MLA Sunil Tingre | वाड्यांबाबत अभिप्राय देणाऱ्यांना निलंबित करा | आमदार टिंगरे यांची चौकशीची मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

MLA Sunil Tingre | वाड्यांबाबत अभिप्राय देणाऱ्यांना निलंबित करा | आमदार टिंगरे यांची चौकशीची मागणी

 

MLA Sunil Tingre | नागपूर : ‘पुणे शहराच्या मध्यभागात झोपडपट्टी पुनर्वसनाच्या (SRA) नावाखाली’ जुन्या वाड्यांचा (Old Wadas) पुनर्विकास करण्याचा घाट घालून कोट्यवधी रुपयांचे हस्तांतरणीय विकास हक्क (TDR) लाटण्याचा प्रयत्न झाला आहे. वाड्यांना झोपडपट्टीसदृश असल्याचे अभिप्राय देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांचे निलंबन करावे,’ अशी मागणी आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी विधानसभेत केली. (Pune Municipal Corporation)

पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) घोषित केलेल्या झोपडपट्ट्यांनाच झोपडपट्टी पुनर्विकासाच्या सवलती देण्यात येतात. असे असतानाही वाड्यांनाच झोपडपट्टी दाखवून पुनर्विकासाचे फायदे लाटण्यात येत असल्याचा प्रकार महापालिकेत उघडकीस आला आहे. या प्रकरणात आमदार टिंगरे यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.

आमदार टिंगरे म्हणाले, ‘पुणे महापालिकेत टीडीआर घोटाळा समोर आला आहे. विकासकाकडून महापालिका आणि ‘एसआरए’च्या अधिकाऱ्यांशी संगनमत जुन्या वाड्यांना झोपडपट्टीसदृश दाखविण्यात येत आहे. या वाड्यांमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंना झोपडपट्टीधारक दर्शवण्यात येत आहे. या वाड्यांच्या पुनर्विकासासाठी ‘एसआरए’च्या नियमावलीनुसार ‘टीडीआर’ निर्माण करण्यात येत असून, पुणे शहरात अशा प्रकारे ७० झोपडपट्टीसदृश वाडे विकसित करण्याचा प्रयत्न झाला आहे. महापालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या अभिप्रायामुळे हा ‘टीडीआर’ निर्माण झाला आहे. निर्माण झालेला ‘टीडीआर’, त्याची झालेली विक्री ही एक प्रकारची फसवणूक आहे. या प्रकरणात त्वरित कारवाई करून असे अभिप्राय देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे.’

Old Wada In Pune | धोकादायक वाडे उतरवण्यासाठी 91 लाखांचा खर्च | स्थायी समितीची मान्यता

Categories
Breaking News PMC social पुणे

Old Wada In Pune | धोकादायक वाडे उतरवण्यासाठी 91 लाखांचा खर्च | स्थायी समितीची मान्यता

Old Wada In Pune | (Author: Ganesh Mule) | पुणे शहरातील (Pune city) सी 1 प्रवर्गात (C 1 Category) मोडणारे म्हणजेच अति धोकादायक वाडे (Dangerous Old Wada)  उतरवले जात आहेत. महापालिका प्रशासनाने (Pune Municipal Corporation) त्याचे काम सुरु केले आहे. संबंधित वाडा मालकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली होती. जनक इंटरप्रायजेस ला हे काम देण्यात आले आहे. वर्षभरासाठी 91 लाखांचा खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिली आहे. (Old Wada in Pune)

पुणे शहरातील धोकादायक वाडे/इमारती यांचे सर्वेक्षण करणेचे काम  (Pune city old wada survey) टेक ब्युरो इंजि. प्रा.लि. (Tech beuro engineer private limited) यांचेकडून बांधकाम विभागाकडून चालू आहे. पुणे शहरात अंदाजे अडीच ते तीन हजार वाडे (old Wada) असून या सर्वेक्षणा अंतर्गत आज अखेर सुमारे १२०० वाडे / इमारतींचे सर्वेक्षण (Old wada survey) करण्यात आले आहे. त्यापैकी ३० वाडे अतिधोकादायक (सी१) या प्रवर्गात असल्याचा अहवाल टेकब्युरो इंजि.प्रा.लि. यांचेकडून प्राप्त झाला आहे. धोकादायक वाड्यांना नोटीसा (notices) बजावण्यात आल्या आहे. तसेच उर्वरीत सर्वेक्षण ३० मे २०२३ पर्यत पूर्ण करण्यात आले.  सुमारे ३० ते ४० वाडे अतिधोकादायक (सी१) या प्रवर्गात आहेत. यातील काही वाडे उतरवले देखील आहेत. (Pune old Wada news)

 पुणे शहरातील जुने वाडे हे बहुतांशी लाकडी बांधकामातील वैशिष्ट्यपूर्ण संरचनेमध्ये असून पावसाळ्यामध्ये अतिधोकादायक वाडे / इमारती पडण्याची शक्यता जास्त असते.  शासन परिपत्रकाचे अनुषंगाने तसेच दुर्घटना होऊ नये. याकरिता हे धोकादायक वाडे /इमारती पावसाळ्यापुर्वी निष्कासित करणे आवश्यक आहे.  त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली.  (Pune Municipal Corporation News)

चार टप्यात वर्गीकरण कसे ?

