Policy for property built up | PMC | फक्त आमदार, नगरसेवक सांगतात म्हणून मिळकत (property) नाही बांधता येणार 

Categories
Breaking News PMC पुणे

फक्त आमदार, नगरसेवक सांगतात म्हणून मिळकत (property) नाही बांधता येणार

: संबंधित खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र(NOC) घ्यावे लागणार

पुणे |  पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांकरिता बांधण्यात येणाऱ्या वास्तूंचे वाटप/हस्तांतरण करताना संबंधित विभागाची वास्तू विषयक निकड विचारात न घेता भवन रचना विभागाकडून अथवा संबंधित आमदार निधी, स यादीमधून मोकळ्या आरक्षित जागी बांधकाम करून विकसित करण्यात येतात. त्यामुळे मात्र काही वास्तूंचा विनियोग न होता त्या तशाच पडून राहतात. त्यामुळे महापालिकेचे करोडो रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने जुनी पद्धत बदलून एक नवी कार्यप्रणाली ठरवून घेतली आहे. यापुढे फक्त आमदार किंवा नगरसेवक सांगतात म्हणून मिळकत बांधता येणार नाही. त्यासाठी महापालिकेच्या संबंधित खात्याची NOC घ्यावी लागणार आहे. मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाने हा निर्णय घेतला आहे.

विविध विभागांकरिता बांधण्यात आलेल्या वास्तूंचे/मिळकतींचे हस्तांतरण भवन रचना विभागाकडून मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडे, मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडून संबंधित विभागाकडे (उदा. समाज विकास विभाग, क्रीडा विभाग, सांस्कृतीक विभाग, क्षेत्रीय कार्यालय, अग्निशमनविभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, आरोग्य विभाग इ. ) यांना हस्तांतरित करण्यात येते. व तद्नंतर संबंधित विभागाकडून त्या मिळकतीचा विनियोग करण्यात येतो अशी कार्यपद्धती अस्तित्वात आहे.

तथापि सदर वास्तूंची संबधीत विभागाकडून मागणी नसल्याने व संबंधित विभागाकडून ना-हरकत घेतलेली नसल्याने सदर वास्तू / बांधीव मिळकती ताब्यात घेण्यास नकार दिला जातो व त्यावास्तू विनावापर रिक्त राहतात. त्यामुळे सदर मिळकतीमध्ये अतिक्रमण होण्याची किंवा गैरवापर होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. यामुळे महानगरपालिकेने बांधकामासाठी केलेला निधीचा अपव्यय होतो व विनियोगाअभावी सदर मिळकती विनावापर पडून राहत असल्याने वास्तूंचे जतन व संरक्षण करता येत नाही व मनपाचे आर्थिक नुकसान होते.
ही  वस्तुस्थिती विचारात घेता सदर कार्यप्रणाली मध्ये बदल होणे आवश्यक असून भवन रचना विभागाकडून अथवा क्षेत्रीय कार्यालयाकडून मिळकतीचे बांधकाम करण्यापूर्वी संबधित खात्याची वास्तूविषयक मागणी आहे अगर नाही, याबाबत संबधीत खात्याची ना-हरकत प्राप्त करूनच मिळकत विकसित करणे/ बांधकाम करणे आवश्यक वाटते. या प्रणालीनुसारच आता काम चालणार आहे.

PMC Election : NOC : Corporators : NOC साठी नगरसेवकांची लगबग! 

Categories
Breaking News PMC Political पुणे

NOC साठी नगरसेवकांची लगबग!

पुणे : महापालिका निवडणुकीची(PMC ELECTION) रणधुमाळी आता सुरु झाली आहे. उद्या प्रभाग रचना जाहीर होईल. त्यांनतर सगळ्यांचीच गणिते सुरु होतील. इच्छुक आणि प्रस्थापित नगरसेवक(Corporators) पुन्हा निवडून येण्यासाठी बाजी पणाला लावतील. त्यासाठी आता सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी कंबर कसली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नगरसेवक महापालिका प्रशासनाकडे ना हरकत प्रमाणपत्र(NOC) घेण्यासाठी पत्रं देत आहेत.

: उद्या जाहीर होणार प्रभाग रचना

राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना मंजूर केली आहे. आता पुढचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने (election commission) आखून दिला आहे. त्यानुसार उद्या म्हणजे 1 फेब्रुवारी ला प्रभाग रचना जाहीर होईल. त्यांनतर सर्वांना प्रभाग कळतील आणि पुढील व्यूहरचना आखली जाईल. त्यासाठी इच्छुकांचे डोळे रचनेकडे लागले आहेत. 2 मार्च ला ही प्रक्रिया अंतिम होईल. त्यानंतर पुढचा कार्यक्रम जाहीर होईल.

: सर्व खात्याकडे दिली जाताहेत पत्रं

 दरम्यान आताच्या नगरसेवकांचा कालावधी 14 मार्च रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे हे लोक देखील कंबर कसून कामाला लागले आहेत. हे नगरसेवक 4 च्या प्रभागात निवडून आले होते. आता तीन चा प्रभाग होणारआहे. त्यामुळे सर्वच गणिते बदलणार आहेत. कारण आहे त्या प्रभागात नवीन भाग जोडला जाऊ शकतो किंवा कमी देखील होऊ शकतो. असे असले तरीही नगरसेवकांना आत्मविश्वास आहे की पुन्हा एकदा आपण आपल्या प्रभागातून निवडून येणार आहे. त्यामुळे हे नगरसेवक आपल्या आणि लगतच्या प्रभागातील कामे करण्यासाठी पुढील बजेट मध्ये तरतुदी सुचवत आहेत. 5 कोटी पासून ते 500 कोटी पर्यंत ही कामे सुचवण्यात आली आहेत. गेल्या 2 आठवड्यापासून प्रशासनाकडे अक्षरशः नगरसेवकांच्या पत्रांचा पाऊस पडला आहे.
 
त्यांनतर आता हे नगरसेवक ना हरकत प्रमाणपत्रासाठी लगबग करत आहेत. त्यानुसार आमच्याकडे कुठल्याही खात्याची थकबाकी नाही, अशी विचारणा महापालिका प्रशासनाकडे करत आहेत. पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी हे दस्तावेज महत्वाचे ठरतात. त्यामुळे ही लगबग सुरु असून सर्व खात्याकडे अशी पत्र दिली जात आहेत.