवा अर्थसंकल्प सादर करत असताना वेगवेगळ्या वर्गांना खुश करणारा यात सर्व घटकांचा विचार करणारा आत्मनिर्भर भारत बनवण्याचा व स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा बजेट अत्यंत महत्त्वपूर्ण असं बजेट आहे या बजेटमध्ये भरड धान्यसाठी व लागवडीसाठी विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे नवीन उद्योगधंद्यांना आर्थिक मदत करणार व त्याचप्रमाणे बॅटरीवर चालणाऱ्या सर्व गाड्या स्वस्त होणार तसेच मध्यमवर्गीय लोकांना अत्यंत महत्त्वपूर्ण की त्यात ७ लाख उत्पन्न असणारे आयकारातून सूट व त्याप्रमाणे डाळी साठवणुकीसाठी विशेष हब उभारणार व त्याप्रमाणे कोल्ड स्टोरेज साठी विशेष योजना असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आले दिसले म्हणून हा बजेट देशाच्या विकासासाठी प्रगती कडे नेणारा हा बजेट आहे
———
प्रवीण माणिकचंद चोरबेले
मा अध्यक्ष दी पुना मर्चंट चेंबर
संपादक वाणिज्य विश्व

Union Budget 2023-24 | केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24ची ठळक वैशिष्ट्ये

Categories
Breaking News Commerce cultural Education PMC Political social Sport आरोग्य देश/विदेश पुणे महाराष्ट्र लाइफस्टाइल शेती

Gas subsidy | Petrol-diesel price | पेट्रोल डिझेल नंतर घरगुती गॅस वरही सबसिडी | किती जाणून घ्या!

Categories
Breaking News Political social देश/विदेश महाराष्ट्र

पेट्रोल डिझेल नंतर घरगुती गॅस वरही सबसिडी

सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे आठ आणि सहा रुपयांनी कपात केली. यानंतर पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत. याशिवाय, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे केंद्राला दरवर्षी जवळपास सहा हजार कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. मात्र, या निर्णयामुळे माता-भगिनींची विस्कटलेली आर्थिक गणितं स्थिर होण्यास मदत होणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.

देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीमध्ये 123.46 रुपये प्रति लिटर, तर आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये डिझेल 107.61 रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी, पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 91.45 रुपये आणि डिझेल 85.83 रुपये प्रति लिटर असून, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा आजचा दर 96.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 104.77 रुपये दराने विकले जात आहे. मात्र, आता उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहेत.

निर्मला सीतारामन म्हणाल्या, “पंतप्रधान मोदींनी जेव्हापासून पदभार स्वीकारला, तेव्हापासून केंद्र सरकार गरीबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे. आम्ही गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या मदतीसाठी अनेक पावले उचलली आहेत. परिणामी, आमच्या कार्यकाळात सरासरी महागाई दर पूर्वीच्या सरकारांच्या तुलनेत कमी आहे.”

Union Budget 2022 : NIrmala Sitharaman : काय स्वस्त, काय महाग?; ‘बजेट’नंतर पैसे कुठे वाचणार, कशावरचा खर्च वाढणार…

Categories
Breaking News Commerce Political देश/विदेश

काय स्वस्त, काय महाग?; ‘बजेट’नंतर पैसे कुठे वाचणार, कशावरचा खर्च वाढणार…

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थमंत्री म्हणून आपला चौथा 2022 चा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी देशातील पायाभूत सुविधांसाठी यावेळी मोठ्या घोषणा केल्या. यंदाच्या अर्थसंकल्पात २०४७ पर्यंतची रुपरेषा असल्याचं सांगत ‘पीएम गतिशक्ती योजने’च्या ‘मास्टर प्लान’वर सरकार काम करत असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. गतिशक्ती योजनेअंतर्गत रस्ते, रेल्वे, जलवाहतुकीसाठी येत्या काळात मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. पण देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात राज्य सरकारांनी देखील पुढाकार घेऊन सहभाग घेणं आवश्यक असल्याचंही सीतारामण म्हणाल्या. cheaper and costlier in budget 2022

अर्थव्यवस्थेचा सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होत असतो. त्यामुळेच, यंदाच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना काय मिळालं, काय स्वस्त झालं आणि काय महागलं याची चर्चा होत असते. त्यामुळे, यंदाच्या बजेटमध्ये काय स्वस्त झालं, काय महाग झालं हे खालीलप्रमाणे पाहता येईल. cheaper things in budget 2022

स्वस्त

कपडे, चामड्याचा वस्तू
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू
मोबाईल फोन, चार्जर
हिऱ्याच्या वस्तू, दागिने
शेतीची अवजारे
कॅमेरा लेन्सेस स्वस्त होणार
विदेशातून येणाऱ्या मशिन्स
चप्पल आणि बुट्स
इंधन स्वस्त होण्याची शक्यता
इम्पोर्टेड केमिकल स्वस्त होणार

महाग 

छत्र्या महाग होणार
क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक महाग

अर्थसंकल्पात Digital वर जास्त भर

 

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थमंत्री म्हणून आपला चौथा Union Budget 2022 अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी देशातील पायाभूत सुविधांसाठी यावेळी मोठ्या घोषणा केल्या. यंदाच्या अर्थसंकल्पात २०४७ पर्यंतची रुपरेषा असल्याचं सांगत ‘पीएम गतिशक्ती योजने’च्या ‘मास्टर प्लान’वर सरकार काम करत असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.

अर्थसंकल्पामध्ये फिनटेक आणि  डीजीटल वर भर देण्यात आला आहे. एटीएम, नेटबँकिंग, पेमेंट अॅप्सद्वारे टपाल बचत इंटरऑपरेबल करून ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण लोकांची सोय केली जाणार आहे. RuPay आणि UPI द्वारे एमडीआर फीमध्ये सबसिडी देण्याचा निर्णय एक सकारात्मक पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी २०२२-२३ मध्ये ई-पासपोर्ट जारी करण्यात येणार आहे पासपोर्ट मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करून प्रक्रिया सोपी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे अर्थमंत्री यांनी सांगितले. तसेच २०२२च्या अखेरपर्यंत पोस्ट ऑफिसेसमध्ये बँकिंगशी संबंधित सर्व सुविधा मिळणार आहे. २०२२ मध्ये देशात ५ जी सेवा सुरू होणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले आहे.

पिकांच्या मूल्यांकनासाठी, जमिनीच्य डिजिटल नोंदणीसाठी, किटक नाशकांच्या फवारणीसाठी किसान ड्रोन्सचा वापर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणासाठी १०० चॅनेल्स सुरू करणार असून विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत शिकवण्यात येणार, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. तसेच रेडिओ, टीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार, अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे २०२२-२३ मध्ये आरबीआय डिजिटल चलन आणणार असल्याचंही निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सांगितलं आहे.