 सी-१ म्हणजे राहण्यास योग्य नाही, तात्काळ निष्कासित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत. सी-२ ए म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे. सी-२ बी म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणे. आणि सी-३ म्हणजे इमारतींची किरकोळ दुरुस्ती करणे असे चार टप्यात वर्गीकरण केले जात आहे. तशी सूचना पालिका प्रशासनाकडून इमारतींना देण्यात येते. (PMC Pune Marathi News)
—–
News Title | Old Wada In Pune | 91 lakhs spent to demolish dangerous mansions Approval of Standing Committee

Pune News | पुण्यातील वाड्यांचा विकास होणे अवघड | भाजपा ने पुणेकरांवर सूड उगवला 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune News | पुण्यातील वाड्यांचा विकास होणे अवघड | भाजपा ने पुणेकरांवर सूड उगवला

| कॉंग्रेस नेत्यांचा आरोप

Pune News | निवडणुकीत भाजपाने (BJP) आश्वासन दिले होते की जुन्या वाड्याचा (Old Wada) विकास करण्यासाठी आम्ही किमान 2 FSI करू. परंतु पुन्हा एकदा सरकारने पेठामध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे पुण्यातील वाड्यांचा विकास होणे अवघड झाले आहे. भाजपा ने पुणेकरांवर सूड उगवला आहे. असा आरोप कॉंग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Congress MLA Ravindra Dhangekar), कॉंग्रेस नेते मोहन जोशी (Mohan Joshi) आणि संजय बालगुडे (Sanjay Balgude) यांनी केला. (Pune News)

कॉंग्रेस नेत्यांनी दिलेल्या निवेदनानुसार पुणे शहराचा विकास आराखडा (Pune Devlopment Plan) सन 2013-14 मध्ये प्रकाशित झाला. त्या वेळेस शहरातला गावठाण भाग विशेषता पेठामध्ये बांधकामाला 1.5 FSI करण्यात आला होता. या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता व सभागृहात तसेच राज्य सरकारने हरकती सूचना मागवल्या होत्या. त्यावेळेस पुण्यातील पेठामध्ये राहणाऱ्या नागरिकांवर अन्यायकारक आहे अशी हरकत व सूचना केली होती. पुण्यातील गावठाणात आलेले जुने वाडे व त्यात राहणारे नागरिक अक्षरश 60 ते70 स्क फूट घरात राहत आहेत, भाडेकरूंना पुनर्वसन करण्यासाठी व वाड्यांच्या विकास करायचा असेल तर 2.50 FSI द्यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. (Pune Municipal Corporation)

सन 2015 मध्ये भाजप सरकारने मनपा कडून विकास आराखडा स्वतःच्या ताब्यात घेतला व तो प्रकाशित केला. परंतु त्यात सुद्धा पुणेकरांना गावठाण भागात 1.50 FSI. ठेवण्यात आला होता. त्यावर निवडणुकीत भाजपाने आश्वासन दिले होते की जुन्या वाड्याचा विकास करण्यासाठी आम्ही किमान 2 FSI करू.परंतु पुन्हा एकदा सरकारने पेठाया मध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे पुण्यातील वाड्यांचा विकास होणे अवघड झाले आहे. असा आरोप या नेत्यांनी केला आहे. (PMC Pune)

तसेच वाड्याचा व पेठामधील घरांचा विकासाला 1 मीटर साईड मार्जिन सोडावी लागणार असे समान विकास नियमावलीत (U.D.C.P.R) सन 2020 मध्ये नमूद करण्यात आले होते. याबाबत आपण 1 मीटरची अट रद्द करू असे आश्वासन भाजपाच्या नेत्यांनी अनेक वेळा दिली व कसबा पोटनिवडणुकीत सुद्धा दिले होते परंतु साईड मार्जिनची अट सुद्धा तशीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या पुण्याचा विकास ठप्प होणार आहे. पुणेकरांनी भाजपा ला 100 नगरसेवक 4आमदार 1खासदार दिले. त्या बदल्यात  पुणेकरांवर भाजपाने सूड उगवला आहे. असा आरोप या नेत्यांनी केला आहे. (Pune News)


News Title | Pune News | It is difficult to develop palaces in Pune BJP took revenge on the people of Pune| Allegation of Congress leaders

Old Wada | जुन्या वाड्यांसाठी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करु | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

Categories
Breaking News PMC Political social पुणे

शनिवार वाडा परिसरातील जुन्या वाड्यांसाठी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करु

| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

पुणे | पुण्यातील शनिवार वाडा परिसरातील जुन्या वाड्यांचे पुनर्निर्माण करण्यास अनेक अडथळे आहेत. त्यामुळे इथल्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करुन मार्ग काढू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली.

पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंच्या १०० मिटर परिसरातील बांधकामांना आणि दुरुस्तीला पुरातत्व विभागाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सदर परिसरातील अनेक बांधकामे धोकादायक परिस्थितीत आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज स्थानिकांची भेट घेऊन जुन्या वाड्यांची पाहाणी केली.

 

या पाहणीनंतर पालकमंत्री पाटील म्हणाले की, पुरातत्व विभागाच्या परिपत्रकामुळे पुण्याचा मध्यभाग असलेल्या शनिवार वाड्याच्या शंभर मिटर परिसरात नव्याने बांधकाम किंवा दुरुस्ती करता येत नाही. शहरातील अन्य ठिकाणीदेखील अशी समस्या येत आहे. याबाबत राज्य शासनाची भूमिका सकारात्मक आहे. मात्र याबाबतचे पुरातत्व विभागाशी संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित असल्याने त्याबाबतची माहिती घेऊन बांधकामांना स्थगिती नसल्यास पुरातत्व विभागाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, त्यासाठी स्थानिकांना सोबत घेऊन दिल्लीत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.